गॅरी हॉल ज्युनिअर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आजची दुसरी गोष्ट आहे अजुन एका अतिशय अटितटीच्या स्विमींग रिले शर्यतीची... आणी ही शर्यत जितकी रंगतदार होती त्याइतकेच रंगतदार या कथेतील प्रमुख भुमिका बजावणार्‍या एका स्विमरचे व्यक्तिमत्व होते... त्या स्विमरचे नाव अमेरिकन ऑलिंपिक्स स्विमींगच्या इतिहासात अतिशय गाजलेले आहे... आणी ते नाव म्हणजे गॅरी हॉल ज्युनिअर!

या गॅरी हॉल ज्युनिअरची ऑलींपिक्स कारकिर्द्र सुरु झाली १९९६ च्या ऍटलांटा ऑलिंपिक्समधे... या वल्गनेने की मी जगातला सगळ्यात फ़ास्टेस्ट स्विमर आहे! रशियाच्या अलेकझॅंडर पॉपॉव्ह.. जो गेली आठ वर्षे १०० मिटर्स फ़्रिस्टाइलमधे अपराजित होता... याला मी या वर्षी हरवीनच हे त्याचे अमेरिकन जनतेला दिलेले प्रॉमिस होते.... पण प्रत्यक्षात मात्र त्या ऑलिंपिक्समधे तो ५० मिटर्स व १०० मिटर्स फ़्रिस्टाइल या दोन्ही शर्यतीमधे तो पॉपॉव्हला हरवु शकला नाही.. त्या दोन्ही शर्यतीत तो पॉपॉव्हच्या मागे दुसरा आला व वैयक्तिक स्पर्धेत त्याला २ रौप्य पदकांवर त्याला समाधान मानावे लागले.. पण ४ बाय १०० मिटर्स फ़्रिस्टाइल व ४ बाय १०० मिटर्स मेडले रिले शर्यतीत मात्र त्याने ऍंकर लेग पोहुन पॉपॉव्हच्या रशियन टिमला हरवुन सुवर्णपदके मिळवली होती व अमेरिकेचे रिले शर्यतींमधले प्रभुत्व त्याने टिकवुन ठेवण्यास मदत केली होती. असा हा अति आत्मविश्वासी जलतरणपटु... प्रत्येक शर्यतीच्या आधी मुष्टीयोद्ध्याच्या रोबमधे तलावावर प्रवेश करत असे व एखादा मुष्टीयोद्धा कसा मुष्टीयुद्धाच्या आधी मुष्टीप्रहाराचा हवेत सराव करत नाचत असतो.. तसा हा तलावावर मुष्टीयुद्धाचे हवेत प्रात्यक्षिक करुन प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत असे..

तर असे व्यक्तिमत्व असलेल्या माणसाने २००० च्या सिडनी ऑलिंपिक्सच्या आधी परत एकदा वल्गना केली नसती तरच नवल!... त्या वर्षी त्याने असे भाकीत केले की स्पर्धा जरी सिडनी मधे असल्या तरी व जरी ऑस्ट्रेलियाच्या टिममधे ग्रेट इयान थॉर्प उर्फ़ "थोर्पिडो" चा समावेश होता तरी.... अमेरिकन स्विमींग टिम ४ बाय १०० मिटर्स रिले शर्यतीमधे ऑस्ट्रेलियाच्या टिमचे तुणतुणे वाजवील.... (गिटार ची स्ट्रिंग वाजवतात तसे....!)

अलबत हे गॅरी हॉलचे भाकीत वाचुन ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक स्विमरला भयंकर राग आला नसला तरच नवल! त्यामुळे ऑस्ट्रेलियन टिम अधिकच जिद्दीने पेटली. एकतर स्पर्धा त्यांच्याच बॅकयार्डमधे... त्यात त्यांच्या टिममधे ग्रेट इयान थॉर्प होता व आणी त्यात गॅरी हॉलची स्पर्धेआधीची ही वल्गना... त्यामुळे या घटकांनी युक्त असलेली ही शर्यत अतिशय उत्कंठावर्धक व ग्रेटली ऍन्टीसिपेटेड म्हणुन बघीतली जात होती. ऑस्ट्रेलियन व अमेरिकन जलतरणप्रेमी या स्पर्धेची डोळ्यात तेल घालुन वाट बघत होते.

या ऑलिंपिक्समधे मात्र या रिले शर्यतीच्या आधी गॅरी हॉल ज्युनिअरने ५० मिटर्स फ़्रिस्टाइलमधे पॉपॉव्हला फ़ायनली हरवुन सुवर्णपदक मिळवले व जगातला फ़ास्टेस्ट स्विमर म्हणुन किताब पटकावला होता. आणी १०० मिटर्स फ़्रिस्टाइल स्पर्धेत हॉलंडच्या पिटर व्हान हॅगनबॉन्ड व पॉपॉव्हच्या मागोमाग येउन ताम्र पदक पटकावले होते. त्यामुळे त्याची या वेळची वल्गना अगदीच बेसलेस नव्हती हे सगळ्यांना कळुन चुकले होते. पण तरीही ऑस्ट्रेलियन स्विमर्सचा या ४ बाय १०० मिटर्स फ़्रिस्टाइल शर्यतीवर खुप डोळा होता... त्यांना गॅरी हॉलला व अमेरिकन टिमला या शर्यतीत कसेही करुन धुळ चारायची होती...

तर अश्या या ४ बाय १०० मिटर्स फ़्रिस्टाइल शर्यतीसाठी अमेरिकेच्या वतीने भाग घेणारे चार स्विमर्स होते.... ऍन्थनी अर्विन... ज्याने ५० मिटर्समधे गॅरी हॉलबरोबर पहिले येउन सुवर्णपदक मिळवले होते(हो.. त्या शर्यतीत त्या दोघांचेही टायमिंग एकच होते... त्यामुळे दोघांनाही सुवर्णपदके देण्यात आली होती.. व रजत पदक रद्द करुन पिटर व्हान हॅगनबॉन्डला ताम्र पदक दिले होते),निल वॉकर,जेसन लिझॅक व अर्थात ऍन्कर लेगसाठी गॅरी हॉल ज्युनिअर..! म्हणजे अगदी तगडी टिम होती... तर ऑस्ट्रेलियाच्या वतीने भाग घेणार होते...मायकेल क्लिम,ख्रिस फ़िडलर,ऍशली कॉलिन्स व ऍंकर लेगसाठी इयान थॉर्प उर्फ़ थोर्पिडो! म्हणजे अगदी अमेरिकेसारखी तगडी नसली तरी ऑस्ट्रेलियाची टिम नक्किच अमेरिकेला टक्कर देण्यासारखी होती... आणी ऑलिंपिक्स स्पर्धांच्या इतिहासात असे वारंवार दिसुन आले आहे की यजमान देशाचे खेळाडु आपल्या देशवासीयांसमोर नेहमीच आपली कामगीरी उंचावतात!

शर्यतीचा दिवस उजाडला.. सगळ्या टिम तलावावर हजर झाल्या... आणी नेहमीप्रमाणे गॅरी हॉल आपल्या मुष्टीयोद्ध्याच्या रोबमधे तलावावर प्रवेशकर्ता झाला.. त्याने आपले बॉक्सिंगचे रुटिन सुरु केले... सर्व ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी अर्थातच बु करुन त्याचा धिक्कार केला.. ऑस्ट्रेलियन स्विमर्स मात्र एकदम शांत व एकाग्र चित्ताने स्ट्रेचींग करत होते... त्यांना व सर्व ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना ठाउक होते की अमेरिका ४ बाय १०० मिटर्स रिले शर्यतीत ऑलिंपिक्स स्पर्धेच्या इतिहासात कधीच हरलेली नव्हती... शर्यत सुरु झाली.. अमेरिकेच्या वतीने ऍन्थनी अर्विनने पहिल्या लेगसाठी उडी घेतली तर ऑस्ट्रेलियाच्या वतीने मायकेल क्लिमने... आणी सगळ्यांना आश्चर्यचकित करत ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लिमने चक्क अर्विनला मागे टाकुन त्यांना थोडासा का होइना.. पण लिड मिळवुन दिला.. आणी धुंद झालेल्या प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाने प्रेरित होउन मग ख्रिस फ़िडलर व ऍशली कॉलिन्सने अमेरिकेच्या निल वॉकर व जेसन लिझॅकवर तो लिड कायम ठेवला... प्रेक्षक अक्षरश्: वेडे होउन बेंबीच्या देठापासुन ओरडुन आपली एनर्जी ऑस्ट्रेलियन स्विमर्सना देत होते.. त्यामुळे गॅरी हॉल जेव्हा शेवटच्या चौथ्या लेगसाठी पाण्यात उडी घेत होता तोपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या इयान थॉर्पला मोलाची आघाडी मिळाली होती... पण गॅरी हॉलने तो ५० मिटर्सचा अनभिशिक्त सम्राट असल्याचे पुन्हा एकदा या शर्यतीत सिद्ध केले... व पहिल्या ५० मिटर्समधेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या इयान थॉर्पला गाठले व वळणावर त्याला मागेही टाकले.... सुप्रिम कॉन्फ़िडन्स असलेला गॅरी हॉल पाण्यात सप सप हात मारत वेगाने अंतिम रेषेकडे स्विम करत होता.. पण इयान थॉर्पनेही उगाचच "थोर्पिडो" हे टोपण नाव मिळवले नव्हते!... शेवटच्या २५ मिटर्समधे त्याने खरच टोरपिडो सारखी मुसंडी मारुन गॅरी हॉलला गाठले व २०००० प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाचा फायदा घेत शर्यतीच्या शेवटी गॅरी हॉलला जवळ जवळ पाउण बॉडी लेंग्थने हरवले...

तिकडे काठावर... शर्यतीच्या शेवटी ऑस्ट्रेलियाचे पहिले ३ स्विमर्स... त्यांच्या इयान थॉर्पला प्रोत्साहन देत मोठ्या उत्साहाने उड्या मारत होते.. व शेवटी त्यांच्या थोर्पिडोने त्यांना शर्यत जिंकुन दिली हे पाहुन... ते सगळे एकाच ऍक्शनम्धे गिटार वाजवायची ऍक्शन करु लागले.... आज त्यांनीच गॅरी हॉल व अमेरिकन टिमचे तुणतुणे वाजवले होते.. गिटार वाजवावी तसे... बिचार्‍या गॅरी हॉलला त्याच्याच शब्दात ऑस्ट्रेलियन स्विमर्सकडुन आज उत्तर मिळत होते... असा हा अमेरिकन रिले टिमचा पहिला पराभव व ऑस्ट्रेलियन स्विमर्सचे एकसुरात गिटार वाजवण्याची ऍक्शन करुन सिडनीच्या ऑलिंपिक जलतरण तलावावर नाचुन त्यांचा विजय साजरा करणे... हे मी कधीच विसरणार नाही... आणी गॅरी हॉल ज्युनिअर?.. बिचारा... आपल्या बॉक्सिंग रोबमधे तोंड खुपसुन पराभवाची कडु गोळी पचवायचा असफ़ल प्रयत्न करत होता....

तळटिप: याच गॅरी हॉल ज्युनिअरने २००४ च्या अथेन्स ऑलिंपिक्समधे परत एकदा ५० मिटर्स फ़्रिस्टाइल शर्यतीत सुवर्णपदक मिळवुन जगातला फ़ास्टेस्ट स्विमर म्हणुन आपला किताब कायम राखला.. पण या वर्षीच्या ओमाहा इथे झालेल्या अमेरिकन ऑलिंपिक्स स्विम ट्रायल्समधे मात्र ५० मिटर्स फ़्रिस्टाइलमधे तो चौथा आल्यामुळे बैजींगला जाण्यास पात्र ठरला नाही.. त्यामुळे १२ वर्षांनंतर प्रथमच गॅरी हॉलचे ते ऑलिंपिक्स स्विमिंग तलावावरचे बॉक्सिंगचे रुटीन आपल्याला बैजींग ऑलिंपिक्समधे बघायला मिळणार नाही....

प्रकार: 

नेहमी प्रमाणेच बहोत खुब..........

मुकुंद मस्त....... पण ह्या कथेत हिरो हरला... Happy

. ऍन्थनी अर्विन... ज्याने ५० मिटर्समधे गॅरी हॉलबरोबर पहिले येउन सुवर्णपदक मिळवले होते(हो.. त्या शर्यतीत त्या दोघांचेही टायमिंग एकच होते... त्यामुळे दोघांनाही सुवर्णपदके देण्यात आली होती..>>>>>>>>>>>>
ही घटना खरच दुर्मिळ असेल ना?? Happy
नेहमीप्रमाणेच मस्त लिहिल आहे.

मुकुंद, नेहेमीप्रमाणेच छान.. ह्या वेळच्या स्पर्धा, स्पर्धक आणि कोणत्या आवर्जुन पहायला पहीजे ह्या बद्दलही लिहा ना. म्हणजे आमच्यासारख्या नवशिक्यांना काय पहायलाच हवे याचं मार्गदर्शन मिळेल...

अहो मुकुन्द,

आहात कुठे... फार वाइट सवय लावलीयेत तुम्ही.... आता सारखी सारखी वाट पहावी लागते... पुढे सान्गा कि...

sarivina, अनुमोदन.... आता Olympic सुरु झाल कि परत मुकुन्द परत गायब होतील....

-येड्चाप

येड्चाप.. तुमचा उद्वैग मी समजु शकतो.. पण वेळात वेळ काढुन मी माझे लिखाण करायचा प्रयत्न करत आहे...कृपया राग मानु नये...

सारिविना व इतर.. प्रतिक्रियेंबद्दल आभार.