भूतकाळातील वलयांकित ?

Submitted by जिद्दु on 28 November, 2018 - 03:38

लहानपणापासून ज्यांच्या बद्दल ऐकून असतो असे दिवंगत दिग्गज जे प्रत्यक्षात मात्र वेगळेच होते आणि हे कळल्यावर तुम्हाला धक्का बसला जसे -

१) सर्वपल्ली राधाकृष्णन - ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन ज्यांच्या नावाने साजरा केला जातो ते गुरु ज्यांनी स्वतःच्या शिष्याच्या ग्रंथातून वाङ्मयचोरी केली होती
http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&i...

२) चार्ली चॅप्लिन - कामपिशाच
https://www.ranker.com/list/charlie-chaplin-sex-life-facts/michelle-nati

३) मदर तेरेसा -
https://www.quora.com/Which-famous-person-in-history-who-is-idolized-was...
वरील लिंक वर तेरेसा बाई बरोबर बरेच लोक्स आहेत ते पण पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यायमूर्ती रानडे,
विधवा विवाहबद्दल त्यांची मते सर्वज्ञात आहेत, मात्र पुनर्विवाह करताना त्यांनी 8 9 वर्षाच्या प्रथम वधू मुली बरोबर लग्न केले.

मनूचा मासा नावाचे लोकवाड्ंमय प्रकाशनगृहाचे रमेश महाले लिखीत पुस्तक आहे. त्यात बाबाराव सावरकर हे मुसोलिनीच्या संपर्कात होते. मुंजे तर इटलीला जाऊन मुसोलिनीला भेटून आले, गुरूजी म्हणून कुणी प्रसिद्ध होते, ते अमेरिकन गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात होते. या संघटनेकडून त्यांच्या संघटनेला भारतात अस्थिर परिस्थिती करण्यासाठी निधी यायचा असे धक्कादायक खुलासे आहेत.

वर दिलेले नाव वाचून काहीजण ऑफेंड होतील याची खात्री आहे. तेव्हा माझ्यावर हल्ला करण्या अगोदर खाली वाचा.

माझ्या मनात न्यायमूर्ती रानाड्यांबद्दल आदरच आहे.त्यांनी आणि त्यांच्या पश्चात रामबाई रानाड्यांनी केलेल्या कार्याबद्दल समाज त्यांचा ऋणी राहील.

हे नाव केवळ ध्याग्यातील विराधाभास स्पष्ट करण्यासाठी दिलेले आहे.
जस्टीस रानाड्यांना त्यांच्या अतिशय कर्मठ वडिलांच्या विरोधात जाऊन काही करायचे धैर्य नव्हते, म्हणून त्यांनी लहान मुलीशी लग्न केले.
आज त्यांच्या कार्याची माहिती देताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या सार्वजनिक मताशी प्रतारणा केली हे सांगितले जाईल? की त्यांच्या आणि रामबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल सांगितले जाईल?
त्याची वैचारिक प्रतारणा हा एक कॅरॅक्टर फ्लॉ समजून पुढे जायला काय हरकत आहे?

अगदी असेच इतर वलयांकित लोकांबद्दल सुद्धा म्हणता येईल, कोल्हापूरभागात शाहू महाराजांविषयी अनेक प्रवाद आहेत. पण त्यांची ओळख त्यांचे कार्य आहे की हे प्रवाद आहेत??

ररस्त्यात मारामारी झाली आणि प्रत्येकाला घटनाक्रम विचारला, तर 4 लोकांकडून मागच्या 10 मिनिटांच्या भूतकाळातील 4 वेगवेगळी वर्जनस ऐकायला मिळतील.
अशा परिस्थिती 20-40-100 वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल इव्हल्युअशन करणारे आपण कोण?आणि ते मोजपाम सुद्धा आपण करणार ते आजच्या नॉर्मस च्या फुटपट्ट्या लावून, कोणीतरी दुसर्याने(वेबसाईट, न्यूजपेपर) दिलेल्या माहितीवरून.

जर एखादी प्रतारणा त्याच्या सामाजिक आयुष्यावर/कार्यावर परिणाम करत असेल तर ती गंभीर बाब आहे, उदा, बेघर, अनाथ मुलांसाठी शेल्टर चालवणाऱ्या व्यक्तीने त्या मुलांचा गैरफायदा घेणे/त्यांना राबवून घेणे etc. किंवा वर म्हंटले आहे तसे भारताच्या एकात्मतेसाठी काम करतो म्हणताना सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारी एखादी संस्था वगैरे.
या दृष्टीने धाग्यातील पाहिले उदाहरण विषयाला धरून वाटते. (But again, ते किती खरे किती खोटे हे कोण आणि कसे ठरवणार?)

त्यामुळे मलातरी हा धागा वलयांकित लोकांबद्दल केलेले गॉसिप या प्रकारचा वाटतो आहे.

गांधी खून खटल्यातील दोन व्यक्तींनी ३७७ हे कायद्याचे कलम असहकार आंदोलनांतर्गत मोडले होते अशी
अनेकांची माहीती आहे.

<लहानपणापासून ज्यांच्या बद्दल ऐकून असतो असे दिवंगत दिग्गज जे प्रत्यक्षात मात्र वेगळेच होते >
मोठ्या लोकांच्या कार्याबद्दल आपण ऐकलेलं असतं. ते खाजगी आयुष्यात कसे होते किंवा त्यांच्यात काही अवगुण होते का याने त्यांनी केलेल्या कार्याच्या मूल्यमापनात्/योगदानात फरक पडत नसेल, तर या गोष्टींना काही अर्थ नाही. कोणताही मनुष्य सर्वगुणसंपन्न, दोषमुक्त असणे जवळजवळ अशक्यच आहे.
पुन्हा दुसर्‍या संकेतस्थळावरच्या गप्पांचा (जिथे मतं लिहिली गेली आहेत) धागा उचलून तो इथे गुंफण्यातही काही ग्रेट नाही.

कुठे फरक पडेल? जेव्हा एखादे काम एखाद्या माणसाने केले आहे (उदा : संशोधन) अशी इतिहासात नोंद असते, ती गोष्ट जगप्रसिद्ध असते, पण प्रत्यक्षात बरंच काही वेगळं असतं, अशी गोष्ट. अशा एका संशोधकाबद्दल एका दिवाळी अंकात वाचलं तेव्हा धक्का बसला, वाईट वाटलं पुन्हा असं आणखी कोणाबद्दल वाचलं तर तेवढा धक्का बसणार नाही.

@ मेरीच गिनो कोरा वर एखादा प्रश्न विचारला जातो आणि त्याला कोणी उत्तर दिल्यास सर्व उत्तरे एकाखाली एक अशी एकाच धाग्यावर वर मिळतात म्हणुन त्यात बऱ्याच लोकांचे संदर्भ आलेत

@भरत दुसऱ्या संकेतस्थळावरून उचलून लिहिण्यापेक्षा डिरेक्ट मूळ लिंक देणं योग्य वाटलं म्हणून तसं केलं .. त्यात फक्त एखादा संदर्भ असावा आणि नंतर एखादयाला वाटल्यास तो गुगल वर त्याबाबतीत आणखी शोध घेईल असा हेतू होता .. प्रत्येकात काही अवगुण त्रुटी असणारच कि पण मी दिलेल्या मंडळींच्या बाबतीत त्या केवळ गप्पा नसून सत्यच होतं/आहे आणि त्या किरकोळ गोष्टी नसून गंभीर वाटल्या म्हणून त्यांचा उल्लेख केला

@सिम्बा मी तथाकथित समाजकारणी म्हटलंय ... मी उल्लेख केलेल्या मंडळींच्या बाबतीत या गॉसिप नसून सत्य आहेत म्हणून त्यांचा उल्लेख...

बाकी प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार ...९९ चांगल्या गोष्टी केल्या म्हणजे एका चुकीच्या गोष्टीचा अगदि उल्लेखच करायचा नाही हे पटत नाही .आणि अजून काही लोकांबद्दल अशी माहिती मिळावी म्हणून हा धागा चालू केला मग कोणाला राग येवो अथवा गॉसिप वाटो ....

धाग्याचे शीर्षक दुरुस्त केलंय ... पुन्हा एकदा सांगतो वरील लिंक्स फक्त त्या बाबतीत संदर्भासाठी असून त्या अंतिम सत्य नाहीत .. योग्य शोध घेतल्यास सर्व सापडेल

तुम्ही ज्या गोष्टींबद्दल बोलू पाहताय, त्यांमुळे या वलयांकित व्यक्ती कलंकित ठरण्याची शक्यता शून्याच्या जवळपास आहे. अर्थात कोण कलंकित हे ठरवायचे ज्याचे त्याचे निकष असतातच. त्यांनाअशा एखाद्या व्यक्तीचे चांगले कार्य दुर्लक्षून एखाद्या दोषाकडेच पाहण्यात आनंद मिळणे शक्य आहे.

९९ चांगल्या गोष्टी केल्या म्हणजे एका चुकीच्या गोष्टीचा अगदि उल्लेखच करायचा नाही हे पटत नाही .
>>
ह्यालाच छिद्रान्वेषी असे म्हणतात. असं असणं चांगलं नाही म्हणतात.

आणि अजून काही लोकांबद्दल अशी माहिती मिळावी म्हणून हा धागा चालू केला

अशी माहिती मिळवून काय साध्य होणार ?

'प्रत्येक संताचा एक भूतकाळ असतो आणि पाप्याला भविष्यकाळ ' अशा अर्थाची एक म्हण इंग्रजीमधे आहे.
तात्पर्य एखादा माणूस सदासर्वकाळ, सगळ्याच बाबतीत आणि सार्वकालीन कसोट्यांवर खरा उतरेल असा असू शकत नाही.
तसं झालं तर नराचा नारायण म्हणतात त्यासारखे होईल.

प्रथम वरील लोक्स कर्तृत्वशून्य आहेत असं मी म्हटलं नाही फक्त डोक्यात फिट झालेल्या प्रतिमेला धक्का बसला अशा गोष्टी कोणत्या ते सांगितलं तर यात काय चुकलं ?... शिवाय त्यात तथ्य तर आहेच कि ...
म्हणजे आता मोठ्या लोकांबद्दल बोललं लिहलं तर फक्त चांगलंच लिहायचं आणि काही तथ्य असेल तरीही त्यांच्या कामाकडे बघून काहीच विरोधात लिहायचं बोलायचं नाही असा प्रघात कधीपासून चालू झाला ?.... मग अशांच्या प्रतिमेला छेद देऊन कोणी काही उल्लेख केला तर ते लगेच छिद्रान्वेषी होतात ..... वा धन्य झालो

जिद्दु
पहिली गोष्ट उपरिनिर्दिष्ट व्यक्तींच्या कर्तुत्वाबद्दल आपण अवाक्षरही काढलेले नाही.
दुसरी गोष्ट आपण 'दिवंगत' दिग्गजांबद्दल बोलत आहात जे त्यांच्यावरच्या आरोपांबाबत प्रतिवाद करू शकणार नाहीयेत.
तिसरी गोष्ट तुम्हाला स्वतःला ही धक्का बसला म्हणताहात तसा धक्का अजून इतरांना बसावा असं का वाटतंय तुम्हाला.

एखाद्या 'दिवंगत' व्यक्तीच्या प्रतिमाभंजनातून काय साध्य होणार?

कुठेतरी काहीतरी गफलत आहे असे नाही का वाटत?

वरतून परत 'वा धन्य झालो' म्हणताहात. Proud

९९ चांगल्या गोष्टी दुर्लक्षून एका चुकीच्या गोष्टीचाच उल्लेख म्हणजे छिद्रान्वेषीपणाच होय. खुश्शाल होऊ शकता परत धन्य! Happy

कर्तुत्ववान व्यक्तीबद्दल गॉसिप करण्यासाठी छिद्रान्वेषी प्रवृत्तीला अनुसरून हा धागा उघडला आहे ह्या मुद्द्यांना अनुमोदन.

जिद्दू,
ह्याउलट मिडियाने विवादास्पद म्हणून रंगवलेल्या जिवित व्यक्तींच्या चांगल्या कार्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. उदा अरुंधती रॉय, मेधा पाटकर, अण्णा हजारे, आमिर खान, सलमान खान इत्यादी.

वाईटातूनही चांगले शोधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी कायम केला पाहिजे.

<<<वाईटातूनही चांगले शोधण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी कायम केला पाहिजे.>>>
अगदी बरोबर.
पण हा धागा चांगल्यातले वाईट शोधण्याबद्दल आहे.
कमळ बघू नका, एकच कमळ, पण चिखल बघा किती?
थोडक्यात, कुणाहि व्यक्ती बद्दल असलेला आदर घालवून कसा टाकता येईल ते बघा.
अगदी स्वतःच्या आईचे प्रेम न बघता, तिने अनेकदा मला खेळणे कमी अभ्यास जास्त असे सांगितले. यावरून लहान मुलांवर अत्याचार करण्याची तिची कशी प्रवृत्ति होती ते सांगा!

कमळ बघू सुद्धा नका,

आणि कमल सुद्धा टक लावून बघू नका, उद्या ती मी टू म्हणेल Lol