पाटील v/s पाटील - भाग १२

Submitted by अज्ञातवासी on 21 January, 2019 - 12:27

प्रस्तुत भाग वाचून कुणाच्याही भावना दुखवल्यास......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अशा फालतू गोष्टीने लेखकाला काहीही फरक पडत नाही, याची नोंद घ्यावी!!!

पाटील v/s पाटील भाग ११

https://www.maayboli.com/node/68698

व्यास आणि मोहन, दोन्हीही शून्यात बघत बसले होते.
"व्यास, माझ्या वडिलांना, काकांना, लहानपणापासून फक्त काबाडकष्ट करावे लागले. उकळत्या धातूच्या भट्टीत दिवसरात्र काम केलं. माझी आई, युक्रेनची बरं का? इतकी सुंदर, पण तिनेसुद्धा अठराविश्व दारिद्र्यात दिवस काढले. व्यास, ऐकतो मी कथा, कधीकधी रात्री, काय काय करावं लागलं, फक्त अंबामुळे! म्हणून व्यास मला अंबाकडून हिशेब मागायचाय, सगळ्याचा!"
"जाऊ देत सर, शांत झोपा."
"गुड नाईट व्यास..."
दुसऱ्या दिवशी मोहन पाटीलवाडीत गाडी घेऊन आला...
तेवढ्यात एक बाई, गाडीसमोर येऊन थांबली.
"मोहन आणि व्यास गाडीतून उतरले."
ती बाई हाताचा फणा करून गाणं म्हणत होती, "मै तेरी दुष्मन, दुष्मन तू मेरा...
मी पाटील आहे..."
शेवटचं वाक्य तिने इतक्या जोरात म्हटलं, की मोहन घाबरून व्यासच्या मागे लपला!
"घाबरू नका सर, वेडी आहे बिचारी!"
"हे असं वेड?"
"हो, काय झालं, एकदा हिच्या लग्नाचा वाढदिवस आला. मग हिने लोकांना विचारलं, काय गिफ्ट देऊ? लोकांनी चांगल्या आयडिया दिल्या, पण हीच मी पाटील आहे, अशा फालतू आयडिया नको, माझी विनोदबुद्धी खूप छान आहे असं म्हणून हिनेच नवीन आयडिया काढली."
"मग? झालं काय नक्की?"
"काय झालं काय? येडीने नवऱ्याला नागीण चित्रपट खूप आवडतो, म्हणून जिवंत नागीण गिफ्ट बॉक्समध्ये घालून दिली, गिफ्ट म्हणून. नवरा ते बघून भेदरून महिनाभर बेशुद्ध होता, आणि शुद्धीवर आल्यावर पहिलं काम केलं, तर हिला फारकत दिली. तेव्हापासून असं करतेय!"
Screenshot_20190121-144636.jpg
"अरेरे व्यास, वाईट वाटलं..."
"जाऊ दे सर."
"नाव काय हिचं?"
'विणी पाटील'
"छान नाव आहे."
"हो, हिला धागा धागा विणायला खूप आवडतं, म्हणून विणी म्हणतात."
"व्यास, हिला सोडा हो, मला अंबेवर जायचंय, तुम्हाला कुठे सोडू?"
"कुठेही सोडा, पण हिच्यापासून लांब!!"
मोहन व्यासला सोडून वाड्यावर आला.
"मोहन, अरे सकाळपासून वाट बघतोय तुझी.
का काय झालं?"
"अरे काय झालं काय, आधी ती चावी इकडे आण."
मोहन चपापला, अंबेने भांड फोडलं की काय?
"आधी चावी आण इकडे, अणांनी चावी हिसकली."
"आबा, कशाला त्रास देतायेत बिचाऱ्याला, सांगून टाका!" मिने म्हणाली.
"बरं. मोहन आजपासून तू ड्रायवर नाहीस, आजपासून तू जाधवांची जागा घ्यायचीस."
मोहनला आश्चर्याचा धक्काच बसला...
अंबेने कसं मान्य केलं?
"जा, आणि हो, आईचा आशीर्वाद घे वर जाऊन, तिनेच तुला जाधवांच्या जागी नेमायला लावलं."
मोहन तडक वर गेला, अंबेच दार ठोठावल!
"मेली नाहीये अंबा, हळू वाजव!" अंबेने दार उघडलं.
"तू आहेस होय, अंबा हसली. ये मध्ये ये... बस तिकडे खाली."
"अण्णा म्हणाले, तुम्ही मला जाधवांच्या जागी नेमायला लावलं."
"हो!"
"का?"
"राधीचा नातू आहेस तू, विश्वासघात नाही करणार, पटलं नाही, तरी खाल्ल्या मिठाला जगशील, बघितलंय मी. तुझ्या आजीला लहानपणापासून बघते मी. कायम खऱ्याची बाजू घेणारी, मेहनती, स्पष्टवक्ती...आणि मला काम साधून घ्यायचं जमायचं. पण सगळ्यांना तिचंच कौतुक. कायम तिचं कौतुक ऐकून डोकं उठायचं माझं. राधी अशी सुंदर, अशी सुगरण! अरे या अंबिला काही किंमत आहे की नाही?"
अंबा बोलायची थांबली.
"आईने सगळं सोनं तिला दिलं ना, अंबी चवताळली होती. अरे, मीसुद्धा बहीण होते तिची, एकदाही म्हणता आलं नाही, अंबी घे बरं थोडं, मग अंबिने घेतलं सगळं!"
"जा, नीट काम कर, राधाबाईचा नातू आहेस, नावाला जाग हो." अंबा छद्मीपणे हसली.
मोहन खाली उतरला, त्याच्या डोळ्यात राग मावत नव्हता.
"अरे मोहन, बरं झालं लवकर आलास तू, हे माझे नवीन ड्रायवर आलेच आहेत."
मोहन चमकला.
"नवीन ड्रायवर"
"हो, अरे ३० वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, म्हणतायत, स्टीलची गाडी आली, तरी चालवेन, रामकृष्ण हरी!"
"कोण?"मोहनने अधिरपणे विचारले.
"मी, रामकृष्ण हरी!" कोपऱ्यातून एक हसरा आवाज आला.
मोहन आता फक्त कोसळायचा बाकी होता.
कारण अण्णांचे नवीन ड्रायवर होते,
कृष्णराव पाटील!!!!!

मे तेरी दुष्मन (नक्की बघा) Rofl

https://youtu.be/5XUe_v0oL20

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे.
हा भाग सुद्धा नेहमीप्रमाणे छान...
दिवसाची सुरुवात खुप छान झाली तुझं लेखन वाचल्याने..
Happy

धन्यवाद अनघा,
कथा पुढे सर्कवण्यासाठी भाग नव्हताच हा Wink

Dance tr super ahe BT office mdhe boss aslyakarnane hasayla jmt nahi ahe... so Anyay hotoy as vatatay..

अज्ञातवासी
बाकीचे भाग वाचावेच लागतील.
तुमच्या प्रतिभेचा अंगार भावला ...

Vp

धन्यवाद @विनिता. झकास,
अगदी तसाच थयथयाट दुसऱ्या धाग्यावर चालू झालाय Wink
@दत्तात्रेय साळुंके - धन्यवाद, जास्तीत जास्त माबोकारांसोबत शेयर करा
धन्यवाद @अमी
@उनाडटप्पू - हा भाग कथा पुढे सर्कवण्यासाठी टाकलाच नाही Wink

खरं सांगायचं तर मला हां कथाभाग काहीही कळला नाही आणि त्यात खुद्द लेखक म्हणतात की ― हा भाग कथा पुढे सर्कवण्यासाठी टाकलाच नाही Wink

मग हां भाग नक्की कशासाठी होता? काही क्लू मिळेल का प्लीज ? खूप दिवसांनी मायबोलीवर आल्याने काहीच लिंक लागेना राव !

@ योगेश जोशी,

इथे खूप महाभारत घडलंय, हे सांगून गप्प बसतो!

ओके ओके
युद्धस्य कथा रम्या
पण ते (महाभारत) नंतर कधीतरी ऐकूच.
सध्या मात्र पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

Pages