चौकीदार

Submitted by DJ. on 19 March, 2019 - 05:38

चौकीदार

आमच्या बिल्डिंगचा आधीचा चौकीदार फार सज्जन माणुस. कोणाला काहीही बोलायचा नाही. त्याचं काम तो इमाने-इतबारे करायचा पण त्याच्या वागण्या-बोलण्यात धम्मक नसायची. आपल्या सोसायटीला कसा वागण्या-बोलण्यात वाकब्गार असलेला चौकीदार पाहिजे म्हणुन एक-दोन सभासद उगाच त्या चौकीदाराची निंदा-नालस्ती करु लागले. ते दोन सभासद हे सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज संघटनेचे..! तिथे जी-जी शिकवण मिळेल त्याबरहुकुम वागणारे. झालं..! त्यांच्या कुजबुजीमुळे सोसायटीच्या इतर सभासदांना देखील आहे तो चौकीदार कमालीचा अकर्यक्षम वाटु लागला. चौकीदार कसा हवा - "एकदम तडफदार..!!" असंच सगळ्यांचं मत झालं.

इकडे त्या सार्वजनीक बागेतल्या कोपर्‍यात लाठ्या-काठ्या खेळाणार्‍या कावेबाज बुढाऊंनी त्यांच्याच संघटनेतल्या एका सफेद दाढीवाल्या चौकीदारास कामावर ठेवावे म्हणुन सोसायटी मिटिंगमधे सांगितले. त्याची खुप भलामण केली. त्याने तिकडे दुसर्‍या छोट्या सोसायटीत कशी चकाचौंद कामगिरी केली याचे फोटोशॉप विडीओ दाखवले. सफेद दाढीवाल्या चौकीदाराचे तडफदार वागणे-बोलणे पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. लगोलग त्याला सोसायटी मधे भेटण्यास बोलवण्यात आले. "१०० दिवसात तुमच्या सोसायटीला कसा नावलौकीक प्राप्त करुन देतो ते बघा" असे वचन देऊन त्याने सर्वांच्या मनावर अक्षरश: गारुड घातले. सोसायटी मेंबर्सने मिटिंग बोलवुन आपला जुना-जाणता चौकीदार अत्यंत स्लो आहे असा ठराव पास करुन त्याला कामावरुन काढुन टाकले. जाता-जाता जुना-जाणता चौकीदार म्हणुन गेला "माझ्या कामाची आठवण तुम्हाला भविष्यात येईल..!"

सफेद दाढीवाला नवा चौकीदार कामावर रुजु झाला. नवीन-नवीन होता तोवर काही दिवस तो सर्व सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकायचा. बरे वाटायचे. कोणीही सभासद गाडी घेऊन आला की लगेच गेट उघडायचा. आम्हाला खुप कौतुक वाटायचे. त्याची सफेद दाढी, कडक इस्त्रीचा पोषाख आणि खणखणीत आवाजातले बोलणे ऐकुन हा पहिल्यापेक्षा १०० पटींनी चांगला चौकीदार आहे असे वाटायचे. असे थोडे दिवस गेले आणि मग नंतर-नंतर त्याने सभासदांना येता-जाता खुर्चीवरुन उठुन सलाम ठोकणे बंद केले. गाडी घेऊन आल्यावर हॉर्न वाजवुनही तो गेट उघडेनासा झाला. दिवसा-ढवळ्या झोपुन राहु लागला. मग मात्र आम्ही त्याला हटकलं तर म्हणे "आधीचाही चौकीदार झोपायचा..! त्याला बरं कधी हटकलं नाहीत..??"

एक दिवस व्हायचं तेच झालं..! बिल्डिंग मधे चोरी झाली. याचा जाब विचारायला गेलो तर म्हणे "आधीच्या चौकीदाराच्या साथीदारांनी चोरी केली आसेल.. त्यालाच विचारा..!" बघता-बघता चोर्‍या वाढु लागल्या. रात्री-बेरात्रीच नव्हे तर दिवसाही चोर चोरी करुन पैशांच्या बॅगा भर-भरुन सोसायटीच्या बाहेर पडु लागले. सभासदांकडे येणार्‍या नातेवाईकांचे खुनही पडु लागले. त्यास खडसावायला गेल्यावर त्याने त्याचे नेहमीचे भसाड्या आवाजातले बोलणे बाणेदारपणे ऐकवले. म्हणाला - "जेव्हा ७० वर्षांपुर्वी ही बिल्डिंग बांधली तेव्हा जो चौकीदार इथे होता त्याच्या चुकीमुळे हे सर्व आता भोगावे लागत आहे. त्या पहिल्या चौकीदाराने चोरांवर धाकच नाही ठेवला त्याला मी तरी काय करणार..? सर्व चूक त्याचीच नव्हे काय..??"

त्यानंतर होणार्‍या चोर्‍यांवर आणि पडणार्‍या मुडद्यांवर आम्ही लक्ष ठेवले तेव्हा लक्षात आले की चोर्‍या फक्त आमच्यासारख्या सामान्य सभासदांच्याच घरी होताहेत. मुडदे देखिल आमच्याच नातलगांचे पडताहेत. सोसायटीचे सेक्रेटरी आणि खजीनदार आपल्याकडुन ज्या चोर्‍या-मार्‍या होताहेत त्याकडे काणाडोळा करण्यासाठी या नव्या चौकीदाराला लाच देत आहेत - त्यांच्या घरी तसेच ज्यांच्यामुळे हा नवा चौकीदार सोसायटीत आला त्या सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणार्‍या - २ कावेबाज सभासदांच्या घरी मात्र चोर्‍या होत नाहीयेत. त्यांच्याकडे येणार्‍या नातलगांचेही खुन पडत नाहित. हा नवा चौकीदार फक्त सेक्रेटरी-खजीनदार-कावेबाज सभासदांच्या घराचीच सुरक्षा करतोय हे लक्षात आल्यावर मात्र आम्हाला जुन्या चौकीदाराची आठवण आली. काहीही न बोलता देखील त्याने त्याचे काम नेहमीच चोखपणे केले होते. त्याला निकम्मा ठरवणार्‍या त्या कावेबाज सभासदांचे ऐकुन सोसायटीने मोठी चूक केली हे लक्षात आले.

उशिरा का होईना पण वेळेत चूक लक्षात आली म्हणुन लगोलग मिटिंग बोलवुन हा सारा प्रकार सर्व सभासदांच्या लक्षात आणुन दिला. सेक्रेटरी-खजीनदार आणि २ कावेबाज सभासदांच्या चेहर्‍यावर मात्र चिंता दिसुन आली. पुढच्या महिन्यापासुन चौकीदार बदलायचाच असा ठराव सोसायटीने बहुमताने मंजुर केला आणि नेमका त्याच रात्री सफेद दाढीवाल्या चौकीदाराने एक चोर पकडुन दिला. सगळी बिल्डिंग खुश झाली. आम्ही विचारलं, "बाबा, कशावरुन हा चोर आहे..? सी.सी.टी.वी. आहेत तर फुटेज तरी दाखव.." तर लगेच सेक्रेटरी कडाडाले - "तुम्ही चौकीदारावर संशय घेताय..? असे असेल तर सोडा बिल्डिंग आणि जा त्या शेजारच्या बिल्डिंगमधे रहायला..!" त्या भितीने इतर सभासद काही बोललेच नाहीत.

आता मात्र मोठा प्रश्न पडलाय - आता काय करायचं..?? हा सफेद दाढीवाला चौकीदार जर बदलला नाही तर काही दिवसांनी या बिल्डिंगमधे रहाणं मुश्कील होईल.. आपल्या कष्टाची कमाई डोळ्यांदेखत चोरी होताना पहावे लागेल.. आपल्या सग्या-सोयर्‍यांचे डोळ्यांदेखत मुडदे पाडले जातील आणि सेक्रेटरी-खजीनदार-सार्वजनीक बागेच्या कोपर्‍यात संध्याकाळी हाप चड्ड्या घालुन लाठ्या-काठ्या खेळणारे २ कावेबाज सभासद मात्र स्वतःची संपत्ती/कातडी वाचवुन आपल्यावर असाच अन्याय करत रहातील..!

असो.. पुढच्या पंधरवड्यात मिटिंग आहे. चौकीदार बदलणं अजुनही आपल्या हातात आहे हे बिल्डिंग मधील लोकांना समजेल हीच आशा..!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ हेला

फुगा फुटला.

या प्रतिसादातील दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे असतीलच ! ते देण्याची कृपा कराल का ?
राफेल सारखे सतत किमती बदलणारे पुरावे नकोत हा !

@ हेला
केलेल्या कोणत्याही दाव्याला पुरावे द्यावे लागतात, तरच ते ग्राह्य धरले जाऊ शकते.

अन्यथा त्या कृतीला ला गरळ ओकणे असा अत्यंत चखपल मराठी शब्द आहे.

आणि मग ओकण्याची हि कृती स्वतःच्या घराच्या बाथरूम मध्ये करणे अपेक्षित आहे ती सार्वजनिक संकेतस्थळावर केल्याने सगळीकडे फक्त घाण होत राहते.

ती करणाऱ्याला त्याचे काही वाटत नाही... कारण सवय झालेली असते.
पण एकंदर समाजस्वास्थाच्या दृष्टीने हि गरळ आणि ती त्याहीपेक्षा ती ओकणारे हे आजारांचे निमंत्रक ठरतात..... !

१८८ अत्यंत हास्यास्पद होत आहे. खलिस्तानचा प्रश्न सुटुन जमाना झाला रे. बौद्धिक वय वाढणार की नाही?

https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/bsnl-to-l...

बी.एस.एन.एल च्या ५४ हजार कर्मचर्‍यांवर टांगती तलवार.. मंत्रीमंडळाचा निर्णय होताच ५४ हजार कर्मचारी घरी बसणार.
चौकीदाराने बी.एस.एन.एल. अंबानीच्या घशात घातली.
भक्त आता काय तर्क लढवणार..? Proud

काही नाही , एक उदार उद्योगपती बीएसएनएल ला ताब्यात घेण्याची ऑफर देणार, मग विकला गेलेला चौकीदार त्याला जामदारखान्याच्या किल्ल्या देणार.

युएईचा सर्वोच्च मानला जाणार 'झायद मेडल' हा पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. स्वत:हून पुढाकार घेऊन भारत आणि युएईमधील आंतरराष्ट्रीय संबंध दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार मोदींना देण्यात येतो आहे.
झायद मेडल हा पुरस्कार युएईचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना या पुरस्काराने गौरवण्यात येतं. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग, ग्रेट ब्रिटची राणी एलिझाबेथ३ यांना याआधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 

---

मोदीजींचे अभिनंदन

भाजप्यांसारखी धादांत खोटे बोलायची सवय नाही रे मला बुडबुड्या!
https://indianexpress.com/article/business/economy/88-lakh-taxpayers-did...

आणि ते चपखल असते.. चखपल नाही. आला मोठा शाणा, मराठी शिकवायला. Rofl

काँग्रेसचे मंत्रीही गरळ ओकतातच की
ज्या पक्षाच्या नेत्याला साध भाषण देता येत नाही.
त्याला पंतप्रधान बनवण्यासाठी एवढा आटापीटा.

१८८ अत्यंत हास्यास्पद होत आहे. खलिस्तानचा प्रश्न सुटुन जमाना झाला रे. बौद्धिक वय वाढणार की नाही?
आता सुटला आहे हे मला सुधा माहीत आहे पण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस नी एका देशप्रेमी राज्याला विघटनच्या सीमेवर आणून ठेवले होते.
इतिहास माहीतच असेल

च्यामारी, इथे पण भाट विरुद्ध भक्त मारामारी चोथा चघळत चाललीय.
रोमातून अ‍ॅक्शन बघायची मजाच बाकी न्यारी ए...मित्रों, कुछ तूफानी तो करो! Wink

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचे प्रदर्शन पुढे ढकलले

त्यामुळे ५ एप्रिल या नियोजित तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

-----_-------

बाबा राम रहीम वर सिनेमा आला,

आणि मग तो तुरुंगात गेला

Proud

विकास केला असता तर, असले पिक्चर काढणे , सफाई कामगारांचे पाय धुणे, असे उद्योग करावे लागले नसते. वर कामगारांचे वेतन थकले म्हणून तळतळाटही घेतला. अच्छे दिनचा डायलॉग बोलायलाही आता लाज वाटत असेल.

मोदी भक्तांसाठी खुषखबर! कॉग्रेस सत्तेत आल्यास भक्तांना नोकरीमध्ये १०० % आरक्षण देणार फक्त चौकीदारच्या पोस्टसाठी , शिक्षणाची अट नाही. कॉग्रेसच्या राज्यात शिक्षण घेऊनही मंद राहील्यामुळे त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ही योजना राबवली जाणार.

मंद लोकांच्या पक्षाला टक्कर देण्यासाठी हुशार लोकांच्या 26 पक्षांना युती करावी लागत आहे .
काय जमाना आलाय

जितके उपद्रव मूल्य जास्त त्याच्या कैकपट अधिक शक्ती लागते आटोक्यात आणायला.

काँग्रेस फक्त तक्रार केली, चित्रपटाची तारीख सरकारी नियंत्रकाने पुढे ढकलली,

म्हणजे तक्रार रास्त होती.

हि लोक गरिबांना लुटून पैसे कमावतात.. त्यांच्या कडून थोडे पैसे गरिबांना दिले तर लगेच ह्यांच्या पोटात दुखते..
७२००० ची योजना फार चांगली आहे.. सगळ्यांना मिनिमम पैसे मिळायला पाहिजेतच ..
लागल्यास सगळा टॅक्स सरसकट १०% वाढावावा,
सरकारी नोकरदारांनि १ दिवसाचा पगार द्यावा आणि नाही दिला तर तो कापून घ्यावा सरकार ने ...
पुढील ५ वर्षात ७२००० चे लिमिट महागाई वाढेल तसे कमीत कमी वाढवून ९०००० तरी करावे...
ग्रामीण गरिबांचे ७२००० मधे भागेल, शहरात गरिबांनी राहू नये का? त्यांचे पण काहीतरी करायला पाहिजे..
मुंबई, दिल्ली बंगलोर पुणे इथे आत्ताच १००००० द्यावेत... सातारा कोल्हापूर येथे ८५००० .. बाकी भाग ७२०००..
सगळे मिळून मज्जाच मज्जा करूयात...

इथल्याच भारतातल्या सरकारी अनुदानीत कॉलेजात शिकून परदेशात लाइफ सेटल करणारे लैच काळजी करतात जणू देशाची. नका लाव जीवाला घोर कोण क्यानडात येऊन तुमच्या पगाराव हात घालत नाही

<< काँग्रेसचे मंत्रीही गरळ ओकतातच की
ज्या पक्षाच्या नेत्याला साध भाषण देता येत नाही.
त्याला पंतप्रधान बनवण्यासाठी एवढा आटापीटा. >>

-------- छान छान भाषण देणारे, भाषणांत सतत खोटे बोलणार्‍या पंतप्रधानापेक्षा.... चांगला पर्याय मिळत असेल तर तपासायला काय हरकत आहे?

उदय राव मला तुमचे फार फार कौतुक वाटते. इतक्या शांतपणे हळुवार सभ्यपणे जी तुम्ही चंपी करता ना... लव्हली.
पूर्वी मी पण असाच असायचो... पण आता पेशन्स राहत नाही. तुम्ही असेच लिहित रहा. कधी तरी मलाही असेच शांतपणे लिहिता येईल तुमचे पाहून पाहून..

Lol

------ छान छान भाषण देणारे, भाषणांत सतत खोटे बोलणार्‍या पंतप्रधानापेक्षा.... चांगला पर्याय मिळत असेल तर तपासायला काय हरकत आहे?

खरोखर काही हरकत नाही .
पण भीती ह्याची वाटते आहे की आघाडीत असलेले इरसाल पक्ष आणि स्व पक्षातील इरसाल नेते होणाऱ्या पंतप्रधानाला पार हैराण करून टाकतील .
नीट कारभार सुदा करून देणार नाहीत .
त्या पेक्षा तुमच्या नजरेने थापा मारत असलेला नेता कणखर आहे हवी तशी सत्ता चालवून स्थिर सरकार देवू शकतो.
मग कशाला मत वाया जावून द्यायचे अस्थिर सरकार साठी

अख्खा देश अस्थिर करून टाकला यांच्या स्थिर सरकारने.
दात काढणाऱ्या ने कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल सांगितलेल्या गोष्टींच्या लिंका अजूनही दिलेल्या नाहीत.

Pages