पुन्हा एकदा सैराट

Submitted by DJ. on 20 December, 2018 - 03:23

आज सकाळी-सकाळीच बातमी वाचली. बीड मधे सैराट स्टाईलने मेहुण्याची हत्त्या!

बातमी खोलात जाऊन वाचली. वाघमारे कुतुंबातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सुमीतची घरची परिस्थिती अत्यंत डबघाईची होती. हा सुमीत रा.काँ. चा कार्यकर्ता होता असाही उल्लेख बातमी मधे होता. खून का झाला हे सविस्तर वाचले तेव्हा कळाले की सुमीतने बीड मधील गर्भश्रीमंत असलेल्या लांडगे घराण्यातील मुलीशी विवाह केला आणि हा विवाह मान्य नसल्याने मुलीचा भाऊ बालाजी याने निर्घ्रूण खून केला.

आता लांडगे-वाघमारे वरुन शाब्दिक चकमकी होतीलच पण त्याआधी माझ्या मनात खालील प्रश्न आले :

१. आपल्या घरची परिस्थिती वाईट असताना, २ वेळचे खायचे वांधे असताना आपली प्राथमिकता शिक्षण पुर्ण करण्यास आणि लवकरात लवकर नोकरी-धंद्याला लागुन आपल्या कमाईचा हातभार घरचे दारिद्र्य मिटविण्यास लागावा असे सुमीत वाघमारे यास का वाटले नाही?
२. कॉलेज मधे शिक्षण घेत असताना, घरची कसलीही राजकीय पार्श्वभुमी नसताना कर्यकर्ता होऊन आयुष्याचा वेळ वाया जाईल अशी शंका सुमीतच्या मनात का आली नाही?
३. आपण अजुन आपल्या पायावर उभे नसताना लग्न करणे चुकिचे ठरेल असा विचार सुमीतच्या मनाला का शिवला नाही?
४. आपल्या घरात २ वेळचे खायचे वांधे असताना गर्भश्रीमंत घरातील मुलगी लग्न करुन आपल्या घरी आल्यावर तिची आबाळ होईल याची पुर्वकल्पना सुमीतला आली नाही का?
५. आपला सामाजीक-आर्थिक स्तर आणि लग्न केलेल्या मुलीचा सामाजीक-आर्थिक स्तर वेगळा आहे याचा विचार सुमीतने केला नसेल का?
६. जर ती मुलगी स्वतःहुन त्याला बळजबरीने लग्न कर म्हणुन ब्लॅकमेल करत असेल तर त्याने पोलिसांची मदत का घेतली नाही?
७. या प्रकरणात फक्त सुमीत आणि त्याची बायको हेच २ कंगोरे नसुन आपल्या मुलांनी, भावाने, बहिणीने योग्य जोडिदाराशी लग्न करावे अशी माफक अपेक्षा कुटुंबीय म्हणुन करुच नये का?
८. शिक्षण झाले म्हणुन आपणाला स्वतंत्र विचार करण्याचा हक्क आहे पण तो अविचारही ठरु शकतो याचे भान प्रत्येक मुला-मुलीने ठेवणे गरजेचे नाही का?
९. एक मुलगा/मुलगी/बहीण म्हणुन आपल्याही काही जबाबदार्‍या आहेत हे आपण विसरत चाललो आहोत का?
१०. आपल्याला जशी वैयक्तिक/कौटुंबीक मते/हक्क आहेत तसेच जबाबदार्‍याही आहेत याचे भान असु नये का?
११. आपल्या कुटुंबियांना झेपेल/पचेल अशा कुटुंबातील्/समाजातील स्थळात लग्न करुन सुखी-समाधानाने संसार करावा असे दोघांनाही वाटले नसेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

DJ, आमच्याच ऑफिस मध्ये घरच्यांचा विरोध असून, मुलीने पळून येऊन मुलाशी लग्न केल्याचे आणि ते यशस्वी होण्याचे उदाहरण आहे.
मुलगी सज्ञान आहे तेव्हा फूस लावून पळवले ही तक्रार चालणार नाही हे ध्यानी ठेवून , तिच्या घरच्यांनी तिने मामाच्या घरातील दागिने चोरून पळाली अशी पोलीस कम्प्लेन्ट केली होती. तर मुलाने प्लॅन करून आमच्या लग्नाला विरोध आहे आणि खोट्या तक्रारी येऊ शकतात अशी लोकल पोलीस स्टेशन मध्ये लेखी माहिती दिली होती. हे सगळे वकिलांमार्फत केले होते.
लग्न झाले. दीड वर्षांपर्यंत मुलीकडचे रुसून होते.
नंतर त्यांचे मत परिवर्तन झाले, आणि अजून एक रिसेप्शन देण्यात आले मिलापाचे.

ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. अगदी फिल्मी वाटावी अशी.

या पूर्वीही अशा प्रकारच्या घटना पाहिल्या आहेत, जरी एवढ्या फिल्मी नव्हत्या.

माहितीतील दोन अशी जोडपी आहेत की मुला अथवा मुली कडून संबंध कित्येक वर्षे झाली तरी अजून तोडून आहेत. जोडप्याचे व्यवस्थित सुरू आहे.

@ मानव पृथ्वीकर : तुम्ही अगदी योग्य उदाहरणे दिलीत. अशी ऑफिसमधील उदाहरणे माझ्याही पहाण्यात आली पण ते दोघे शिक्षण योग्य तर्‍हेने संपवुन, चांगल्या ठिकाणी जॉब करुन बक्कळ पैसे कमावते होते पण मी बीड च्या केस बद्दल लिहिले आहे आणि त्यासंदर्भातील उदाहरणांवरच सांगितले आहे. अर्धवट शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभे नसणे यामुळे फरफटत जाणार्‍यांबद्दल विचार मनात आल्यानेच लिहिले आहे.

तुम्ही सांगितलेला जापनीज/ब्रिटिश्/पंजाबी समाज माझ्या आजुबाजुला नव्हता.. बीड मधेही नसेल. >> अरे हो.. ही बीड मधली केस आहे का... विसरलोच होतो.. मग तुमचे बरोबर आहे.
हे बीड हरियाणात का कुठेशी आहे ना?

बीडला असाल तर बीड ... आपलं भीडमुरवत ठेवा. प्रेम करू नका असा काही सल्ला द्यायचा आहे का? पण सैराट तर सोलापूरला शूट केलेला ना? ते बरंच लांब आहे ना? नकाशा शोधणं आलं.

बीडमध्ये , शिक्षण पूर्ण न झालेल्या व स्वतःच्या पायावर उभ्या नसणाऱ्या मुलांची लग्न आईवडील स्वतःहून करून देतच नसतील.
Why cant these people leave the couple alone?
त्यांच्या नावाने अंघोळ करून मोकळे व्हा.
त्यांंचा खून करायची गरज का यावी?
मुलीने पळून जाऊन लग्न केलं, म्हणजे संस्कार चुकले, असं वरच्या एका प्रतिसादात आलं.
मुलगा खुनी निघाला ते संस्कार योग्यच असणार.

बीडची घटना किंवा मध्ये हैदराबाद ला प्रेग्नन्ट बायकोच्या नवऱ्याला मागच्या मागे मारण्यात आलं ते वाचून खूप निराश व्हायला होतं.मुलीने लग्न केलं, आपल्याला पाहिजे त्या वर्गात नाही केलं, जावयाला थोडी मेहनत जरून त्याचं कर्तृत्व उंचावता येईल असा चान्स देता आला तर द्यावा, नाही देता आला तर जितका थोडा काळ भेट होणार आहे तितका काळ प्रेमाने वागावं, आणि इतकं करून जावई नालायक/छळवादी निघालाच तर मुलीला घेऊन यावं हे नाही.सगळ्यांची आयुष्य वाया.खून झालेला मेला, करणारा तुरुंगात.त्यांचे आई वडील जन्मभर दुःखात.
आपल्या इथे इंटरकास्ट वर खूप ओव्हर रिऍक्ट करतात.तसंही लग्नाचं जेवण जेवलं, पहिल्या वर्षीचे सण वार झाले की कोणाला काही पडलेलं नसतं कोणती जात आणि कसे राहतात याचं.

भरत, अगदी!

संस्कार आणि आपली मते/परंपरा लादणे यातील फरक कळायला हवा.

मुलगा खुनी निघाला ते संस्कार योग्यच असणार. >> अहो पुरूष असतातच हिंस्त्र.. त्यात काय मोठे... लायसेंसच असते त्यांच्याकडे... त्यानेच तर पौरुषत्व सिद्ध होते.
बहिणीने भावाच्या आंतर्जातीय लग्नाला विरोध म्हणून भावाच्या बायकोचा खून केला असे तुम्ही कधी ऐकले का?
आजवर एवढी युद्धे, एवढे हिंसक राजे, क्रुरकर्मा हुकूमशहा होऊन गेले .. ह्यात स्त्रियांची ऊदाहरणे दुर्मिळाती दुर्मिळ आहेत.
थोडक्यात जसा आब्रू हा स्त्रीचा तसा हिंसा हा पुरुषाचा दागिना...हेच संस्कार आहेत आपले.
हिंसा परमो धर्मः

आपल्या शाहरूख चे ऊदाहरण घ्या.... हिंदू (ते सुद्धा पंजाबी) ऊच्च मध्यमर्गीय आणि निम्नमध्यम वर्गीय आणि ते सुद्धा मुस्लिम .... किती त्रास झाला असेल त्या जोडप्याला.... पण प्रेमावर विस्वास असला की सगळे स्वप्नवत खरे होते.
>>>>>>

खरं आहे हायझेनबर्ग! प्रेमात अफाट ताकद असते !
दुर्दैवाने या लग्नालाही लव जिहादचे टॅग लावणारे पाहिले आहेत.

बीडची घटना किंवा मध्ये हैदराबाद ला प्रेग्नन्ट बायकोच्या नवऱ्याला मागच्या मागे मारण्यात आलं ते वाचून खूप निराश व्हायला होतं.मुलीने लग्न केलं, आपल्याला पाहिजे त्या वर्गात नाही केलं, जावयाला थोडी मेहनत जरून त्याचं कर्तृत्व उंचावता येईल असा चान्स देता आला तर द्यावा, नाही देता आला तर जितका थोडा काळ भेट होणार आहे तितका काळ प्रेमाने वागावं, आणि इतकं करून जावई नालायक/छळवादी निघालाच तर मुलीला घेऊन यावं हे नाही.सगळ्यांची आयुष्य वाया.खून झालेला मेला, करणारा तुरुंगात.त्यांचे आई वडील जन्मभर दुःखात. >>> +१

सर्वच प्रकार धक्कादायक आहे.

जर कायद्याने ते दोघे सज्ञान असतील आणि प्रेम-विवाह केला असेल तर प्रश्न का यावा? जगाच्या दृष्टीने त्यांच्या दोन घरात काही मोठी तफावत (आर्थिक किंवा अजुन काही) असेल पण त्या दोघांना तर ते एकमेकांना सुयोग्य आणि एकमेकासाठी बनंलेले आहेत असे वाटत होते. जगाचा विरोध पत्करुन त्यांनी लग्न केले होते.

कायद्याने सज्ञान मुलीने कुणाशी लग्न करायला हवे किंवा नाही करायला हवे हे ठरवण्याचा अधिकार फक्त तिला आणि तिलाच आहे. आई-वडील-भाऊ-काका-मामा यांना जरुर सांगा, विचार घ्या पण अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केवळ मुलीचा असावा. तुमची मुलगी आहे, तिने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा द्यावा.

बहिणीवर निखळ, निरपेक्ष प्रेम असते तर तिच्या पाठीशी खंबिरपणे उभे रहायला हवे होते. तिचा निर्णय चुकीचा होता/ आहे हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही.

खुन्यांना पकडुन शासन व्हावे अशी अपेक्षा.

Pages