पुण्यातल्या सायकॉलॉजिस्ट चे अनुभव/ रेफरन्स

Submitted by नानबा on 26 December, 2018 - 06:58

एका साध्या पण दीर्घकालीन आणि चालण्या वर परिणाम करणार्‍या आजारा ने त्रस्त झालेल्या, डिप्रेस हो ऊ शकेल अशी लक्षणे दाखवत असलेल्या व्यक्तीकरता सायकॉलॉजिस्ट हवा आहे.
ही व्यक्ती अ‍ॅन्क्झायटी चीही सगळी लक्षणे दाखवत आहे. कॉन्फिडन्स खूप ढासळला आहे.
गेल्या काही वर्षात एकटी घराबाहेर पडायला तयार नसते, एकटी घरात रहायलाही फारशी खूष नसते.
ह्या केस मधे सायकॉलॉजिस्ट ची मदत होईल का सायकॅट्रिस्ट ची?
त्यांची ऑल्रेडी खूप औषधे चाललेली असल्याने अजून औषधे नकोत असे वाटते.

पुण्यात कोणी असल्यास प्लीज सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानबा मी मदत तर नाही करू शकणार, पण एक सल्ला देतो.
मी अशाच केसेस बघितल्या आहेत, सायकॉलॉजिस्ट गोळ्या देतात, त्याने प्रचंड झोप येते व विचारशक्ती मंदावते. वजन वाढतं.
अजून एक, शक्यतोवर अशा व्यक्तींना एकटं राहू देऊ नका. सुसायडल टेंडणसी वाढते.

त्यांची ऑल्रेडी खूप औषधे चाललेली असल्याने अजून औषधे नकोत असे वाटते.>> मी सायकिअ‍ॅट्रीस्टची औषधे चालू आहेत असे समजतो. तसे असेल तर -- ती औषधे चालू ठेवलेली असतील तर दुसर्‍या चांगल्या तज्ञाने संमती दिल्याशिवाय बंद करू नयेत. गंभीर परिणाम होऊ शकतात.
-- त्याने प्रचंड झोप येते व विचारशक्ती मंदावते. वजन वाढतं. >>>> या साइड इफेक्टला उपाय नाही.
औषधाशिवाय उपचार घेणं (कन्सलटिंग) च्या स्वरूपात कधीही चांगलं!>> अत्यंत धोकादायक.

अशा पेशंटला वेळच्यावेळी औषधे देण्याबरोबरच बरोबरच घरच्यांनी काळजीपूर्वक आयुष्यभर संभाळणे हाच एकमेव पर्याय सध्यातरी आहे. काळानुरूप औषधे कमी जास्त होउ शकतात किंवा सुधारीत बद्लूशकतात.

माझा एक वर्गमित्र आहे सायकियाट्रिस्ट. शि.न. एस टी स्टॅण्ड समोर त्याचे ओपीडी आहे.. हवे असल्यास संपर्क डिटेल्स देईन. तो विश्वासार्ह्य आहे.. अनावश्यक औषधांचा मारा नक्कीच करणार नाही!

नानबा,
आजारावर जे डॉक्टर उपचार करत आहेत त्यांच्याशी बोलून त्यांच्या मदतीने सायकॉलॉजिस्ट शोधल्यास फायदा होईल. सुरु असलेल्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणूनही औदासिन्य, अँक्झायटी हे उद्भवते. गरज पडल्यास सायकीअ‍ॅक्ट्रीसची देखील मदत घ्या पण रुग्णासाठी मूळ आजार आणि त्यातुन्न उद्भवलेली ही समस्या याचे निराकारण करायला मुख्य आजाराचा डॉक आणि जोडीला मानसिक आरोग्य सांभाळायला सायकॉलॉजिस्ट, सायकिअ‍ॅक्ट्रीस अशी एक टीम म्हणून उपाययोजना केल्यास चांगला फायदा होईल. तुम्ही चालण्यावर परीणाम करणारा आजार असे म्हटलेय तर फिजीओथेरपिस्ट देखील या आजारासह जगण्यासाठी मदत करेल.

सायकॉलॉजिस्ट समुपदेशन करतात आणि अगदीच गरज वाटली तर औषधं सुचवतात.
डेक्कनच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सायकॉलॉजिस्ट on call उपलब्ध असतात.
सह्याद्री हॉस्पिटलच्या वेबसाईटवर नंबर मिळेल.
समुपदेशन पण पुरेसं वाटत नसेल तर सायकॉलॉजिस्ट स्वतःच psychiatristला consult करतात.

सायकॉलॉजीस्ट औषधे देत नाहीत / देऊ शकत नाहीत.

तुम्ही लिहीलंय त्यावरून सायकियाट्रीस्टला दाखवलेले बरे असे वाटतंय. आला पेशंट की धरा आणि द्या त्याला अँटीसायकोटिक गोळ्या असे ते करत नाहीत. गरज असेल तर योग्य ते औषध देतील किंवा थेरपी करीता सायकॉलॉजिस्टला रेफर करतील.

माझा अनुभव वेगळा आहे. सायकिअ‍ॅट्रीस्ट मोस्टली औषधांवर भर देतात. अशी औषधे बर्‍याचदा लाँग टर्म घेतल्या शिवाय योग्य तो फरक दिसत नाही त्यामुळे कस्टमाईज्ड औषधे देण्याची रिस्क बरेचसे सायकिअ‍ॅट्रिस्ट्स घेत नाहित. कारण त्याला प्रचंड अनुभव लागतो.

नानबा माझा ईमेल मिळाला का ?

Thank u all.
DakshIna, mail milali ga. Spam madhe jaun basalelee.

Swati tai cha salla pan awadala. Will ask her doctor.

Sadhya psychiatrist chi treatment nahi.
Depression madhe nahit ajun. Chidchidepana vadhalela, patkan hatash ani nirash hone gelya 1-2 athavadyat vadhalyane gharachyanni alarming sign mhanun ghetale.
Baki jeevanecha kami zali ahe ase vatat nahi, which is a good sign.
Ajibat chalu shakat nahit ase sadhya nahi, pan pains mule restrictions ahet.
Nantar laptop varun marathit yete.

Dr. Madhavi gadkari: therapist
dr sanjay phadke: psychiatrist
dr raman khosla: therapist + psychiatrist
all three experienced reliable. don't prescribe unnecessary medicines. give more emphasis on therapy sessions.

बायोमेडिकल ला प्राधान्य व सायकोथेरपीला प्राधान्य असे दोन पंथ सायकियाट्रि मधे दिसतात. जो तो आपापल्या जागी बरोबर आहे.

Mridula apte mhanun ahet psychologist. Mala changala anubhav ahe... refer kelelya lokanahi changala anubhav ahe.

कर्वे नगर ला IPH (ठाणे, दर आनंद नाडकर्णी) ची शाखा उघडली आहे , समुपदेशक, डॉक्टर, सगळी मदत एकाच ठिकाणी मिळू शकते

मानसोपचारतज्ज्ञ निवडणे हे खरेदीला जाण्यासारखे असते. एकाला आलेला चांगला अनुभव दुसऱ्याला येईलच असे नाही. त्यामुळे हताश न होता आपल्याला आवडेल असाच मानसोपचारतज्ज्ञ निवडावा. उपचार महत्त्वाचे असतात.

१. रमण खोसला हा एक अत्यंत हुशार व एथिकल मुलगा आहे.

२. चिनुक्स +१

३. सायकॉलॉजीस्ट औषधे देत नाहीत / देऊ शकत नाहीत. << +१

स्वानुभवावरून एक सांगू का .. सर्वात आधी तुम्ही तुमच्या फॅमिली DR ना भेटून त्यांच्या routine tests करून घ्या.
हे सगळे issues त्यांच्या बरोबर सविस्तर discuss करून पुढची लाईन ऑफ action ठरावा . e.g. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ला भेटणे / सायकियाट्रीस ला भेटणे etc . काही physicians सुद्धा बेसिक टेस्ट करून बघतात कि नक्की हे कशाशी निगडित आहे.. मानसिक आहे / मेंदूशी काही निगडित आहे / फिसिकल काही त्रास आहे इ .

व्यक्ती अ‍ॅन्क्झायटी चीही सगळी लक्षणे दाखवत आहे. कॉन्फिडन्स खूप ढासळला आहे.
गेल्या काही वर्षात एकटी घराबाहेर पडायला तयार नसते, एकटी घरात रहायलाही फारशी खूष नसते. ~~~~~~~~
त्यांच्या स्वभावात गेल्या काही महिन्यांत जास्त / जाणवण्याइतका फरक झाला असेल तर आणि anxiety ची लक्षणे जाणवतं असतील जवळच्या, घरातल्या लोकांना तर विलंब न करता DR ना भेटा . अती औषधांचा मुद्दा मग गौण आहे
आणि इथे उपचारांची / consultation ची जास्त गरज आहे

अशा पेशंटला वेळच्यावेळी औषधे देण्याबरोबरच बरोबरच घरच्यांनी काळजीपूर्वक आयुष्यभर संभाळणे हाच एकमेव पर्याय सध्यातरी आहे. ~~~~~~~~ हे १००% खरे आहे. उपचार घेऊन /घेताना आणि नंतर सुद्धा आधाराची आणि प्रेमाची गरज , समजून घेऊन , ना चिडचिड करता सांभाळायची गरज सर्वात जास्त आहे आता इथून पुढे .

DR संदीप पारखी हे एक ऐकून आहेत. Practo वर डिटेल्स मिळू शकतील .
DR उर्जिता कुलकर्णी (होमिओपॅथी) या सुध्दा consult करू शकतात या विषयी . यांचे consultion चे अनुभव चांगले आहेत, याना मी personally ओळखते ..

ज्याचा भर औषधांपेक्षा समुपदेशनावर आहे असा मानसोपचार तज्ञ मिळाला तर जास्त चांगले असे माझे मत आहे. कारण औषधे फक्त हातघाईच्या परिस्थितीतून बाहेर काढतात. तो कायमचा उपाय नसतो असे मला वाटते. काहीजण औषधे देऊन वाटेला लावतात. तर काही जुजबी चर्चा करतात. काहीजण मात्र समुपदेशनावर भर देतात. औषध पुढे कमीही करतात. कारण अनेकदा खोल मनात जी गोष्ट कुरतडत असते किंवा एखादा स्वभावदोष मनोरोगाला कारणीभूत असतो त्याला हात घालणे महत्वाचे असते. जे चर्चा करूनच शक्य होते.
अशावेळी घरच्यांची भूमिका महत्वाची असते. रुग्णाबरोबर त्यांनीही समुपदेशन करून घ्यावे. कारण कुठलाही मनोरोग हा आतून माणसाला उध्वस्त करत असतो. त्याचे लगेचच बाहेर परिणाम दिसतीलच असे सांगता येत नाही. त्यामुळे "हा नाटक करतोय" अशी अनेकांची समजूत होते. औदासिन्यात तर सुई टोचली तरी सुरी भोसकल्याच्या वेदना होत असतात. त्यामुळे अशा माणसांना कसे हाताळावे यासाठी घरच्यांनी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते.
त्याचबरोबर सदर व्यक्तीला कुठली गोष्ट त्रास देत आहे हे कळल्यास बरे होण्यास मदत होऊ शकेल.

nimhans alumni reliable / ethical/ less emphasis on medicines and more on therapy असते हे माझे निरिक्षणा आहे.

औदासिन्यात तर सुई टोचली तरी सुरी भोसकल्याच्या वेदना होत असतात. त्यामुळे अशा माणसांना कसे हाताळावे यासाठी घरच्यांनी नीट माहिती करून घेणे आवश्यक असते. >> बरोबर लिहिलेत. त्या व्य क्तीकरता ते दु:ख/दुखणे खरेच असते!

सगळ्यांना खूप थँक्यु! पुढच्या स्टेप्स घेतल्या की कळवेनच.

ज्याचा भर औषधांपेक्षा समुपदेशनावर आहे असा मानसोपचार तज्ञ मिळाला तर जास्त चांगले असे माझे मत आहे. कारण औषधे फक्त हातघाईच्या परिस्थितीतून बाहेर काढतात. तो कायमचा उपाय नसतो असे मला वाटते. काहीजण औषधे देऊन वाटेला लावतात. तर काही जुजबी चर्चा करतात. काहीजण मात्र समुपदेशनावर भर देतात. औषध पुढे कमीही करतात. कारण अनेकदा खोल मनात जी गोष्ट कुरतडत असते किंवा एखादा स्वभावदोष मनोरोगाला कारणीभूत असतो त्याला हात घालणे महत्वाचे असते. जे चर्चा करूनच शक्य होते >> ह्म्म.. बँग ऑन

Wanted to update all and thank all who responded here.
Somehow this person bounced back on own.
Anxiety ahech. Pan no depression. Vavaranyat swabhavat far farak ahe.
Thank u for all who have responded and helped! Happy

नानबा, पेशंटच्या हिस्टरीबद्दल काही सांगू शकाल का ? म्हणजे त्यांच्या आयुष्यात काही गंभीर समस्या आली होती का, काही नात्यामध्ये तणाव होता का?
बाकीच्याना त्यांच्या आजाराची लक्षणे कधीपासून जाणवली ?

ही माहिती उपाय सुचवण्यासाठी नसून फक्त माहितीसाठी आहे. माझ्याही माहितीत काही मित्रमंडळी अशा समस्यांना तोंड देत आहेत, पण दरवेळी त्यांच्या जवळच्यांना अशा आजारांची चाहूल लागेलच असं नाही. कधीकधी आतल्याआत कुढत राहिल्यामुळे आजार हाताबाहेर जातो, आणि माणूस कोलमडून पडतो तो कायमचाच .

यावर तुम्ही एक लेख लिहिलात, तर इथल्या मंडळींना आजार समजून घ्यायला मदतच होईल.

सायकीॲट्रिस्ट जी औषधे देतात ती प्रामुख्याने झोपेसाठीची असतात. ,SSRI,SNRI,benzo असे प्रकार असतात. एकदा घ्यायला सुरवात केली की वजन वाढणे व विचारशक्ती मंदावणे हे होते. मेटाबॉलिक सिंड्रोमही होऊ शक्तो. त्यामुळे समुपदेशन + लो डोस antipsychotic असं असेल तर फायदा होईल. गोळ्या घ्यायला हरकत नाही पण पावर कमी ठेवा असे डॉक्टरांना सूचवा (काऊंसलरकरवी)

सायकीयाट्रीस्ट जी औषधे देतात ती सरसकट झोपेची औषधे म्हणून निकालात काढू नयेत. निदान फार्मकोलजीचा अभ्यास नसणर्‍यांनीतरी या बाबतीत संयम बाळगावा आणि डोक्टरांना आपले काम करु द्यावे. कीत्येकदा न्युरोट्रन्समिटर्सचा इम्बेलन्स (ब्रेनमधला केमिकल लोचा!!) झाल्यामुळे देखील मनोविकारांची लक्षणे उद्भवतात. अश्या वेळी हा बेलेन्स आधी सुधारून मग कन्सल्टशन वगैरे साठी जाता येते.
माझ्या आईला दोन वर्षांपुर्वी असे झाले होते. ज्या शेजार्‍यांशी आधी चांगले संबंध होते, ते अचानक माझ्यावर लक्ष ठेवतात, मला त्रास देतात असे ती म्हणू लागली. त्या लोकांचा शेतीसाठी लागणार्‍या पेस्टीसाईड्स चा व्यवसाय आहे. ते लोक आमच्या विहीरीत केमिकल्स टाकतात असं तिला वाटायला लागलं. ते माझ्या दिशेने केमिकल्स फवारतात असंही म्हणायला लागली. तिला सतत केमिकल्सचा वास यायचा. घरी कोणिही आलं तरी ती हेच विचारायची की बघा वास येतोय् न? तिनी घराच्या सगळ्या खिडक्या आधी पेपेर्स चिकटवून आणि त्यावर दोन जाड पडदे लावून कडेकोट बंद करून टाकल्या. तरीही ते लोक नजर ठेवतायेत असंच वाटायचं तिला.
कोणालाही काहीही न सांगता एक दिवशी तिनी अचानक वुमन्स सेलमधे शेजार्‍यांच्या लहान २८ वर्षाम्च्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली.
त्यानंतर त्या शेजर्‍यांचा आम्हांला फोन आला आणि हे सगळं कळलं.
आम्ही मग एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी सगळ्यात आधी जागेत बदल करायला सांगीतलं. १-२ औषधे दिली. अक्षरशः दोन दिवसांत तिचा वास येणे हा प्रकार बंद झाला. आणि थोडं मोकळं राहू लागली.
Olfactory paranoia असं तिचं निदान झालं. अतिशय सिंपल औषधांनी तिच्यात अगदी आश्च्र्यकारक फरक पडला. तिला पुढे फक्त १ महीनाभर औषधे सांगितली होती.

Cognitive behavior therapy आणि mindfulness या दोन थेरपी सध्या खूप पॉप्युलर आहेत. त्याचाही उपयोग होईल.

Pages