व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग 1

Submitted by समई on 26 December, 2018 - 02:27

सगळ्यांच्या बकेटलिस्ट(आजकाल हा शब्द जास्तच लोकप्रिय झाला आहे)मधली बरीचशी ठिकाणे आमची पण बघून झाली असल्यामुळे आता परदेश प्रवास नको ग बाई(६५ प्लस चा परिणाम असावा)ह्या निष्कर्षाप्रत मी आले होते.नको तो१७,१८ तासांचा प्रवास, एअरपोर्ट वर ७,८ तास ताटकळत बसणे, जाणारी,येणारी विमाने न्याहाळणे, आपल्या पर्सला किंमती झेपणार नाही हे माहीत असून ड्युटी फ्री दुकानातून उगीचच फेरफटका मारणे इत्यादी गोष्टींचा आता कंटाळा यायला लागला.बरे, परदेशात विमाने संध्याकाळी ७,८पर्यंत पोचतात किंवा निघतात. पण इथून निघणारी,किंवा येणारी विमाने मध्यरात्री नन्तर जातात किंवा येतात.त्यामुळे इतर देशांनी भारताविरुद्ध केलेला हा कट आहे अशी माझी खात्री आहे.(हे माझे वैयक्तिक मत आहे,सिरियसली घेऊ नये).तर तात्पर्य हे की आता भारताबाहेर प्रवास करायचा नाही असे मी मनाशी (माझ्याच हो)ठरवले होते.पण माझे इतर ठराव जसे कोलमडतात तसे ह्या बाबतीतही झाले.जुलै मध्ये दिराचा श्रीकरचा फोन आला की व्हिएतनाम, कंबोडियाची ट्रिप ठरवत आहे,येणार का?माझा एक दीर मनीष(१८ मामे,मावस दिरांपैकी सगळ्यात धाकटा,म्हणून सगळ्यांचा लाडका)व्हिएतनाम मध्ये २७,२८ वर्षांपासून रहात आहे.तो त्याच्या मिस व्हिएतनाम झालेल्या अतिशय गोड आणि लाघवी बायको जिचे नाव हुआ(Hua)आहे व तितकीच गोड मुले (२मुली वएक मुलगा) ह्यांना घेऊन दर चार वर्षांनी होणाऱ्या फॅमिली get together ला न चुकता येतो.ते सर्व कायम इथेच रहात असल्यासारखे सगळ्यांत मिसळतात, बोलतात.आमच्यातलेच होतात.त्यामुळे त्यांच्या देशात त्यांना भेटण्याची संधी येत असताना नाही म्हणण्याचे कारणच नव्हते.आम्ही लगेच होकार कळवला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरवात आहे, पुढचे भाग पटापट टाका, शक्य असल्यास फोटो पण द्या.

भाग एकदा टाकला तरी तो आठवडाभर संपादित करता येतो. नंतर मात्र काही बदल करता येत नाही. तुम्ही आजच भाग टाकलाय त्यामुळे संपादित करता येणार.