|| तथ्य ||

Submitted by शिवाजी उमाजी on 12 December, 2018 - 02:02

|| तथ्य ||

वठविती सोंग । करीत भक्त गोळा ।
घालुनी त्यां माळा । दंभी बुवा ।।

नामा ज्ञाना तुका । वेठीला धरून ।
पाजळती ज्ञान । गावोगावी ।।

मारूनीया थापा । भरताती पोट । 
उठवीती मठ । स्वकल्याणे ।।

ऐशा भोंदू लोकां । पाडोनी उघडे ।
जाहीर वाभाडे । काढावेत ।।

परमेश्वर एक । आहे जो सर्वत्र । 
ठेवा ध्यनी मात्र । अंतर्यामी ।।

वसलाय ईश्वर । परस्परी जाणा ।
हेची सत्य माना । विश्वासाने ।।

अनुभूती घेता । उमगते सत्य ।
तव माना तथ्य । म्हणे शिवा ।।

©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t30104/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ही फक्त हिंदू धर्मावरील टीका आहे, असे नाही का वाटत तुम्हाला?माळा,मठ, वारकरी संतांचा उल्लेख यावरून तसेच जाणवते आहे.

हायझेनबर्ग आपलं निरीक्षण अगदी बरोबर आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

पाटीलजी आपण म्हणता ते मी स्वानुभवातून मांडलय, आणि केवळ एका पंथावर किंवा धर्मावर लिहिले असे नाही, अन्य धर्ममातील गोष्टीवर पण लिहिले आहे. लवकरच पोस्ट करतोय.
आपणां दोघांचे पुन्हा एकदा आभार.