पुन्हा एकदा सैराट

Submitted by DJ. on 20 December, 2018 - 03:23

आज सकाळी-सकाळीच बातमी वाचली. बीड मधे सैराट स्टाईलने मेहुण्याची हत्त्या!

बातमी खोलात जाऊन वाचली. वाघमारे कुतुंबातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सुमीतची घरची परिस्थिती अत्यंत डबघाईची होती. हा सुमीत रा.काँ. चा कार्यकर्ता होता असाही उल्लेख बातमी मधे होता. खून का झाला हे सविस्तर वाचले तेव्हा कळाले की सुमीतने बीड मधील गर्भश्रीमंत असलेल्या लांडगे घराण्यातील मुलीशी विवाह केला आणि हा विवाह मान्य नसल्याने मुलीचा भाऊ बालाजी याने निर्घ्रूण खून केला.

आता लांडगे-वाघमारे वरुन शाब्दिक चकमकी होतीलच पण त्याआधी माझ्या मनात खालील प्रश्न आले :

१. आपल्या घरची परिस्थिती वाईट असताना, २ वेळचे खायचे वांधे असताना आपली प्राथमिकता शिक्षण पुर्ण करण्यास आणि लवकरात लवकर नोकरी-धंद्याला लागुन आपल्या कमाईचा हातभार घरचे दारिद्र्य मिटविण्यास लागावा असे सुमीत वाघमारे यास का वाटले नाही?
२. कॉलेज मधे शिक्षण घेत असताना, घरची कसलीही राजकीय पार्श्वभुमी नसताना कर्यकर्ता होऊन आयुष्याचा वेळ वाया जाईल अशी शंका सुमीतच्या मनात का आली नाही?
३. आपण अजुन आपल्या पायावर उभे नसताना लग्न करणे चुकिचे ठरेल असा विचार सुमीतच्या मनाला का शिवला नाही?
४. आपल्या घरात २ वेळचे खायचे वांधे असताना गर्भश्रीमंत घरातील मुलगी लग्न करुन आपल्या घरी आल्यावर तिची आबाळ होईल याची पुर्वकल्पना सुमीतला आली नाही का?
५. आपला सामाजीक-आर्थिक स्तर आणि लग्न केलेल्या मुलीचा सामाजीक-आर्थिक स्तर वेगळा आहे याचा विचार सुमीतने केला नसेल का?
६. जर ती मुलगी स्वतःहुन त्याला बळजबरीने लग्न कर म्हणुन ब्लॅकमेल करत असेल तर त्याने पोलिसांची मदत का घेतली नाही?
७. या प्रकरणात फक्त सुमीत आणि त्याची बायको हेच २ कंगोरे नसुन आपल्या मुलांनी, भावाने, बहिणीने योग्य जोडिदाराशी लग्न करावे अशी माफक अपेक्षा कुटुंबीय म्हणुन करुच नये का?
८. शिक्षण झाले म्हणुन आपणाला स्वतंत्र विचार करण्याचा हक्क आहे पण तो अविचारही ठरु शकतो याचे भान प्रत्येक मुला-मुलीने ठेवणे गरजेचे नाही का?
९. एक मुलगा/मुलगी/बहीण म्हणुन आपल्याही काही जबाबदार्‍या आहेत हे आपण विसरत चाललो आहोत का?
१०. आपल्याला जशी वैयक्तिक/कौटुंबीक मते/हक्क आहेत तसेच जबाबदार्‍याही आहेत याचे भान असु नये का?
११. आपल्या कुटुंबियांना झेपेल/पचेल अशा कुटुंबातील्/समाजातील स्थळात लग्न करुन सुखी-समाधानाने संसार करावा असे दोघांनाही वाटले नसेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिरुध्द..
प्रश्न परत वाचा आणि उत्तर द्या..
असं तुमच्या घरातल्या मुलीने केल्यावर काय करता? चटके देता? मुस्काड फोडता?

>>काय कराल असे हवे ना..<< कदाचित स्वानुभव असेल त्यामुळे त्यांनी थेट्च विचारलं असावं..!

मुलांना लहानपणापासूनच मारू नये. फक्त दम द्यावा. मारले की मुले कोडगी होतात. आणि माराचा धाक नाहीसा होतो. धाक पुन्हा बसावा म्हणून तुम्ही आणखी मारता. आणि ती आणखी कोडगी बनतात. हे एक दुष्टचक्र आहे. तुम्ही माराचे प्रमाण वाढवत नेता आणि पोरं आणखी कोडगी कोडगी बनत जातात. अखेरीस एक वेळ अशी येते की त्यांनी मोठी चूक केल्यास तुम्हाला त्यांचा मर्डर करण्यावाचून पर्याय राहत नाही Sad

आमच्या मुलींनी, स्वतःच्या मर्जीने त्यांचे जोडीदार निवडले होते आणि आम्ही थाटात लग्न लावून दिली होती.
काय कराल असे हवे ना?<<<
ते विरोध करणार हे सांगितलंच आहे, विरोध कसा करणार? हे विचारलं
अभिमानाला ठेच वगैरे लागल्यावर मूग गिळून कसे काय गप्प बसू शकतात?
म्हणून चटके देता? मुस्काड फोडता?
साधा प्रश्न आहे, उत्तर द्यायचं का टाळताय?

@ कल्पना१ : ज्याच्या घरात साप शिरला होता त्याला तो कसा मारला हा प्रश्न विचारणे योग्य ठरेल.. उगीच एखाद्या हायराईज बिल्डिंगच्या टॉप फ्लोरवर रहाणार्‍याला त्याच्या घरात साप शिरला तर काय करशील म्हणुन विचाराल तर तो बिचारा काय उत्तर देणार..? सापांची भिती नकोच यास्तव त्या बिचार्‍याने हायराईज बिल्डिंगच्या टॉप फ्लोरवर फ्लॅट घेतला असेल ना...?

धन्य. खालच्या सामाजिक आणि आर्थिक वर्गातला मुलगा म्हणजे साप. आपल्या घरात शिरला तर ठेचलाच पाहिजे.
तो आपल्या घरात शिरू नये म्हणून हायराइझमध्ये टॉप फ्लोअरला flat घ्यायचा असतो.
अशा घरात जन्माला येणाऱ्या आणि लग्न करून येणाऱ्या मुलींबद्दल करुणा दाटून येते.

डीजे
तुम्ही दुखावलेला दिसताय. माझे अशा विषयांवरचे प्रतिसाद टोकदार असतात ज्याला माझा नाईलाज आहे. प्रथमदर्शनी अशा बातम्यांमधे या घटनेतील क्रौर्यच कुणाच्याही ध्यानी येईल. ते संवेदनशीलतेचे लक्षण आहे. बाकीच्या गोष्टी या नंतर येतात. प्रेम केलं म्हणून जीव घेणे या गोष्टीचे समर्थन होऊ शकत नाही. कुठल्याच कारणाने. तुमच्या प्रश्नांची यादी या गोष्टीला बळ देतेय असे नाही वाटत का ?

@ भरत. : साप ही उपमा नसुन रुपक म्हणुन वापरलं आहे. जी गोष्ट माहीतच नाही त्याबद्दल कोण काय उत्तर देणार..?
कुणाच्या घरात जन्माला यावं हे जसं आपल्या हातात नसतं तसं कोणी आपल्याविषयी काय विचार करतं हे देखिल आपल्या हातात नसतं. आपला मार्ग निर्धोक असावा म्हणुन काळजी घेणं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं.

@ किरणुद्दीन : >>तुमच्या प्रश्नांची यादी या गोष्टीला बळ देतेय असे नाही वाटत का ?<< एखाद्याला रोग होऊच नये म्हणुन खबरदारी घेणं आवडतं आणि रोग झाला तरी बेहत्तर पण काहीही करुन दुखण्याचा अनुभव घेऊन पहायचाच असंही एखाद्याला वाटु शकतं. आपण काय विचार करतो त्यावर ते अवलंबुन असतं ('रोग' हे देखील रुपक म्हणुनच वापरलं आहे.. क्रुपया त्यास उपमा समजु नका)

भरत, किरण +१
माझ्यात याबद्दल काहीही लिहायची एनर्जी नाही.
निदान जे झालं ते चूक (म्हणजे त्या खुन्याची चूक, जोडप्याची नाही) याबद्दलही एकमत असू नये इथे हे भयाण आहे.

आपण कोणाबद्दल कसा विचार करावा हे तर आपल्याच हातात असतं.
तुमच्या उपमा, रूपकं अधिकाधिक भयाण होत चालल्यात.
पण मला या विचारांचं नवल वाटलं नाही.
न्यूज वेबसाइट्स वरच्या अधिकतर प्रतिक्रिया अशाच आहेत.
Sad

मुलगा म्हणजे साप. आपल्या घरात शिरला तर ठेचलाच पाहिजे.
तो आपल्या घरात शिरू नये म्हणून हायराइझमध्ये टॉप फ्लोअरला flat घ्यायचा असतो.
अशा घरात जन्माला येणाऱ्या आणि लग्न करून येणाऱ्या मुलींबद्दल करुणा दाटून येते.

नवीन Submitted by भरत. on 21 December, 2018 - 18:06
__
लोकसत्ताकारानी ह्या धाग्यावरवर देखील, एका प्रतिसादाचा अर्थाचा अनर्थ करून शेवटी जातीयवाद आणलाच.

मुलीने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं, म्हणजे तुमच्या मते तिने चूक केली, तिने पाप केलं. मग तिला तुम्ही शिक्षा करणारच ना? ती शिक्षा काय असेल?

कुणी माघार घ्या अथवा पुढाकार घ्या.. सर्वांच्या प्रतिसादातुन बीड मधे घडालेल्या वाईट प्रसंगावर काही ना काही प्रतिक्रिया आल्याच. त्यातुन जे चांगले वाटते ते घेऊन पुढे अशा घटना घडुच नयेत यासाठी उपाय्/प्रबोधन घडले तर चांगलेच आहे.

धागा काढला त्यामागे माझ्या आजुबाजुला कुटुंबियांना लग्न मान्य नसल्याने (अगदी स्वजातीतील/नात्यातील सुद्धा..! अर्थात कारण काहिही असु शकेल) पोळलेले अल्पवयीन नवरा-बायको आणि त्यांचे उध्वस्त झालेले कुटुंबीय यांचे करुण चेहरे होते म्हणुन मला ज्या पद्धतीने समाज दिसला तसा विचार मांडला.

बीड जसे महाराष्ट्रातील एक जिल्ह्याचे ठिकाण आहे तसे इतरही शहरा-गावातील समाज वेगवेगळा असु शकतो.. तिथले प्रश्न वेगळे असु शकतात याचे भान ठेवायला हवे. आपण जिथे रहातो त्याच पेठेतील चालिरिती उर्वरीत महराष्ट्रात असतील अशा गोड गैरसमजात राहुन या प्रश्नाला ठराविक साच्यात उत्तर देता येत नाही आता असेच मला वाटते.

डीजे
तुम्हाला प्रेमविवाहाबद्दल धागा काढायचा होता तर बीडच्या घटनेचा उल्लेख करायची आवश्यकता नव्हती. तुम्ही तो उल्लेख न करताही काढू शकला असतात. बीडच्या घटनेतले क्रौर्य तुम्ही कारणावळ देऊन उथळ करताय हे माझे मत आहे. तुम्हाला पटो वा न पटो...

दोघांनी विचार न करता लग्न केले, पण पुढे निभावता आले नाही दोघांचे बिनसले, दोघांना त्रास झाला. अशी काही घटना असती तर असे प्रश्न, चर्चा एकवेळ रास्त असती.
इथे सरळ खून पडलाय. अन्यथा लग्न यशस्वीही झाले असते.
पण निर्घृण खुनाकडे दुर्लक्ष करून, असे लग्न अयोग्यच आणि अयशस्वीच राहिले असते असे गृहीत धरले आहे.

किरणुद्दीन मला जे वाटलं ते मी लिहिलं. एखाद्याला ते बरोबर वाटु शकतं किंवा चुकिचं वाटु शकतं. आपल्या आजुबाजुला घडाणार्‍या घटनांवरुन आपणाला ते लक्षात येऊ शकतं.

धागा काढल्यामुळे ज्याप्रकारे समाजात बीड सारख्या क्रुर घटना दिसु शकतात हे दिसले त्याच समाजात "कल्पना१" वैनीसारख्या एखाद्या व्यक्तीच्या नशिबी एका पेक्षा अधिक जावई विनाकष्टाने बिनबोभाटही मिळू शकतात हेही यानिमित्ताने समोर आले.

@ मानव : >>पण निर्घृण खुनाकडे दुर्लक्ष करून, असे लग्न अयोग्यच आणि अयशस्वीच राहिले असते असे गृहीत धरले आहे.<< असे काही ग्रुहीत धरण्याचा प्रश्नच नाही. खूनाची तरफदारी कोण करु शकेल? आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे घरच्यांशी फारकत घेऊन यशस्वी झालेले माझ्या तरी बघण्यात नाहित.

{त्यातुन जे चांगले वाटते ते घेऊन पुढे अशा घटना घडुच नयेत यासाठी उपाय्/प्रबोधन घडले तर चांगलेच आहे.}
प्रबोधन फक्त अशी लग्ने करून पाहणाऱ्या तरुणतरुणींचे करायचे. त्यांच्या कुटु़ंंबीयांचे अजिबात नाही.
अर्थात जे लोक खून करण्यापर्यंत उतरू शखतात, ते प्रबोधनाच्या पलीकडचे असतात असे मानायला वाव आहेच.
{कुणाच्या घरात जन्माला यावं हे जसं आपल्या हातात नसतं तसं कोणी आपल्याविषयी काय विचार करतं हे देखिल आपल्या हातात नसतं.}
अमुक घरात जन्म झालेल्या लोकांना lesser humans समजणारे तमुक घरात जन्मलेले inhuman असतात असा माझा विचार होत चाललाय.

लग्न अयशस्वी होण्याला घरचे हेकेखोर, रूढीवादी लोक किती जबाबदार असतील?
त्यांनी जैडप्याला एकटं सोडलं तर ते यशस्वी होऊ शकलं असतं. सैराटचंच उदाहरण आहे. ते दोघेही आपला जम बसवू लागले होते, नवं घर घेऊ पाहत होते.
लौकिकार्थाने हे यशच नव्हे काय?

डीजे शक्य झाल्यास असेच ११ प्रश्न खून करणा-या मुलीच्या भावाच्या वर्तणुकीबद्दल पण पडतात का पहा आणि पडत असतील तर इथे लिहा. नसतील पडत तर चिंताजनक आहे हे ...

मदत म्हणून सुरूवात करून देतो.
१. मुलीच्या भावाने जे काही केले ते आईवडीलांचे नाव काढण्यासाठी केले का ?

माझ्या पाहण्यात अशी घरच्यांच्या विरोधात जाऊन यशस्वी झालेली लग्नं आहेत. इतकी यशस्वी की जावई सासऱ्याचा आधार झाला.
मुलांनी निवडलेला जोडीदार आनंदाने स्वीकारणारे पालकही पाहिलेत.

@ किरणुद्दीन : हा धागा ज्या हेतुने काढला तो हेतु मागेच सफल झाला.. आता तुम्हीच काढा ना बालाजीवर एक धागा.

आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे घरच्यांशी फारकत घेऊन यशस्वी झालेले माझ्या तरी बघण्यात नाहित. >> एवढ्यातच जापानच्या राजकुमारीने एका सामन्य मध्यमवर्गीय माणसाशी लग्न करण्यासाठी राजघराणे सोडून दिले आणि they are living happily ever after

प्रिन्स विल्यम आणि खास करून प्रिन्स हॅरी ह्यांची लग्ने पहा... सामाजिक स्तरात आकाश पाताळाची भिन्नता असून आपल्यांची खप्पा मर्जी ओढवूनही ही लग्ने यशस्वी झाली.
तेवढ्या लांब जायचे नसेल आपल्या शाहरूख चे ऊदाहरण घ्या.... हिंदू (ते सुद्धा पंजाबी) ऊच्च मध्यमर्गीय आणि निम्नमध्यम वर्गीय आणि ते सुद्धा मुस्लिम .... किती त्रास झाला असेल त्या जोडप्याला.... पण प्रेमावर विस्वास असला की सगळे स्वप्नवत खरे होते.
एवढी ऊदाहरणे २४/७ डोळ्यांसमोर असतांना तुम्ही म्हणता अशा केसेस बघण्यात नाही. माफ करा पण 'आपल्याला जे बघायचे असते तेच सगळीकडे दिसते' हे वचन किती सत्य आहे ते दिसते.

दशकानुदषके सिनेमे प्रेम चांगले आहे शेवटी तेच जिंकते आणि सगळ्यांनी प्रेम समजून घेतले पाहिजे हे आपल्या कानीकपाळी ओरडून सांगत असतांना फक्त सैराट लक्षात रहावा हे आपल्या समजाचे दुर्दैव आहे.

धन्यवाद.

सिनेमा आणि वास्तविक आयुष्य यात जमीन आस्मानाचा फरक असतो हे सत्य जरा समजुन घ्या. >> ऑं .. मग धाग्याचे शीर्षक आणि धागा कशावर आहे... सकाळे सकाळी फार कन्फ्युझिंग झाले हे सगळे माझ्यासाठी

@ हायझेनबर्ग - बीड च्या घटनेची अखेर सैराटने झाली जी टाळता येणे शक्य होते. माझ्या पहाण्यात ज्या केसेस आल्या त्या माझ्या आजुबाजुला असणार्‍या समाजात घडल्या होत्या (खून वगैरे नाही..!) तुम्ही सांगितलेला जापनीज/ब्रिटिश्/पंजाबी समाज माझ्या आजुबाजुला नव्हता.. बीड मधेही नसेल.

Pages