मेले शब्द डोळ्यादेखत बदलतात

Submitted by सुनिधी on 12 February, 2019 - 00:48

( शब्द हा शब्द लिहायचा राहून गेला होता धाग्याच्या नावात)

तुम्हालाही हा अनुभव आला असेलच, पण मला फारवेळा येतो. तरी हल्ली सावध झाले आहे, तरी अधुनमधुन ‘ते’ दगा देतंच.
‘ते’ म्हणजे.... शब्द, ऑटोकरेक्ट...
म्हणजे काय होतं, मी मेसेज लिहिते.. इंग्लीशमधुन, मिंग्लीशमधुन. लिहिताना कळतं की ‘हे शाब्बास, बरोब्बर‘ लिहीलंय‘. आणि ‘सेंड’ वर टिचकी मारली रे मारली की .... मेले डोळ्यादेखत शब्द बदलतात आणि हताशपणे पहाण्यावाचुन उपाय उरत नाही. आणि नंतर तो उडवता येत नाही कारण अख्ख जग व्हाटसपवर नजरा लाऊन बसलेलं असल्याकारणाने सर्वांनी ते वाचलेलंही असतं आणि मग सुरु होतो फिदफिदण्याचा काळ.

आता परवाच ऑफीसमधला एक म्हणाला, ‘मला रोटीमॅटिकचा पोळी करतानाचा व्हिडिओ पाठव‘. मग काय उत्साहाने घरी येऊन पसारा आवरुन मस्त व्हिडिओ काढला व मेसेज लिहुन तो पाठवला, ‘ Prabhu, sending you Rotimatic video per your request’. आमची टीम हसरीखेळकर आहे म्हणुन आमचा व्हातसप गॄप आहे. तर सगळ्यांनाच पाठवला. तर ऑटोकरेक्ट सायबांनी तो ‘Prabhu, sending you romantic video per your request’ असं झोकात बदलुन पाठवले. कळले तोवर उशीर झाला होता.. टीममधल्या एका शांत मुलाने मी लिहिल्याप्रमाणे ‘रोमँटिक व्हिडिओ दिसत नसल्याची’ तक्रार सौम्यपणे केली तेव्हा झाला प्रकार कळला.
दुसर्‍या एका गॄपमधे एक व्यक्ती भयंकर गंभीरतेने एक मत मांडत होती तर तिला ‘you are right’ लिहिले तर ते ‘you are tight’ झाले. तिच्याशी प्रथम संभाषण व त्याची अशी सुरुवात?

असे असंख्य प्रकार झालेत हातुन. स्वतःचे कौतुक किती करायचे म्हणुन गब्बस्ते.

तर येऊ द्यात तुमच्याही ऑटोकरेक्ट या शत्रुमुळे झालेल्या गंमतीजंमती वा फजिती.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

romantic video > Lol

प्रत्येक नविन शब्द किंवा नाव सेव करावे लागते, तसे नाही केले तर आॅटोकरेक्ट हट्टीपणा करून स्वत:चेच घोडे पुढे दामटते व आपले हसू होते. वैताग आहे नुसता.

ऑटोकरेक्ट पण आपले नेहमीच्या वापरातले शब्द सुचवतं ना>>> Lol Lol Lol

जरा अवांतर. या वरुन मला "ज्याची ब्राऊझर हिस्ट्री क्लिन असते त्या माणसाच्या सज्जनपणावर विश्वास ठेऊ नये." हे उगाचच आठवले.

"ज्याची ब्राऊझर हिस्ट्री क्लिन.......
आणि व्हाट्सऐप लास्ट सिन ऑफ़ असते त्याच्याही ..... ! हेमावैम

---------
जर का आपण मिन्ग्लिश टाइप करत असू तर ब्वॉ हे ऑटो करेक्ट डिक्शनरी सेटिंग्स ऑफ़ करण्याची सोय वापरावी हेच श्रेयस्कर !

Happy अनेकदा अचाट शब्द निसटून गेले आहेत.

परवाच एका चॅट मधे एक खाण्याबद्दलची साइट ही "फुड पॉर्न" आहे लिहीताना टायपो झाल्याने ती साइट "गुड पॉर्न" आहे असे ग्रूप मधल्या एका व्यक्तीने लिहीले होते, त्याची आठवण झाली.

'Your wifi is being used by other people' ऐवजी 'Your wife is being used by other people' असे कुणाचे तरी झालेले ऐकले आहे... Proud

कालच एक अ‍ॅड पाहिली. त्यात एक अपार्टमेन्ट रेण्ट ने उपलब्ध आहे वगैरे होते. त्यात electricity, water, garbage wifi अशे शब्दशः होते. गार्बेज व वायफाय मधे कॉमा नसल्याने भाड्यात गार्बेज (कलेक्शन चार्जेस) व वायफाय दोन्ही इन्क्लुडेड आहे, की हा तेथील वायफायच्या क्वालिटीबद्दल स्पष्ट उल्लेख आहे असा प्रश्न पडला Happy

अगंबाई, हा धागा जिवंत आहे की अजुन.
हल्लीच शालिनी नावाच्या स्त्रीशी ओळख झाली. तिला पहिलाच मेसेज हाय शालिनी पाठवताना त्याचे हाय शेकिंग झाले. काय वाटलं असेल तिला? सॉरी म्हटले म्हणा.

अरे हे धमाल आहे! आज वाचलं.

गर्बेज वायफाय Lol

पूर्वी ऑटोकरेक्ट नसतानाही 'बाबूज मॅरेज फिक्स्ड विथ लिमयेज डॉटर'ऐवजी 'बाबूज गॅरेज मिक्सड विथ लेमन वॉटर' असं लिहिणारे तंतूगुरुजी पोष्टापोष्टात होतेच. Happy

गर्बेज वायफाय >> हे देवनागरीत वाचुन गर्बेंनी सुरु केलेली वायफाय सर्व्हीस असे वाटले.

आता व्होटस्प मेसेज 15 मिनिट पर्यंत एडिट करता येतात
मजा कमी झाली त्याने..

तसेही मी सध्या बोलून टाईप करतो. त्यामुळे हा प्रॉब्लेम येत नाही आता..

एकदा ऑटोकर्रेक्ट मुळे हॅलो प्रमोद चे हॅलो पिरॅमिड झाले. आणि पहिल्यांदाच मेसेज केला होता काही ओळख नव्हती ! ते बिचारे सद्गृहस्थ खूप वैतागले होते आणि मला एकीकडे खूप हसू येत होते पण माफी मागावी लागली आणि एक्सप्लेन करावे लागले कि हे ऑटोकर्रेक्ट ने झाले होते.

साडी नेसताना चे ऑटो करेक्ट नेहमी साडी0व0 नसताना होते.(आताही झाले, बदलावे लागले.) गाडी लिहिल्यावर गादी होते आणि सर्व संदर्भ हास्यास्पद बनतात.
गुगल इंडिक अतिशय नकारात्मक आहे.नेहमी चांगल्या शब्दाचे वाईट ऑटो करेक्ट करतो.कधी मेलं काही साधं लिहिलं, त्याचं छान ग्लॅमर वाल्या शब्दात ऑटो करेक्ट होऊन बॉस ला गेलं आणि त्याचा(आणि नंतर आपला) फायदा झाला असं होतच नाही. Happy

Lol
मी एकदा मोदकांचा फोटो दिला तर एक मित्र हाताच्या छान इमोजीसहित 'नाईस मॉडेल' म्हणाला. पुन्हा सॉरी, सॉरी ऑटोकरेक्ट म्हणाला.

Lol
चुकलेला शब्द बरोबर लिहिताना पुढील मेसेजमधे * आणि त्यानंतर बरोबर शब्द आपण लिहितो, तशी लिहायचे तेव्हा तीनदा .. हो ३दा * बरोबर तो चुकीचाच शब्द गेला. काय होता आठवत नाही पण तारांबळ झालेली आठवते. समोरच्याची पण झाली असेल,

Pages