आपल्या घरात आपल्याही नकळत वस्तू जमा होत जातात. मुले आली की त्यांच्याबरोबर पसारा पण निर्माण होत जातो. बाबा जिमला न जाता घरीच ट्रेडमिल वर चालू ठरवतात. आई स्वयंपाकघरातील प्रत्येक गरजे साठी नव नवे मशीन्स घेत जाते. आयपी कुकर किमान पाच साइज मधले.
बारका, छोटा, नॉर्मल युएस्बी वर चालणारा, इंडस्ट्रिअल पावरचा फूड प्रोसेसर, मिक्सर ज्युसर, सूप मेकर, करंजीचे साचे, सोर्या , प्रत्येक मुलाचे किमान १०० कपडे आईच्या साड्या, भारतीय व परदेशी पद्धतीचे कपडे, बाबांचे फॉर्मल्स व कॅजुअल्स, व प्रत्येकी १० -११ प्रकारचे शूज.
झोपाळे, सोफे, बीन बॅग, खेळणी लेगोच्या ब्रिक्स हर सणाचे डेकोरेशन हे नीट साठवलेले प्रत्येक वर्शीचे,
काही जुन्या आठवणीतील वस्तू, आईची पैठणी, बाबांची ब्रीफकेस, आत्याचे गणेश मूर्तींचे कलेक्षन, बारक्यांचे प्रॉजेक्ट्स, वस्तू कपडे आणि अजून जास्त वस्तू ह्यांच्या पसार्यात आणि अडगळीत कधी कधी हरवून जायला होते . आपण नक्की काय करतो आहोत ह्यावरचा फोकस निघून जातो व ही अडगळ नातेसंबंधात पण परा व र्तित होते. हा सर्व कचरा पसारा साफ करणे अगदी गरजेचे आहे.
हे मी म्हणत नाही तर मारी काँडो. सुप्रसिद्ध जपानी प्रोफेशनल स्पेस ऑर्गनायझर व डिक्लटर स्पेशालिस्ट म्हण ते. ह्या ताईंची ब्रांडेड व बहुतेक
पेटंटेड मेथड म्हणजे कोनमारी.
सर्व कपाटे खण, ड्रावर फडताळे रिकामी करा, जरुरीपुरतेच ठेवा व बाकीचे देउन टाका नाहीतर टाकून द्या. असे ताई म्हणतात बहुतेक.
कारण त्या जपानीत बोलतात. व अडगळ / पसारा दिसला कि शिव शिव करत चक्कर आल्याचा अभिनय करतात. पण मग घर आवरायला मदत करतात.
नेटफ्लिक्स वर कोनमारी, मेरी कांडो ची काही भागांची मालिका उपलब्ध आहे. मी दोन भाग बघून सोडून दिले. काय तो पसारा? बघवेना. पण घर आवरल्यावर दिसते मात्र छान.
मग भगिनिन्नो व बंधुंनो काय घेतायना घर आवरायला?!
राज - धन्यवाद त्या लिन्कबद्दल
राज - धन्यवाद त्या लिन्कबद्दल. नेहमी वापरतो त्या सर्व्हिसेस सगळ्या ऑटो-पे वर आहेतच. ही बिल्स म्हणतोय ती अधूनमधून स्पेसिफिकली केलेल्या गोष्टींबद्दलची. पण बाकी मटेरियल करता ती लिन्क चेक करतो.
माझी बायको रिअल इस्टेट चे
माझी बायको रिअल इस्टेट चे काम करणारी वकील आहे. तिच्याकडे अनेक लोक कागदपत्र सल्ला/ तपासायला येत असतात. पैकी काह कागद पत्रे महत्वाची असतात. लोक ती परत न्यायला येत नाहीत. अशीच ती साचत जातात. असेच एक जीर्ण जुने मूळ कागदपत्र आवरताना निदर्शनास आले. कुणी कधी दिले ते माहीत नव्हते संबंधीत सोसायटीला देउ म्हणून परत अनेक दिवस धूळ खात पडले. आज देउ उद्या देउ. करत असेच पडले होते. आज ते मी शोधून काढले व त्या सोसायटीला उपयोगी पडेल म्हणून नेउन दिले. त्या रिडव्हलपमेंट च्या वेळी ती फार महत्वाची असतात. तिच्या व्यवसायाच्या कामात मी पडत नाही एकतर आमचे वर्क कल्चर वेगळे आहे व दुसरे मला त्यात रस नाही. व कळत नाही.
मुलीची जुनी खेळणी वय 5 च्या
मुलीची जुनी खेळणी वय 5 च्या आधीची आता उपयोगी नाहीत. तीन पोती भरून पसारा आहे. कशी विल्हेवाट लावता येईल?
हे फक्त 10%आहे
मुलीची जुनी खेळणी वय 5 च्या
मुलीची जुनी खेळणी वय 5 च्या आधीची आता उपयोगी नाहीत. तीन पोती भरून पसारा आहे. कशी विल्हेवाट लावता येईल?>> होमलेस मुलांना खेळायला द्या किंवा अनाथाश्रमात देता आले तर बघा.
वर्गवारी करा, स्वच्छ करा, पॅक
वर्गवारी करा, स्वच्छ करा, पॅक करा मग देऊन टाका. सोशल मिडीयावर सुद्धा फोटो टाकून कोणाला हवे असेल तर घेऊन जा म्हणायचे.
Facebook वर तुमच्या परिसरातील
Facebook वर तुमच्या परिसरातील reuse recycle, free your stuff अशा प्रकारच्या groups मध्ये पोस्ट करा
Segregate Kara, e.g. Lego, soft toys, vehicles, big Scooters, kitchen items etc व परिचयातील या वयोगटातील मुलांच्या पालकांना विचारा माझ्याकडची बरीचशी खेळणी अशीच गेली
वरती अमा नी लिहिल्याप्रमाणे द्या
मी माझ्याकडची कार सीट OLX वर फ्री मध्ये दिली होती 2 वर्षापूर्वी मुंबईत , तसं काही करता येतं का ते पहा
एखादी वस्तू तुम्हालाच घरात repurpose करता येते का ते बघा,कमी कष्टात जमत असेल तर मुलीलाही सामील करून घेता येईल
Thanks all for ideas
Thanks all for ideas
Pages