नववर्षाच्या स्वागताला मुंबईपुण्यात मद्यालये रात्रभर उघडी - हा निर्णय पटतो का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2018 - 23:46

दिवाळीला फटाके वाजवू नका…
त्याने ध्वनि आणि वायूप्रदूषण होते

होळीला पाण्याने रंगपंचमी खेळू नका...
त्याने पाण्याची नासाडी होते

दहीहंडीला वीस फूटाच्या वर हंडी लाऊ नका...
त्याने जिवाला धोका असतो

गणपतीला डीजे लाऊ नका...

शिवजयंतीला रस्त्यावर मंडप बांधू नका...

नवरात्रीला गरबा आणि स्पीकर दहाच्या आधी बंद म्हणजे बंद...

अजून काही राहिले असेल तर वाचकांनी भर टाका...

पण आज मात्र मायबाप सरकारने वर्षाच्या अखेरीस का होईना लोकांना भावनेला किंमत देत ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करायला दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण हा सण कुठलाही धिंगाणा न घालता पर्यावरणप्रेमी अत्यंत शांततेत साजरा करतात आणि यातून समाजात सलोखा कायम राहण्यास मदतच होते.

तरी सर्व इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा पण त्या आधी हा निर्णय तुम्हाला पटला का हे मात्र *"प्रामाणिकपणे"* जरूर ईथे नमूद करा !

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मद्यालये/हॉटेल रात्रभर उघडी ठेवली तर फ्री कॅब ड्रॉप द्या.सर्व्हिंग स्टाफ ला दुसऱ्या दिवशी आणि 1 च्या रात्री पूर्ण पगारी सुट्टी द्या.
मोठ्याने म्युझिक वाजवणार ते एरिया साउंडप्रूफ केलेले असावे, जवळ रुग्णालये नसावी.
(बाकी स्वतःच्या पैश्याने,समाज सुरक्षा न बिघडवता, नशेत गाड्यांच्या काचा न फोडता आणि दारू पिऊन ड्राईव्ह करून समोरच्याला न उडवता काय वाटेल ती मजा करा.व्यक्ती स्वातंत्र्य आहे.)

फक्त मद्यालयांनाच परवानगी मिळालीय का?
>>>
बार, हॉटेल्स, पब्स.. जिथे जिथे दारू पिली जाते
अन्यथा लोकं पावभाजी आणि पुलाव खायला कश्याला रात्ररात्रभर बाहेर राहणार आहेत?

बाकी स्वतःच्या पैश्याने,समाज सुरक्षा न बिघडवता, नशेत गाड्यांच्या काचा न फोडता आणि दारू पिऊन ड्राईव्ह करून समोरच्याला न उडवता काय वाटेल ती मजा करा.व्यक्ती स्वातंत्र्य आहे
>>>

अगदी सहमत
फक्त असे सुरक्षित वातावरण तयार करण्यास पैसा आणि मनुष्यबळ कोण पुरवणार कोण जबाबदारी घेणार हा प्रश्न आहे. तो तसाच सोडलाय.

सुरक्षित वातावरण तयार करणे तुमच्याच हातात आहे.

तुम्ही स्वतःच्या पैश्याने,समाज सुरक्षा न बिघडवता, नशेत गाड्यांच्या काचा न फोडता आणि दारू पिऊन ड्राईव्ह करून समोरच्याला न उडवता काय वाटेल ती मजा करा. बाजूच्याला करू द्या. एकमेकांची आय माय उद्धरु नका, मग समोरचा तरी कशाला उद्धरेल? तुम्ही शिस्तीत राहा, बाकीचे शिस्तीत राहतील.

प्रत्येक ठिकाणी सरकार दंडुका घेऊन हवे, नैतर लोक कंट्रोलच्या बाहेर, तर लोकशाही कसली? लोकांनी स्वतःला सुसंस्कृत करावे.

बाकी स्वतःच्या पैश्याने,समाज सुरक्षा न बिघडवता, नशेत गाड्यांच्या काचा न फोडता आणि दारू पिऊन ड्राईव्ह करून समोरच्याला न उडवता काय वाटेल ती मजा करा.व्यक्ती स्वातंत्र्य आहे >>>

हे व्यक्तीस्वातंत्र्य एकाच रात्रीपुरते कशाला?
२४ × ३६५ द्यावे मग.

समाज सुरक्षा न बिघडवता स्वतःच्या पैशाने पिने,
नशा करुन गाड्यांच्या काचा न फोडणे,
पिऊन गाडी चालवायची पण कुणाला उडवायचे नाही,
प्यायची पण शिविगाळ करायची नाही
हे तुम्हाला जमले की मग तुम्ही सुसंस्कृत. ही सुसंस्कृतपणाची नविन व्याख्या आवडली.
उद्या एखाद्याने वरील सर्व पाळून नशा केली आणि कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आणि त्या दिगंबर अवस्थेत रस्त्याने फिरला तर तोही सुसंस्कृतपणाच ठरवायचा का? कारण त्यातही कुणालाच त्रास होत नाही.

दारू न पिता दिगंबरावस्थेत फिरलं तर चालतं का? याचं जे उत्तर असेल तेच.
दारू प्याल्यावर काय काय करू नये याची exhaustive list करायची का? ती list indicative आहे.
मानव, युवासेनाप्रमुखांची जुनी मागणी आहे की हॉटेल्स, मॉल्स , शॉप्स,इ. रात्रभर चालू राहू द्या. वर्षभर.

वर जे जे करू नका म्हटलंय, त्यांना तेही करायला हवंय. किमान त्यांच्या पक्षाचा स्टँड तसा आहे.

काल दुबईहून लखनौला येणार्‍या एअर इंडीया एक्सप्रेस या विमानात एक प्रवासी असेच स्वत:चे सर्व कपडे काढून दिगंबरावस्थेत फिरायला लागला, विमानाच्या स्टाफने त्याला ब्लॅंकेट मधे गुंडाळून, संपूर्ण प्रवासादरम्यान सीटला बांधून ठेवला. आता या प्रवाश्याला सुसंस्कृत म्हणणार की असंस्कृत ? वर त्यांने दारु देखील प्यायली नव्हती.

कित्येक उच्चभ्रू हॉटेल्स उघडी असतात की. व तिथे झडणाऱ्या पार्ट्यांची वर्णने व फोटो ग्लॉसी पेपरात छापुनही येतात. ताज रात्रभर उघडे असावे हा माझा अंदाज.

सामान्य लोकांसाठीची हॉटेल्स रात्रभर उघडी राहिली तरी सकाळी उठून 8.17 ची फास्ट गाडी पकडायची चिंता असलेली मंडळी रात्रभर पार्टी करणार हे थोडे कठीण दिसतेय.

शिवसेनेचे काही कळत नाही. काही वर्षांपूर्वी 14 फेबला दांडके घेऊन लोकांच्या मागे लागायचे. आता रात्रभर जल्लोश करा म्हणताहेत.

आर्थिक गणितं आहेत बार रात्रभर उघडे ठेवण्यात.
इंडियन पिनल कोड नुसार गुन्हा/दुसऱ्याला धोका/समाजाला भडकवणे ठरणार नाही असे काहीही स्वतःच्या पैश्याने दारू पिऊन किंवा न पिता करणे वर्षाचे कोणतेही दिवस अलाउड आहे.(कपडे काढणे/प्रवाश्याचे विमानातील वागणे भारतीय दंड विधानाखाली गुन्हा आहे.)
पिंपरी चिंचवड/धायरी/आंबेगाव/काळेवाडी मध्ये सध्या दारू जास्त झाली की रस्त्यावर येऊन कोणत्यातरी पांढरपेशया सोसायटी बाहेर उभ्या गाड्या उगीचच फोडण्याची फॅशन आहे.तितके होणार नाही इतपत काळजी घ्यावी लागेल.

हे स्वातंत्र्य फक्त मुंबई पुण्यालाच आहे की सर्व महाराष्ट्रातील जनता यास पात्र ठरली आहे?

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट ड्राय डे असतात. प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास नाही रात्रभर तर निदान रोजच्या वेळेप्रमाणे मद्यालये उघडी ठेवणार का?

या विमानात एक प्रवासी>>> या प्रवाश्याची मानसिक अवस्था ठीक नसावी असे पोलिस म्हणाले. त्याच्या दुबई येथील मालकाने त्याला दिलेल्या त्रासामुळे त्याची अवस्था झाली असावी असं त्यांचं म्हणणं आहे

पण आज मात्र मायबाप सरकारने वर्षाच्या अखेरीस का होईना लोकांना भावनेला किंमत देत ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करायला दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
<<
हे खांग्रेजी सरकारकडून होणारे अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन आहे. हिंदू नववर्ष सात्विकतेने साजरे होते. आपण हिंदू आहोत, असली थेरं करणे योग्य नाही.

मुंबईतले सध्याचे भ्रष्ट काँग्रेस सरकार ताबडतोब पाडलेच पाहिजे!

भरत, अच्छा ही युवासेनेची जुनी मागणी आहे हे माहीत नव्हते.

इतरवेळी रात्रभर हॉटेल्स, पब्स, बार्स उघडे ठेवणे वेगळे. पण लोक जास्त प्रमाणात पिऊन सुरक्षा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, उपद्रव होऊ शकतो तेव्हा ड्राय डे ठेवतात.
३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपघात, छेडखानी यात वाढ झाली आहे. तेव्हा ३१ डिसेंबरला रात्रभर मद्यालये उघडे ठेवणे योग्य वाटत नाही.

तुम्ही शिस्तीत राहा, बाकीचे शिस्तीत राहतील.
प्रत्येक ठिकाणी सरकार दंडुका घेऊन हवे, नैतर लोक कंट्रोलच्या बाहेर, तर लोकशाही कसली? लोकांनी स्वतःला सुसंस्कृत करावे.
नवीन Submitted by साधना on 31 December, 2018 - 12:35

√√√√

कर्रेक्ट !
मी तर म्हणतो पोलिस आणि न्यायालय ही खातीच बंद करून टाकूया. लोकांनाच सुसंस्कृत आणि सभ्यपणे राहायचे आवाहन करूया. पुर्ण देशाचा शनिशिंगणापूर करून टाकूया...

पुर्ण देशाचा शनिशिंगणापूर करून टाकूया...
<<
शनिशिंगणापूर गाव पोलिस व न्यायालयाच्या कक्षे बाहेर आहे का ?

खरं तर शहाण्या माणसाने 31 डिसेंबर ला पिऊन ड्राईव्ह करू नये.अगदी कमी प्यायले तरी समोरच्या एखाद्या टल्ली चालकाला तोंड देताना रिफ्लेक्स तितके चपळ राहत नाहीत.शिवाय पोलिसांना जरा जरी तुमच्या चेहऱ्यावर अपराधी भाव दिसला की ते पकडून ब्रेथलायझर लावून दंड घेतात.(अनुभव परिचितांचे)
मस्त घरी बसून मित्राना बोलवावे, थोडे प्यावे,खाणे स्वतः बनवून किंवा बाहेरून मागवून बायकांना पण निवांत गप्पा करू द्याव्या,नंतर घरी मुक्काम करावा आणि सकाळी उतरल्यावर कडक कॉफी मारून घरी परतावे.अर्थात हा आदर्शवादी प्लॅन झाला.प्रत्यक्षात लोकांना त्यात मजा येत नसेल.

शनिशिंगणापूर गाव पोलिस व न्यायालयाच्या कक्षे बाहेर आहे का ?
>>>>
हद्दीतच आहे पण तिथे पोलिस आणि कायद्याची गरज लागत नाही. कारण तिथे लोकं बिनधास्त दरवाजे उघडे ठेवतात. कोणी कोणाकडे चोरी करत नाही. खरया अर्थाने तिथे लोकशाही नांदते Happy

असो,
सांगायचा मुद्दा असा, मी शिस्तीत वागलो तर जग शिस्तीत वागेल हा भाबडा आशावाद झाला.
आम्हा न पिणरया लोकांनाही वाटते की कुटुंबाबरोबर एखाद्या शांत निवांत रात्री समुद्रकिनारी फेरफटका मारून ३१ डिसेंबर साजरा करावा. पण आता बार रात्रभर उघडे असल्याने त्यातून कसा क्राऊड रस्त्यावर उतरेल हे सांगता येत नसल्याने हा प्लान ड्रॉप करावा लागणार.

..

अर्थात हा आदर्शवादी प्लॅन झाला.प्रत्यक्षात लोकांना त्यात मजा येत नसेल.
>>>>>
एक्झॅक्टली. आदर्शवादाला अनुसरून कोणी वागत नाही म्हणूनच तर कायद्याचे बंधन लागते. तुम्ही आधीच मोकाट सोडाल तर लोकं आणखी गैरफायदा उचलणार.

३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपघात, छेडखानी यात वाढ झाली आहे. तेव्हा ३१ डिसेंबरला रात्रभर मद्यालये उघडे ठेवणे योग्य वाटत नाही. >>>>> मला तर हा निर्णय योग्य वाटतोय म्हणजे रात्री आलेले सकाळपर्यंत बाहेर पडलेच नाहीत तर रात्री दुर्घटना होणारच नाहीत ना ! . ' 'आत आलेल्यांना सकाळी सातनंतर सोडण्यात येईल' छ्या ! काहीच्या काही ! पुणेकराकडून पाटी लिहून घ्यायला हवी..

मी तर म्हणतो पोलिस आणि न्यायालय ही खातीच बंद करून टाकूया. लोकांनाच सुसंस्कृत आणि सभ्यपणे राहायचे आवाहन करूया. पुर्ण देशाचा शनिशिंगणापूर करून टाकूया...>>>>>

अशी वेळ जेव्हा येईल तो सुदिन. लोक सुसंस्कृत व सभ्य झाले तर पोलीस व न्यायालयाची गरज राहणारच नाही.

पण दुर्दैव!!! तो दिवस कधीही येणार नाही. इथे मायबोलीवर एखादा नियम पाळा म्हटले की तो मोडण्यासाठी लोक धावून येतात. सभ्य किंवा असभ्य कुठल्याही भाषेत केलेली आवाहने लोकांपर्यंत पोचत नाहीत. उलट आवाहने धिक्कारायला बरे वाटते. हे करून त्यांना कसला आनंद मिळतो हे त्यांना स्वतःलाच माहीत. इथे लिहिणारे शिक्षित असणार पण ते 'सु'शिक्षित नाहीत, सुसंस्कृत नाहीत हे ते स्वतःच वारंवार सिद्ध करतात. मग बाहेरच्या जगाचे काय घेऊन बसलात. असो.

सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

ही चर्चा अशीच पुढच्या 31 पर्यंत वाहो.

मला तर हा निर्णय योग्य वाटतोय म्हणजे रात्री आलेले सकाळपर्यंत बाहेर पडलेच नाहीत तर रात्री दुर्घटना होणारच नाहीत ना ! . ' 'आत आलेल्यांना सकाळी सातनंतर सोडण्यात येईल' छ्या ! काहीच्या काही ! पुणेकराकडून पाटी लिहून घ्यायला हवी..>>>>

हेहे, मंजुताई, मस्त सिक्सर.

हा हा मंजुताई.
सकाळ पर्यंत राहण्याची सक्ती केली की मोठा प्रश्न सुटेल.

एकदा दारू पोटामार्गे डोक्यात गेली की मद्यपी कोणाची सक्ती जुमानतील असे वाटत नाही.
किंबहुना हीच मद्यपानाची खासियत आहे.
तरी एकदा असा नियम लागू करून प्रयत्न करून वघायला हरकत नाही. फक्त संभाव्य दंग्याला रोखण्यास स्पेशल फोर्स तैनात करायची काळजी घ्यावी लागेल.

अशी वेळ जेव्हा येईल तो सुदिन. लोक सुसंस्कृत व सभ्य झाले तर पोलीस व न्यायालयाची गरज राहणारच नाही.
पण दुर्दैव!!! तो दिवस कधीही येणार नाही.
>>>>>

काल आपणच हा आशावाद व्यक्त केला होता.
३१ डिसेंबरच्या रात्रीचा उच्छाद बघून मतपरीवर्तन Happy

Pages