पुन्हा एकदा सैराट

Submitted by DJ. on 20 December, 2018 - 03:23

आज सकाळी-सकाळीच बातमी वाचली. बीड मधे सैराट स्टाईलने मेहुण्याची हत्त्या!

बातमी खोलात जाऊन वाचली. वाघमारे कुतुंबातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सुमीतची घरची परिस्थिती अत्यंत डबघाईची होती. हा सुमीत रा.काँ. चा कार्यकर्ता होता असाही उल्लेख बातमी मधे होता. खून का झाला हे सविस्तर वाचले तेव्हा कळाले की सुमीतने बीड मधील गर्भश्रीमंत असलेल्या लांडगे घराण्यातील मुलीशी विवाह केला आणि हा विवाह मान्य नसल्याने मुलीचा भाऊ बालाजी याने निर्घ्रूण खून केला.

आता लांडगे-वाघमारे वरुन शाब्दिक चकमकी होतीलच पण त्याआधी माझ्या मनात खालील प्रश्न आले :

१. आपल्या घरची परिस्थिती वाईट असताना, २ वेळचे खायचे वांधे असताना आपली प्राथमिकता शिक्षण पुर्ण करण्यास आणि लवकरात लवकर नोकरी-धंद्याला लागुन आपल्या कमाईचा हातभार घरचे दारिद्र्य मिटविण्यास लागावा असे सुमीत वाघमारे यास का वाटले नाही?
२. कॉलेज मधे शिक्षण घेत असताना, घरची कसलीही राजकीय पार्श्वभुमी नसताना कर्यकर्ता होऊन आयुष्याचा वेळ वाया जाईल अशी शंका सुमीतच्या मनात का आली नाही?
३. आपण अजुन आपल्या पायावर उभे नसताना लग्न करणे चुकिचे ठरेल असा विचार सुमीतच्या मनाला का शिवला नाही?
४. आपल्या घरात २ वेळचे खायचे वांधे असताना गर्भश्रीमंत घरातील मुलगी लग्न करुन आपल्या घरी आल्यावर तिची आबाळ होईल याची पुर्वकल्पना सुमीतला आली नाही का?
५. आपला सामाजीक-आर्थिक स्तर आणि लग्न केलेल्या मुलीचा सामाजीक-आर्थिक स्तर वेगळा आहे याचा विचार सुमीतने केला नसेल का?
६. जर ती मुलगी स्वतःहुन त्याला बळजबरीने लग्न कर म्हणुन ब्लॅकमेल करत असेल तर त्याने पोलिसांची मदत का घेतली नाही?
७. या प्रकरणात फक्त सुमीत आणि त्याची बायको हेच २ कंगोरे नसुन आपल्या मुलांनी, भावाने, बहिणीने योग्य जोडिदाराशी लग्न करावे अशी माफक अपेक्षा कुटुंबीय म्हणुन करुच नये का?
८. शिक्षण झाले म्हणुन आपणाला स्वतंत्र विचार करण्याचा हक्क आहे पण तो अविचारही ठरु शकतो याचे भान प्रत्येक मुला-मुलीने ठेवणे गरजेचे नाही का?
९. एक मुलगा/मुलगी/बहीण म्हणुन आपल्याही काही जबाबदार्‍या आहेत हे आपण विसरत चाललो आहोत का?
१०. आपल्याला जशी वैयक्तिक/कौटुंबीक मते/हक्क आहेत तसेच जबाबदार्‍याही आहेत याचे भान असु नये का?
११. आपल्या कुटुंबियांना झेपेल/पचेल अशा कुटुंबातील्/समाजातील स्थळात लग्न करुन सुखी-समाधानाने संसार करावा असे दोघांनाही वाटले नसेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरचे मुद्दे काही अंशी मान्य जरी केले तरिही एखाद्याला जीवे मारणे वाईटच.

१. आपल्या घरची परिस्थिती वाईट असताना, २ वेळचे खायचे वांधे असताना आपली प्राथमिकता शिक्षण पुर्ण करण्यास आणि लवकरात लवकर नोकरी-धंद्याला लागुन आपल्या कमाईचा हातभार घरचे दारिद्र्य मिटविण्यास लागावा असे सुमीत वाघमारे यास का वाटले नाही? >> एक वेडं वय असतं झपाटलेलं त्यात फक्त रक्त तापेल अशाच गोष्टी तरूणाई करू शकते. उदा. प्रेम, गँगवॉर, समाजासाठी सो कॉल्ड काहितरी कार्य, अन्यायाविरूद्ध आवाज उठवणे (भले मग अर्ध्या तरूणांना अन्याय म्हणजे नक्की काय झालंय ते माहिती ही नसते) हं! मग काय करा दगडफेक.. दंगे. त्या वयात शांत संयमी वागणे, कुटुंबाची जबाबदारी घेणे इ. गोष्टींची जाण नसते.

२. कॉलेज मधे शिक्षण घेत असताना, घरची कसलीही राजकीय पार्श्वभुमी नसताना कर्यकर्ता होऊन आयुष्याचा वेळ वाया जाईल अशी शंका सुमीतच्या मनात का आली नाही? >> अशा तरूणाईला बहुतकरून राजकारणी लोक हाताशी ठेवतात. मी अधिक खोलात शिरून लिहित नाही. पण बेरोजगार तरूण लोकांना थोडे फार पैसे आणि इतर काही गोष्टी पुरवून "तुम्ही समाजासाठी फार उत्तम काम करताय" हे ठसवले की झाले. आपला वेळ व्यर्थ जातोय हे कळायला मग फार उशिर होतो.

३. आपण अजुन आपल्या पायावर उभे नसताना लग्न करणे चुकिचे ठरेल असा विचार सुमीतच्या मनाला का शिवला नाही?
४. आपल्या घरात २ वेळचे खायचे वांधे असताना गर्भश्रीमंत घरातील मुलगी लग्न करुन आपल्या घरी आल्यावर तिची आबाळ होईल याची पुर्वकल्पना सुमीतला आली नाही का? >> प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात पडलेले पण.

काही घराण्यात सूडाची परिसीमा ही समोरच्याचा जीव घेणे हीच असते. सुज्ञपणे विचार करून तोडगा काढण्यास शिकणे हे अजून काही वर्षे तरी नक्कीच शक्य नाही.

अनिरुद्ध, ही बातमी आज एबीपी माझावर पण दाखवली.
Submitted by रश्मी.. on 20 December, 2018 - 15:46
<<
ओके,
पाहीली बातमी.
---
सुमित इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमित राहत होता. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत त्याचे प्रेम जुळले. तब्बल तीन वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र दोन्ही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं.
---
या बातमीतील वरिल मथळा वाचल्यास धागाकर्त्याच्या सर्व प्रश्नांची वासलात,
फक्त एकाच उत्तरांने लागू शकते. ते म्हणजे 'प्रेम आंधळे असते'

बालाजी गुंडच होता असे आपण म्हणू शकतो.

पण जेव्हा शिक्षण सुरू असते/नुकतेच पूर्ण झालेले असते तेव्हा असे निर्णय घेणाऱ्या व पुढे त्याची परिणीती वाइटात होणाऱ्या केसेस वाचल्या की माझ्या मनातही वर दिलेल्यापैकी बरेच प्रश्न येतात.

प्रेम आंधळे असतेच पण ते मुके व बहिरेही असते.

११. आपल्या कुटुंबियांना झेपेल/पचेल अशा कुटुंबातील्/समाजातील स्थळात लग्न करुन सुखी-समाधानाने संसार करावा असे दोघांनाही वाटले नसेल का? >>> असहमत
कारण, प्यार किया नही जाता हो जाता है, दिल दिया नही जाता खो जाता है Proud
वर एका पोस्ट मध्ये वाचलं त्याप्रमाणे 11 मुद्द्यांमधला एक तरी बालाजी चूक की बरोबर हे विचारणारा हवा होता. विचारलेले प्रश्न प्रॅक्टिकल आहेत, पण ते दोघे चुकले म्हणून डायरेक्ट खून हे तरी बरोबर का?

१. हा धागा ललितलेखनात नको, चालू घडामोडीत हवा.
२. बहुतेक प्रश्नांची उत्तरं - ते वय तसं असतं, सारासार विचार करायची शक्ती आलेली नसते.
३.< आपला सामाजीक-आर्थिक स्तर आणि लग्न केलेल्या मुलीचा सामाजीक-आर्थिक स्तर वेगळा आहे याचा विचार सुमीतने केला नसेल का?>
शैक्षणिक स्तर आणि मने जुळणे जास्त महत्त्वाचे वाटले तर त्यात वावगे काय आहे?
४. <आपल्या मुलांनी, भावाने, बहिणीने योग्य जोडिदाराशी लग्न करावे अशी माफक अपेक्षा कुटुंबीय म्हणुन करुच नये का?> मुलीने निवडलेला जोडीदार योग्य नाही, हे त्यांनी कशाच्या जोरावर ठरवलं?

आपल्या घराण्याच्या इज्जतीपुढे एका माणसाचा , तोही ज्याच्याशी आपल्या बहिणीने नाते जोडले आहे, जीव कवडीमोल वाटावा? कायद्याप्रमाणे तो भाऊही खडी फोडायला जायला हवा. पण आर्थिक, सामाजिक स्तर पाहता तसे होईलच याची खात्री नाही.

माणसाची किंमत त्याचा जन्म कोणत्या सामाजिक, आर्थिक स्तरात झाला यावरून करण्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या व्यक्तित्व, चारित्र्य, विचार, गुणावगुण यांच्यावरून करायला नको का?

वर कोणीतरी म्हटलंय की बालाजी गुंड होता, म्हणून सोडून द्या. त्याच्या लग्नासाठी मुली शोधताना मात्र त्याच्या सामाजिक आर्थिक स्थितीमुळे फारशा अडचणी आल्याच नसत्या. खुनशी स्वभावाचा अडथळा आला असता का?

पालकांनी नकार देण्यापेक्षा, अजून तुम्ही लग्न करायला लहान आहात, शिक्षण पूर्ण करून जम बसवा, तोवर थांबू असा पवित्रा घेतला असता तर?

हत्या तो मुलगा कॉलेजातून परीक्षा देऊन बाहेर पडत असताना कॉलेजच्या गेटवर झालीय.

माणसाची किंमत त्याचा जन्म कोणत्या सामाजिक, आर्थिक स्तरात झाला यावरून करण्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या व्यक्तित्व, चारित्र्य, विचार, गुणावगुण यांच्यावरून करायला नको का?>>>>>>

हा विचार भारतात जेव्हा कधी सुरू होईल तेव्हा देश खऱ्या अर्थाने सुधारणेच्या रस्त्यावर चालू लागेल.

वर कोणीतरी म्हटलंय की बालाजी गुंड होता, म्हणून सोडून द्या. त्याच्या लग्नासाठी मुली शोधताना मात्र त्याच्या सामाजिक आर्थिक स्थितीमुळे फारशा अडचणी आल्याच नसत्या. खुनशी स्वभावाचा अडथळा आला असता का?>>>>
अजिबात अडथळा आला नसता, उलट वधुपित्यानी रांगा लावल्या असत्या व जो पिता जिंकला त्याने स्वतःची मुलगी व ढिगानी हुंडा एका नालायकाला देऊन स्वतःला कृतकृत्य समजले असते. आजच्या समाजाचे हे वास्तव आहे. इथे लग्ने सामाजिक स्तर बघून केली जातात. वधुवरांची मानसिक व शारीरिक मॅचिंग केली जात नाही.

पालकांनी नकार देण्यापेक्षा, अजून तुम्ही लग्न करायला लहान आहात, शिक्षण पूर्ण करून जम बसवा, तोवर थांबू असा पवित्रा घेतला असता तर?>>>

हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सामाजिक व जातीय पातळीवरून कोणी मोठा किंवा छोटा ठरणे बंद होईल. शिक्षण पूर्ण झाले नाही म्हणून थोडीच हत्या झालीय.

सैराट नाव दिलेय त्यानिमित्ते, सैराटचा इंटरवलनंतरचा दुसरा भाग पाहताना कायम मनात येत राहते की शिक्षण अर्धवट असतानाही स्वबळावर ते दोघे अनोळखी शहरात जम बसवतात, स्वतःचे घर व वाहन घेतात. पळून जायची वेळ पालकांनीच आणली, ती तशी न आणता दोघांनाही पुढील शिक्षण दिले असते तर त्या दोघांनी किती मोठे साम्राज्य उभे केले असते. पण दुर्दैव, पालकांना त्यांच्यातले हे स्फुल्लिंग दिसत नाही. दिसतात ते सामाजिक स्तर, जाती, प्रतिष्ठा, पैसा.

>>>>>> घरची परिस्थिती वाईट असताना, २ वेळचे खायचे वांधे असताना आपली प्राथमिकता शिक्षण पुर्ण करण्यास आणि लवकरात लवकर नोकरी-धंद्याला लागुन आपल्या कमाईचा हातभार घरचे दारिद्र्य मिटविण्यास लागावा असे सुमीत वाघमारे यास का वाटले नाही?>>>>

कदाचित गर्भ श्रीमंत मुलीशी लग्न करणे हे या प्रश्नाचे उत्तर असेल??

घरची परिस्थिती वाईट असताना, २ वेळचे खायचे वांधे असताना आपली प्राथमिकता शिक्षण पुर्ण करण्यास आणि लवकरात लवकर नोकरी-धंद्याला लागुन आपल्या कमाईचा हातभार घरचे दारिद्र्य मिटविण्यास लागावा असे सुमीत वाघमारे यास का वाटले नाही?
<<

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलाचे, २ वेळचे खायचे वांधे असतील इतका तो दरिद्री असेल ह्यावर विश्वास बसत नाही.

मुलगा सेटल नव्हता हा मुद्दा होता की कास्ट चा मुद्दा होता?
सैराट मध्ये कास्ट फ़ॅक्टर अनेक पद्धतीने दाखवला होता.

<३. आपण अजुन आपल्या पायावर उभे नसताना लग्न करणे चुकिचे ठरेल असा विचार सुमीतच्या मनाला का शिवला नाही?>
आईबापांचे , खरं तर बापाचे पाय भक्कम असले तर त्याच्यापोटी आलेल्या आणि कधीही स्वतःच्या पायावर उभे न राहू शकणार्‍या मुलाचंही लग्न होतंच.

अशातल्या कोणाची नजर वेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरातल्या मुलीवर पडली तर तो तिचा वेगळाच उद्धारही करू शकतो.

विचार बिचार सगळे वेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातल्या मुलांनी करावेत.

<९ एक मुलगा/मुलगी/बहीण म्हणुन आपल्याही काही जबाबदार्‍या आहेत हे आपण विसरत चाललो आहोत का?
१०. आपल्याला जशी वैयक्तिक/कौटुंबीक मते/हक्क आहेत तसेच जबाबदार्‍याही आहेत याचे भान असु नये का?
११. आपल्या कुटुंबियांना झेपेल/पचेल अशा कुटुंबातील्/समाजातील स्थळात लग्न करुन सुखी-समाधानाने संसार करावा असे दोघांनाही वाटले नसेल का?>
लग्नासारखा स्वतःच्या आयुष्याशी निगडीत निर्णय तरुण तरुणीला स्वतःच्या मनाने घेऊ द्यावा असे यांतल्या कोणालाच वाटायची आवश्यकता का नाही?

आर्थिक स्थिती बरी नाही, घराचा राजकारणाशी संबंध नाही, शिक्षण चालू आहे म्हणून राजकीय कार्यकर्ता होऊ नये हा मुद्दाही पटला नाही. म्हणजे घराणं राजकारण्यांचं असेल त्यांचा तो जन्मसिद्ध हक्क. बाकीच्यांनी निवृत्त झाल्यावर मुलं कर्तीसवरती झाल्यावर मग बघावं.

अंबानींकडे पहा. आपल्यापेक्षा गरीब असलेल्या मुलाचा त्यांनी जावई म्हणून स्विकार केला आहे. मरीन ड्राईव्ह येथे मुलाचा फक्त तीन मजली बंगला आहे. २२ मजली घरात राहीलेली इशा इव्हड्याशा घरात कशी राहील असा विचार कुणी केला का ? की इशाच्या बहीणीने कोयता घेऊन असा काही प्रसंग केला ?

त्यांनी मुलीच्या मर्जीचा मान राखला आणि काटकसरीने लग्न लावून दिले ज्यामुळे मुलाला देखील अवघडल्याप्रमाणे वाटू नये. अठरा आकडी वैयक्तिक संपत्ती आणि शिवाय अनेक कंपन्या, गुंतवणुकी, शेअर्स हे सगळे मोजून डोळे दिपून जाईल एव्हढ्या मायेचा धनी असलेल्या मुकेशरावांनी केवळ साडेसातशे कोटींची चिल्लर खर्चून मुलीचे लग्न साधेपणाने करावे हे वाईट वाटण्यासारखेच आहे. ज्या लग्नात मोदी, राहुल गांधी, ट्रंपतात्या, पुतीनाण्णा वाढपी यायचे तिथे तोंडाला रंग लावणा-या अमिताभ बच्चन आणि आमीरखान सारख्या नटांवर भागवावे लागले याचे त्या पित्याच्या काळजास काहीच दु:ख झाले नसेल का ? पण मुलीसाठी एव्हढे सहन करावेच लागते.

अंबानींपुढे जर लांडगे कुटुंबीय असतील तर माहीत नाही.

ही बातमी वाचल्यावर डोकं सुन्न झालं होतं आणि खून-खराबा कधीही समर्थनीय नाही.

या प्रकरणामुळे माझ्या डोक्यात जे प्रश्न आले ते मी मांडले. त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातुन माझ्याकडुन सुटलेले प्रश्न अधोरेखीत झाले.

या सर्व प्रतिक्रियांतुन लक्षात आले की जगात व्यक्ती तितक्या प्रकॄती असतात-

१. आई-वडिलांच्या विचाराने जगणारे वि. स्वतःच्या मर्जीने जगणारे
२. कुटुंबियांचा विचार करणारे वि. कुटुंबियांनी आपला विचार करावा असे वाटाणारे
३. साधा-सरळ माहित असलेला मार्ग चोखाळुन समाधानी होणारे वि. आपल्या मनाला वाट्टेल तो मार्ग वट्टेल ती किंमत चुकवुन तो तयार करुन समाधानी होणारे
४. एखाद्याच्या दु:खात धीर देणारे वि. दु:खाला हसणारे

शेवटी ज्याचा त्याचा चॉईस..!

"प्रेमविवाह केला म्हणून ज्या तरूणीच्या नवऱ्याचा खून करण्यात आला, ती तरुणी याआधीही पोलिसांकडे तक्रार घेऊन गेली होती. पण पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही, असं तिचं म्हणणं आहे. याबाबत पोलिसांना जाब विचारायला गेलेल्या 'न्यूज18 लोकमत'च्या प्रतिनिधीलाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. यानंतर आता ज्या तरूणीच्या पतीला संपवण्यात आलं ती तरूणी जे बोललीय ते ऐकूण कोणाचंही काळीज पिळवटून जाईल. 'माझ्या नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आता मलाही मारा,' असं ही तरूणी म्हणाली आहे."

डीजे, तुमचा धाग्याचा विषय म्हणजे कशावरून तरी लक्ष हटवण्यासाठी केलेला उपद्व्याप वाटला. म्हणजे आपण गुन्हेगार नाही मात्र आपल्या घरातील कुणी गुन्हा केला आहे आणि त्यामुळे आपल्याला लाज उत्पन्न होणार आहे याचा सल असल्यावर काही जण समोरच्या व्यक्तीचे विचार भरकटवण्यासाठी मूळ मुद्दा सोडून भलत्या मुद्यांवर तात्विक वाद घालतात व स्वतःचेही समर्थन करतात असे काहीसे. माफ करा. पण स्पष्ट लिहीले.

इथे अनेक प्रतिक्रियातून आला तसा हा ऑनर किलिंगचा विषय नाही. मयताच्या मित्रांकडून जी माहिती कर्णोपकर्णी मिळते त्यानुसार जात हा विषय इथे नाही. दोन्ही कुटुंबे नात्यात आहेत. त्यांच्यातले संबंध नीटसे नाहीत असे काहीसे आहे.
या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहीलेला नाही. संपूर्ण बीड जिल्हा, परळी भाग इथे खून वगैरे विशेष वाटत नाही. राजकारण खोल आहे. पोलीस भानगडीत पडत नाहीत वरून आदेश असल्याशिवाय. हल्लीच वातावरण निवळत चालले आहे असा सूर असताना ही घटना घडली आहे.
आपल्या बहीणीने "त्या" कुटुंबाशी संबंध जोडले हा राग असण्याची शक्यता आहे.

कोणत्याही कारणाने या घटना समर्थनीय असू शकत नाही. एक तर बीड जिल्ह्यात राज्यघटना, भादंवि या गोष्टी लागू करा नाहीतर संपूर्ण देशात जंगलचा कानून लागू करा. मग काय ज्यांना जसे निकष लावायचे तसे लावा. ते एकमेकांशी जुळले नाही तर जीव घ्या. विचारविनिमय, निर्णय घेण्याचा अधिकार या गोष्टींना मान्यता या बाबी आपल्या देशात असू शकत नाहीत हे एकदा मान्य करून जमल्यास देश सोडून गेलेले बरे. किमान कुठल्या देशात जावे हा निर्णय घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीस असावा. नाहीतर पाकिस्तान, सिरीया अशा देशात पाठवण्याची सक्ती होऊ शकते.

ज्याने मारलं त्याच्या बद्दल एकही प्रश्न निर्माण होत नाहीये. प्रेम लग्न दोघांनी केलं तरी त्या मुली बद्दलही जुजबी मुलामुलींनी टाईप प्रश्न आहेत. जो जिवे मारला गेला त्याच्या बद्दल मात्र "औकात होती का?" टाईप प्रश्न.
चालू द्या!

डीजेवाले बाबू ...
एकदम सोपा प्रश्न विचारते.
तुमच्या सख्या, लहान, साक्षर, जबाबदार बहिणीने, स्वतःच्या मर्जीने, असं लग्न केलं असतं तर तिला कोयत्याने मारलं असतं का तलवारीने? का सरळ गळा दाबून जीव घेतला असता?
आणि असंच जर तुमच्या लहान भावाने केलं असतं तर? त्याला लपायला घरात जागा दिली असती का?
यावर हे म्हणू नका की, माझा भाऊ किंवा बहीण संत आहेत, ते पळून जाऊन कधीच लग्न करणार नाहीत.

पोरगी म्हणजे घराण्याची ईज्जत आणि आब्रू.
पोरगी गेली, ईज्जत गेली.
आणि ईज्जत लुटणारयाला शिक्षा एकच.
सजा ए मौत!

चार दिवसांपूर्वीच हा विषय निघालेला. गावाखेड्याकडची मुले सांगत होती. असे सैराट प्रकार चिक्कार घडतात. कधी चर्चा होते तर कधी चर्चाही न होता दाबले जातात.

मी हॉस्टेलला असताना अश्याच एका मुलीच्या प्रेमप्रकरणावरून सोलापूरची काही पोरं माझा कोथळा काढायच्या तयारीत होती. पण सोलापूरच्याच एका वजनदार पोराशी माझी गट्टी जमली असल्याने ती परत फिरली.

तसेच लोकल मुलगी कितीही आवडली तरी त्या वाटेला जायचे नाही हे तेव्हा आमच्यातील प्रत्येकानेच ठरवले होते. बस्स माझ्यातच किडे जरा जास्त असल्याने मी त्या आघाडीवरही हातपाय झाडले होते.

पण ते एक वय असते. जे आता गेले. आता या क्षणाला धागालेखकाशी सहमत.
गुण्डांच्या नादी लागून मरण्यात काही अर्थ नाही.

भारतात लग्न करायचं असेल आणि नंतर पैसे/बेबीसीटिंग यात कुटुंबाचा सखुषीने सपोर्ट हवा असेल तर 2 स्टेटस मध्ये सांगितलेल्या 4 अटी पूर्ण झालेल्या बर्या.फ्रीकशन कमी होते आणि आयुष्य जरा सुरळीत चालून नोकरी धंद्यात जास्त चांगले लक्ष घालता येते.

@ किरणुद्दीन : >>तुमचा धाग्याचा विषय म्हणजे कशावरून तरी लक्ष हटवण्यासाठी केलेला उपद्व्याप वाटला<< असं काहीच नाही. फक्त एवढं खरंय की समाजात आजुबाजुला घडणार्‍या अशा प्रकरणात मी जे पाहिले त्यावरुन एवढेच सांगु शकेन की भले त्या नवदांंपत्यांनी पळुन जाऊन लग्न केले तरी ना त्यांचे आई-वडील, पै-पाहुणे खुश झाले ना ते स्वतः खुश राहु शकले. आई-वडील दोघेही अशा लग्नाच्या विरोधात असतील तर मुलांनी ३-४ वेळा जरुर विचार करावा. हेच लग्न जर दोन्ही बाजुंच्या आई-वडिलांच्या संमतीने झाले तर सोन्याहुन पिवळे ठरते.

आणि बरंका किरणुद्दीन, मला काही समोरच्या व्यक्तीचे विचार भरकटवण्यासाठी मूळ मुद्दा सोडून भलत्या मुद्यांवर तात्विक वाद घालण्याची हौस वगैरे काही नाही.

@ कल्पना१ : तुमच्या कल्पना जरी अफाट असल्या तरी आमच्या घरी असे काही झाले नाही. कदाचीत असे घडले असते तरी खून-बीन नक्किच केला नसता. त्यांचे आयुष्य त्यांना लखलाभ म्हणुन आपल्या मार्गाने गेलो असतो. बा.द.वे. तुमची मुलगी/मुलगा/बहीण्/भाऊ असे वागले असतिल तुम्ही काय केले असते हे ऐकायला नक्कीच आवडेल..

@ ऋन्मेऽऽष : >>गुण्डांच्या नादी लागून मरण्यात काही अर्थ नाही.<< हेच काय ते सुखी जीवनाचे गुपीत.

@ मानव पृथ्वीकर : सदर धाग्याचे नाव 'सैराट' सिनेमाची पुनरव्रुत्ती झाली म्हणुन तसे दिले आहे. पण मी इथे त्या घटनेची स्टोरी सांगण्यासाठी धागा काढला नाहे.. फक्त मनात आलेले प्रश्न मांडले. त्यावर प्रतिक्रिया आल्या तर.. वैचारीक घुसळण होईल.. काय बरोबर काय चुकिचे याचे लोणी तरंगेल या हिशोबाने धागा काढला.

>>आईवडिलांनाही विचार करायची गरज आहे..<< आपले जन्मदाते आहेत ते.. त्यांनी आपणाला खस्ता काढुन वाढवलं असेल तर मुलांनी त्यांचा नक्की विचार करावा. स्वत:पुरता विचार केला तर हाती फारसं काही लागत नाही. कुठे ना कुठे तरी नक्कीच कुटुंबाची कमतरता वाटत रहाते..

आपले जन्मदाते आहेत ते.. त्यांनी आपणाला खस्ता काढुन वाढवलं असेल तर मुलांनी त्यांचा नक्की विचार करावा. स्वत:पुरता विचार केला तर हाती फारसं काही लागत नाही. कुठे ना कुठे तरी नक्कीच कुटुंबाची कमतरता वाटत रहाते..<<<<<<<<<<<<<<<<
बरोबर आहे. मुलांना शिक्षा द्यायलाच हवी... स्वतःच्या मर्जीने लग्न केलं... चुकूंची वागली की नाही? असं तुमच्या घरातल्या मुलीने केल्यावर काय करता? चटके देता? मुस्काड फोडता?

बरोबर आहे. मुलांना शिक्षा द्यायलाच हवी... स्वतःच्या मर्जीने लग्न केलं... चुकूंची वागली की नाही?
<<

मुल/मुली जर त्यांच्या शैक्षणिक वयात, शिक्षण सोडून असले प्रेमाबिमाचे रिकामे धंदे करत असतील, तर त्याला त्या मुला/मुलीचे पालकच जबाबदार आहेत, मुळात मुलांना लहानपणासूनच योग्य ते संस्कार दिले तर चांगली संस्कारी मुले असल्या फालतू गोष्टीत पडतच नाहीत. जोडीदार निवडताना त्यांना कोण आपल्या बरोबरीचा आहे, कोण नाही याची योग्य समज असते.
--

Pages