पाटील v/s पाटील - भाग ८

Submitted by अज्ञातवासी on 6 July, 2018 - 06:08

भाग ७ - https://www.maayboli.com/node/66470

“माणूस म्हणजे काय, एक ओझं.”
“ओके व्यास, पुढे?”
“आपण म्हणतो, हा माझा बाप, हा माझा भाऊ, हि माझी आई, हि माझी बाई.... सगळं मोहमाया... शेवटी मीसुद्धा उरत नाही हो...”
“टोटली सहमत व्यास...”
“मग का म्हणून हे ओझं वागवावं? फेकून द्यावं हे ओझं....” हे बोलतानाच व्यास तोल जाऊन खाली पडलेच असते, पण मोहनने त्यांना सावरलं...
“का सावरला मला? मी ओझं फेकून देणार होतो स्वतःच...” व्यास भरल्या डोळ्याने म्हणाले.
“नको व्यास नको, आम्हाला गरज आहे तुमची...” मोहननेसुद्धा तसाच नाटकी अभिनय केला.
महिन्यातून एकदा व्यासना जेव्हा जास्त चढत असे, तेव्हा ते असेच वाहवत जात असत.
या बंगल्यात हे सर्व लोक एका कारणासाठी आले होते, आणि आता सर्वांमध्ये एक बंध निर्माण झाला होता.
व्यास चला तुम्हाला घरी सोडतो...
“ओके... तसेही तुम्ही आता ड्रायवर आहातच....”
क्षणभर सगळ्यांनी चमकून व्यासकडे बघितले. मोहन आता काय करेल यावर सगळ्यांचं लक्ष लागलं होत.
“चला, आज मी तुमचा ड्रायवर...” मोहन हसत व्यासला आधार देत म्हणाला.
सर्वजण आपल्या मालकाच्या वर्तणुकीत घडणारा हा बदल बघत होते. अनुभवत होते.
व्यास पाटीलवाडीपासून २० किमी अंतरावर राहत होते.
"गुड नाईट सर "
"गुड नाईट व्यास."
मोहन व्यासला सोडून बाहेर आला.
मोहनची अवस्थाच विचित्र झाली होती. त्याच तंद्रीत तो रस्त्यावरच्या डिव्हायडर वर जाऊन बसला.
'आजीची तब्येत खालवतेय. तिला तू जवळ हवा आहेस. आणि तू काय वेड घेऊन गेलाय. कंपनीला तुझी गरज आहे. घराला तुझी गरज आहे.'
आजच सकाळी कॉल आला होता. मोहनला परत येण्यासाठी सर्व आग्रह करत होते.
बराच वेळ विचार करून तो उठला. गाडी चालू केली, आणि पाटीलवाडीकडे सुसाट निघाला...
सकाळी....
“मोहन निघायचंय.”
“जी अण्णा...”
“मालक.. अण्णा घरच्यांसाठी.”
मोहन वरमला... “जी मालक.”
अण्णा गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसले.
“मी जिथे म्हणतोय, तिथे घे. फक्त डोळे आणि हात - पाय चालू ठेवायचे. तोंड आणि कान बंद.”
“ठीक मालक.”
एका माळरानावर अण्णांनी गाडी थांबवायला लावली.
“तू इथेच थांब,” आणि अण्णा तिथल्या एका पडक्या घराकडे जायला निघाले.
मोहन गाडीतच थांबला. सूर्य माथ्यावर होता. ऊन तळपत होत, आणि मोहनच डोकसुद्धा.
आणि त्याक्षणी मोहनची नजर एका गोष्टीवर पडली
एक माणूस तलवार घेऊन अण्णांच्या अंगावर वार करणार, तेवढ्यात सुसाट वेगाने मोहनने गाडी त्याच्या अंगावर घातली. तशीच गाडी १८० अंशात वळवून त्याने दार ढकलून अण्णाना मध्ये घेतले.
मोहनने बघितले, मागून अक्षरशः माणसांची झुंड हातात तलवारी घेऊन सुसाट वेगाने धावत येत होती.
मोहनने तशीच गाडी पाटीलवाडीकडे घेतली.
“तुला तो माणूस चाल करून येण्याआधीच तुला कसं कळलं?”
“सावली दिसली... सावलीवरून हातातली तलवार ओळखतो मी.”
“धन्यवाद... मोहन...” अण्णा म्हणाले.
“मालक नोकराच्या नात्यात, धन्यवाद शब्द विसंगत वाटतो, मालक.....”
अण्णा वरमले. त्यांनी खाली मान घातली.
गाडी अंबावर आली. पाटील सुन्नपणे खाली उतरले, आणि वाड्यात शिरले.
“आबा काय झालं, कसं खरचटलं तुम्हाला,” मिनीने अण्णांना पाहून प्रश केला.
“असा अवतार कसा झाला अण्णा?” अंबाने प्रतिप्रश्न केला.
“मालक हायवेवर चहा प्यायला थांबले होते. तिकडून बैलगाडी येत होती... बैलगाडीच्या चाकात मालकांच्या धोतराचा पदर अडकला, आणि मालक पडले.” मोहन निष्पापपणे म्हणाला. अण्णा मोहनकडे बघतच राहिले.
“हायवेवर बैलगाडी, आणि चाकात धोतराचा पदर?” जाधवने प्रतिप्रश्न केला...
“जाधव, तुमच्या स्वर्गीय वडिलांच्या नावावर बोर्ड ठोकलाय का हायवेवर? बैलगाडी चालवणाऱ्याला जन्मठेप आणि त्यात धोतर अडकून पडणाऱ्याला फाशी.” अण्णांनी जाधवकडे आग ओकत बघितले.
“मीने, जा हळद आण. लागलंय पोराला.” अंबा म्हणाली.
“मालक, मी बाहेर थांबतो,” मोहन म्हणाला.
आणि यावर अण्णांनी जे उत्तर दिलं, त्याची अपेक्षाही कुणी केली नव्हती.
“अण्णा म्हणायचं यापुढे, नाहीतर नोकरीवरून काढून टाकीन.”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<सॉरी मेघा. खूप उशीर झाला हा भाग टाकायला. पुढचे भाग येतील पटापट.

Submitted by IRONMAN on 6 July, 2018 - 10:49 >>>

IRONMAN जी कधी येणार पुढचे भाग ?

IRONMAN sssssss
कधी येईल पुढचा भाग???????

मायबोली वरील माझी सर्वात आवडती सीरीज होती ही Happy
धाग्यास जागृत केल्याबद्दल धन्यवाद. पुभाप्र