रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Zee 5 वर कालचा भाग पहातोय Uhoh

सुरुवातीलाच दत्ता काय अण्णाचे ताक पिऊन आलेला..?? Seriously?? मला तर तो अतिशय थकलेला , अण्णांनी दहा मीटर दोराचा घेर त्याच्या पोटाच्या घेराभोवती बांधून पंचवीस नारळ चढायला लावल्याने दमलेला दत्ता वाटला..
फारच मरगळल्यासारखा चालत येतो.. Uhoh

अण्णाच्या ताकवाल्याने दत्ताला बहुतेक न चढणारे ताक दिले असेल Proud

माई म्हणते, हे विष का घेतलंस, तर तेव्हा मला वाटलेले की तो खरोखर विष पिऊन आला Lol

च्या मारी, सरिता तर पाटणकरिण कडे पण नाय... Sad
कसला शब्दात घोळवलंय पण तीने अण्णांना ... अण्णा वचन द्या म्हणे की तुम्ही सरिता ला घेउन याल.... आणि त्या वर छाया चा महा बेरकी रिस्पॉन्स !! हा हा हा मजा आली !

मला वाटतां सरिता पाटणकरणीकडेच असतंला. तिने आण्णाक वचन दियां लावल्यानी म्हणजे पाटणकरणीच्याच घरी असतंलंय आपली सरिता. पाटणकरणीनं काल आण्णाक 'ऑल लाईन क्लीअर' सिग्नल दिल्यान म्हणुन आण्णान वचन दिलंय. आज रात्रीक सरिता नाईकांचो वाड्यात अन आण्णा पाटणकरणीकडं असतंय का नाय तां बघाच.

पण काल मला सरिताच्या वडिलांचं फार वाईट वाटलं. माझ्याही डोळ्यात पाणी आलं इतकी छान आणि सुंदर वठवलिये त्यांनी ती भुमिका.
एखाद्या बापाने किती हतबल असावं. Sad Sad Sad

बाकी दत्तकं काय ताक पिऊन झिंगायची अ‍ॅक्टींग जमुकं नाय.

मला आधी समजेचना की हा दारु प्यायलाय की थकलाय. जाम कन्फ्युजन झालेलं मला. माईनं माका सांगल्यानं काय ता. Proud

काल वच्छी नवर्‍याला दिवा का लावलाय? विझवुन टाका दिवा. तुमची नातसुन मेलीये आणि दिवा काय लावता अशा अर्थाचं बोलत होती.
सरीता वच्छीची नातसुन म्हणजे माई वच्छीची सुन आणि अण्णा पुतण्या, नाना दीर. Uhoh Happy
तुपारेइतका नाही पण इथेही नात्यांचा जरा घोळच आहे.
वच्छी आणि तिचा नवरा, चुलत सासु-सासरे. दोघेही आण्णा-माईपेक्षा तरुण दिसतात.
काशी पण दत्ता-छायापेक्षा लहान दिसतो.
आणि गंमत म्हणजे वच्छी सहावारी गोल साडी नेसते आणि माई नउवारी Happy

शेवंता जेव्हा अतिलाडाने अण्णा मला वच्चन द्या गडे करत होती तेव्हाच लक्षात आलेलं की सरीता तिच्या घरी असणार.
दत्ता नीट वागत नाही म्हणुन शेवंताने तिला स्वतःकडे ठेवलीये. दत्ताला वठणीवर आणण्यासाठी.

तो चोंगट्या काय एवढा घाबरला? शोभलं नाही त्याला ते घाबरणं.

आजच्या भागात सरिताचो हातुन पाण्याचा तांब्या आण्णाचो ताटात पडुक व्हया. मगे अण्णा परत जाम कावुक व्हया.. माई 'गे बाय माझे' करुन रडुक व्हया..

सरीता पण सैरावैरा, अण्णा पिसाट झाले
भयभीत उभी ही माई, रडवेली झाली आहे

नाना ही खाली बसले, दत्ताला सुचले नाही
छाया च्या नजरेमध्ये विखार जाणवत राही
अभिराम आता न बोले, पांडु हा दचकुन जाई

नाथाच्या वाढल्या फेर्‍या, निशब्द उभा तो राही
वच्छीच्या अंगणामध्ये चोंगट्यो गजाली करी

रात्रीस भिवरी आली, रात्रीस भिवरी आली...

पाटणकरीण सरिताची बाजु घेऊन आण्णाला खडसावते ते पाहुन मात्र बरे वाटले. सरिता तिच्या घरात सापडली हा माझा आणि मनीमोहर यांचा कयास खरा ठरला पण सरिता सारखा मोहरा स्वतःकडे ओढुन आता काय नवीन प्लॅन करणार आहे ते न कळे.

कालच्या भागात सरिता आणि माईने छायाची यथेच्छ टिंगल केली. खुप दिवसांनी माई सुखी समाधानी दिसली. भिवरीचे पण दर्शन झाले.

भिवरीचे पण दर्शन झाले.>>> हो ना.. पार डोळ्यातली पांढरी लेन्स स्पष्ट दिसून भिवरीची भिती न वाटता, हसू येण्याइतपत क्लोजप घेतला होता ! Wink

आण्णा माईक सोन्याची माळ देतत ती नक्की भानगड काय असा? Uhoh खय गावली तेन्का ती माळ? माका वाटता पाटणकरणीन दिली आण्णांका. सरिताच्ये गळ्यान होती काय? Uhoh
शेवंतान नेने वकिलाक चांगलो तोंडार पाडल्यानी कायद्याचो डोस देवन.

Pages