चौकीदार
आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.
इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्यात लाठ्या-काठ्या खेळाणार्या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"
सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"
एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"
त्यानंतर होणार्या चोर्यांवर आणि पडणार्या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्या-मार्या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.
उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.
आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!
असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!
परत हाच चौकीदार असणारे..
परत हाच चौकीदार असणारे..
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/lok-sabha-election-20...
संसदेच्या पायऱ्यांवर जेव्हा
संसदेच्या पायऱ्यांवर जेव्हा डोके टेकले तेंव्हाच हा माणूस चमकोगीरीचा बादशाह आहे ह्याची जाणीव झाली, सफाई कामगारांचे पाय धुवून त्याने निराश केले नाही. आता २४ एप्रिलला पुन्हा शास्त्रज्ञांच्या कामगिरीचे श्रेय घेऊन चमकोगीरीची संधी सोडणार नाही.
@नथुराम नसलेले गोडसे, पुन्हा सरकार बनल्यानंतर या गरळीचे पोकळ बांबू घालून लोणचे करा .
तमाम रुग्णांना पुढची पाच वर्षे त्यावरच गुजराण करायची आहे !
बाळासाहेब ठाकरे यांचा
बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे काढून घेण्यात आला होता परंतु विद्वान पंतप्रधान औसा (जि लातूर) येथे म्हणाले की त्यांचा मतदानाचा हक्क कॉग्रेसने काढून घेतला.
विद्यमान पंतप्रधान तर असं
विद्यमान पंतप्रधान तर असं सुद्धा म्हणालेले की १९८४ मध्ये अवघे दोन खासदार येऊनही भाजपने इव्हीएमबद्दल तक्रार केली नव्हती.
त्यांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे.
चापलुसी गॅंग ची कीव येति .
चापलुसी गॅंग ची कीव येति ..अरे जरा राहुल गांधींच्या भाषण बद्दल तरी बोला ..म्हणजे कळलं कि किती दिवे लावतायत ते , भारती विद्यापीठ मध्ये म्हणे सगळं स्क्रिप्टेड प्रश्न होते , पोर पार कंटाळून गेली होती बिचारी पण काय करणार संस्थाच काँग्रेसची ..
Look who is talking about
Look who is talking about scripted questions!
कितीही बोंबा मारल्या तरी परत
कितीही बोंबा मारल्या तरी परत मोदीच
इतकी खात्री आहे, तर उगी रहा
इतकी खात्री आहे, तर उगी रहा की. तेवढी शक्ती राष्ट्रकार्यात
सत्कारणी लावा.
पुन्हा सरकार बनल्यानंतर या
पुन्हा सरकार बनल्यानंतर या गरळीचे पोकळ बांबू घालून लोणचे करा .
झणझणीत लोणचं घालण्यासाठी तुमच्या बरण्यांची तोंड उघडून ठेवा, आग झाली तर चमको चौकीदार आहे मलम लावायला आणि व्हिडिओ सुद्धा दिमाखाने दाखवेल,तेव्हा लाजू नका तोंड दाखवायला .
विद्यमान पंतप्रधान तर असं
विद्यमान पंतप्रधान तर असं सुद्धा म्हणालेले की १९८४ मध्ये अवघे दोन खासदार येऊनही भाजपने इव्हीएमबद्दल तक्रार केली नव्हती.
त्यांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे.
Submitted by भरत. on 9 April, 2019 - 19:41
<<
पंतप्रधान श्री मोदींच्या, तुम्ही म्हणताय त्या भाषणाचा एकादा व्हिडीओ पाहायला मिळेल काय ? नाही तुम्ही लोकसत्ताच्या बातम्या खूप सिरियसली घेता म्हणून विचारतोय.
पाच वर्षात विकास हरवला, आता
पाच वर्षात विकास हरवला, आता जनता हुशार झाली आहे, ते आता चौकीदारलाच हरवतील.
(No subject)
https://youtu.be/ts9oBx5Ya_g
https://youtu.be/ts9oBx5Ya_g
हा घ्या व्हिडिओ गुरुजी.
बाळ बीबीसीन्यूजहब, आता बोला.
बाळ बीबीसीन्यूजहब, आता बोला.
पाच वर्षात विकास हरवला, आता
पाच वर्षात विकास हरवला, आता जनता हुशार झाली आहे, ते आता चौकीदारलाच हरवतील - चस्मा बदला , तुम्हाला कसा विकास दिसणार नाही , कारण जे पप्पू आहेत त्यांना विकास दिसणार तरी कसा ..पण जनता पप्पू नाही हो.
पुन्हा सरकार बनल्यानंतर या
पुन्हा सरकार बनल्यानंतर या गरळीचे पोकळ बांबू घालून लोणचे करा- चापलुसी गँग ची भाषा बघा ..अरे रे एवढी अवस्था वाईट झालीय ह्यांची , ५ वर्ष सत्ता काय गेली पार जल बिन मछली अशी अवस्था आहे , सगळं गटार ओपन झालाय ह्यांचं..पुढच्या ५ वर्षात तर काय करणार आहे देव जाणे ..
असा फॉल्टी विकास फक्त फालतू
असा फॉल्टी विकास फक्त फालतू लोकांनाच दिसणार, जनता चौकीदारही नाही ती चौकस आहे .
फॉल्टी विकास - पाहिलं तर
फॉल्टी विकास - पाहिलं तर विकास नव्हता आता फॉल्टी झालाय , सुधारणा आहे ..चालुद्या अजून..हळू हळू येतंय तुम्ही लाइनीवर..
पप्पू ने लावलेला दिवा पण दाखवा मग विकासाचा ..मागच्या १५ वर्षात अमेठीचा ..लोक पप्पू नाहीत हो..चौकस असलेला चांगला ..
अरे नेमाटोडा जंता , पोकळ
अरे नेमाटोडा जंता , पोकळ बांबूचे लोणचं कोण बोललय हे नीट वाचले का? तुझेच जातभाई आहेत ते . सगळेच अंधभक्त फॉल्टी आहेत हे दाखवून दिलेस तू . नोटबंदीसारखा फॉल्टी विकास केला म्हणून हरवला का ?
नोटबंदीसारखा फॉल्टी विकास
नोटबंदीसारखा फॉल्टी विकास केला- .अरे तो विकासाचा मुद्दा नव्हता घाण साफ करण्यासाठी केला होता ..तुमच्यासारखे सापडले ना त्यामध्ये म्हणून तर एवढा राग ...नका काळजी करू.. समजू शकतो मोठा धक्का असणार ..माणस कधी कधी आपल्याच पायावर कुराड मारून घेत असतात ..
कशाला मनाची खोटी समजूत घालून
कशाला मनाची खोटी समजूत घालून घेता? कोणीही सापडले नाही,सगळा पैसा बँकेत परत आला. नसता आला तर तुमचा मुंगेरीलाल ३-४ लाख कोटी काळ्या पैशाने विकासाचे स्वप्न बघत होता ना ? विकास नव्हता करणार, तर त्या नोटांच्या पुंगळ्या करून ...
कोणीही सापडले नाही,सगळा पैसा
कोणीही सापडले नाही,सगळा पैसा बँकेत परत आला- ह्यांची अवस्था पाकिस्तान सारखी आहे, सांगता पण येत नाही , जो पैसा बँक मध्ये आला तो काळा होता कि नव्हता ह्याची माहिती मिळाली आहे काळजी करू नका , बैलगाडी हळू हळू वाढत जाणार आहे .. बाकी तुम्ही अजूनही कॅश मध्येच व्यवहार करत असाल नाही का मोदी विरोध म्हणून ..काँग्रेस ने ७० वर्षात तर एवढा विकास केला आहे कि प्रत्येक घरात वीज ,प्रत्येक घरात शॉचालय , प्रत्येक घरात एक बँक अकाउंट , गरीब तर नावाला सुद्धा दिसत नव्हता , शिक्षण व्यवस्था तर जागतिक दर्जाची , आरोग्य व्यवस्था दृष्ट लागलं अशी होती, सरकारी व्यवस्ते चा अभ्यास करायला तर चीन चे लोक पण येऊन जात होते . उगाच मोदी येऊन सगळं खराब केल नाही का?
हो, नोटाबंदी नंतर दोन वर्षात
हो, नोटाबंदी नंतर दोन वर्षात कॅशचे व्यवहार वाढले त्याला चौकीदार आळा घालू शकला नाही हे अपयश मान्य करा . तुम्ही सगळे व्यवहार डिजीटल करत असाल तर ती २००० च्या नोटेची पुंगळी कधी करणार? की निवडणूकीसाठी वापर करणार?
नोटाबंदी नंतर दोन वर्षात
नोटाबंदी नंतर दोन वर्षात कॅशचे व्यवहार वाढले- बातमी चुकीची वाचलीत तुम्ही बहुतेक किंव्हा जुन्या १०००/५०० च्या पुंगळीचा त्रास असेल,
https://www.siliconindia.com/finance/news/70-YearonYear-Growth-in-Mercha...
https://www.businesstoday.in/current/economy-politics/demonetisation-imp...
https://www.thehindubusinessline.com/money-and-banking/two-years-after-n...
The value of NEFT transactions had gone up from ₹988,000 crore in September 2016 (just two months before demonetisation) to ₹14,182,000 crore in September 2017, and to ₹18,015,000 crore in September 2018
The value of mobile banking transactions, too, shot up from ₹2,700 crore in September 2015 to ₹104,300 crore in 2016, and to ₹186,200 crore in 2017.
If one includes all digital transactions, there has been a 440 per cent increase since demonetization
४४०% वाढ झालीय डिजिटल पेमेंट मध्ये , तुम्ही बसा अजूनही कॅश मध्ये व्यवहार करत ..मोदी विरोध म्हणून ..
digital वापर वाढावा हा
digital वापर वाढावा हा नोटबंदीचा उद्देश पण पुर्णत: असफल झाला. currency in circulation ३७ % नी वाढले आहे असा RBI चा 2017-18 चा वार्षिक अहवाल सांगतो. आता रिझर्व बँकेचा अहवाल म्हणजे खात्रीलायक स्त्रोत आहे आणि जनतेसाठी मोफत उपलब्द आहे.
पान क्र. २६० वर APPENDIX TABLE 4
https://rbi.org.in/Scripts/AnnualReportPublications.aspx?year=2018
<< हो, नोटाबंदी नंतर दोन
<< हो, नोटाबंदी नंतर दोन वर्षात कॅशचे व्यवहार वाढले त्याला चौकीदार आळा घालू शकला नाही हे अपयश मान्य करा . तुम्ही सगळे व्यवहार डिजीटल करत असाल तर ती २००० च्या नोटेची पुंगळी कधी करणार? की निवडणूकीसाठी वापर करणार? >>
----- दोन हजाराच्या नोटांमुळे काळा पैसे जमा करणार्यांची एक मोठी सोय झाली... त्यांच्या कडे असणार्या नोटांच्या महाकाय डोंगराची उंची कमी झाली आणि नोटा मोजत बसण्याचा वेळ वाचला. शेवटी श्रीमंतांची सोय पण बघायला हवी.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सध्या विरोधी बाकावर असणारा काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.
काल भाजपाच्या लोकांनी आठ कोटी
काल भाजपाच्या लोकांनी आठ कोटी cash अकौंटातून काढताना पोलिसांनी पकडले,
पोलीस तेच बोलले , इतकी केश का ? ऑनलाइन दे घे का नई केली ?
बाळ बीबीसीन्यूजहब, आता बोला.
बाळ बीबीसीन्यूजहब, आता बोला.
नवीन Submitted by भरत. on 9 April, 2019 - 20:57
<<
ठिक आहे.
होते कधी-कधी बोलण्याच्या ओघात.
त्यांचं आणि अंध भक्तांच हे
त्यांचं आणि अंध भक्तांच हे नेहमीचच आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.
Pages