नट्टी पालक पुलाव

Submitted by मंजूताई on 3 December, 2018 - 16:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या बासमती तांदूळ अर्धा तास भिजून नंतर त्याचा मोकळा शिजवून घेतलेला भात, एक जुडी पालकाची ब्लांचकरून केलेली प्युरी, बटरच १०० ग्रॅम, एक चमचा तेल, वाफवलेले मक्याचे दाणे,एक मोठा कांदा उभा चिरलेला,खडा ( सबंध) मसाला ह्यात पाच-लवंगा, काळी मिरी, हि.वेलदोडा, दोन ब. विलायची, एक तेज पत्ता व गोड लाकुड उर्फ मिठी लकडी उर्फ दालचिनी, चवी पुरतं मीठ, अर्धा कप क्रीम , मी एक कप फुल क्रीम मिल्क वापरलं तुम्ही चीजही घालू शकता. नट्टी आहे तर आपल्या आवडीनुसार दोन मुठी सुकामेवा आपल्या आवडीनुसार (बदाम, काजू, अक्रेड, पिस्ते, बेदाणे )आणि शास्त्रापुरती हळद

क्रमवार पाककृती: 

एका मोठ्या पातेल्यात तेल टाकून सुकामेवा तळून काढून घ्या हे करण्यासाठी अर्थातच गॅसवर पातेल/कढई ठेवून पेटवावा लागणार आहे. गॅस बंद नकरताच त्यातच बटर टाकल्यावर खडा मसाला व कांदा टाका. कांदा पारदर्शक झाला की पालक प्युरी टाका. दूध/क्रीम टाकून आटवून घ्या. त्यात आता भात टाका. चवीनुसार मीठ टाका काळजी घेत कारण बटरमध्येही मीठ आहे . चीज वापरणार असाल तर आता टाका. वाफवलेले मक्याचे दाणे व तळलेले नट्स टाका. चांगला परतून एक दणदणीत वाफ काढा. चव घेऊन पहा. बिघडायचा फार चान्स नाही पण मीठाचं तेवढं बघा. मी शक्यतो कमीच घालते गरज पडली तर वरुन घालता येतं. गॅस बंद करा. गरम गरम खायला तयार!

वाढणी/प्रमाण: 
१० जणींच्या पार्टीला इतर पदार्थांबरोबर पुरला होता. दहा मुलींपैकी एक दिक्षीत, दोनएक दिवेकर, तिसरी नो ग्लुटेन व चवथी किटो होती. आणि चारजणांसाठी पाच वांग्याची भाजी करून एक वांग उरु शकत तिथे प्रमाणाचा अंदाज कसा लिहावा हा प्रश्नच आहे.
अधिक टिपा: 

मिरची हि.ला. वापरली नाही. हा सौम्य चवीचा भात आहे. तुम्ही हिमि. च वापरा रंग बदलणार नाही.
शास्त्रापुरती हळद म्हणजे किती ? आई, आजी, काकी, मामींना विचारावी अन्यथा नाही घातली तरी पळेल.
दूध : घट्ट की पातळ व गाई की म्हशीचे इतकं मर्यादित द्न्यान होतं दूधाच्या बाबतीत. इथे ये म्हणजे आपल्या त्या इथेच हो ए१ व ए२, देशी गाय, संस्कारित गाय आणि आता त्या उसगावात येऊन द्न्यानात अजूनच भर पडली.

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

20181130_110032.jpgIMG-20181203-WA0005.jpg पाककृतीत फोटो टाकत येत नाहीये. कसे टाकावे?

मस्त पाकृ, करून बघेन.. प्रतिसाद संपादित करताना जो कोड दिसेल तो उचलून मुख्य पोस्ट मध्ये डकवा

slurrrrr....p... Happy

छान आहे रेस्पी. करुन बघेन.
शास्त्रापुरती हळद घालायचीच आहे का? नाही घातली तरी काही फरक पडणार नाही असं वाटतंय.

१० जणींच्या पार्टीला इतर पदार्थांबरोबर पुरला होता.
<<
एकेक चहाचा चमचा वाटेस आला असेल.

**
पाककृतीत फोटो टाकत येत नाहीये. कसे टाकावे?
<<
हा तुमचा प्रतिसाद एडिट करा.
फोटोच्या लिंका दिसतील : त्या कॉपी करा,

किंवा, याप्रमाणे →
img src="https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u3348/20181130_110032.jpg"
img src="https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33485/IMG-20181203-WA0005.jpg"

मी दिलेय त्या प्रत्येक लिंकेच्या दोन्ही बाजूला आधी < व शेवटी > अ‍ॅड करा. अन ती लिंक तुम्हाला हवी तिथे डकवा.

सगळ्यांना धन्यवाद !
मानव, बरोबर बडी उर्फ काली उर्फ मोठी
सस्मित, नाही घातली हळद तरी हरकत नाही. विपु तेवढी बघ बाई!
आरारा, अहो नमुन्यादाखल ठेवलाय तुमच्यासमोर.... वाढणीचे प्रमाण एडीट केलंय... नजर टाका. लिंकबद्दल धन्यवाद ! वेळ मिळाला की टाकते वर फोटो.

मस्त वाटतेय पा.कृ.

दहा मुलींपैकी एक दिक्षीत, दोनएक दिवेकर,>>>>> घाईत वाचताना पहिल्यांदा कळलं नाही.तिसरी नो ग्लुटेन >>>> हे वाचल्यावर प्रकाश पडला.

छान रेसीपी पण भयंकर हाय कॅलरी. आणि नट्स अ‍ॅलर्जी असेल तर काय विदाउट नट्स करता येइल. लॅक्टोज इं टॉलरंट किम्वा विगन असेल तर दूध चीज वगळायचे. चव जबरदस्त असणार. स्पेशल पदार्था त नोंद करून ठेवली आहे. तुपात करणार. व्हाय फिकर? Wink

संस्कारित गाय>> आपल्याला संकरित गाय म्हणायचे आहेकाय?

छानच.

ममो, अमा, प्राजक्ता धन्यवाद!
अमा, तुपात करा. संकरित व संस्कारित पण असताता कुठल्यातरी आयुरवेदिक सेंटरात..