हिवाळा स्पेशल लज्जतदार ओल्या तुरीचे (तूरदाण्यांचे) पराठे

Submitted by मनिम्याऊ on 20 November, 2018 - 06:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

तुरीच्या शेंगा १/२ किलो
लहान कांदा १
लहान टोमॅटो १
कोथिंबीर बारीक चिरलेली
आले लसूण पेस्ट १ चमचा
लसूण ४-५ पाकळ्या
हिरव्या मिरच्या १-२
जिरे १ चमचा
तेल फोडणीसाठी
हळद १ चमचा
मीठ चवीनुसार
मळलेली कणीक
हाताशी भरपूर वेळ
IMG_20181120_160825.JPG

क्रमवार पाककृती: 

प्रथम शेंगा सोलून तुरीचे दाणे काढून घ्या. (हे फार कंटाळवाणे काम आहे तसेच शेंगा सोलताना नखे व बोटांची पेर काळी होतात. योग्य ते खबरदारी घेणे)
कुकरमध्ये मीठ आणि किंचित हळद (हळद ऑपशनल) घालून २-३ शिट्या देऊन वाफवून घ्या. (मी सरळ अख्या शेंगा मीठ-हळद घालून कुकरला उकडून घेते आणि मग दाणे काढते. फारच पटकन निघतात.)
IMG_20181116_204234.jpg
यानंतर दाणे चाळणीवर घेऊन पाणी निथळून घ्या.

पॅनमध्ये एक लहान चमचाभर तेल गरम करून त्यात जिरे लसूण आणि मिरचीवर तुरदाणे चांगले खमंग परतून घ्या.

IMG_20181120_164539_0.JPG

थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या (हवे असल्यास किंचित पाणी घालावे)

आता परत एकदा पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आलेलसूण पेस्ट घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतून घ्या. आता त्यात टोमॅटो आणि कोथिंबीर घालून तेल सुटेपर्यंत शिजवा.

यानंतर वाटलेले तूरदाण्यांचे मिश्रण घालून थोडे थोडे पाणी टाकत साधारण बटाट्याच्या सारणासारखी कंसीस्टंसी येईपर्यंत वाफेवर छान शिजवून घ्या.

IMG_20181120_164652.JPG

तयार सारण थंड झाले की नेहमीप्रमाणेच पराठे बनवा.

चटणी/ केचप/ दही बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
IMG_20181120_164055.JPG

वाढणी/प्रमाण: 
2
माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे प्रकार!
शेंगा दिसतायेत बाजारात आणून हा प्रयोग करण्यात येईल!

तों पा सु रेसीपी Happy कल्पना छान Happy पाकृ करता करता उकडलेल्या शेन्गा खाता येतील उचलुन Happy

आम्ही तुरीच्या शेन्गांच्या दाण्यांची आमटी करतो नेहमी Happy
फोटो खुपच छान आलेत..
शेवटच्या फोटो मधली रन्गसन्गती एकदम झकास Happy

मस्त!

आमच्यात या शेंगा नुसत्याच मिठाच्या पाण्यात उकडून डायरेक्ट दाणे खाल्ले जातात. कधीतरी रिकामपणी याचे पराठे करण्याचा कुटाणा करण्यात येईल.

बाकी हा पराठा = दाल-रोटी खाण्याची वेगळी पद्धत. Lol (दिवे घ्या)

हिरवी चटणी कसली आहे? छान पोपटी रंग दिसतोय.

धन्यवाद सर्वाना.
<<पाकृ करता करता उकडलेल्या शेन्गा खाता येतील उचलुन>>
अगदी अगदी Wink
<<हिरवी चटणी कसली आहे? छान पोपटी रंग दिसतोय>>
ती चटनी खोबरे कोथिम्बिर मिरची जीरे आणि मीठ दह्यात एकत्र वाटून केली आहे

<<वा. मस्तच. नक्की करुन बघेन.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 November, 2018 - 12:05>>
जागु ताई नक्की कर आणि तुझा अभिप्राय सांग इथे Happy

भारीच कुटाणा अहे हा.
तीन वेळा तुरीचे दाणे शिजवायचे.
आणि मग पुन्हा पराठ्यात.

<<भारीच कुटाणा अहे हा.
तीन वेळा तुरीचे दाणे शिजवायचे.
आणि मग पुन्हा पराठ्यात.

Submitted by सस्मित on 22 November, 2018 - 15:36>>
कुटाणा तर आहेच. but its worth it Wink

IMG_20180823_202353.jpg

हिच पद्धति वापरून केलेले सोयबीनचे पराठे

IMG_20180909_145257.jpg

ताटात उजवीकडे सोयाबीनच्या उकडलेल्या शेंगा आहेत