सरफरोश, वेनस्डे व बॉर्डर या चित्रपटांनी भारतीयातील तात्कालीक वा क्षणभंगुर का असेनात, पण देशप्रेम चढत्या क्रमाने जागे केले. या तीनही चित्रपटांच्या कथानकात, सादरीकरणात, मनोरंजन मूल्य वाढवण्याच्या शैलीत प्रचंड फरक आहे. सरफरोशमध्ये प्रेम आहे, गीते आहेत, धबधब्यात मारलेल्या मिठ्यासुद्धा आहेत. त्याशिवाय सरफरोशमध्ये जळजळीत सत्य आहे की पाकिस्तानमधून मृत्यू कसा चोरून सीमापार आणला जातो. वेनस्डेमध्ये एकही गीत, नृत्य न घेता एक सामान्य माणूस तथाकथित कर्तव्यदक्ष यंत्रणा कश्या मुळापासून हालवून सोडू शकतो आणि सामान्य माणसाच्या शांततेबाबत व सुरक्षितेबाबत किती सामान्य अपेक्षा असतात याचे प्रभावी चित्रण आहे. बॉर्डर हे सरळसरळ युद्ध आहे. देशप्रेमाच्या सुप्तावस्थेतील ठिणगीला फुलवणारी आणि आग बनवणारी ही कथा आहे. रक्त सळसळवणारी कथा आहे. तरीही या तीनही कथांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे कोठेतरी सीमेपलीकडून होणारा दहशतवाद, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भीषण स्वरूप, देशप्रेम, कर्तव्यतत्पर अधिकारी आणि भारतीयाला जागृत करणारी आणि देशाप्रती आपल्या असलेल्या जबाबदारीचे भान देणारी कथा!
मद्रास कॅफेमध्येही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भीषण स्वरूप आहे. अंगावर येणारी हिंसा आहे. ढवळाढवळ आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे. मृत्यूचे तांडव आहे. कर्तव्यतत्पर अधिकारी आहे. भ्रष्ट अधिकारी आहे. मद्रास कॅफेमधील कर्तव्यतत्पर अधिकार्याच्या पत्नीलाही प्राण गमवावे लागलेले आहेत जसे सरफरोशमध्ये आमीर खानच्या भावाला गमवावे लागलेले असतात. येथेही अत्यंत सरस चित्रण, एकही फ्रेम अनावश्यक नसणे, बेफाम वेगाचे कथानक, सहसा सामान्यांना न बघता येणारे जीवनाचे रौद्र आणि क्रूर रूप या सर्व गोष्टी आहेत.
मद्रास कॅफेमध्ये फक्त एकच नाही आहे. देशप्रेम जागृत करण्याचा कथेचा हेतू! संपूर्ण कथानक माजी पंतप्रधानांना वाचवण्याच्या कामगिरीभोवती फिरते. या पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीर्दीत परदेशातील राजकारणात किंवा स्थानिक लढ्यात ढवळाढवळ केलेली असते. ही ढवळाढवळ कागदोपत्री शांतता करार म्हणून मान्यता पावलेली असली तरी ती एक राजकीय खेळी असते व तिचा उद्देश स्वतःच्या देशाच्या सुरक्षिततेला धोका होऊ नये असा असतो. हा उद्देश कितीही योग्य असला तरी या लहानश्या भूभागात या उद्देशाच्या पूर्ततेसाठी केली गेलेली कृती ही अंकल सॅमच्या दादागिरीपेक्षा भिन्न नसते. मुळातच, ती त्या विशिष्ट कालावधीत एका परदेशात केली गेलेली ढवळाढवळ असते. याचे भीषण परिणाम त्या भूभागात स्थायिक असलेल्यांना भोगायला लागतात. या राजकीय खेळीतून तेथे शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात या उद्देशाने एका कर्तव्यतत्पर अधिकार्याची तेथे बदली करण्यात येते. तो अधिकारी शांततेच्या चिंधड्या उडवणार्याच्या मार्गात विविध अडथळे कसे आणता येतील या दृष्टीने प्रयत्न करू लागतो.
हे सर्व प्रेक्षणीय आहे. त्या अधिकार्याचा लढा, त्याच्यावर झालेले हल्ले, आपल्याच प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, नवी दिल्लीच्या सुपर हाय कमांडकडून एक्झर्ट झालेली हाय प्रेशर्स, अधिकार्याच्या पत्नीला मारण्यात येणे, साऊंड इफेक्ट्स, चित्रण, सत्याचा विजय, काय नाही या चित्रपटात जे प्रेक्षणीय नाही?
मात्र हे सगळे केंद्रीत आहे दोनच गोष्टींभोवती! माजी पंतप्रधानांची हत्या टाळणे आणि स्वतः दुसर्याच्या देशात केलेल्या ढवळाढवळीला 'एक जेन्युईन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न' म्हणून ग्लोरिफाय करणे!
यात देशप्रेमाचा लवलेशही नाही. असावा ही अपेक्षा नाहीच, पण आव मात्र तसा आणला आहे याचा संताप येतो. चित्रण असे करण्यात आले आहे जणू भारतापुढे किती परकीय समस्या होत्या आणि त्यातून सर्व कर्तव्यतत्पर अधिकार्यांनी कसा मार्ग काढला वगैरे! एका नेत्याच्या वैयक्तीक मूर्खपणामुळे (या शब्दांसाठी क्षमस्व, पण याहून उचित शब्द सापडत नाही) त्याच नेत्याला प्राण गमवायला लागणे आणि व्यक्तीपूजक भारतीय समाजात अचानक त्या नेत्याच्या पक्षाबाजूने प्रेमाची लाट येऊन देशातील राजकीय चित्र पालटणे (हा दुसरा भाग चित्रपटात दाखवलेला नाही) हे ज्यांनी त्या काळी स्वतः अनुभवलेले असेल त्यांना मी काय म्हणत आहे हे समजेल.
बेसिकली, आज इतक्या वर्षांनी त्या काळातील हे कथानक लोकांना प्रभावीपणे आठवून देण्याचे कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात असे तर काहीच नाही की लोकांच्या देशाप्रती काही भावना जागृत व्हाव्यात वगैरे! निव्वळ इतिहास सांगितला आहे म्हणावे तर तोही असा इतिहास जो विसरावासा वाटेल.
एक चित्रपट म्हणून मात्र हा चित्रपट फारच म्हणजे फारच सरस ठरतो. वेग, अभिनय, पात्रनिवड, चित्रण, संवाद, कथानकातील सूक्ष्म धागे, प्रेक्षकाला नजरबंदी केल्यासारखे वाटावे, हे सर्व काही उत्तम जमून आलेले आहे. एकही दृष्य अनावश्यक नाही.
पण चित्रपटगृहाबाहेर पडल्यावर माझ्या मनात आलेला पहिला विचार, मला खरंच कोणत्याच पक्षाबद्दल विशेष काहीच आस्था नसली तरीही, हाच होता की या चित्रपटाने निव्वळ राजीव गांधी आणि काँग्रेसला मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचारसंहितेच्या काळात कदाचित हा चित्रपट प्रदर्शीत होऊ शकला नसता. तो परफेक्ट टायमिंगला प्रदर्शीत केला गेला आहे असे वाटते. संताप याचा येतो की स्वतःच्या देशात सुरक्षिततेच्या आघाडीवर पदोपदी नामुष्की होत असताना दुसर्या देशात पीस कीपिंग फोर्स पाठवणार्यांना महान ठरवले गेले आहे.
मद्रास कॅफे, हा मूलतः एक अनावश्यक चित्रपट आहे असे माझे मत आहे. तसे पाहिले तर आवश्यक काहीच नसते. पण जे जे निर्माण होते त्याचा निदान मूळ हेतू तरी उदात्त असतो. जसे, उद्या निर्भया प्रकरणावर कोणी चित्रपट काढला तर तो चित्रपट पाहवणार नाही, क्रूर वाटेल वगैरे ठीक आहे, पण निदान त्याचा हेतू हा असेल की लोकांनी जागृत व्हावे आणि नराधमांना शिक्षा मि़ळावी. मद्रास कॅफेचा हेतूच समजत नाही.
एक असा माणूस, जो गोरा गोमटा होता, सगळ्या देशाचा आधारस्तंभ असलेल्या त्याच्या आईच्या हत्येनंतरही धीरोदात्तपणे सर्वांना स्वतःच धीर देत होता आणि ज्याचे वास्तव्य परदेशात असले तरीही चेहरा भारतीय होता, त्याला कसलीही पार्श्वभूमी नसताना, त्याचे काहीही कर्तृत्व नसताना एका रात्रीत त्याला एका कोट्यावधीच्या देशाचे पंतप्रधानपद मिळाले. म्हणजे त्याक्षणी तो साधा खासदारही नव्हता, तो थेट पंतप्रधान झाला. आज त्याचा मुलगा निदान पप्पूपणा करत का होईना पण काही वर्षे येथे पद न घेता अस्तित्वात आहे. हा मनुष्य थेट परदेशातून आला, त्याचदिवशी पहिल्यांदाच या देशातील असंख्य सामान्यांना दिसला आणि थेट पंतप्रधान झाला. ही तर आपली, आपल्या व्यक्तीपूजनाची अवस्था आणि दशा! मग या माणसाने अनेक चांगले वाईट निर्णय घेतले. भिंद्रानवालेंनी इंदिराजींवर सूड उगवला तसा दक्षिणेने या माणसावर! ती निव्वळ एक वैयक्तीक सूडकथा होती. त्यात भारताचा एक देश म्हणून काही संबंधच नव्हता. असो!
मद्रास कॅफेचे कनेक्शन त्या वास्तवाशी न लावता जर कोणाला हा चित्रपट पाहता आला, तर एक अफाट प्रभावी चित्रपट वाटू शकेल इतकेच खरे! अन्यथा, ही एक निव्वळ राजकीय खेळी वाटावी अशी अवस्था आहे.
-'बेफिकीर'!
तेव्हा असं केलं नाही मग आताच
इन्किलाब हा इतका इन्फ्ल्युएन्शल चित्रपट होता तर कोणा (नावाजलेल्या) निवडणूक विश्लेषकाने त्याबद्दल लिहिलंय का?
Submitted by भरत. on 29 January, 2019 - 20:12
तेव्हा असं केलं नाही मग आताच असं का करता वाला स्टँड घेतलेला चालतो का पुरोगामी मंडळींना? चालत असल्यास मी चिक्कार मुद्द्यांबाबत घेऊ शकतो.
तेव्हा आताचा प्रश्न नाही.
तेव्हा आताचा प्रश्न नाही. इन्किलाबमुळे निवडणुकीचा निकाल असा असा लागला असं तुमच्यासारखंच कोण्या विश्लेषकाला वाटलं होतं की नाही?
मला तर हे बाहुबली-अमीर खान - पोटदुखी- दंगल-चीन सारखं लॉजिक वाटतंय.
मला तर हे बाहुबली-अमीर खान -
मला तर हे बाहुबली-अमीर खान - पोटदुखी- दंगल-चीन सारखं लॉजिक वाटतंय.
Submitted by भरत. on 29 January, 2019 - 20:37
नाही हे अॅक्सिडेंटल पीएम सिनेमा सूर्यवंशमचा विक्रम तोडण्याइतपतवेळा केबलवर दाखविण्यासाठी बनविला आहे सारखं लॉजिक आहे. तसंच ते दिव्याच्या उष्णतेमुळे एक माणूस संबंध रात्र थंड पाण्यात उभा राहू शकतो तर उंच बांबूवर ठेवलेल्या भांड्यातली खिचडी खाली जळणार्या काटकीच्या उष्णतेने का बरे शिजू शकत नाही या बिरबल लॉजिक सारखं देखील आहे.
२००९ मध्ये नव्हतो मी
२००९ मध्ये नव्हतो मी मायबोलीवर.<<<
तेच तर!
असो
< तसंच ते दिव्याच्या
< तसंच ते दिव्याच्या उष्णतेमुळे एक माणूस संबंध रात्र थंड पाण्यात उभा राहू शकतो तर उंच बांबूवर ठेवलेल्या भांड्यातली खिचडी खाली जळणार्या काटकीच्या उष्णतेने का बरे शिजू शकत नाही या बिरबल लॉजिक सारखं देखील आहे>
इन्किलाबमुळे २००९ मध्ये काँग्रेस जिंकली हे ना? तेच तर मी म्हणतोय. टाटा आणि शुभरात्री.
इन्किलाबमुळे २००९ मध्ये
इन्किलाबमुळे २००९ मध्ये काँग्रेस जिंकली हे ना? तेच तर मी म्हणतोय. टाटा आणि शुभरात्री.
Submitted by भरत. on 29 January, 2019 - 20:54
नाही हे अॅक्सिडेंटल पीएम सिनेमा सूर्यवंशमचा विक्रम तोडण्याइतपतवेळा केबलवर दाखविण्यासाठी बनविला आहे सारखं लॉजिक आहे. हे सोयीनुसार तुम्हाला दिसलं नसेलच ना? नेहमीप्रमाणे सिलेक्टिव्ह रिडींग आणि यशस्वी पलायनाकरिता शुभेच्छा.
Pages