हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!

Submitted by मार्गी on 7 March, 2019 - 04:19

हर्पेन ह्यांनी चद्दर ट्रेक पूर्ण केला

समस्त माबोकरांना नमस्कार. आपले प्रेरणास्थान असलेल्या हर्पेन ह्यांनी नुकताच गोठलेल्या झांस्कर नदीवरचा चद्दर ट्रेक पूर्ण केला आहे. हर्पेन ह्यांच्या सर्व कर्तृत्व शिखरांप्रमाणे हा त्यांचा अनुभवही थरारक आहे. तेव्हा समस्त माबोकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव सविस्तर शब्दबद्ध करावेत. हा चद्दर ट्रेक काय असतो, तयारी काय लागते, तांत्रिक बाबी काय असतात, काय अनुभव येतात हे सर्व त्यांनी सांगावे. शिवाय दर वर्षी हा ट्रेक करताना ट्रेकर्स मृत्युमुखी पडतात. त्याबद्दलही सांगावे. आणि पर्यटक- ट्रेकर्सचा लदाखच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व बाबींची चर्चा करावी अशी त्यांना विनंती आहे.

गोठलेल्या झांस्कर नदीलाही उन्हाळा सुरू होताना पाझर फुटतो. तसा हर्पेन ह्यांच्या लेखणीलाही पाझर फुटेल व आपल्यावर तिची बरसात होईल ही आशा करतो! Happy

धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

नमस्कार मंडळी आपण दाखवलेल्या सद्भावना आणि आपुलकी मुळे मी अगदी भारावून गेलो आहे. तुमच्या विश्वासास पात्र ठरेन असे हातून लिहिले जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

ओहह!!!! इतक्या प्रतिक्रिया!!! सर्वांचे खूप खूप आभार!!! आणि अनुमोदन मिळाल्यामुळे हर्पेन ह्यांच्यासमोर माझी बाजू अधिकाधिक बळकट केल्याबद्दल धन्यवाद!!

@ हर्पेन, आता तुम्हांला लिहावंच लागणार आहे; सो जास्त उत्तर देत नाही! Happy नाही तर इतकंच म्हणालो असतो की, तुमच्या वाढदिवसाला तुम्हांला शुभेच्छा देताना वापरलेली सर्व विशेषणं इथे पुनश्च उद्धृत केली असती! आणि मी २७ फेब्रुवारीला मराठी दिनाच्या उपक्रमाला शुभेच्छा देऊन तो धागा वर आणला होता, हाही खारीचा वाटाच ना! Happy आणि माझ्या ह्या तथाकथित 'टुकार ललित लेखन' धाग्याला इतका अपार प्रतिसाद मिळालाय, सो मला त्याचा आनंदच आहे!!! ही तुमचीच पुण्याई, दुसरं काय! तेव्हा आता त्वरित आपल्या लेखणीला पाझर फुटवा! Happy Happy

हर्पेन एक नंबर,
अभिनंदन !
कमाल आहेस तु !! लेख वाचायला प्रचंड उत्सुक आहे, लवकर लिही. >>>>>+9999 Happy

अरे बाप्रे!
हॅट्स ऑफ हर्पेन! खुप खुप अभिनन्दन!! Happy
मायबोलीचा झेन्डा तिथेही फडकला तर!

आता एक छानशी लेखमालिका येउ द्या!
खुप दिवस झाले मायबोलीवर चांगले काही वाचावयास मिळावे यासाठी उत्सुक... नव्हे नव्हे अधाशासारखे डोळे लावुन बसलो आहोत.

खुप खुप अभिनन्दन!! Happy आपले अनुभव नक्की लिहा इथे ,

प्रेरणा मिळेल कायमच अम्हा ट्रेकर्स ना.

अभिनंदन हर्पेन. फोटो व थोडक्यात माहिती येऊ दे जमल्यास. मग सविस्तर लेख वेळ होईल तसा येऊ दे.

Pages