मेथी भाजीचा [तिखट] केक...

Submitted by सुलेखा on 19 January, 2012 - 00:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

केक म्हणजे गोडाचाच प्रकार म्हटला जातो..पण हा मेथीचा केक काहीसा "हांडवा" प्रकारात मोडतो असे मला वाटते..उसगावातल्या माझ्या पंजाबी मैत्रीणीने हा केक शिकवला..पार्टी ला केलेल्या 'स्टार्टर 'पदार्थ प्रकारात हा होता..मोजके च जिन्नस वापरुन ,कमी मेहनतीत उत्तम पदार्थ तयार होतो..गरम्,थंड कसाही खा ..स्वाद फर्मास..
१ मेथीच्या जुडीची पाने,कोवळ्या दांड्या असल्या तर चालतील..धुवुन जाडसर चिरुन घ्यावी..
१ कप जाड रवा..
३/४ कप बेसन..
१ कप तेल..
१ कप दुध..
१ कांदा बारीक चिरलेला..
१ टिन क्रीम स्टाईलअमेरिकन कॉर्न..[
[अमेरिकन कॉर्न थोडया दुधात वाफवुन घेतले तरी चालेल ..]
हिरवी मिरची+आले वाटुन केलेली पेस्ट ३ चमचे..[मिरचीचा तिखटपणा व आपली आवड त्याप्रमाणे]
मीठ चवीनुसार..
हळद १ टी स्पुन.
१ टी स्पुन बेकिंग पावडर..
२ टी स्पुन साखर...
१ कप काजु+बदाम तुकडे..[भरपुर हवे]
किसलेले सुके/ओले खोबरे अर्धी वाटी....[ केक बेक करण्याआधी वरुन पेरायला..]

क्रमवार पाककृती: 

एका मोठया बाऊल मधे तेल,दुध,मिरची-आले पेस्ट,मीठ, साखर ,हळद घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे..
आता कांदा,रवा,बेसन व बेकिंग पावडर घालुन मिक्स करा..
काजु-बदाम व मेथीची भाजी,कॉर्न घालुन मिक्स करा..
बेकिंग ट्रे ला [मोठा ]केक टिन चालेल] तेलाने कोटींग करुन घ्या..त्यात केक मिश्रण टाकुन चमच्याने नीट एकसारखे पसरवुन घ्या..वरुन खोबरे किस पेरा..अगदी हलक्या हाताने किस चिकटेल इतपत दाबा ..
ओव्हन मधे ३५० फॅ.वर सधारण ४५ मिनिटे ते एक तास पर्यंत बेक करा..
थंड झाल्यावर वडयांच्या आकारात कापा..

अधिक टिपा: 

बटरी सेल डिस्चार्ज झाल्याने फोटो नीट आला नाही..पुन्हा चार्ज होइपर्यंत केक उरला नाही..म्हणुन फोटो नाही..

माहितीचा स्रोत: 
माझी उसगावातील पंजाबी मैत्रीण शशी दी..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी खूप वेळा हा केक केलाय, जो खातो तो प्रेमात पडतो केकच्या Happy

ऑर्किड, मी लाडवाचा बारीक रवा, उपम्याचा जाड रवा दोन्ही वापरून केलाय हा केक. दोन्ही प्रकारे चांगला होतो. बारीक दलिया वापरून बघितला नाही, पण त्याचाही चांगला होईल असे वाटते. मिश्रण कदाचित थोडेसे पातळ करावे लागेल, दलियाला शिजताना जास्त द्रव पदार्थ लागेल.

आज बारीक दलिया वापरून केला.
4:30 पासून साहेब भूक भूक करत होते.
नेमका हा धागा वर होता.
पटकन तयारी ला लागले.
मी फक्त गाजर किसून घातले. तिखट बेताचाच झाला होता.
चविष्ट झाला , पण , फारच फळफळीत झाला.
चमच्याने खावा लागला. काय चुकले??
टीप : दलिया अगोदर भिजत ठेवा. मी , १० मि. दुधात च भिजवला.पण माझ्यामते 30मि तरी ठेवा.

स्वस्ति, तू दलिया वापरून केलास? मग तू दलिया शिजायला जितका द्रव पदार्थ लागतो तितका घातला नसणार. दलियाने होते नव्हते ते सगळे द्रव खेचून घेतले असणार व म्हणून फळफळीत झाला असणार.

झांपी, तेलकट होत नाही.

ओके साधनाताई . मग दुप्पट दूध/पाणी घालू म्हणताय ?
बॅटर ईडली पीठासारखं झाल होतं परत कधी केला तर आणखी पातळ करून पाहीन
धन्स

स्वस्ति आधी रव्याचा करून बघ, मग अंदाज येईल.

झंपी, रेसिपीत 1 कप तेल लिहिले असले तरी मी अर्धा कप तेल वापरून करते. चांगला होतो, तेलकट होत नाही. 1 कप तेलानेही तेलकट होणार नाही, फ्लेकी खुसखुशीत होईल असे वाटते. मी पहिल्यांदा केला तेव्हा अर्धा कप तेल वापरून केला. दुसऱ्यांदा तेल अगदीच कमी वापरले, 1 चमचा वगैरे, तेव्हा खूप कोरडा झाला, चव थोडी बिघडली. आता अर्धा कप तेल वापरूनच करते. चांगले टेक्श्चर येते.

सगळे मिश्रण जाडसर होते, मीठ घातल्यावर दूध लगेच फाटत नाही, गरम केले तरच फाटते. इथे मिश्रण गरम होईपर्यंत दूध स्वतःचा फॉर्म गमावून बसलेले असते.

ओवन शिवाय कराय्चा झाल्यास काय करावे?

>>> जाड बुडाच्या कढईत मंद आचेवर मिश्रणाचं भांडं ठेवा. वरून दुसरी कढई/पातेलं ठेवा.

चांगलाच होईल. मेथी कमी घालेन.
वेगवेगळे रवे वापरून पाहायला हवेत. तांदुळाचा घेतल्यास केक म्हणता येणार नाही, ढोकळा होईल.
प्रकार आवडला.

IMG-20210117-WA0015.jpg

मी मेथीचा एक केला होता. काचेचे झाकण असलेल्या कढईत. मध्यम आचेवर.
वरच्या रेसिपी मधे फक्त काही बदल. कॉर्न, कांदे वापरल नव्हते. गाजर किसून टाकले होते.
दुधा ऐवजी दही १ वाटी, एक वाटी रवा एक वाटी बेसन साठी. पाणी एक कप. (अर्धा अर्धा कप, एकदा मिश्रण करताना, एकदा १० मिनिटे भिजवून झाल्यावर.)
आणि नॉन स्टिक पसरट कढईमधे मिश्रण टाकायच्या आधी जीरे, तीळ, लाल तिखट, कढी पत्ता तेलात परतून त्यावरच मिश्रण टाकायचे.
फोटोत एकाच बाजूला लागलेले तीळ स्वयंपाक्याच्या अनुभवाची कमी दाखवतात. Happy

विक्रम काका , केक एक्दम टेम्टीन्ग दिसतोय

सध्या दर आठवड्याला मेथीची जुडी आणली जाते .
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करून झाल्या , पराठे झाले .
आता एकदा हा केक करेन . मागे दलिया घालून केला होता . तेन्व्हा भुसभुशीत झाला होता . परत प्रयत्न करेन .

यात मेथी म्हणून शब्द्खूण नाहीये म्हणून माझ्या नजरेत आला नाही , नाहीतर बर्याचदा पाक्रू अ‍ॅप वापरते मी .

मी पण करून पाहिला काल हा केक. छान झाला. रव्याच्या ऐवजी स्टील कट ओट्स वापरले. दूध आणि दही अर्धा कप प्रत्येकी घेतले. दूध अजून दोन टेबलस्पून वाढवले ओट्स शिजण्यासाठी. छान न्याहारीचा प्रकार आहे. मी सोबत हिरवी चटणी (मिरची, कोथिंबीर, आले, किंचित दही घालून) वाढली.

ढुधा ऐवजी पाणी / ताक /गोड दही वापरले तर चालेल . तेल पाउण वाटी तर हवेच . मिश्रण सरसरीत होईल इतके असावे. त्यानुसार द्रव पदार्थ प्रमाण असावे.

Ok.... Happy ताक वापरून करून पाहीन

मी आज केला आहे हा केक.. खूप छान झाला आहे नेहमीप्रमाणेच.
बरेच वेळा केला आहे आजवर, पण इथे अक्नॉलेज केलं नव्हतं. कसं काय देवजाणे!

Pages