मद्रास कॅफे - एक राजकीय खेळी

Submitted by बेफ़िकीर on 1 September, 2013 - 00:24

सरफरोश, वेनस्डे व बॉर्डर या चित्रपटांनी भारतीयातील तात्कालीक वा क्षणभंगुर का असेनात, पण देशप्रेम चढत्या क्रमाने जागे केले. या तीनही चित्रपटांच्या कथानकात, सादरीकरणात, मनोरंजन मूल्य वाढवण्याच्या शैलीत प्रचंड फरक आहे. सरफरोशमध्ये प्रेम आहे, गीते आहेत, धबधब्यात मारलेल्या मिठ्यासुद्धा आहेत. त्याशिवाय सरफरोशमध्ये जळजळीत सत्य आहे की पाकिस्तानमधून मृत्यू कसा चोरून सीमापार आणला जातो. वेनस्डेमध्ये एकही गीत, नृत्य न घेता एक सामान्य माणूस तथाकथित कर्तव्यदक्ष यंत्रणा कश्या मुळापासून हालवून सोडू शकतो आणि सामान्य माणसाच्या शांततेबाबत व सुरक्षितेबाबत किती सामान्य अपेक्षा असतात याचे प्रभावी चित्रण आहे. बॉर्डर हे सरळसरळ युद्ध आहे. देशप्रेमाच्या सुप्तावस्थेतील ठिणगीला फुलवणारी आणि आग बनवणारी ही कथा आहे. रक्त सळसळवणारी कथा आहे. तरीही या तीनही कथांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे कोठेतरी सीमेपलीकडून होणारा दहशतवाद, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भीषण स्वरूप, देशप्रेम, कर्तव्यतत्पर अधिकारी आणि भारतीयाला जागृत करणारी आणि देशाप्रती आपल्या असलेल्या जबाबदारीचे भान देणारी कथा!

मद्रास कॅफेमध्येही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भीषण स्वरूप आहे. अंगावर येणारी हिंसा आहे. ढवळाढवळ आहे. शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे. मृत्यूचे तांडव आहे. कर्तव्यतत्पर अधिकारी आहे. भ्रष्ट अधिकारी आहे. मद्रास कॅफेमधील कर्तव्यतत्पर अधिकार्‍याच्या पत्नीलाही प्राण गमवावे लागलेले आहेत जसे सरफरोशमध्ये आमीर खानच्या भावाला गमवावे लागलेले असतात. येथेही अत्यंत सरस चित्रण, एकही फ्रेम अनावश्यक नसणे, बेफाम वेगाचे कथानक, सहसा सामान्यांना न बघता येणारे जीवनाचे रौद्र आणि क्रूर रूप या सर्व गोष्टी आहेत.

मद्रास कॅफेमध्ये फक्त एकच नाही आहे. देशप्रेम जागृत करण्याचा कथेचा हेतू! संपूर्ण कथानक माजी पंतप्रधानांना वाचवण्याच्या कामगिरीभोवती फिरते. या पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीर्दीत परदेशातील राजकारणात किंवा स्थानिक लढ्यात ढवळाढवळ केलेली असते. ही ढवळाढवळ कागदोपत्री शांतता करार म्हणून मान्यता पावलेली असली तरी ती एक राजकीय खेळी असते व तिचा उद्देश स्वतःच्या देशाच्या सुरक्षिततेला धोका होऊ नये असा असतो. हा उद्देश कितीही योग्य असला तरी या लहानश्या भूभागात या उद्देशाच्या पूर्ततेसाठी केली गेलेली कृती ही अंकल सॅमच्या दादागिरीपेक्षा भिन्न नसते. मुळातच, ती त्या विशिष्ट कालावधीत एका परदेशात केली गेलेली ढवळाढवळ असते. याचे भीषण परिणाम त्या भूभागात स्थायिक असलेल्यांना भोगायला लागतात. या राजकीय खेळीतून तेथे शांततापूर्ण वातावरणात निवडणुका व्हाव्यात या उद्देशाने एका कर्तव्यतत्पर अधिकार्‍याची तेथे बदली करण्यात येते. तो अधिकारी शांततेच्या चिंधड्या उडवणार्‍याच्या मार्गात विविध अडथळे कसे आणता येतील या दृष्टीने प्रयत्न करू लागतो.

हे सर्व प्रेक्षणीय आहे. त्या अधिकार्‍याचा लढा, त्याच्यावर झालेले हल्ले, आपल्याच प्रशासनाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, नवी दिल्लीच्या सुपर हाय कमांडकडून एक्झर्ट झालेली हाय प्रेशर्स, अधिकार्‍याच्या पत्नीला मारण्यात येणे, साऊंड इफेक्ट्स, चित्रण, सत्याचा विजय, काय नाही या चित्रपटात जे प्रेक्षणीय नाही?

मात्र हे सगळे केंद्रीत आहे दोनच गोष्टींभोवती! माजी पंतप्रधानांची हत्या टाळणे आणि स्वतः दुसर्‍याच्या देशात केलेल्या ढवळाढवळीला 'एक जेन्युईन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न' म्हणून ग्लोरिफाय करणे!

यात देशप्रेमाचा लवलेशही नाही. असावा ही अपेक्षा नाहीच, पण आव मात्र तसा आणला आहे याचा संताप येतो. चित्रण असे करण्यात आले आहे जणू भारतापुढे किती परकीय समस्या होत्या आणि त्यातून सर्व कर्तव्यतत्पर अधिकार्‍यांनी कसा मार्ग काढला वगैरे! एका नेत्याच्या वैयक्तीक मूर्खपणामुळे (या शब्दांसाठी क्षमस्व, पण याहून उचित शब्द सापडत नाही) त्याच नेत्याला प्राण गमवायला लागणे आणि व्यक्तीपूजक भारतीय समाजात अचानक त्या नेत्याच्या पक्षाबाजूने प्रेमाची लाट येऊन देशातील राजकीय चित्र पालटणे (हा दुसरा भाग चित्रपटात दाखवलेला नाही) हे ज्यांनी त्या काळी स्वतः अनुभवलेले असेल त्यांना मी काय म्हणत आहे हे समजेल.

बेसिकली, आज इतक्या वर्षांनी त्या काळातील हे कथानक लोकांना प्रभावीपणे आठवून देण्याचे कारणच लक्षात येत नाही. चित्रपटात असे तर काहीच नाही की लोकांच्या देशाप्रती काही भावना जागृत व्हाव्यात वगैरे! निव्वळ इतिहास सांगितला आहे म्हणावे तर तोही असा इतिहास जो विसरावासा वाटेल.

एक चित्रपट म्हणून मात्र हा चित्रपट फारच म्हणजे फारच सरस ठरतो. वेग, अभिनय, पात्रनिवड, चित्रण, संवाद, कथानकातील सूक्ष्म धागे, प्रेक्षकाला नजरबंदी केल्यासारखे वाटावे, हे सर्व काही उत्तम जमून आलेले आहे. एकही दृष्य अनावश्यक नाही.

पण चित्रपटगृहाबाहेर पडल्यावर माझ्या मनात आलेला पहिला विचार, मला खरंच कोणत्याच पक्षाबद्दल विशेष काहीच आस्था नसली तरीही, हाच होता की या चित्रपटाने निव्वळ राजीव गांधी आणि काँग्रेसला मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचारसंहितेच्या काळात कदाचित हा चित्रपट प्रदर्शीत होऊ शकला नसता. तो परफेक्ट टायमिंगला प्रदर्शीत केला गेला आहे असे वाटते. संताप याचा येतो की स्वतःच्या देशात सुरक्षिततेच्या आघाडीवर पदोपदी नामुष्की होत असताना दुसर्‍या देशात पीस कीपिंग फोर्स पाठवणार्‍यांना महान ठरवले गेले आहे.

मद्रास कॅफे, हा मूलतः एक अनावश्यक चित्रपट आहे असे माझे मत आहे. तसे पाहिले तर आवश्यक काहीच नसते. पण जे जे निर्माण होते त्याचा निदान मूळ हेतू तरी उदात्त असतो. जसे, उद्या निर्भया प्रकरणावर कोणी चित्रपट काढला तर तो चित्रपट पाहवणार नाही, क्रूर वाटेल वगैरे ठीक आहे, पण निदान त्याचा हेतू हा असेल की लोकांनी जागृत व्हावे आणि नराधमांना शिक्षा मि़ळावी. मद्रास कॅफेचा हेतूच समजत नाही.

एक असा माणूस, जो गोरा गोमटा होता, सगळ्या देशाचा आधारस्तंभ असलेल्या त्याच्या आईच्या हत्येनंतरही धीरोदात्तपणे सर्वांना स्वतःच धीर देत होता आणि ज्याचे वास्तव्य परदेशात असले तरीही चेहरा भारतीय होता, त्याला कसलीही पार्श्वभूमी नसताना, त्याचे काहीही कर्तृत्व नसताना एका रात्रीत त्याला एका कोट्यावधीच्या देशाचे पंतप्रधानपद मिळाले. म्हणजे त्याक्षणी तो साधा खासदारही नव्हता, तो थेट पंतप्रधान झाला. आज त्याचा मुलगा निदान पप्पूपणा करत का होईना पण काही वर्षे येथे पद न घेता अस्तित्वात आहे. हा मनुष्य थेट परदेशातून आला, त्याचदिवशी पहिल्यांदाच या देशातील असंख्य सामान्यांना दिसला आणि थेट पंतप्रधान झाला. ही तर आपली, आपल्या व्यक्तीपूजनाची अवस्था आणि दशा! मग या माणसाने अनेक चांगले वाईट निर्णय घेतले. भिंद्रानवालेंनी इंदिराजींवर सूड उगवला तसा दक्षिणेने या माणसावर! ती निव्वळ एक वैयक्तीक सूडकथा होती. त्यात भारताचा एक देश म्हणून काही संबंधच नव्हता. असो!

मद्रास कॅफेचे कनेक्शन त्या वास्तवाशी न लावता जर कोणाला हा चित्रपट पाहता आला, तर एक अफाट प्रभावी चित्रपट वाटू शकेल इतकेच खरे! अन्यथा, ही एक निव्वळ राजकीय खेळी वाटावी अशी अवस्था आहे.

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डटिपचरमधीलसंदेश'सीयािशखरावरअसतानायशाचे सातयगृहीतधनये वसवाचे सव िदवससारखे नसतात' असे होत
>>
हे ऐकल्यावर निर्माता दिग्दर्शक कपाळावर हात मारून घेतील. अहो ते फक्त एक व्यक्तीचित्र होते. पाहिजे तर एक मसालापट म्हणा. तुम्ही एका विशिष्ट चौकटीतून सार्याकडे बघत आहात असे वाटते. तुम्ही एक कथाकार व कादंबरीकार म्हणून मला माहिती आहात म्हणून हे सांगायचं धाडस केलं.:)

ह्ल्ल्याची नेमकी तारिख, हल्लेखोर कुठुन येणार इत्यादी गोष्टी RAW च्या लोकान्ना समजल्या होत्या. त्या आधारे त्यान्नी राजीवजीना दोन दिवस सभा घेवु नये असे सुचवले होते तेव्हा दोन दिवस दौरा स्थगित केला असता तर हत्या टळली असती कदाचित त्या अवधीत भारतात आलेल्या हल्लेखोराना आपले अधिकारि पकडू सुद्धा शकले असते हि सुद्धा शकयता होती. हल्लेखोरानी त्या दिवशी नाहि तर दोन दिवसांनंतर हल्ला केला असता ही शक्यता आहे तशीच हत्येसाठी आलेले लोक पकडले जावून हत्या टळली असती ही पण एक शक्यता होती.
एखादा सिनिअर अधिकारि गम्भीरपणे हत्येबद्दल एवढी स्पेसिफिक माहिती देत असेल तर राजकिय नेत्याने पण ते गाम्भिर्याने घ्यायला हवे होते असे मला म्हणायचे होते.

मी कालच हा चित्रपट पाहिला.
मला २ गोष्टी कळाल्या नाहीत.
१. जर त्यांना रिसिव्ह करायला गेलेला माणूस त्यांना सापडला होता तर त्या चौघांची रेखाचित्रे काढून त्या आधारे शोध का नाही घेतला.?
२. जर त्या जर्मन केमिकल ईंजिनीअर ने सांगीतले होते कि ती स्फोटके मेटल डिटेक्टर मधे सापडत नाहीत तर त्यांनी दुसर्‍या प्रकारे चेकिंग का नाही केले (म्हणजे ३ ते ४ हजार लोक सभेला येणार असा अंदाज असताना दुसरी काही सोय करता येऊ शकते का)? ईथेही परत जे लोक बंदोबस्ताला होते त्यांना ती रेखाचित्रे देता आली असती की....

वरदाच्या पोस्ट्स्ना अनुमोदन. एक political thriller म्हणून सिनेमा मस्त जमलाय (त्यातल्या काही बाळबोध त्रुटींशिवाय). बाकी त्यातून काही वाचायचा प्रयत्न करायची गरज नसावी.

२. जर त्या जर्मन केमिकल ईंजिनीअर ने सांगीतले होते कि ती स्फोटके मेटल डिटेक्टर मधे सापडत नाहीत तर त्यांनी दुसर्‍या प्रकारे चेकिंग का नाही केले >> PET पहिल्यांदाच वापरली असल्यामूळे अजून वेगळे detector available नसतील म्हणून ?

आज हा सिनेमा बघायचा योग आला . सिनेमा अंगावर येतो. हिंसाचाराची दृश्य अंगावर काटा आणतात . हिंसेपायी किती बळी जातात . एक पोलिटिकल स्पाय थ्रिलर म्हणून बघण्यासारखा आहे.

बाकी जे काहि या लेखात लिहिलेलं आहे ते अजिबात पटलं नाही. भारतीय सैन्याच श्रीलंकेत झालेलं व्हिएतनाम , त्यापायी राजीव गांधींना गमवावा लागलेला जीव ही या चित्रपटाची स्टोरीलाईन आहे .लेखात लिहिले आहे तसे पोलिटिकल अजेंडा वगैरे काहीच सापडलं नाही . उगाच काहीही .

शेवटी राजीव गांधींनी raw चा इशारा ऐकायला हवा होता असं वाटलं . एक पंतप्रधान असा दुर्देवीरित्या गमावाव लागला नसता Sad

इन्किलाब सिनेमा २००९ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी सातत्याने वेगवेगळ्या चॅनेलवर दाखविला जात होता आणि त्याने आवश्यक तो परिणाम साधला गेलाच.

आज नरेंद्र मोदींवर टीका करणार्‍या शत्रुघ्न सिन्हाला कदाचित आठवतही नसेल की १९९३ साली खून भरी मांग सिनेमा डीडी नॅशनलवर दाखविला होता तेव्हा तांत्रिक करामती करुन त्यातली शत्रुची दृश्येच कापून टाकली पण त्याच्या संवादांशिवाय कथेची लिंक लागली नसती म्हणून नाईलाजाने संवाद ठेवले होते. शत्रू कमालीचा संतापला होता तेव्हा.. लाडक्या लोकसत्तेतच ही बातमी आली होती.

काँग्रेसने दूरदर्शन आणि पुढे पुढे इतर चॅनेल्सचा उपयोग राजकीय स्वार्थाकरिता केला. आता चॅनेलवर सिनेमे कोणी फारसे पाहत नसल्याने थेट सिनेमा बनवुन राजकीय स्वार्थ साधलेला दिसतोय. स्वतःच्या विरोधात असला किंवा तसा नुसता संशय जरी आला तरी "इंदू सरकार" सारखा सिनेमा हाणून पाडतात. मधूर भांडारकरच्या प्रमोशनल कॉन्फरन्सला विरोध करतात.

अर्था असहिष्णूतेच्या नावाने गळे काढणार्‍यांना हे दिसत नाहीच म्हणा.

http://indianexpress.com/article/opinion/for-buying-a-nine-volt-battery-...

या राजकीय खेळात सामान्यांच्या आयुष्याची कशी धूळधाण हिते त्याचे हे एक उदाहरण. 9 वोलटची बॅटरी खरेदी केली या आरोपाखाली 27वर्षे तुरुंगात फाशीच्या शिक्षेची वाट बघत या मनुष्याने काढली आहेत

<या चित्रपटाने निव्वळ राजीव गांधी आणि काँग्रेसला मोठे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आचारसंहितेच्या काळात कदाचित हा चित्रपट प्रदर्शीत होऊ शकला नसता. तो परफेक्ट टायमिंगला प्रदर्शीत केला गेला आहे असे वाटते.

मद्रास कॅफे, हा मूलतः एक अनावश्यक चित्रपट आहे असे माझे मत आहे

अन्यथा, ही एक निव्वळ राजकीय खेळी वाटावी अशी अवस्था आहे. >

आठवणी ताज्या करण्यासाठी.

भरत.

वर मी २००९ साली पुन्हा पुन्हा केबलवर दाखविल्या जाणार्‍या इन्किलाब सिनेमाविषयी लिहिलंय. त्यावरचं तुमचं मत वाचायला आवडेल.

मला इन्किलाब हा चित्रपट माहीत नाही. २००९ मध्ये तो केबलवर वारंवार दाखवला जात असे हेही माहीत नाही.
त्या चित्रपटाचा परिणाम सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालावर झाल्याचं कधी ऐकलं वाचलं नाही.

भरत,
परत परत दाखवल्या जाणाऱ्या सुर्यवंशम बद्दलचे तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल

२००९ मध्ये अमिताभ समाजवादी पक्षाच्या जवळ होता ना? मग इन्किलाबमधून अमिताभला वगळलेलं का?
तसंच या चित्रपटांचे हक्क सगळ्याच वाहिन्यांना मिळतात का? नक्की कोणत्या वाहिनीवर तो चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवला जायचा?

१९९३ मध्ये शत्रुघ्न सिन्हा राजकारणात होते का?
Submitted by भरत. on 29 January, 2019 - 18:42

हो.

इन्किलाब मधे अस काय होतं ??
Submitted by विठ्ठल on 29 January, 2019 - 18:12

चित्रपटांमध्ये सहसा सत्ताधारी पक्ष भ्रष्ट दाखविण्यात येतो. इन्किलाबमध्ये सत्ताधारी पक्ष कमकुवत कण्याचा असून विरोधी पक्ष जोमात असल्याचे दाखविले आहे. अमिताभही विरोधी पक्षाच्या बाजूने व सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढतो. प्रत्यक्षात त्याला समजते की, सत्ताधारी पक्ष चांगला असून तो ज्यांच्या बाजूने लढला आहे तो विरोधी पक्षच प्रचंड भ्रष्ट व गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. तर हे असा हा खलपुरुषांचा बनलेला व सुरुवातीला विरोधी बाकांवर बसलेला पक्ष नंतर झंजावाती प्रचारामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतो व सत्ताधारी बनतो तेव्हा अमिताभ या सर्व निवडून आलेल्या संसद सदस्यांना संसदेतच गोळ्या घालून ठार करतो.

चित्रपटाच्या सुरुवातीला दाखविलेले तत्कालीन सत्ताधारीच चांगले व विरोधक वाईट हे ठळकपणे दर्शविणारा हा चित्रपट पुन्हापुन्हा विविध वाहिन्यांवर दाखविल्याने अपेक्षित परिणाम साधला जाऊन २००४ सालचे यूपीए सरकार जनतेची नाराजी असूनही पुन्हा २००९ ला सत्तेत आले कारण अर्थातच विरोधक किती वाईट्ट असा प्रचार या सिनेमाने केला होता.

भरत,
परत परत दाखवल्या जाणाऱ्या सुर्यवंशम बद्दलचे तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल
Submitted by सिम्बा on 29 January, 2019 - 18:37

सूर्यवंशम सिनेमा कितीही वेळा सेट मॅक्सवर येत असला तरी त्याचा सरकारशी काय संबंध? शिवाय तो निवडणूकीच्या विशिष्ट काळातच दाखविला जातो असेही नाही. त्याचा सेट मॅक्ससोबत मोठ्या कालखंडाचा करार असल्याने तो सतत चालू असतो ही एक आर्थिक अपरिहार्यता आहे इतकेच.

प्रश्न मला नसला तरीही मी माझंही मत इथे मांडलंय. भरत. त्यांचं वेगळं मत मांडतीलच.

<चित्रपटाच्या सुरुवातीला दाखविलेले तत्कालीन सत्ताधारीच चांगले व विरोधक वाईट हे ठळकपणे दर्शविणारा हा चित्रपट पुन्हापुन्हा विविध वाहिन्यांवर दाखविल्याने अपेक्षित परिणाम साधला जाऊन २००४ सालचे यूपीए सरकार जनतेची नाराजी असूनही पुन्हा २००९ ला सत्तेत आले कारण अर्थातच विरोधक किती वाईट्ट असा प्रचार या सिनेमाने केला होता.>

भारतीय मतदाराच्या आकलन आणि निर्णयक्षमतेबद्दलचं हे आकलन पाहून माझी तर बोलतीच बंद झालीय.
आता भाजपचे प्रधान प्रचारक मोदीजी उरीतले संवाद सभांतून फेकताहेत. त्यांचा आयटीसेलप्रमुख चित्रपटाबद्दल ट्विटमागून ट्वीट करतो.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या चित्रपटाला जात असताना आणि चित्रपटगृहात घोषणा देत असतानाचा व्हिडियो काढून सोशल मीडियावर येतो. त्यांना ज्येष्ठ असलेल्या दुसर्‍या मंत्री स्मृती इराणी या चित्रपटाचे खेळ आयोजित करतात. म्हणजे आता भाजप ३/४ बहुमताने निवडून येणार हे नक्की.

भारतीय मतदाराच्या आकलन आणि निर्णयक्षमतेबद्दलचं हे आकलन पाहून माझी तर बोलतीच बंद झालीय.

Submitted by भरत. on 29 January, 2019 - 19:53

मग ही बोलती बंद करण्याचं क्रेडिट मला नकोच. सिम्बा हेच त्याचे हक्कदार आहेत.

हे वाचा

https://www.maayboli.com/node/68504?page=1

हा चित्रपट थिएटर मध्ये धंदा करायला बनवलाच नाहीये,
मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व सॅटेलाईट/ केबल चॅनेल वर दाखवण्यासाठी बनवला आहे.

अजून महिन्याभरात याचा TV वल्ड प्रीमिअर होणार.
आणि एप्रिल पर्यंत हा सुर्यवंशम चा रेकॉर्ड मोडणार
Submitted by सिम्बा on 16 January, 2019 - 14:23

भारतीय मतदाराच्या आकलन आणि निर्णयक्षमतेबद्दलचं हे आकलन दोन आठवडे आधीच सिम्बा यांनी केलंय.

सिंबांच्या पोस्टमध्ये मतदार कुठे दिसतोय?

इन्किलाब हा इतका इन्फ्ल्युएन्शल चित्रपट होता तर कोणा (नावाजलेल्या) निवडणूक विश्लेषकाने त्याबद्दल लिहिलंय का?

मायबोलीवर २००९ च्या निवडणुकांसंबंधीचा धागा आहे. तिथे या चित्रपटाबद्दल काही लिहिलंय का कोणी?

इन्किलाब हा इतका इन्फ्ल्युएन्शल चित्रपट होता तर कोणा (नावाजलेल्या) निवडणूक विश्लेषकाने त्याबद्दल लिहिलंय का?<<<

तुम्ही असल्यावर कोणाची हिम्मत होईल का लिहायची?

{{{सिंबांच्या पोस्टमध्ये मतदार कुठे दिसतोय?}}}

पेडगावचं नॉनरिटर्नेबल तिकीट असणार्‍यांना नाहीच दिसणार. बाकीच्यांना इतकं केळं संत्रं सोलून द्यायची गरज असते का?

२००९ मध्ये नव्हतो मी मायबोलीवर.
Submitted by भरत. on 29 January, 2019 - 20:27

मी पण नव्हतो.

Pages