येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

Submitted by संदीप डांगे on 11 January, 2019 - 03:12

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

1. येत्या वीस वर्षांत सरकारी नोकरीला काही अर्थ राहणार नाही, महत्त्वाची मलिदा खाऊ पदे सोडली तर सगळंच्या सगळं औटसोर्स होणार आहे, अगदी लष्करात सुद्धा होत आहे. म्हणजे सरकारचे खाजगीकरण वाऱ्याच्या वेगाने सुरु आहे.

2. आजच्या सर्व पारंपरिक शिक्षणसंस्था, इर्रीलिव्हेण्ट होणार आहेत. कारण कामाचे स्वरूप इंडस्ट्रीनुसार बदलत आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पेशलायज ज्ञानाची कौशल्याची गरज भासत आहे. उद्योगांना स्वतः चे कर्मचारी स्वतःच्या स्पेशल गरजेनुसार स्वतः प्रशिक्षित करून घ्यावे लागतील.

3. नव्या प्रकारच्या शिक्षणसंस्थांचा उदय निश्चित आहे, ज्यात शिक्षण प्रचंड महाग असेल, कोणालाही कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. ह्या संस्था पूर्ण नफ्यासाठीच चालविल्या जातील.

4. शहरीकरण, खेडी सोडून शहरात येण्याचे प्रमाण भयंकर वेगाने वाढणार आहे. सर्व टायर टू आणि टायर थ्री शहरांना मोठ्या लोकसंख्येसाठी तयारीत राहावे लागणारच आहे. शहरात राहणे त्यामुळे गावपेक्षा सुखाचे असेल असे नाही, शहरात चौपट मेहनत व एकपट मेहनताना मिळेल, कारण कामगारांची प्रचंड उपलब्धता. ह्यातून व्हाइट ब्लु कोणतीही कॉलर सुटणार नाही.

5. व्यवसाय उद्योग क्षेत्रात नव्याने शिरणाऱ्या लोकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागेल. नेहमीचेच व्यवसाय उद्योग असतील तर प्रस्थापितांकडून स्पर्धा, अडवणूक होणार, त्याला तोंड देऊन व्यवसाय उभा करणे कठीण असेल. प्रचलित पद्धतींपेक्षा अगदी नव्या पद्धतीने किंवा नवीनच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्याला यश मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही प्रकार दुर्मिळ असतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२० वर्ष खूप लांबीचे झाले पुढील १० वर्षात आताचे कितीतरी रोजगार संपलेले असतील AI मुळे .... टेकनॉलॉजिमुळे सगळे जग पूर्णपणे बदलले असेल
शिक्षणासाठी कोणीही कॉलेज मध्ये जाणार नाहीत सगळे online असेल .... नेहमीचे इंजिनीरिंग बंद झालेले असेल. अगदी डॉक्टर्सवर पण संक्रांत असेल कारण बरीचशी ऑपरेशन्स रोबोट करतील

२० जाऊ दे
१० पण राहु दे
सध्या जे ३रे महायुद्ध सुरू आहे त्याचे खरे स्वरूप अजून ३ वर्षात दिसू लागेल जेव्हा चीन अमेरिका रशिया त्यांची ठेवणीतली अस्त्र वापरून प्रचण्ड विध्वंस घडवतील. तेव्हा हे सगळे वरचे तार्किक वेगळ्या अर्थाने आणि त्रासदायकरित्या सिद्ध होण्याची शक्यता आहे.

चांगला विषय निवडल्याबद्दल अभिनंदन.
१. हे खरंतर व्हायलाच हवं कारण भारतात सरकारी नोकर म्हणजे भरपूर पगार ,पण वर्कलोड कमी आणि तेपण नीट करत नाहीत, चहापाणी द्यावं लागतं , कसेही वागले तरी नोकरी जात नाही वगैरे. सन्माननीय अपवाद असतात , त्यांनाच फक्त या नोकऱ्या असाव्यात.
२ व ३ - सध्याची शिक्षण व्यवस्था वर्क होत नाहीये त्यामुळे बदल तर व्हायला हवा. तो काय स्वरूप घेईल ते काळच ठरवेल.
४ व ५ - हे दोन्ही आज ऑलरेडी होत आहे.

माझ्यामते पर्यावरण, इकोलॉजी हे पुढे मोठं संकट होईल.

विषय चांगला आहे.

<< माझ्यामते पर्यावरण, इकोलॉजी हे पुढे मोठं संकट होईल. >>
-------- पर्यावरण पहिले प्राधान्य असायला हवे. अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवायची.

(अ) महानगरांची संख्या वढणार, आहे त्यांचा आकार फुगणार - वाढत्या लोकसंखेला सामावण्यासाठी उंच इमारती....
वाढत्या संख्येला जिवनावश्यक असणारे पाणी/ अन्न आणायचे कुठून. जमिनीतली पाण्याची पातळी खालवत चालली आहे. पाणी सुरक्षा तसेच अन्न सुरक्षा.
(ब) विविध (द्वनी, वायू, पाणी... प्लॅस्टिकचा/ रसायनांचा अतोनात वापर... ) प्रकारच्या वाढत्या प्रदूषणांचा सामना करावा लागेल.

विषय चांगला आहे. + १
ठरावीक संस्था/महाविद्यालये वगळता सध्या मागणी असणाऱ्या व्यावसायिक शिक्षणाचा दर्जाही प्रचंड घसरला आहे. तेव्हा शिक्षणातील विषय जरी नव्या इंडस्ट्रीला हवे ते घेतले तरी इंडस्ट्री सध्याच्या शिक्षण संस्थेवर विसंबून रहाणे शक्य नाही. शिक्षणसंस्थेत आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे.

उद्योग क्षेत्रातील बदल खूप झपाट्याने होत आहेत. कार्पोरेट्स सब सप्लायर्स वेठीस धरून आहेत, प्रचंड पिळवणूक, जीवघेणी स्पर्धा आहे. नवा उद्योग सुरू करणे हे कागदोपत्री सुलभ झाले असले तरी तो उद्योग तग धरून चालवणे प्रचंड जिकरीचे झाले आहे.