दिवाळीला फटाके वाजवू नका…
त्याने ध्वनि आणि वायूप्रदूषण होते
होळीला पाण्याने रंगपंचमी खेळू नका...
त्याने पाण्याची नासाडी होते
दहीहंडीला वीस फूटाच्या वर हंडी लाऊ नका...
त्याने जिवाला धोका असतो
गणपतीला डीजे लाऊ नका...
शिवजयंतीला रस्त्यावर मंडप बांधू नका...
नवरात्रीला गरबा आणि स्पीकर दहाच्या आधी बंद म्हणजे बंद...
अजून काही राहिले असेल तर वाचकांनी भर टाका...
पण आज मात्र मायबाप सरकारने वर्षाच्या अखेरीस का होईना लोकांना भावनेला किंमत देत ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करायला दारूचे बार रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कारण हा सण कुठलाही धिंगाणा न घालता पर्यावरणप्रेमी अत्यंत शांततेत साजरा करतात आणि यातून समाजात सलोखा कायम राहण्यास मदतच होते.
तरी सर्व इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा पण त्या आधी हा निर्णय तुम्हाला पटला का हे मात्र *"प्रामाणिकपणे"* जरूर ईथे नमूद करा !
- ऋन्मेष
मंजुताई बेस्ट
मंजुताई बेस्ट
<<<उद्या एखाद्याने वरील सर्व
<<<उद्या एखाद्याने वरील सर्व पाळून नशा केली आणि कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आणि त्या दिगंबर अवस्थेत रस्त्याने फिरला तर तोही सुसंस्कृतपणाच ठरवायचा का? कारण त्यातही कुणालाच त्रास होत नाही.>>>
असे करा की उद्या संध्याकाळीच तुम्ही नशा न करता, एखाद्या रस्त्याने कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळून अर्धा तास भटकून या.
मग काय होते ते आपोआपच कळेल.
उगाच असले प्रश्न इथे कशाला विचारायचे? करून बघा म्हणजे आपसूक कळेल.
नाहीतर उगीच कुणि उत्तर दिले की त्याच्याशी भांडायला मोकळे!
"उदाहरणार्थ" ही संकल्पनाच पुष्कळांना समजत नाही. नशा न करता खून केला तर, असले प्रश्न विचारत बसायचे!
ऋन्मेऽऽष तुमचे दारू बद्दल मत
ऋन्मेऽऽष तुमचे दारू बद्दल मत परिवर्तन नेमके कशामुळे झाले ते वाचायला आवडेल.
दारू हे पेय वाह्यातच आहे हे
दारू हे पेय वाह्यातच आहे हे माझे मत कायम आहे.
मी लोकांना नेहमीच त्यापासून सावध करत राहतो.
काहीवेळा उपरोधाने उलटे लिहितो..
तसेच जसे मी शाहरूखचे कौतुक केले तर लोकांना शाहरूख आवडायचा बंद होतो तसे दारूचे कौतुक केले की दारू आवडायची बंद होते का हे चेक करतो.
दुर्दैवाने तसे होत नाही...
पण तरीही आज माझ्यामुळे ईथले कित्येक लोकांनी दारू अगदी सोडली नसली तरी कंट्रोलमध्ये पित असतील एवढे नक्की!
पण तरीही आज माझ्यामुळे ईथले
पण तरीही आज माझ्यामुळे ईथले कित्येक लोकांनी दारू अगदी सोडली नसली तरी कंट्रोलमध्ये पित असतील एवढे नक्की!>> येस्स!! +७८६
जसे मी शाहरूखचे कौतुक केले तर लोकांना शाहरूख आवडायचा बंद होतो तसे दारूचे कौतुक केले की दारू आवडायची बंद होते का हे चेक करतो.>> दुर्दैवाने लोकांना चांगल्या सल्ल्याची आणि त्यांच्या भल्यासाठीच केलेल्या उपदेशाची allergy असते.. तुम्ही म्हणता तसे हुमायुन नेचर.. काय करणार.. तुम्ही तरी किती समजावणार.. शेवटी ज्याचे त्याचे दैव.
पण तरीही आज माझ्यामुळे ईथले
पण तरीही आज माझ्यामुळे ईथले कित्येक लोकांनी दारू अगदी सोडली नसली तरी कंट्रोलमध्ये पित असतील एवढे नक्की!>>
तुला दारूच्या व्यसनाची नीट माहिती नाही का? प्रमाणाबाहेर पिण्याऱ्या लोकांना परत प्रमाणात पिणं शक्य होत नाही. बंद करावी लागते (ते सोपे नाही वगैरे आहेच). वर्ष दोन वर्षे बंद करून परत घेतली की एकदा किंवा फार तर दोनदा प्रमाणात पिऊ शकतील, पुढे फुल टू होतात.
शेवटी ज्याचे त्याचे दैव. शद्
शेवटी ज्याचे त्याचे दैव. शद्
>>>
खरं आहे. कभी कभी लगता है स्साला अपुन भगवान क्यो नही है. सबकी दारू छुडा देता.
किंवा शंकराने जसे विष प्राशन केले तसे जगातले सारे मद्य पिऊन टाकले असते ...
@ मानवमामा,
निदान आज जे कंट्रोलमध्ये पित आहेत ते तरी निदान येथील चर्चा वाचून आपले प्रमाण वाढवणार नाहीत.
तसेच ज्यांनी सुरू केली नाही ते सुरू करताना शंभरदा विचार करतील.
जे पुढे गेले आहेत त्यांचे प्रश्न असे चर्चा वाचून सुटणार नाहीत हे मान्य. पण त्यांच्या प्रयत्नांना सुरुवात तरी होऊ शकते. शेवटी काय तर आधी मनावर घेणे गरजेचे.
कदाचित हा माझा भाबडा आशावादही असेल,
पण् सोशलसाईटवर नेहमी दारूची भलामण करणारेच पोस्ट आणि विनोद फिरत असतात. कोणीही प्रत्यक्षपणे दारूला नाव ठेवत नाही. गंमत म्हणजे प्रत्येकाला ठाऊक असते की दारू ही वाईटच. तरीही एकमेकांना नव्हे स्वत:लाच फसवत लोकं दारूवरचे विनोद लेख कविता फिरवत असतात. कोणीतरी कुठेतरी आरसा दाखवणे गरजेचे आहे . मी ते काम करत राहतो. खारीचा वाटा का असेना, मला तो उचलायला आवडतो.
Pages