विण्डोज् सेव्हन (Windows 7) ऑपरेटिंग सिस्टीमकरिता सर्विस पॅक १ इन्स्टॉल कसा करावा?

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 12 January, 2019 - 00:24

मायक्रोसॉफ्ट विण्डोज् सेव्हन ६४ बिट (Windows 7 64 Bit) ऑपरेटिंग सिस्टीम सध्या वापरत आहे. त्यावर सर्विस पॅक १ इन्स्टॉल कसा करावा?

नेटवर शोधाशोध करुन खालील तीन फाईल्स डाऊनलोड केल्या पण त्यापैकी कुठलीच रन होत नाही.

windows6.1-KB976932-X64

Windows6.1-KB947821-v34-x64

windows6.1-KB976932-X86

त्याकरिता नेटवरील कुठल्या साईटवरुन कोणत्या फाईल्स डाऊनलोड करुन घ्याव्यात?

तसे केल्यास स्पीड वाढेल का? लायब्ररीतील (माय डॉक / माय व्हिडीओ / माय म्युझिक) फाईल्स आणि फेवरिट्स / बुकमार्क्स इत्यादी डिलीट होतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विंडोज ७ मध्ये Windows update एनेबल करा, आणि download and install updates automatically हा ऑप्शन ठेवा. त्यात अनेक अपडेट्स येतील, संगणक अनेक वेळा रिस्टार्ट करावा लागेल. आणि हवे ते अपडेट्स इन्स्टॉल झाले की SP1 सुद्धा इन्स्टॉल होईल.
मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ चा सपोर्ट बंद केला असला तरी, ऑलरेडी जे अपडेट्स आणि सर्व्हिस पॅक्स रिलीज झाले होते, ते विंडोज अपडेट्स वरून डाउनलोड व इन्स्टॉल होतात.
जानेवारी २०१८ पर्यंत तरी हे मी केले आहे.
त्यांनतर कंपनी बदलली आणि आता माझ्याकडे Ubuntu आहे म्हणून आता चेक करू शकत नाही, पण विंडोज अपडेट्स अजूनही काम करत असावे.

माझ्याकडे विंडोज ७ होम प्रीमियम आहे.
अजूनही अपडेट्स येतात.
मी कंट्रोल पॅनेल- विंडोज अपडेट->चेंज सेटिंग्स यात check for updates but let me choose whether to download and install them हा पर्याय निवडलाय.

अपडेट डिसेबल केले असतील तर विंडोज अपडेट->चेक फॉर अपडेट्स करून पुढे जाता येईल.

पायरेटेडे ला विंडोज अपडेट अनेबल केले की वांधे होतात असे आमच्या तंत्रज्ञाने सांगितले. त्याने अपडेट बंदच ठेवले आहे

Microsoft ended mainstream support for Windows 7 on January 13, 2015, but extended support won't end until January 14, 2020. @Submitted by मानव पृथ्वीकर on 12 January, 2019 - 17:24