मेथी भाजीचा [तिखट] केक...

Submitted by सुलेखा on 19 January, 2012 - 00:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

केक म्हणजे गोडाचाच प्रकार म्हटला जातो..पण हा मेथीचा केक काहीसा "हांडवा" प्रकारात मोडतो असे मला वाटते..उसगावातल्या माझ्या पंजाबी मैत्रीणीने हा केक शिकवला..पार्टी ला केलेल्या 'स्टार्टर 'पदार्थ प्रकारात हा होता..मोजके च जिन्नस वापरुन ,कमी मेहनतीत उत्तम पदार्थ तयार होतो..गरम्,थंड कसाही खा ..स्वाद फर्मास..
१ मेथीच्या जुडीची पाने,कोवळ्या दांड्या असल्या तर चालतील..धुवुन जाडसर चिरुन घ्यावी..
१ कप जाड रवा..
३/४ कप बेसन..
१ कप तेल..
१ कप दुध..
१ कांदा बारीक चिरलेला..
१ टिन क्रीम स्टाईलअमेरिकन कॉर्न..[
[अमेरिकन कॉर्न थोडया दुधात वाफवुन घेतले तरी चालेल ..]
हिरवी मिरची+आले वाटुन केलेली पेस्ट ३ चमचे..[मिरचीचा तिखटपणा व आपली आवड त्याप्रमाणे]
मीठ चवीनुसार..
हळद १ टी स्पुन.
१ टी स्पुन बेकिंग पावडर..
२ टी स्पुन साखर...
१ कप काजु+बदाम तुकडे..[भरपुर हवे]
किसलेले सुके/ओले खोबरे अर्धी वाटी....[ केक बेक करण्याआधी वरुन पेरायला..]

क्रमवार पाककृती: 

एका मोठया बाऊल मधे तेल,दुध,मिरची-आले पेस्ट,मीठ, साखर ,हळद घालुन मिश्रण ढवळुन घ्यावे..
आता कांदा,रवा,बेसन व बेकिंग पावडर घालुन मिक्स करा..
काजु-बदाम व मेथीची भाजी,कॉर्न घालुन मिक्स करा..
बेकिंग ट्रे ला [मोठा ]केक टिन चालेल] तेलाने कोटींग करुन घ्या..त्यात केक मिश्रण टाकुन चमच्याने नीट एकसारखे पसरवुन घ्या..वरुन खोबरे किस पेरा..अगदी हलक्या हाताने किस चिकटेल इतपत दाबा ..
ओव्हन मधे ३५० फॅ.वर सधारण ४५ मिनिटे ते एक तास पर्यंत बेक करा..
थंड झाल्यावर वडयांच्या आकारात कापा..

अधिक टिपा: 

बटरी सेल डिस्चार्ज झाल्याने फोटो नीट आला नाही..पुन्हा चार्ज होइपर्यंत केक उरला नाही..म्हणुन फोटो नाही..

माहितीचा स्रोत: 
माझी उसगावातील पंजाबी मैत्रीण शशी दी..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा,
धन्यवाद !! घाबरत घाबरत केला केक. मेथी केक ऐकुनच घरी नाक मुरडण्यात आल होत. पण जबरदस्त हिट झाला. आता मेथी अशीच करा अस फर्मान आहे. Happy
फोटो काढलाय. पोस्ट करते.

.

ईन्ना,
पहिल्यांदा 'तिखट मेथीकेक' ऐकल्यावर माझी प्रतिक्रिया सेम अशीच होती..पण खाल्ल्यावर मात्र चव आवडली..सगळे जिन्नस एकदा मिक्स करुन बेक करायला ठेवले कि एक पदार्थ तयार.. त्यामानाने मेहनत कमी आहे..पुन्हा पुन्हा पहावे लागत नाही..

<सुलेखा
आता तिखट केक स्वरुपाचे प्रयोग करायला हरकत नाही. शनिवारी गाजर , बीट, घालुन करुन बघणार आहे. Happy
चान्गला झाला तर पोस्ट करीन. Happy

इन्ना,व्हेरीएशन करुन चवीला छानच लागतो..पण गाजर्,बीट,दुधी,पानकोबी ,बटाटा,रताळे घातल्यास मोठ्या भोकाच्या किसणीने जाडसर किसुन घालावी..

दिनेशदा,पॅन मधे ही मंद आचेवर छान होईल..
टोकुरीका,मावे ,ओव्हन्,केक चा ओव्हन नसल्यास कुकरच्या पॅन मध्ये ही करता येईल..पण त्याखाली लोखंडी तवा ठेवल्यास केक खाली करपणार नाही..कुकर मधे थोडी वाळु टाकुन त्यात केक चे भांडे [ किंवा कूकरमधल्या डब्यात]ठेवुन त्यात केक मिश्रण बेक करता येईल्..एकदा वाळु गरम झाली कित्यात केक चे भांडे ठेवावे व मंद गॅस करावा. केक छान होईल..

मनी चालेल ना.मटार्,शेंगदाणे,तुमच्यातिथे जर सध्या पापडी/घेवडा किंवा सुरती पापडी वा हिरव्या तुरीच्या शेंगा मिळत असेल तर त्याचे दाणे ..असे काहीही टाकता येतील्..शेंगदाणे भाजुन्,सोलुन किंवा १ तास पाण्यात भिजवलेले शेंगदाणे घातले तरी चालतील्..प्रत्येकाची चव वेगळी येईल.रेडिमेड भोपळा /कलिंगड्/खरबुज च्या बिया सोललेल्या मिळतात पहा ड्राय्-फ्रुट च्या दुकानात त्यांना मगज असे म्हणतात.त्या ही टाकु शकतो..सोबत किशमीश भरपुर घालावे.त्याची गोडसर चव मुलांनाही फार आवडते.

मामी
प्रेस्टीज पॅन मधे बसणार अल्युमिनियम च भान्ड केक साठी तयार केल. त्यात सुलेखातैंच्या क्रुतीप्रमाणे मिश्रण ओतल. पॅन मोठ्या बर्नर वर तापवुन त्यात हे भान्ड ठेवल. गास्केट आणि शिट्टी काढून झाकण लावल.पुढे ३५ मि ,पहिल्यान्दा १५ मि हाय मग लो फ्लेम. बरा दिसल्यावर पहिल्यान्दा फोटु ! Happy
मग गट्ट्म. आमच्या कडे गाजर , मटार , श्रा.घे. अशि बरीच व्हेरिएशन पण झाली. सुलेखातै प्रत्येक वेळेला खाणार्याना मुळ सुगरणीच नाव सान्गण्यात आलय. Happy थन्क्यू !

सामी,कूकर मधे करण्यापेक्षा कढईत्/लोखंडी किंवा पांढर्‍या अल्यु.च्या नेहमीच्या कढईत थोडी वाळु [पाव भाग भरेल इतकी म्हणजे दिड वाटी वाळु पुरेशी आहे..एकदा वापरलेली वाळु पुन्हा-पुन्हा वापरता येते]टाकायची १० मिनिटे हाय फ्लेम वर तापवायची मग त्यात मेथी केक चा डबा ठेवायचा त्यावर झाकण र्ठेवायचे व फ्लेम कमी करायची साधारण १० मिनिटानी चेक करायचे नन्तर पुन्हा ५ मिनिटानी..कूकर पाणी न घालता गरम केला तर त्याचा आकार बिघडतो झाकण लागत नाही

आज केला हा केक. तेल पाव वाटीच घातले पण तरीही छान झाला. गारही चांगला लागतो. परत परत करण्यास काहीच हरकत नाही. Happy

साधना,या मेथी केक सारखेच कोथिंबीर् चा केक अळुची पाने घालुन केक खुप छान होतो.फक्त अळुची पाने खुप बारीक चिरुन घालावी लागतात.कमी तेल घालुन आता मी ही करुन पाहीन.

Frozen methiche praman deu shakaal kaa? Like tyaatla ek frozen square don etc...recipe interesting aahe....ani winter purn sampala chya aata frozen methi sampawali pahije Asa ek wichar manat yetoy.....aabhar

वेळकाढू--फ्रोझेन मेथीचे दोन स्क्वेअर घ्यावे लागतील ..त्यातल्या जाड काड्या न शिजणार्‍या,कडक,दाताखाली येणार्‍या काढाव्या लागतील..मी सर्वात पहिल्यांदा फ्रोझेन मेथीचाच केक खाल्ला होता.हे सगळे प्रमाण तेव्हा त्यांनी दुप्पट घेतले होते..व मोठा केक केला होता.

मनी,होय मेझरींग कप च आहे.पण आपला नेहमीचा चहाचा कप घेतला तर ..एक मेझरींग कप= दिड कपाचा अंदाज घे.दुसरे असे कि .मेथीभाजी किती घेताय त्यावर सगळे अवलंबुन आहे.त्यामुळे अंदाजे बाकी जिन्नस घ्यायचे.तसेच रवा जास्त व बेसन कमी घ्यायचे म्हणजेच केक रवाळ होईल.तेल-ड्राय फ्रुट शक्य होईल / प्रकृतीला मानवेल तितकेच घ्यायचे.बे.पा.मुळे केक खस्ता होईलच.मनी जमले तर या केक चा फोटो इथे टाकशील.

जाड रवा म्हणजे नेहमी शिरा, उपमा करायला वापरतो, तो रवा ना?की त्याहून जाड? माझ्याकडे बारीक(रवा बेसन लाडूसाठी) आणि मध्यम रवा(शिरा,उपमासाठी) आहे.
बारीक दलिया चालेल का? रेसिपी मस्त आहे. इन्नाच्या केकचा फोटो दिसत नाही.

Pages