कोन मारी मेथड. आवरा तो पसारा!!

Submitted by अश्विनीमामी on 5 February, 2019 - 01:06

आपल्या घरात आपल्याही नकळत वस्तू जमा होत जातात. मुले आली की त्यांच्याबरोबर पसारा पण निर्माण होत जातो. बाबा जिमला न जाता घरीच ट्रेडमिल वर चालू ठरवतात. आई स्वयंपाकघरातील प्रत्येक गरजे साठी नव नवे मशीन्स घेत जाते. आयपी कुकर किमान पाच साइज मधले.
बारका, छोटा, नॉर्मल युएस्बी वर चालणारा, इंडस्ट्रिअल पावरचा फूड प्रोसेसर, मिक्सर ज्युसर, सूप मेकर, करंजीचे साचे, सोर्‍या , प्रत्येक मुलाचे किमान १०० कपडे आईच्या साड्या, भारतीय व परदेशी पद्धतीचे कपडे, बाबांचे फॉर्मल्स व कॅजुअल्स, व प्रत्येकी १० -११ प्रकारचे शूज.
झोपाळे, सोफे, बीन बॅग, खेळणी लेगोच्या ब्रिक्स हर सणाचे डेकोरेशन हे नीट साठवलेले प्रत्येक वर्शीचे,

काही जुन्या आठवणीतील वस्तू, आईची पैठणी, बाबांची ब्रीफकेस, आत्याचे गणेश मूर्तींचे कलेक्षन, बारक्यांचे प्रॉजेक्ट्स, वस्तू कपडे आणि अजून जास्त वस्तू ह्यांच्या पसार्‍यात आणि अडगळीत कधी कधी हरवून जायला होते . आपण नक्की काय करतो आहोत ह्यावरचा फोकस निघून जातो व ही अडगळ नातेसंबंधात पण परा व र्तित होते. हा सर्व कचरा पसारा साफ करणे अगदी गरजेचे आहे.

हे मी म्हणत नाही तर मारी काँडो. सुप्रसिद्ध जपानी प्रोफेशनल स्पेस ऑर्गनायझर व डिक्लटर स्पेशालिस्ट म्हण ते. ह्या ताईंची ब्रांडेड व बहुतेक
पेटंटेड मेथड म्हणजे कोनमारी.

सर्व कपाटे खण, ड्रावर फडताळे रिकामी करा, जरुरीपुरतेच ठेवा व बाकीचे देउन टाका नाहीतर टाकून द्या. असे ताई म्हणतात बहुतेक.
कारण त्या जपानीत बोलतात. व अडगळ / पसारा दिसला कि शिव शिव करत चक्कर आल्याचा अभिनय करतात. पण मग घर आवरायला मदत करतात.

नेटफ्लिक्स वर कोनमारी, मेरी कांडो ची काही भागांची मालिका उपलब्ध आहे. मी दोन भाग बघून सोडून दिले. काय तो पसारा? बघवेना. पण घर आवरल्यावर दिसते मात्र छान.

मग भगिनिन्नो व बंधुंनो काय घेतायना घर आवरायला?!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक काळ असा होता की वस्तुंवर अतोनात प्रेम केले. मग एकदिवस सगळ्याचा कंटाळा आला आणि अक्षरश: गरजेच्या वस्तु सोडून बाकी सगळे वाटुन टाकले. आठ दिवस बायको हताश होऊन पहात होती पण तिलाही नंतर पटले. आता गावी माझ्या पुस्तकांची एक विनामुल्य लायब्ररी सुरु आहे. Happy

लिव्हते. पण मथितार्थ
१) गरज सरो वैद्य मरो ,,
२) कामापुरती मामी,
३) भिडे भिडे पोट वाढे
४) अंथरूण पाहून पाय पसरावे.
हाच आहे. त्याला जपानी बाई कशाला हवी.

भारतात तरी गरज संपलेल्या पण सुस्थितीतल्या वस्तू काही ही असोत पण टाकून दिल्या किंवा देउन टाकल्या तर त्या शुन्यातून विश्व उभे करणारे आहेत. मुळात अगदी गरजे पुरते शॉपिन्ग केले तर ही परिस्थिती येणार नाही.

ती तिच्या असिस्ट्म्टला जपानीतून सांग णार मग भाषांतर करून असिस्टंट बाई घरवाल्यांना सांगते मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो. व ते वस्तू सॉर्ट करायल लागतात. शिवाय दर वेळी घरी आली की दारात बिग हग हे कश्याला नाटक.

कारण त्या जपानीत बोलतात. व अडगळ / पसारा दिसला कि शिव शिव करत चक्कर आल्याचा अभिनय करतात. पण मग घर आवरायला मदत करतात.>>>> मी पाहिल नाहीये अजुन ,, पण त्यांचा अभिनय इमॅजिन केलाच.जपानी लोक शिव शिव कसे करत असतील ते . Lol

>>त्याला जपानी बाई कशाला हवी.
खरंय. हेच म्हणणार होते. पण कोनमारी हे नवीनच ऐकलं म्हणून उत्सुकता होती.

माझं स्वप्न आहे घरात फक्त गरजेच्या वस्तू ठेवायच्या असं. मी एका पायावर तयार आहे अख्खं घर पिंजून काढून मिनिमलवर आणायला. पण एक वस्तू जरी बाहेर काढायची म्हणली तरी खूप वादविवाद होतात. मग कोनमारी करू पाहिलं तर झालंच मग.

मग कोनमारी करू पाहिलं तर झालंच मग. >>> मग कोनमारी राहिल बाजूलाच.......मारामारी व्हायची Lol

कोनमारीबाईच्या सांगण्यानुसार कपडे घडी घालून ट्रीपला नेले,तसेच घडी घालून आणले.कमी जागेत भरपूर कपडे बसले. एरवी तिचे बरेच काही पटत असूनही करवत नाही.

सर्वात प्रथम वाढदिवस बंद करायचे. लग्नातले आहेर बंदच झालेत. नको त्या वस्तू उगाचच गोळा होतात.
साड्या घेणे आणि एकदाच नेसणे बंद करा. म्हणजे वस्तू जमवायच्याच नाहीत. भारतात कुठेही ट्रिपवर गेल्यास खरेदी अजिबात करायची नाही.

चक्कर आल्याचा अभिनय करतात >>> बाप्रे. आमच्याकडे आल्या तर कोमातच जायचा अभिनय करावा लागेल बाईंना.
प्रचंड पुस्तके, खेळणी, कपडे, धान्य साठवण, अंथरूण/पांघरूणं, जुन्या फायली , कधी काळी परदेशात जाऊन आल्याने त्या भल्या मोठ्या सुटकेसेस.. त्यात बिल्डरने एकही खोलीला लॉफ्ट दिला नाहीये. त्यामुळे सगळे जास्तीचे सामान रेल्वेच्या प्लॅटफॉर्म सारखे जिकडे तिकडे पडलेले. घरी कोणी येणार असेल तर तात्पुरते आवरतो. Sad
काही टीप्स असतील तर जरूर द्या.

आमच्या कडे डिझास्टर कोपरे आहेत.वर्किंग डेज ला त्यावर पसारा होतो.वीकेंड ला तो आवरला जातो.परत हळूहळू पसारा साचत जातो.पब्लिक ची लहान मुलं असूनही इंटिरिअर च्या जाहिराती सारखी दिसणारी घरं डोळ्यात साठवतो.कधीतरी आमचंही तसं असेल.कोनमारी बाईंना बोलवावं का एकदा? ☺️☺️

पसारा करणं हा माझा आवडता उद्योग! घरी कुणी नसलं, तर जुन्या पुरान्या पेपरची पाने सुटी करून वाचणे हा माझा आवडता छंद. पण 5s को ओरडीनेटर म्हणून नेमणूक झाली, आणि जेव्हापासून 5s शिकलोय, अंगात भिनलय, तेव्हापासून पसारा करावासा वाटत नाही.
वर्कप्लेस आणि घरही प्रचंड स्वच्छ राहातय. वस्तू वेळच्या वेळी आणि नीट सापडल्याने पैशाचीही बचत होतेय!
या कोनमारी बाईपेक्षा 5s कित्येक पटीने उत्तम!
5s वर एखादा लेख लिहावासा वाटतोय!

कोन मारी बरोबर खूप सार्‍या लहान मोठ्या पेट्या घेउन येते. व एक सारख्या वस्तू. जसे चमचे. डाव, मोजे, मसाल्याचे पुडे. खिळे लहान मुलांची खेळणी, अंत्रवस्त्रे सर्व अश्या पेट्यां मध्ये ठेवा हा मोलाचा उपदेश देते. गुड इनफ. आमच्याकडे मोठ्या पेटार्‍यात एकच १०० ग्राम मिरीचे उघडलेले पुडके, फ्रिज मध्ये सर्वत्र जागामिळेल तिथे पिठा मिठाची उघडलेली पुडकी. दह्यासमोर ठेचा, भाजीच्या ट्रे मध्ये दुधाचे बॉक्सेस.
अंड्याच्या बॉक्स मध्ये उकडलेले बटाटे. फ्रीझर मध्ये सूपचे पाकीट. जे एकदाच बनवून मग विसर्ले जाते परत सर्दी होईपरेन्त. असले असते.
ती एव्ढ्या गोड पणी सर्व सांगते दाखवते की माझे तर लाजून पाणीच होईल. ते ठेवायला एक ड्रम लागेल.

पब्लिक ची लहान मुलं असूनही इंटिरिअर च्या जाहिराती सारखी दिसणारी घरं डोळ्यात साठवतो.>>>माझ्या एका नातलगाचे असं घर होतं.बेडवरील चादरपण बिनासुरकुतीची.केव्हाही गेलो की टापटीप.लहानपणी तिथे गेलो की घराबाहेर आल्यावर मोकळा श्वास घेत असू.घरातल्या सर्वांना वस्तू जागच्याजागी ठेवण्याची आवड असली पाहिजे.

की माझे तर लाजून पाणीच होईल. ते ठेवायला एक ड्रम लागेल...... Rofl

5s वर एखादा लेख लिहावासा वाटतोय!>>> लिहा ना सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

अमा Biggrin

लिहा ना सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र>>>>>
हे असलं सर्रर्रर्रर्र वाचून माझ्या अंगावर सर्रकन काटा आलाय Lol
नका ना म्हणू सर. तुपारे पासून कुणी साधं सर म्हटलं तरी चिडवतोय असं वाटतं!

कोन मारी मला गुजराथी शब्द वाटला होता. Happy
हे आणि मिनिमलिस्टिक मधे काय फरक आहे?
आणि जर नुसता पसाराच आवरत असतील तर त्याला कोनमारी कशाला हवी?

अमा, फ्रीजबद्दल +१००
की माझे तर लाजून पाणीच होईल. ते ठेवायला एक ड्रम लागेल....>>> Lol

आमचा पसारा असाच आहे. नवर्‍याला नवीन वस्तु घेण्याचा छंद. माझे कपडे, मुलीची खेळणी, पुस्तके, अ‍ॅमेझॉनची खोकी ( हो खोकीच, कारण अंगात त्राण उरले नाहीये ते आवरायला ) साबा व साबुचा जुना संसार, त्यांची कपाटे, जुन्या खुर्च्या, टेबले. एक मोठा स्टुल, एक शिडी, आमच्या परदेशातुन आल्यावर ३ मोठाल्या बॅगा, एक जुनी लोखंडी ट्रंक व अजून बरेssssssच काही असा भव्यदिव्य पसारा आहे. Proud

दर शनीवार-रविवार ठरवते आवरायला, पण बोंबलायला सारखी नवीन कामे व कार्ये निघतात. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास !!

अमा Biggrin

अमा चांगला लेख.

मिनिमलिस्टिक म्हणजे कमीत कमी गोष्टी मध्ये जगणे. जपान मध्ये काही लोक घरात फक्त १५० वस्तु वर जगतात.

कोनोमारी ही ह्याचा वरची स्टेप आहे. यात घरी मिनिमलिस्टिक पेक्षा जास्त गोष्टी असु शकतात पण त्या नीट ठेवायला शिकवतात. अगदिच नाही लागणार ते टाकुन द्यायला सांगते.

कोनोमारी मध्ये मुलाना लहान पणापासुन पसारा न करायला शिकवते. त्यात कमी जागेत जास्त गोष्टी कश्या बसतिल आणि तरीही वस्तु सहज सापडेल ह्यावर जोर असतो

लहानपणी मुंबईत जेव्हा चाळी मध्ये राहात होतो तेव्हा कोनोमारी च्या मिळतीजुळती पध्धत होती. कदाचित तुमच्या घरात पण असेल. हल्ली जागा वाढली , उत्पन्न वाढले घरात चार गोष्टी आल्या त्यामुळे पसारा वाढला.

हल्ली जागा वाढली , उत्पन्न वाढले>> टोटली. आमचे तीन खोल्यांचे घर त्यात एक गाण्याच्या क्लासची, एक किचन व एक झोपायची त्यात मला एक सेकंड हँड टेबल होते व त्यावर एक मेटल शेल्फ त्यात व दोन ड्रावर मध्ये माझा सर्व शालेय संसार होता पूर्ण पाचवी ते दहावी. चित्रकलेचे सामान सकट. टेबल शेजारी टीव्ही कॅबिनेट. व गोदरेज कपाट. जागाच नाही. त्यामुळेच टीव्ही ऐकत कामे करायची सवय झाली.

आता मुलीला स्वतंत्र खोली. घर बदलले तेव्हा नवा बेड प्लस भले मोठ्ठे कपाट. हब्बी वाइफचे कंबाइन्ड असते ते. व त्यात अनेक कपडे नीट लावलेले व बाई इथे राहात देखील नाही. मी एक कोपरा हळो हळू बळकावला आहे.
मी एक केले आहे म्हणजे सर्व चांगले व मापाला मोठे झालेले कपडे धुवून इस्त्री करून रिटायरमेंट नंतर वापरायाचे कपडे अशी वर्गवारी करून
वस्तू जमवल्या व नीट बॅगेत पॅक करून ठेवल्या आहेत.

सर्व कपाटे खण, ड्रावर फडताळे रिकामी करा, जरुरीपुरतेच ठेवा व बाकीचे देउन टाका नाहीतर टाकून द्या. असे ताई म्हणतात बहुतेक.>>>
कोनमारी मेथड मुख्यतः आधारीत आहे, स्वतःला आनंद देणार्‍या , चांगल्या स्म्रुती जागृत करणार्‍या बघितल्यावर स्पार्क निर्माण करणार्‍या वस्तुच ठेवा. उदा. साधी पायजम्याची पँट असेल तर ती तुम्हाला अ‍ॅब्सोल्युटली आवडलेली असली पाहिजे. उगाच आवडत नाहीये पण पैसे घालून आणली आहे तर घातली पाहिजे ह्या विचाराने ती ठेवू नका.

गरजे पुरते शॉपिंग वगैरे ठिक आहे. काही लोक ते करतात. कोनमारी मेथड फक्त मिनिमिलिस्टीक यावर आधारीत नाही. तर वस्तु सॉर्ट करणे, ऑर्गानाईज कशी करावी ह्यावरही आहे. साहिलनी अगदी अ‍ॅक्युरेट लिहिल आहे.

मला तीची मेथड आवडते किंवा मी तिची मेथड फॉलो करते असं अज्जिब्बात नाही. पण उगाचच , ह्याला जपानी बाई कशाला वगैरे कमेंट लिहून काय मिळत कळत नाही.

जपानी लोक प्रचन्ड शिस्तित जिवन व्यतित करतात त्यामुळे कोनमारी वाचुन नवल वाटले नाही, मागे एक व्हॉटसअ‍ॅप व्हिडियो पण पाहिला होता.एवढा छोटासा देश असल्याने घर पण छोटी त्यामूले आपोआप गरजेपुरते वापरायची सवय होत असावी.

Pages