शब्दखेळ- अंत्याक्षरी

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2019 - 22:38

काय म्हणताय...... नाही नाही, बरोबरच वाचलंय तुम्ही. आम्हाला शीर्षकात अंताक्षरी नव्हतेच लिहायचे आणि आपल्याला अंताक्षरी खेळायचीही नाहीये.

हो हो सांगतो, मूळ मुद्द्याकडेच येतोय. अगदी बरोबर वाचलंय तुम्ही. अंत्याक्षरी..

तर आजचा खेळ आहे अंत्याक्षरी.

खेळ असा आहे.

आपल्याला एक अक्षर दिले जाईल त्या अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता धागादोरा मिळावा म्हणून काही वर्णनपर सूचक शब्द सांगितले जातील. तो शब्द किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारून त्याचे निर्देशन केले जाईल. त्याचा वापर करून आपण तो शब्द ओळखायचा आहे आणि त्याच अक्षराने शेवट होणारा शब्द ओळखण्याकरता पुढचा क्लू ही तुम्हीच द्यायचा. त्याही वेळी तो किती अक्षरी आहे हे कळावे म्हणून तितक्या फुल्या मारायला विसरायचे नाही बरं.

फार गुंतागुंतीच वाटते आहे का ? तसे अजिबात नाही. कसे ते पाहूच.

उदा. समजा अक्षर आहे र

१. एक प्रकारचा साप - XXX र

मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा

१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - XXX र

मग ज्याला हे उत्तर येईल त्याने ते दोन्ही वर्णनपर शब्द / वाक्य कॉपी करून उत्तर द्यायचे आणि पुढचा क्लू द्यायचा

१. एक प्रकारचा साप - अजगर
२. खूप जास्त - भरपूर
३. लोणच्यातला द्रव भाग / रामाने पाठीवरून हात फिरवलेला प्राणी - X र

अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे.

तर पहिले अक्षर आहे प.

पहिला क्ल्यू आमच्याकडून
१. वरदानाच्या विरुद्ध - X प.

पुढचे अक्षर क्ष
१. हंपी येथील प्रसिद्ध मंदिर- XXX क्ष
हा शब्द ओळखून पटापट पुढचा क्ल्यू द्या बरं!
आणि आधीचे शब्द कॉपी करायला विसरू नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायब - गडप

चिन्हांची भाषा - xपी

जवळ - समीप

जेवणानंतर तोंडात टाकतात ती - _ _ _ प

Pages