आपण का कमी पडतोय?

Submitted by दीपा जोशी on 26 October, 2018 - 00:33

आपण का कमी पडतोय?

प्रसंग १….

स्थळ:अमेरिका; वॉल मार्ट आणि इत्तर मोठे मॉल .

आम्ही रोज वापरण्यासाठी नॉनस्टिक भांड्याना पर्याय म्हणून काही स्टीलची भांडी शोधतोय. वरण / आमटी वाढण्यासाठी डाव, स्टीलची कढई, किंवा जाड बुडाचे स्टीलचे पातेले … इत्यादी. नॉनस्टिक पॅन्स /चमचे/डाव हे आम्ही मुळीच वापरत नाही. आणि इथे तर सर्रास अशीच भांडी उपलब्ध होती. आम्हाला पाहिजे तश्या वस्तु मिळतच नाहीयेत. बऱ्याच वेळाने एका मॉल मध्ये पाहिजे तसा छोटा छानसा डाव मिळाला. त्याशिवाय, अगदी हवे तसे नसले तरी- स्टीलचे, कढई सारखे काम-चलाऊ भांडे आणि जाड बुडाचे एक पातेल्यासारखे भांडे मिळाले. मी खुश.

सहज उत्सुकतेने ‘मेड इन’ कुठले ते बघितले. सगळी भांडी ‘मेड- इन- चायना’ होती. एकदम मनात विचार आला … ही भांडी घेऊन आपण चीनच्या अर्थव्यवस्थेला कणभर का होईना पण हातभार लावण्याचं काम करणार. पण इलाज नव्हता. भांडी घेणे भागच होते.

प्रसंग २ रा …

स्थळ : अमेरिका; ‘टार्गेट’ आणि ‘वॉलमार्ट’ सुपरमार्केट्स

आम्ही आमच्या मापाचे आणि रास्त दर असलेले कपडे शोधतोय. त्यामध्ये, आमच्या तान्ह्या नाती साठी देखील अंगाला येणाऱ्या मापाचे संपूर्ण सुती फ्रॉक्स, झबली बघतोय. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि फॅशनच्या कपड्यानी खचाखच भरलेल्या दालनातून शोधताना आम्हाला हवे असलेले कपडे मिळाले. सवयीनुसार आणि ‘मेड इन चायना’’ नकोय ही खबरदारी म्हणून, ‘मेड -इन’ कुठले? हे पहिले. निवडलेले सगळे कपडे वेगवेगळ्या देशातील होते. नातीची झबली ‘मेड -इन’ थायलंड अथवा कोरिया होती. एक झबले तर इथिओपिया या आफ्रिकन देशातले होते. बरा वाटलेला एक शर्ट होता, ‘मेड- इन- पकिस्तान.’

प्रसंग ३ रा

स्थळ: अमेरिका, बाळंतिणींचे हॉस्पिटल.

प्रसंग : हॉस्पिटल अतिशय सुव्यवस्थित, सुनियोजित आणि नियमांना बांधील असलेले. शहरात एकूणच दर्जा साठी नावाजलेले. हॉस्पिटलमधील बाळंतिणीच्या खोलीतल्या पाळण्यात ठेवलेल्या, नुकत्याच जन्मलेल्या आमच्या नातीला आम्ही पाहायला आलेलो.पद्धतशीरपणे दुपट्यात बाळाला गुंडाळून ठेवलेले. अशी दोन छानशी मोठी दुपटी बाळासाठी हॉस्पिटलकडून मिळाली होती. उबदार दुपट्यात बाळ मस्त झोपलेलं. ती दुपटी आम्हाला आवडली. आपण अजून अशी दुपटी विकत घ्यावीत म्हणून आम्ही लेबल पाहू लागलो. लेबल होतं, ‘मेड- इन- पाकिस्तान’ चं.
मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. दर्जेदार हॉस्पिटल कडून माल घेतला जातो, म्हणजे त्या दुपटी-निर्मात्याचा तो एक प्रकारे बहुमानच की.
पाकिस्तानमधील व्यापार्याचा माल अमेरिकेत निर्यात होतो, चिनी व्यापारी निर्यातीत आघाडीवर आहेत. कोरिया, थायलंड, या देशांतून अमेरिकेत वस्तू येतात......
…. पण भारतातून आलेली क्वचित एखादी वस्तू नजरेला पडते.
भारतात चांगल्या वस्तू बनत नाहीत असे नाही.
मग भारतीय माल अमेरिकेसारख्या बाजारपेठेत सर्रास का बरं दिसत नाही?
याला कारण भारताचं निर्यात धोरण? व्यापाऱ्यांचे प्रयत्न कमी पडतात?
मालाचा दर्जा मान्यता प्राप्त नाही?

आपण कुठे कमी पडतोय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल तसं नाही म्हणायचंय. कपडे निर्यातीत चीप लेबर शिवाय पर्याय नाही. सो भारताला निर्यात वाढवायची असेल तर हाय मार्जिन क्षेत्रांकडे जास्त बघायला हरकत नाही.
भारतात बांग्लादेशापेक्षा किंवा इतकंच चीप लेबर असेल किंवा नसेल त्याबद्द्ल बोलत न्हवतो.

अमित, मी केवळ तुला उद्देशून नाही म्हंटलं तसं. फा च्या पोस्ट मध्येही तसा टोन जाणवला. म्हणून म्हंटलं.

>> दुसरे म्हणजे आपल्या देशातील कामगारांना कमीत कमी पगार, सुविधा, मानवी अधिकार ई देउन अत्यंत स्वस्तात माल विकसित देशांकरता तयार करणे, यात अनेक आशियाई देश "पुढारलेले" आहेत. भारताला तिकडे जायची गरज नाही.

<<< हे निर्यात करणे म्हणजे काही भारी काम नाही, भारताने त्यात पडू नये बाबतही सहमत. >> Lol
खरं आहे. आधी उत्तम क्वालिटीचा माल भारतात उपलब्ध करून द्यावा. नाहीतर चायना आहेच तिथे पण, भारतात गणपतीच्या मूर्ती पाठवायला.

मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. एक उदाहरण देतो. एका प्लँटमधे मी पूर्वी काम करत असे, तिथे खूप हाय टॉर्कची १ विशिष्ट डी.सी. मोटर हवी होती जिचा आकार अतिशय छोटा हवा होता. केवळ १८० वॉटच्या त्या मोटरची किंमत त्या काळी १ लाख रुपये होती जी इंपोर्ट करावी लागत असे. आम्ही १ सँपल तुम्हाला देतो, त्याची कॉपी मारा असे किर्लोस्कर कंपनीला सांगितले. त्यांनी किंवा इतरांनी बराच प्रयत्न करूनही त्या आकारात आणि त्या टॉर्कमध्ये मोटर बनवायला जमले नाही. खरे वाटत नसेल तर अजूनही अल्ट्राटेक सिमेंटच्या प्लँटमध्ये जाऊन स्टॅकर्/रिक्लेमरची ती मोटर बघून या. निव्वळ एका मोटरमुळे पूर्ण प्लँट बंद पडू शकतो, म्हणून १ लाख प्रत्येकी अशा २ मोटर्स नेहमी स्पेअर ठेवाव्या लागतात.

निर्यात मध्ये 'गूड्स आणि सर्विसेस' दोन्ही येतं की .... २८ बिलिअनच्या निर्यतीत सर्विसेस मध्ये आयटी क्षेत्राचीची निर्यात निम्मी म्हणजे १५ बिलिअन असेल.. त्यात तर जगातल्या सगळ्या देशांना पुरून ऊरतो की भारत? की सर्वे फक्त 'वॉलमार्टात मिळाले पाहिजे' ह्या क्रायटेरिआ वर आहे?

लो क्वालिटी ईंडस्ट्रीअल गूड्सची निर्यात करून पर्यावरणाच्या र्‍हासाची मोठी किंमत मोजावी लागेल.. चायना मोजत आहे... भारतही.. त्याएवजी सर्विसेस आणि मनुष्यबळ निर्यात बेस्ट.

>>>अमेरिका-भारत ट्रेड डेफिसिट २७ बिलिअन डॉलर्सचे आहे.
>>> हाब ते अमेरिकेचं डेफिसिट आहे. तात्याला समजलं तर पगारातून कापून घेईल आपल्या. आज शुक्रवार आहे

हो सशल भारतात चीप लेबर वापरले जाते. पण भारताने त्या रेस मधे जायची गरज नाही असे म्हणतोय. कारण ती उलटीकडे वाटचाल आहे.

की सर्वे फक्त 'वॉलमार्टात मिळाले पाहिजे' ह्या क्रायटेरिआ वर आहे? >> वॉलमार्टात सर्विस करायला देसी दिसतात तेंव्हा एखादा तरी टक्का धरू शकतोस Happy

"वॉलमार्टात सर्विस करायला देसी दिसतात" - वॉलमार्ट होम ऑफिस आणी व्हेंडर्स म्हणतोयस का? कारण तिथे 'देसियांची मांदियाळी' आहे. 'माझिया देशाचा मिळो कोणी' असं म्हणायची सुद्धा गरज नाहीये. Wink

माझ्या अनुभवानुसार गॅप , ओल्ड नेव्ही , कोहल्स सारख्या शॉप मध्ये भरपूर मेड इन इंडियन प्रॉडक्ट (कपडॆ ) मिळतात , हे नक्कीच आहे कि इथे खूप चायनीज प्रॉडक्ट्स भेटतात कारण त्या माघे चीन ने खूप प्रयत्नपूर्वक काबीज केलेली बाजारपेठ , नियोजनपूर्वक लोकांच्या गरज ओळखून त्या गोष्टी मार्केट मध्ये उपलब्ध करून देण्याची योजना राबवलेली आहे. आपण ह्या मध्ये नक्कीच कमी पडलो आहे , त्या साठी सरकारी धोरण आणि बाबूशाही कारणीभूत आहे .. आज ही भारता मध्ये नवीन उद्योग सुरु करणे अवघड आहे , जरी आता थोडीशी लवचिकता सुरु झाली आहे पण म्हणावा तसा परिणाम दिसायला वेळ लागेल

निर्यात वाढवायचा प्रयन्त केला पाहिजे. खास करुन कपड्याचा बाबतित. भारत साधरण $2-3B चा कापुस चीन ला निर्यात करतो, त्याएवजी जर कपडे निर्यात केले तर पाच पट मिळु शकतात.
काही बाबतीत भारताची निर्यात खुप चांगली आहे. Clarke मध्ये चांगले शुज शक्यतो भारतात बनलेले असतात. पॅकिंग पण जबरदस्त असते.
डायमड व्यापार मध्ये, हिर्याच्या पैलु पाडण्यामध्ये भारत १ नंबर आहे. IT आणि सर्विस सेंटर मध्ये भारत एक नंबर आहे.
स्किल्ड मनुष्यबळ निर्यात मध्ये पण एक नंबर आहे मग ते IT असो नाहीतर हॉटेल विकत घेण्यामध्ये असो. मागे NPR News वर ऐकले होते, अमेरिकेत ५०% हॉटेल भारतीय वंशाच्या लोकाच्या मालकीचे आहेत.

इतक्या लोकांचे प्रतिसाद पाहून असे वाटते की , दिपा जोशी यांना ' आम्ही अमेरिकेत आहोत ' एव्हढेच अधोरेखित करावयाचे आहे की काय ? असेल बुवा.

अमा << आता राहायचे अमेरिकेत तिथे भारती य दुय्यम दर्जाचा माल कश्याला शोधताय.>>
आम्ही भारतीय मालच शोधत होतो असे विधान मी कुठेही केलेले नाही. तरीही भारतीय माणसाच्या गरजाना भारतीय माल जवळचा वाटणे स्वाभाविक आहे . मला जाणवलेला इत्तर देशांच्या तुलनेत भारतीय मालाचा अभाव यावरून हा धागा निघालाय.
भारतीय माल दुय्यम दर्जाचा आहे? कोणत्या बाबतीत ? स्पष्ट केलेत तर बरं होईल.
अमेरिकेतल्या वॉलमार्ट , टार्गेट अशा दुकानात फक्त कपडे किंवा भांडी एवढ्या लिमिटेड अनुभवांवर तुम्ही एकदम भारताच्या निर्यात धोरणावर भाष्य करताय? >.> लेखात मी कोणतही भाष्य केलं नाहीय. माझ्या निरीक्षणावरून जे प्रश्न मनात निर्माण झाले, ते फक्त या धाग्यात मांडलेत. माहितगारांकडून/ जाणकारांकडून काही माहिती मिळेल एवढाच हेतू.

चौकट राजा <<अमेरिकेत फुटपाथा वरून चालताना ड्रेनेज च्या मेनहोल ची लोखंडी झाकणं नीट बघा. मेड इन ईंडिया असतात. माझ्या रहात्या शहरात हा अनुभव आल्यावर मी गंमत म्हणून बाहेरगावी गेल्यावरही लक्ष देऊन बघू लागलो तेव्हा बहुतांशी ठिकाणी मला ती मेड इन इंडिया दिसली आहेत.>> आम्ही पण आता थोडं लक्ष देऊन बघू नक्की.

नंद्या ४३ <<यात भारताचे मार्केटिंग कमी पडत असेल.>> मलाही असेच काही कारण असेल तर जाणून घ्यायचे आहे.

सीमा<<दीपा , तुमचा डाटा सेट खुप छोटा आहे आणि जनरिक आहे त्यामुळ त्यावरून ठोस मत तयार करणं योग्य होणार नाही.>> शक्य आहे. पण तसे नसेल, भारतीय माल देखील इथल्या बाजारपेठेत उपलब्ध असेल तर आनंदच आहे!

या धाग्यावर आपले मत व्यक्त करून थोडीफार चर्चा केलीत , माहिति दिलीत, सर्वान्चे मनापासून आभार!

Jayant shimpi <<इतक्या लोकांचे प्रतिसाद पाहून असे वाटते की , दिपा जोशी यांना ' आम्ही अमेरिकेत आहोत ' एव्हढेच अधोरेखित करावयाचे आहे की काय ? असेल बुवा.>> तुमच्या विधानावर खूप हसू आले. अहो , अमेरिकेतच नाही तर जगभर आपले हुशार लोक कर्तृत्वाने पुढे येत आहेत. आम्ही फक्त नातीच्या कारणास्तव अमेरिकेत आहोत. त्यात सांगण्यासारखे काय आहे?
मायबोलीचे व्यासपीठ आपले विचार व्यक्त करण्यासाठी आहे. त्यामध्ये आपले निरीक्षण आणि मत व्यक्त केले, माहितगारांकडून माहिती घेतली, तर वाईट काय आहे?
इतक्या लोकांना प्रतिसाद द्यावे वाटले, ते त्यांना काही वेळ जात नाही म्हणून नाही. सगळे आपल्या व्यापात बुडालेले आहेत. तरी पण त्यांना त्यांच्या अनुभवावर आधारित विचार मांडावे वाटले , हे खरे प्रशंसनीय आहे.

चीनने आर्थिक वृद्धीसाठी निवडलेला मार्ग निर्यातीवर भर देणार्‍या अर्थव्यवस्थेचा होता. Export led growth model.

सोलर, सेमी मार्केट चीनने काबीज केले आहे. कित्येक इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट्स, मशिनरी जे आपण युरोप मधून इम्पोर्ट करतो त्याला आता चीनने टक्कर द्यायला सुरुवात केली आहे, भारतात उत्पादन होत नाही. यात मूळ चायनीज कंपनीज तसेच चीन मध्ये उत्पादन करणाऱ्या युरोपियन कंपनीज आहेत.

मी पण प्रत्येक खरेदीच्या वेळी वस्तू कुठे बनली आहे हे बघतोच... लहान मुलान्ची खेळणी, भान्डी या मधे made in china ला पर्याय नाही आहे आणि किमतीच्या बाबतीत त्यान्ची बरोबरी करता येत नाही. कपड्यान्च्या बाबतीत बान्गलादेश, पाक, आता फिलीपिन्स, अगदी (तुरळक ठिकाणी) हैती पण दिसते...

चीनची निर्यात आपल्या निर्यातीपेक्षा खूप जास्त आहे. त्या देशात एफ डी आय सुध्दा आपल्यापेक्षा अधिक आहे.

भारत अमेरिकेला निर्यात करण्याबाबत कुठे कमी पडतोय असा विषय आहे. चर्चा करणे ठीक आहे. पण माझ्या मते हा कन्सर्न असण्यासारखा विषय नाही. "मेड इन चायना" अमेरिकेत अनेक ठिकाणी दिसेल. चीन प्रगत राष्ट्र आहे. "मेड इन सिंगापोर" फार कुठे दिसणार नाही. तरीही सिंगापोर प्रगत देशांत गणला जातो. या उलट पाकिस्तानचे उदाहरण खुद्द धाग्यातच दिले आहे. करन्सी जितकी दुबळी, तितका त्या देशातील माल स्वस्त. तितकी तेथून निर्यात जास्त (प्रोव्हायडेड कि मालाचा दर्जा चांगला. हे बेसिक तर आहेच). त्यामुळे माझ्या मते निर्यात करण्यात कमी का पडतो हा काळजीचा विषय असण्याचे कारण नाही. एखाद्या देशात नैसर्गिकरीत्या असलेल्या साधनसामुग्रीच्या तसेच तिथे निर्माण केल्या जाणाऱ्या मालाच्या दर्जाच्या तुलनेत त्या देशाची करन्सी दुबळी असणे/होणे हे मात्र नक्कीच काळजी करण्यासारखे आहे. पण त्याची कारणे हा ह्या धाग्याचा विषय नाही.

मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
>> Submitted by उपाशी बोका on 26 October, 2018 - 22:46

या प्रतिसादात दिलेले उदाहरण खूप बोलके आहे. अशा वस्तू आपल्याला का निर्माण करता येत नाहीत?
दुसरीकडे याच्या उलट उदाहरण पण आहे. कित्येक गरीब कारागिरांनी बनवलेल्या वस्तू भारतीय बाजारपेठेत रस्त्यावर घासाघीस करून मागितल्या जातात. परवाच एका ग्रामीण भागातल्या बाजारपेठेत मेसकाठीपासून बनवलेल्या अतिशय सुबक बुट्ट्या पाहिल्या. फळे भाज्या ठेवण्यासाठी. काही खुर्च्या पण बनवलेल्या होत्या. हे सगळे कवडीमोल भावात विकले जात होते. काही वर्षापूर्वी अशाच याच दर्जाच्या वस्तू इंग्लंडमध्ये कितीतरी अधिक पटीने किंमत कमावताना पाहिल्यात.

देशात दर्जेदार मालाची निर्मिती होणे आणि ते निर्माण करणाऱ्यांची देशातल्या देशात पिळवणूक न होणे या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. या गोष्टी खऱ्या कन्सर्न असण्यासारख्या आहेत.

Pages