गुरु का आनि कसा

Submitted by महेश ... on 13 March, 2019 - 14:59

काही वर्षां पूर्वी मी गुरु शोधायला सुरुवात केली , १ सापडला आणि त्याने दीक्षा आणि मंत्र दिला, जप करून २-३ महिने झाले असतील पण माझ्यात काहीही बदल झाला नाही. शेवटी कंटाळून दुसरा गुरु शोधायला सुरु केलं . काही जण म्हणाले गुरु असा सापडणार नाही , तो आपोआप तुझ्या कडे येईल, मग काय अजून २-३ महिने वाट पाहिली पण गुरु काही आला नाही. अशा रीतीने ६-७ मौल्यवान महिने वाया गेले. मग बरच चिंतन केलं, ध्यान केलं आणि लक्षात आलं कि गुरु का हवा.
मी इतका आळशी नाही कि गुरु ची सेवा करून तो माझं भलं करेल. मला माझेच कष्ट घ्यायला हवे. मग ग्रंथांचं वाचन सुरु केलं . ज्ञानेश्वरी माझ्या आयुष्यात ला पहिला ग्रंथ. त्यात लक्षात आलं कि गुरु असो अथवा नसो माझी श्रद्धा किंवा विश्वास आणि प्रयत्न असेल तर ज्ञानेश्वरी च माझा गुरु होईल .
मग काय जोमाने अभ्यास सुरु केला. माऊलींची कृपा म्हणून एक एक उमगायला लागला. ध्यान वाढत गेलं.
गुरु म्हणून मी जर बाहेरच शोधात राहिलो असतो तर कदाचित आयुष्य संपून गेलं असत . आणि मी तसाच मेलो असतो
देव सर्वत्र आहे , दगडात फुलात मातीत पाण्यात हवेत सर्वत्र , मग ह्या सर्वांनाच का गुरु मनू नये. ह्यांना गुरु मानणं म्हणजे साक्षात देवालाच गुरु मानणं आहे.
आता ध्यान अजून जास्त लागायला लागलं. ध्यान कुठेही करायचो नदी शेजारी, बस स्टॉप वर, ट्रॅफिक मध्ये, घरात कुठेही .आता उमगलं कि देव माझ्यात पण आहे मग काय आत्म केंद्रित ध्यान सुरु झालं .
मी जर मनुष्य रुपी गुरुची वाट पाहत राहिलो असतो तर कदाचित आयुष्य पूर्ण वाया गेला असत .
फार पूर्वी संताना कळून चुकलं होतं कि येणाऱ्या काळात गुरु मिळणं कठीण , म्हणून कदाचित ग्रंथ संपदा निर्माण झाली असेल.
ग्रंथ हेच गुरु.
जेणे करून साधकास अडचण येऊ नये.
हे माझ्या अल्प अनुभवाचे विचार आहेत. आपणास कदाचित वेगळे अनुभव आले असतील . कृपया इथे प्रदर्शित करा. सर्वांनाच त्याचा लाभ होईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग काय जोमाने अभ्यास सुरु केला. माऊलींची कृपा म्हणून एक एक उमगायला लागला. ध्यान वाढत गेलं>>>>>> ज्ञानोबांच्या तुम्हाला उमगलेल्या ओव्यांचा शब्दार्थ ,भावार्थ आणि गूढार्थ विशद करून लिहा . आवडेल वाचायला

गुरु शोधा

अजून प्रयत्न केला तर नक्की सापडेल.

गुरुशिवाय शिष्य अपूर्ण असतो, असे ऐकले आहे