फेसबुक सरकारी असते तर...

Submitted by अतुल. on 11 January, 2019 - 23:53

फेसबुक हि वीस बावीस वर्षापूर्वी सरकारने दिलेली सोय असती तर ते कसे असते? एक कल्पनाविलास. पुण्यातील एका "सरकारी फेसबुक सेंटर" मध्ये अशा प्रकारचा फलक पाहायला मिळाला असता Lol

*** सरकारी सहकारी फेसबुक संस्था. शाखा: पुणे ***

* नेट वर सोशल होण्याचे एकमात्र ठिकाण *

आमचे ब्रीदवाक्य: बहुजन कुठं हाय बहुजन इथं हाय

नियम व अटी:

१. कृपया टाईमपास शिवाय जास्त वेळ थांबू नये. आपले झाल्यानंतर इतरांना बँडविड्थ वापरू द्यावी.

२. ही सोय मोफत आहे. त्यामुळे सर्वांना रस निर्माण होईल अशाच पोष्ट टाकून सरकारप्रणीत उद्योगास हातभार लावावा. स्वत:चे अथवा स्वत:च्या मुलांचे कौतुक असलेल्या पोस्ट जास्त टाकू नयेत. कारवाई केली जाईल.

३. पोष्टला कॉमेंट्स अथवा लाईक्स न मिळाल्यास व्यवस्थापनास जबाबदार धरू नये. अशा तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

४. ही सुविधा मोफत असल्याने तिचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून अपलोड केले जाणारे सर्व फोटो पासपोर्ट साईज असणे बंधनकारक आहे. इतर फोटो स्वीकारले जाणार नाहीत. तसेच फोटोची एक स्थळप्रत स्वत:जवळ ठेवावी.

५. कृपया ही सुविधा स्वत:च्या जबाबदारीवर वापरावी. विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे अथवा अन्य तांत्रिक कारणामुळे सर्व्हर बंद पडून प्रोफाइल/पोष्ट/कॉमेंट्स/फोटो इत्यादी गायब झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.

६. काही तक्रार असल्यास डाव्या बाजूला तक्रारीच्या लिंक वर क्लिक करावे. लिंक चालत नसेल तर फुलस्केप पेपर वर एका बाजूला सुवाच्य अक्षरात तक्रार लिहून ती पेठेतील कार्यालयात आणून द्यावी (लेखी तक्रारी स्वीकारण्याची वेळ दर सोमवारी सकाळी ११ ते १)

७. हा व्यवसाय जाहिरातदारांनी दिलेल्या जाहिरातींवर चालतो. त्यामुळे अर्धा तास टाईमपास केल्यानंतर कमीत कमी एका जाहिरातीवर क्लिक करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आपोआप लॉग आउट करून पुढील दोन तास अकाउंट बंद ठेवण्यात येईल.

८. फोटोच्या ठिकाणी फेसबुकचा लोगो असलेल्या सर्व प्रोफाइल्स व्यवस्थापकांकरिता राखीव. क्लिक करू नये. आत पाहण्यासारखे काही नाही.

९. अनोळखी मुलींच्या/स्त्रियांच्या प्रोफाइलवर जाऊन त्यांना त्रास देणे निषिद्ध आहे. अपमान झाल्यास व्यवस्थापन जबाबदार नाही.

१०. कृपया शांतता पाळा. पोष्ट अथवा कॉमेंट्स मध्ये सर्व कॅपिटल अक्षरे वापरून आरडाओरड करू नये.

हुकुमावरून,

|| आपला टाईमपास सुखाचा होवो ||

Biggrin

(पाच वर्षापूर्वी माझ्या फेसबुक वॉलवर पूर्वप्रकाशित लेख)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारी काम असं होईल? शक्यच नाही!

१. कृपया टाईमपास शिवाय जास्त वेळ थांबू नये. आपले झाल्यानंतर इतरांना बँडविड्थ वापरू द्यावी.>>>> नेट डाऊन हाये हो, थांबा की थोडावेळ... ह्ये बाकीचे काय तैयंपास करतायेत का... एक पिक्चर लोड व्हायला अर्धा तास घेतोय... एवढी घाई असेल तर स्वतःच नेट आणा की...

२. ही सोय मोफत आहे. त्यामुळे सर्वांना रस निर्माण होईल अशाच पोष्ट टाकून सरकारप्रणीत उद्योगास हातभार लावावा. स्वत:चे अथवा स्वत:च्या मुलांचे कौतुक असलेल्या पोस्ट जास्त टाकू नयेत. कारवाई केली जाईल.>>>> ओ त्या शेवटच्या खिडकीत टोकण घ्या, मग इकडे या. वीस रुपयाचं हाये. रांग हाये असं म्हणताय? मग इकड तीस द्या आणि घुसा आत. कुठली पोस्ट चाललं म्हणताय? कुठलिही चाललं ओ! पिंट्याचा वाढदिवस येतोय ना, टाका की मग, ह्यापी बडे पिंटूऊऊउऊ!

३. पोष्टला कॉमेंट्स अथवा लाईक्स न मिळाल्यास व्यवस्थापनास जबाबदार धरू नये. अशा तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.>>>>>
सायेब लाईक पाह्यजे असल तर एक नोट द्या, आखी लाईन पोष्ट लाईक केल्याशिवाय सोडत नाय बघा!

४. ही सुविधा मोफत असल्याने तिचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून अपलोड केले जाणारे सर्व फोटो पासपोर्ट साईज असणे बंधनकारक आहे. इतर फोटो स्वीकारले जाणार नाहीत. तसेच फोटोची एक स्थळप्रत स्वत:जवळ ठेवावी.>>>> ह्यो फोटो चालणार नाय हो, कान नाहीये दिसत. कान दिसल असा फोटो आना, नाहीतर अपंग सर्टिफिकेट. चार झेरॉक्स पायजेल. १ इकडे, १ चार नंबरला, १ जावकला आणि १ तुमची प्रत.

५. कृपया ही सुविधा स्वत:च्या जबाबदारीवर वापरावी. विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे अथवा अन्य तांत्रिक कारणामुळे सर्व्हर बंद पडून प्रोफाइल/पोष्ट/कॉमेंट्स/फोटो इत्यादी गायब झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
>>>>>> लाईट नाय ओ, आणि तुमची प्रोफाइल सापडत नाय... लै शोधली, आक्ख दप्तर शोधलं, मार्क सायबांकडे शोधलं, नाय मिळाली.

६. काही तक्रार असल्यास डाव्या बाजूला तक्रारीच्या लिंक वर क्लिक करावे. लिंक चालत नसेल तर फुलस्केप पेपर वर एका बाजूला सुवाच्य अक्षरात तक्रार लिहून ती पेठेतील कार्यालयात आणून द्यावी (लेखी तक्रारी स्वीकारण्याची वेळ दर सोमवारी सकाळी ११ ते १)>>>>> काय आहे, लिवून आणली का तक्रार, ह्ये काय, कागदावर? तो ५० रुपयांचा तक्रार फॉर्म घ्या. सगळ्या लाईनी भरा. एक प्रत पोलीस, एक तहसीलदार, एक तलाठी आणि एक ग्रामपंचायत. सगळ्यांचा फॉर्मवर शिक्का घ्या, आणि ऑनलाईन पोस्ट टाका फेसबुकवर, त्यांनंतर मार्क साहेबाला ट्विट करा. चार नन्तर येतात ते, त्यांना फॉर्म द्या.

७. हा व्यवसाय जाहिरातदारांनी दिलेल्या जाहिरातींवर चालतो. त्यामुळे अर्धा तास टाईमपास केल्यानंतर कमीत कमी एका जाहिरातीवर क्लिक करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आपोआप लॉग आउट करून पुढील दोन तास अकाउंट बंद ठेवण्यात येईल.>>>>>>
त्ये पोष्टवर लाईक ठोका की साहेबांच्या... साहेबांच्या बाईने नवीन रेशिपी टाकल्यात, शेर करा, उद्या साहेब एक तास फुकट देतील... करा करा... मागच्या अप्पाने दिसलाईक केलं, तर अकौंटच डिलिट केलं सायबाने...

८. फोटोच्या ठिकाणी फेसबुकचा लोगो असलेल्या सर्व प्रोफाइल्स व्यवस्थापकांकरिता राखीव. क्लिक करू नये. आत पाहण्यासारखे काही नाही.
>>>>>
लंच रूम हाय हो, फुटा तिकडं...

९. अनोळखी मुलींच्या/स्त्रियांच्या प्रोफाइलवर जाऊन त्यांना त्रास देणे निषिद्ध आहे. अपमान झाल्यास व्यवस्थापन जबाबदार नाही.
>>>>>
भड***च्या, लै लाईक ठोकतोय, डिलेतच करतो अकाउंट. ओळखीची तरी हाय का ती? काय म्हणतो कॉलेजात हुती, माकड्या बाब्या हाय तो, फेक अकाउंट हाय!

१०. कृपया शांतता पाळा. पोष्ट अथवा कॉमेंट्स मध्ये सर्व कॅपिटल अक्षरे वापरून आरडाओरड करू नये.
>>>> मोठ्याने बोला की ओ, या कलकलाटमध्ये काय नाय ऐकू येत. काय पोस्ट रिजेक्त झाली, मग बरोबर हाय, फार्मवर लिहिलंय, कॅपिटल लेटर वनली!

वर लिहिलेलं परिकथेतल कार्यालय वाटतय Rofl

>> दुपारी 1 ते 3 बंद राहील हे पण ऍड करा की Happy
>> Submitted by च्रप्स on 12 January, 2019 - 18:53

हो पुण्यात तर पाहिजेच पाहिजे Lol

@अज्ञातवासी: Biggrin
>> एक प्रत पोलीस, एक तहसीलदार, एक तलाठी आणि एक ग्रामपंचायत
Rofl

@ Mi Patil aahe, अॅमी: धन्यवाद Happy

छान आहे कल्पना. मला अज्ञातवासींचं ऑफिस पण लई आवडलं Happy
भड***च्या, लै लाईक ठोकतोय, डिलेतच करतो अकाउंट. >>>
ह्यो फोटो चालणार नाय हो, कान नाहीये दिसत. कान दिसल असा फोटो आना, नाहीतर अपंग सर्टिफिकेट. >>>
तो ५० रुपयांचा तक्रार फॉर्म घ्या. सगळ्या लाईनी भरा. एक प्रत पोलीस, एक तहसीलदार, एक तलाठी आणि एक ग्रामपंचायत.>>
सगळंच Lol