वेब सिरीज बाबत काही मुलभूत प्रश्न

Submitted by Parichit on 10 January, 2019 - 23:30

वेब सिरीज बाबत मी जरा लेट कमर आहे. काही मुलभूत प्रश्न आहेत.

१. वेब सिरीज नक्की कुठे पाहता येतात? युट्युब वर सर्व पाहता येतात का?

२. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम हे नक्की काय आहेत? युट्युब पेक्षा ते वेगळे आहेत का? इथे सुद्धा वेब सिरीज पाहता येतात का?

३. कोणतीही वेब सिरीज कोणत्याही च्यानेल मधून (नेटफ्लिक्स, युट्युब, अमेझॉन प्राईम) पाहता येते का?

४. वेब सिरीज हि इतर व्हिडीओज प्रमाणे ऑफलाईन कधीही पाहता येते का? कि लाइव स्ट्रीमिंग सुरु असतानाच पहावी लागते?

५. एखादी वेबसिरीज वरील पैकी (किंवा अन्यत्र) कोठे पहायची हे कसे कळणार? कोण सांगते?

कोणी माहिती सांगितल्यास उपकृत राहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. वेब सिरीज या video streaming service providers यांच्या सर्व्हरवरून पहाता येतात, त्यांच्या वेबसाईटवर/ऍपवरून. यू ट्यूब ही व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिस आहे. तिथे जर कुणी एखाद्या सिरीजचे व्हिडिओ शेअर केले असतील तर ते पाहता येतील. सोनी झी टीव्ही वगैरे त्यांच्या सिरीजचे व्हिडीओज यू ट्यूब वर शेअर करतात, आपण पाहू शकतो. पण त्या सिरीज टीव्ही वर ही त्यांच्या चॅनेलवर ब्रॉडकास्ट होत असतात.

२. नेटफलिक्स, प्राईम व्हिडीओ (ऍमेझॉनचे) हे streaming service providers आहेत. त्याप्रमाणे Youtube TV पण आहे. या सर्व्हिसेस मोफत नाहीत. ऍमेझॉन प्राईमचे सबस्क्रिप्शन वर्षाला ₹ हजार आहे. त्यात प्राईम व्हिडिओ बघता येते, प्राईम म्युझिक ऐकता येते आणि ऍमेझॉन वरून ऑनलाईन काही मागवल्यास ठरावीक supplies साठी मोफत व त्वरीत डिलिव्हरी मिळते.
नेटफलिक्सचे मासिक सबस्क्रिप्शन आहे, ₹ ५००/- , ₹ ६५०/-, आणि ₹ ८००. यातील ₹ ६५० /- दोघात शेअर करता येते तर ₹८०० चौघात. ₹५००/- मध्ये HD नाही, शेअरिंग नाही.
याव्यतिरिक्त HOOQ, HBO, BIGFLIX, असे बरेच streaming service providers आहेत, सगळ्यांची वेगवेगळी फी आहे.
त्यापैकी नेटफलिक्स व ऍमेझॉन जास्त लोकप्रिय आहेत, त्यांच्यावर अधिक वेब सीरिज, व चित्रपट उपलब्ध असतात, आणि नेटफलिक्स ओरिजिनल, ऍमेझॉन ओरिजिनल या त्यांच्या स्वतःच्या वेबसिरीज असतात ज्या अन्य ठिकाणी पाहता येणार नाहीत.

३. सिरीज बनवणाऱ्यांनी ज्यांना कुणाला अधिकार दिले आहेत त्यांच्या चॅनेलवर पहाता येतात.

४. जो पर्यंत त्यांच्या सर्व्हरवर उपलब्ध आहे तेव्हा केव्हाही आणि कितीही वेळा पहाता येते. पण जेव्हा रिलीज होतात तेव्हा सर्व देशात एकाचवेळी होतील आणि सर्व देशात होतीलच असे नाही.

५. १. गुगळुन. २. आपण ज्या चॅनेलचे सबस्क्रिप्शन घेतले, त्यांच्या नव्या रिलीजची, जुने काही उपलब्ध झाले असेल त्याची आपल्या इमेलवर अपडेट्स येतात. ३. अजूनही काही मार्ग असतील.

याव्यतिरिक्त वेबसिरीज बघण्याच्या बऱ्याच ट्रिक्स / work around असतात जाणकार त्याबद्दल सांगतील.

अमेझॉन, नेटफ्लिक्स हे नव्या जगातले मनोरंजन क्षेत्रतील जायंट आहेत. स्पेशली नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्सचा कंटेट इतका रिच आहे आताच की दुसरीकडे पहायची गरज नाही.
गेम ऑफ थ्रोनसारखी टिव्ही मालिका पुन्हा कुठल्या चॅनेल वर होणे नाही. यापुढील काळात टिव्ही चॅनल्स जगणे आणि भव्यदिव्य काही करणे शक्य नाही. टिव्ही एरा संपत चाललाय. तसेच बिग बजेट सिनेमे यापुढे अशाच मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी असेल आणि बरेच मोठाले डायरेक्टर्स अशा कंपन्यांच्या दावणीस बांधलेले असतील. थोडक्यात, कलाकार पण नोकरीवर असतील, विकली वेजेसवर.
नवीन प्लॅटफॉर्म, नवीन एरा.

वर जे सांगितले आहेत त्या व्यतिरिक्त भारतातही आता नव्याने काही सेवा सुरू झालेल्या आहेत. त्या ही चांगल्या आहेत.

१. आल्ट बालाजी
२. जिओसिनेमा
३. एअरटेल
४. व्होडाफोन प्ले अ‍ॅप
५. टेलिग्राम (डालो करून पाहता येते)
६. आयडिया
७. एम एक्स प्लेयर