संक्रांतीला तुमच्या घरचा परंपरागत स्पेशल मेनू काय असतो?

Submitted by Mi Patil aahe. on 13 January, 2019 - 00:02

संक्रांत म्हटले की मला आठवते ती बाजरीची मऊ भाकरी (तीही कडक असेल तर भारीच) अन् भज्जीची (मिक्स) भाजी(बोर,ऊस,गाजर,हरभरा,---वगैरे, वगैरे)
तिळाची पोळी अन् तूप,दूध हे शक्यतो किंक्रातीला!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कोणत्या सणाला काय करायचे आमच्याकडे हे डिपार्टमेंट आईचे
मला तर वर्षाचे ३६६ दिवस नॉनवेज खाऊ घातले तरी त्यातच समाधान मानेन Happy

अरे येस्स
ते तीळाचे लाडू संक्रातीचेच ना ...
ते जगात फेव्हरेट.. एकापाठोपाठ एक चोखत राहायचे नुसते

कोणत्या सणाला काय करायचे आमच्याकडे हे डिपार्टमेंट आईचे
मला तर वर्षाचे ३६६ दिवस नॉनवेज खाऊ घातले तरी त्यातच समाधान मानेन Happy>>>>>>
आता तरी आईला रीटायर्ड होऊ द्या!!!

अरे येस्स
ते तीळाचे लाडू संक्रातीचेच ना ...
ते जगात फेव्हरेट.. एकापाठोपाठ एक चोखत राहायचे नुसते>>>>
हे काय "संक्रांतीचेच ना>>" असे उद्गार काढण्याइतपत विसर पडला "ते जगात फेव्हरेट...."असताना!!!!
हे जरा अतीच झाले बरं!!!!!

मग संक्रांतीला काय खाणार आता,संपलं असेल ना सगळं!!!
अरे असं कसं संपेल सगळं !
मायबोली करांचे डोकं आहे की खायला ( जे ऑलरेडी खाताय केव्हापासून )

आमच्याकडच्या पाटलांमधे करेला मटन नसेल तर कर साजरी होत नाही. ही स्पृहणीय प्रथा मी उचलल्यामुळे आमच्या घरी प्रचण्ड आदळआपट चालते, पण मटनापुढे ते आवाज माझ्या कानात पोहोचत नाहीत.

आता, भोगी, संक्रांत व कर, या तीन सणांमधल्या उरलेल्या दोन दिवसांबद्दल धागे काढा.

Lol हाहा:

संक्रांत सणाचीही नकळत टिंगल होतच आहे.

आम्ही संक्रांत बकरीद ला साजरी करतो असे म्हणने तसेच बकरसंक्रात मकरीद वगैरे शब्दप्रयोग एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्यास पुरेश्या आहेत.
जर मी ह्युमन नेचरला हुमायुन नेचर म्हटल्याने कोणाला ते खटकत असेल तर वरील शब्दप्रयोग नक्कीच खटकू शकतात.

त्यामुळे वेळीच सावरा ही विनंती Happy

वेड्याचे सोंग घेतल्यासारखे दर्शवत स्मार्ट कमेण्ट करण्याच्या नादात खरोखरच वेड्यासारख्या कमेण्ट्स गळ्यात मारणे किंवा धागा काढणे हा ही भावना दुखावण्याचाच प्रकार असू शकतो की Lol

संक्रांत सणाचीही नकळत टिंगल होतच आहे.

आम्ही संक्रांत बकरीद ला साजरी करतो असे म्हणने तसेच बकरसंक्रात मकरीद वगैरे शब्दप्रयोग एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्यास पुरेश्या आहेत.
जर मी ह्युमन नेचरला हुमायुन नेचर म्हटल्याने कोणाला ते खटकत असेल तर वरील शब्दप्रयोग नक्कीच खटकू शकतात.>>>>>>>>>
नकळत नाही चांगली जाणीवपूर्वक संक्रांत सणाची म्हणजेच हिंदू धर्माची टवाळखोर आणि टिंगलखोराच्या झुंडशाही ने टिंगल आणि टवाळी चालू केलेली उघड दिसत आहे.
यालाच धर्मनिरपेक्ष विनोदबुद्धी म्हणतात, की काय देव जाणे!!!!

आणि ते किरणुद्दीन(की अल्लाउद्दीन कोण जाणे!!!) तर स्वत: ला वेड्याचे डॉक्टर समजून स्वत:च स्वत:चीच तपासणी करतात की काय देवच जाणो!!!!!!
आ.रा.रा.राssssssssssssssssssssssssssssss