आपण का कमी पडतोय?

Submitted by दीपा जोशी on 26 October, 2018 - 00:33

आपण का कमी पडतोय?

प्रसंग १….

स्थळ:अमेरिका; वॉल मार्ट आणि इत्तर मोठे मॉल .

आम्ही रोज वापरण्यासाठी नॉनस्टिक भांड्याना पर्याय म्हणून काही स्टीलची भांडी शोधतोय. वरण / आमटी वाढण्यासाठी डाव, स्टीलची कढई, किंवा जाड बुडाचे स्टीलचे पातेले … इत्यादी. नॉनस्टिक पॅन्स /चमचे/डाव हे आम्ही मुळीच वापरत नाही. आणि इथे तर सर्रास अशीच भांडी उपलब्ध होती. आम्हाला पाहिजे तश्या वस्तु मिळतच नाहीयेत. बऱ्याच वेळाने एका मॉल मध्ये पाहिजे तसा छोटा छानसा डाव मिळाला. त्याशिवाय, अगदी हवे तसे नसले तरी- स्टीलचे, कढई सारखे काम-चलाऊ भांडे आणि जाड बुडाचे एक पातेल्यासारखे भांडे मिळाले. मी खुश.

सहज उत्सुकतेने ‘मेड इन’ कुठले ते बघितले. सगळी भांडी ‘मेड- इन- चायना’ होती. एकदम मनात विचार आला … ही भांडी घेऊन आपण चीनच्या अर्थव्यवस्थेला कणभर का होईना पण हातभार लावण्याचं काम करणार. पण इलाज नव्हता. भांडी घेणे भागच होते.

प्रसंग २ रा …

स्थळ : अमेरिका; ‘टार्गेट’ आणि ‘वॉलमार्ट’ सुपरमार्केट्स

आम्ही आमच्या मापाचे आणि रास्त दर असलेले कपडे शोधतोय. त्यामध्ये, आमच्या तान्ह्या नाती साठी देखील अंगाला येणाऱ्या मापाचे संपूर्ण सुती फ्रॉक्स, झबली बघतोय. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि फॅशनच्या कपड्यानी खचाखच भरलेल्या दालनातून शोधताना आम्हाला हवे असलेले कपडे मिळाले. सवयीनुसार आणि ‘मेड इन चायना’’ नकोय ही खबरदारी म्हणून, ‘मेड -इन’ कुठले? हे पहिले. निवडलेले सगळे कपडे वेगवेगळ्या देशातील होते. नातीची झबली ‘मेड -इन’ थायलंड अथवा कोरिया होती. एक झबले तर इथिओपिया या आफ्रिकन देशातले होते. बरा वाटलेला एक शर्ट होता, ‘मेड- इन- पकिस्तान.’

प्रसंग ३ रा

स्थळ: अमेरिका, बाळंतिणींचे हॉस्पिटल.

प्रसंग : हॉस्पिटल अतिशय सुव्यवस्थित, सुनियोजित आणि नियमांना बांधील असलेले. शहरात एकूणच दर्जा साठी नावाजलेले. हॉस्पिटलमधील बाळंतिणीच्या खोलीतल्या पाळण्यात ठेवलेल्या, नुकत्याच जन्मलेल्या आमच्या नातीला आम्ही पाहायला आलेलो.पद्धतशीरपणे दुपट्यात बाळाला गुंडाळून ठेवलेले. अशी दोन छानशी मोठी दुपटी बाळासाठी हॉस्पिटलकडून मिळाली होती. उबदार दुपट्यात बाळ मस्त झोपलेलं. ती दुपटी आम्हाला आवडली. आपण अजून अशी दुपटी विकत घ्यावीत म्हणून आम्ही लेबल पाहू लागलो. लेबल होतं, ‘मेड- इन- पाकिस्तान’ चं.
मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. दर्जेदार हॉस्पिटल कडून माल घेतला जातो, म्हणजे त्या दुपटी-निर्मात्याचा तो एक प्रकारे बहुमानच की.
पाकिस्तानमधील व्यापार्याचा माल अमेरिकेत निर्यात होतो, चिनी व्यापारी निर्यातीत आघाडीवर आहेत. कोरिया, थायलंड, या देशांतून अमेरिकेत वस्तू येतात......
…. पण भारतातून आलेली क्वचित एखादी वस्तू नजरेला पडते.
भारतात चांगल्या वस्तू बनत नाहीत असे नाही.
मग भारतीय माल अमेरिकेसारख्या बाजारपेठेत सर्रास का बरं दिसत नाही?
याला कारण भारताचं निर्यात धोरण? व्यापाऱ्यांचे प्रयत्न कमी पडतात?
मालाचा दर्जा मान्यता प्राप्त नाही?

आपण कुठे कमी पडतोय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://wits.worldbank.org/CountrySnapshot/en/IND/textview

The total value of exports (FOB) is US$ 260,327 million.
The total value of imports (CIF) is US$ 356,705 million.
At the HS6 digit level, 4,411 products are exported to 219 countries and 4,310 products are imported from 211 countries.

हा वर्ल्ड बॅक साइ ट वरचा २०१६ चा डेटा. अजून एक्स्पो र्ट वाढावा ह्या साठी काय स्टेप्स घ्या व्या भार ताने असे आपले मत आहे? कृपया शेअर करा. काका टॅरिफ लावतील का? कश्या कश्यावर टॅरिफ लागू होतील ते आयटेम सांगा. म्हणजे स्टेप्स घ्यायला सांगता येइल सरकारला व व्यापार्‍यांना.

टोटल एक्स्पो र्ट चा गूड्स व सर्विसेस वाइज ब्रेकप हवा असल्यास तो ही शेअर करते. धन्यवाद.

मेड इन इंडीया वस्तु खालील सर्व ब्रँडेड दुकानात भरपूर आणि उत्तम मिळतात. त्यामुळ दर्जा वगैरेचा नक्कीच प्रश्न नसावा.
बनाना रिपब्लिक,
लॉफ्ट,
अ‍ॅन टेलर,
जे क्र्यु,
अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी,
टारगेटचा थ्री शोल्ड ब्रँड,
टारगेटचा ओपल हाऊस ब्रँड,
Aeropostale,
अरबन आउटफिटर्स,
क्रेट अँड बॅरल (CB2)
पॉटरी बार्न ,
रिस्टोरेशन हार्डवेअर,
वेस्ट एल्म,
पीअर वन
कार्टर, चिल्डर्न प्लेस, जिम्बोरी, गॅप , गॅप किड्स ,
होम गुड्स मधल्या बर्‍याच वस्तु (मार्बल चीज बोर्ड वगैरे)
वस्तु इथोपियातून किंवा पाकिस्तानातुन आली आहे म्हणुन तीचा दर्जा वगैरे कमी अधीक असेल अस नाही होत. याला कारण कंपन्याचे क्वालीटीचे मेट्रीक्स ठरलेले असतात. त्यामुळ वस्तु खराब निघालीच तर कुठल्या देशातून बनून आली आहे पेक्षा QA कमी पडलेलं. भरपुर वस्तु दिसतील तुम्हाला मेड इन इंडीया.
याचा अर्थ असा नव्हे कि उत्तम दर्जा म्हणुन तर चीप आणि इझीली अव्हाईलेबल लेबर . कंपन्या दर्जा मेंटेन करुन आपल्या इथून काम करवून घेतात.
इतक्या दिव्सानंतर मला अमेरिकतल हेल्थ केअर हे एक फिल्ड अस दिसलय कि जे अजुनही फारस आउट सोर्स करता आल नाहीये. याला कारण HIPPA regulations etc. बाकी भारतातून आलेल मनुष्य बळ आणि वस्तु भरपूर दिसतात. Happy

The top products that are exported to the Us are:
Basmati Rice.
Mica.
Pani Puri Making Machine.
Beef.
Orthopedic Devices.
Spices.
Garments.
Tea.

हे सर्वात जास्त एक्स्पोर्ट होतात.

हेल्थ केअर एक्स्पोर्ट करण्यापेक्षा पेशंट इथे येउन सर्जरी करोन जातात अमेरिकेपेक्षा स्वस्तात होते. मेडिकल टुरिझम असे नाव आहे.

स्टी ल व अ‍ॅलुमिनीअम उत्पादने $ १.५ बिलिअन इतके एक्स्पोर्ट आहे आजमितीला. टॅरिफ मधले इशू दूर झाले तर ते वाढेल. चणे चिकपी व -लेंटिल वरील ड्यूटी पण ३०-४० वरून ७० केली आहे त्याचा ही फटका बसतो आहे. लुक्स लाइक यू गाइज आर गोइन्ग टू प्रोडू स इट देअर इट्सेल्फ. एक्स्पोर्ट वाढू शकतात पण अमेरिकन सर्कार सध्या प्रोटेक्षनिस्ट मोड मध्ये आहे वॉर नाही तर ट्रेड वॉर तरी चालू केलेच आहे. जरा शब्द टाकून बघा ना.

Ama ani seema, tumchi mahiti chan ahe. pan mala disle tase baki kahi deshanchya tulnemadhe bhartiy mal saglikade nahi milat.

Ama ani seema, tumchi mahiti chan ahe. pan mala disle tase baki kahi deshanchya tulnemadhe bhartiy mal saglikade nahi milat.>> आता राहायचे अमेरिकेत तिथे भारती य दुय्यम दर्जाचा माल कश्याला शोधताय. उच्च दर्जाचा माल भरपूर एक्स्पोर्ट होतो. जसे टावेल्स शीट्स बेड लिनन पण तो महाग दुकानांतून बुटीक्स मधून असेल कदाचित. तुम्ही तीनच लोकेशन्स दिलीत. त्यांची वेगळी अ‍ॅरेंजमेंट असेल कदाचित. परत असे आहे ना ज्या देशाची स्पेशालि टी ते तिथे विकतात. इजिप्शिअन कॉटन हाय दर्जाचे त्याचे शीट्स. उदा. पाकिस्तानी हँड वर्क. टारगेट वालमार्ट इथे मॅनेजर ला विचारल्यास खरी माहिती मिळेल. पन ही जनतेची दुकाने आहेत. हाय एंड स्टफ नव्हे.
तिथे अगदी अगदी कमी किंमत पर पीस निगोशिएट करून भली मोठी ऑर डर देतात. ती आपल्या पक्षी आमच्या भारतीय मालाला कदाचित परव्डत नसेल. खाद्यपदार्थात भरपूर व्हरायटी दिसेल. पण ती देखील पाकिस्तानात बनलेली असू शकते. शान मसाले वगैरे. आपल्या राधिका ताई पन करतातच की एक्स्पोर्ट. फिअर नॉट.

दर्जेदार हॉस्पिटल कडून माल घेतला जातो, म्हणजे त्या दुपटी-निर्मात्याचा तो एक प्रकारे बहुमानच की. >> दुपटी, डायपर्स, वाइप्स, क्लीनिंग सप्लाईज, पेशंटला देत असलेले गाउन्स हे सर्व मोठ्या व्हॉल्युमवर लागणारे , आणि त्यामुळे खर्चिक प्रकार. त्यात काही मॅनुफॅक्चरिंग स्किल्स नाही, कॉम्प्लेक्सिटी नाही, की इनोव्हेशन नाही. कमी पैशात हॉस्पिटलने सांगितलेले बेसिक स्टँडर्ड मेन्टेन करता आले आणि क्वांटिटी वेळेत सप्लाय करता आले की बस. बहुमान कसला आलाय त्यात !

अमेरिकेतल्या वॉलमार्ट , टार्गेट अशा दुकानात फक्त कपडे किंवा भांडी एवढ्या लिमिटेड अनुभवांवर तुम्ही एकदम भारताच्या निर्यात धोरणावर भाष्य करताय? इतर देशात निर्यात होणार्‍या गोष्टी, अमेरिकेत देखील कपडे वगळुन इतर निर्यात होणार्‍या कित्येक गोष्टी आहेत. सीमाने कपडे / फर्निचर यांची यादी दिलीच आहे.

मेडिकल सप्लाइज, व्हिस्की, पेन्झी सारख्या प्रतिष्ठीत ब्रँड करता मसाले , अगदी फिशिंग ल्युअर सुद्धा एक्स्पोर्ट होतात भारतातून अमेरिकेत आणि इतर देशात. तुमच्या कक्षेत येत नसतील एवढेच

जाता जाता गंमत म्हणून - अमेरिकेत फुटपाथा वरून चालताना ड्रेनेज च्या मेनहोल ची लोखंडी झाकणं नीट बघा. मेड इन ईंडिया असतात. माझ्या रहात्या शहरात हा अनुभव आल्यावर मी गंमत म्हणून बाहेरगावी गेल्यावरही लक्ष देऊन बघू लागलो तेव्हा बहुतांशी ठिकाणी मला ती मेड इन इंडिया दिसली आहेत.

यात भारताचे मार्केटिंग कमी पडत असेल.
शिवाय काँट्रॅक्ट मधे असलेल्या गोष्टी न पाळणे अशीहि कारणे असू शकतात. मी ज्या इंजिनियरिंग कंपनीत काम करत होतो, तिथे माझे काही मित्र भारतातील निरनिराळ्या कंपनीतून टेक्नॉलॉजी विकत घ्यायला आले होते. त्याबद्दल आमच्या भारतीय व्हाईस प्रेसिडेंटने हा अनुभव सांगितला.
भारतीय ग्रोसरी दुकानांमधे एखादी गोष्ट हमखास मिळेलच असे नाही. बहुतेक मालक सांगतात की त्यांची अशी काही सिस्टीम नाही, तिकडन जे येईल ते विकतो नि विकल्या जाते. मग कशाला उगाच पैसे खर्च करून डोक्याला ताप करून घ्यायचा?
(तिकडे भारतात मात्र सॅप, त्यातल्या सप्लाय चेन सॉफ्टवेअरचे अनेक तज्ञ आहेत म्हणे. ते सर्व फक्त अमेरिकेत किंवा इतरत्र जाऊन काम करतात. भारतीय व्यापार्‍यांना त्याची गरज भारतात भासत नसावी. )

स्टीलची भांडी मोठ्या भारतीय ग्रोसरीच्या दुकानात पाहिली आहेत. माझे स्वयंपाकघरातील गोष्टींचे ज्ञान जरा कमीच, (जरा कमी काय, बायकांच्या मते अजिबात नाहीच. ) पण काही काही भारतात बघितलेल्या भांड्यांसारखी भांडी दिसली. (अर्थात तीहि चीनमधे बनवलेली असल्यास माहित नाही)

मेड इन इंडिया कपडे, भांडी वगैरे सुद्धा भरपूर मिळतात. किंबहूना, मी तरी कपडे वगैरे घेताना आवड, क्वालिटी, किंमत वगैरे गोष्टी बघून घेतो. त्यामुळे ते मेड इन कुठे आहेत हे खरच कधी बघितलं नाहीये. पण एक अंदाज असा आहे की ह्या अमेरिकन कंपन्या, वेगवेगळ्या देशात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्ट्स मधून निवड न करता, सप्लायर ठरवून, त्यांची स्पेसिफिकेशन्स देऊन, वस्तू बनवून घेत असतील. त्यामुळे त्या 'मेड इन' टॅग ला फारसा अर्थ नसावा.

>> मी तरी कपडे वगैरे घेताना आवड, क्वालिटी, किंमत वगैरे गोष्टी बघून घेतो. त्यामुळे ते मेड इन कुठे आहेत हे खरच कधी बघितलं नाहीये.>> सहमत.

मेड इन इंडिया कपडे, भांडी वगैरे सुद्धा भरपूर मिळतात >>> हो कपडे मी अनेकदा पाहिले आहेत.

चौकट राजा - बरोबर. मी तर हवाई मधे ("मॉउवी") ला सुद्धा एका ठिकाणी ते पाहिले होते Happy

बाकी भारत कोठे कमीबिमी पडत नाही. अगदी आत्ताआत्तापर्यंत** अमेरिकेचे आणि भारताचे संबंध परस्परसंशयावर आधारित होते Happy त्यामुळे एकूणच व्यापार अमेरिका-चीन, अमेरिका-पाक ई पेक्षा कमी होता.
** म्हणजे २०१४ नव्हे Wink आधी अर्थव्यवस्था मुक्त होणे, नंतर आर्थिक व राजकीय कारणांनी अमेरिका पाक पेक्षा भारताकडे सरकला आहे.

दुसरे म्हणजे आपल्या देशातील कामगारांना कमीत कमी पगार, सुविधा, मानवी अधिकार ई देउन अत्यंत स्वस्तात माल विकसित देशांकरता तयार करणे, यात अनेक आशियाई देश "पुढारलेले" आहेत. भारताला तिकडे जायची गरज नाही.

भारताला तिकडे जायची गरज नाही. >> +१ अगदी बरोबर म्हणातोस फा !

तसेच सीमा म्हणती आहे ते मी पण पाहिलेले आहे की जरा चांगला ब्रँड आणि महाग असलेल्या वस्तू असतील तर त्या बर्‍याच वेळा मेड इन इंडीया असतात. कपड्यांच्या बाबतीत तर ते अगदी ९०% वेळा खरे होते. लेदर शूज वगैरेंच्या बाबतीत सुद्धा.

अमेरिकेत फुटपाथा वरून चालताना ड्रेनेज च्या मेनहोल ची लोखंडी झाकणं नीट बघा. मेड इन ईंडिया असतात. माझ्या रहात्या शहरात हा अनुभव आल्यावर मी गंमत म्हणून बाहेरगावी गेल्यावरही लक्ष देऊन बघू लागलो तेव्हा बहुतांशी ठिकाणी मला ती मेड इन इंडिया दिसली आहेत. >> ९/११ चे वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यानंतर सगळी डेब्री जहाजात भरून भारतात गेली (चेन्नईतील कंपनीने तो लिलाव जिंकला असे ऐकले)... तिथे ती प्रोसेस होऊन त्यातून मेटल वेगळे करून अनेक प्रकारे ते मेटल पुन्हा अमेरिकेत आले... मॅनहोलची बहुतांश झाकणं त्याच प्रोसेसचा भाग आहेत असे कुठेतरी वाचले.

Ama ani seema, tumchi mahiti chan ahe. pan mala disle tase baki kahi deshanchya tulnemadhe bhartiy mal saglikade nahi milat.>>>
दीपा , तुमचा डाटा सेट खुप छोटा आहे आणि जनरिक आहे त्यामुळ त्यावरून ठोस मत तयार करणं योग्य होणार नाही. भारतातल्या इम्पोर्ट होणार्‍या गोष्टींची काय स्थिती आहे असं विचारून बघा. (आणि ती उत्तम दिसली आहे. )कदाचीत उत्तम चर्चा होईल. Happy

हेल्थ केअर एक्स्पोर्ट करण्यापेक्षा पेशंट इथे येउन सर्जरी करोन जातात अमेरिकेपेक्षा स्वस्तात होते. मेडिकल टुरिझम असे नाव आहे.>>>लोल .
हेल्थ केअर म्हणजे नुस्त सर्जरी नाही हो अमा. इंशुरंन्स रिलेटेड , पेशंट रिलेटेड डाटा, प्रोसिजर कोड्स , फिजिशियन बिलिंग, कोडींग, इंशुरन्स व्हेरिफिकेशन फोन कॉल्स/फॉलो अप (कॉल सेंटर्स), ओव्हर ऑल मेडिकल डेबिट कलेक्शन इत्यादी इत्यादी. नुस्त्या सर्जरीज झाल्या ( त्याही अत्यंत कमी प्रमाणात) तर हेल्थ केअर आउट सोर्सिंग होतय अस कस म्हणता येईल. we are talking about Billion Dollar industry here. कपडे, आयटी , फर्निचर जितक्या प्रमाणात भारतात आउट सोर्सिंग होत त्याच्याशी कंपेअर करतोय आपण.

>> मॅनहोलची बहुतांश झाकणं त्याच प्रोसेसचा भाग आहेत असे कुठेतरी वाचले.<<

९/११ होण्या आधी पासुन इथे मॅन्होलची झाकणं मेड इन इंडिया आहेत. ९/११ चे बरेच आर्टिफॅक्ट्स मेमोरियल म्हणुन इतर राज्यांत गेले आणि स्क्रॅप इतर देशांमध्ये गेले - तिथल्याच बांधकामात ते स्टील वापरता यावं म्हणुन. शिवाय मॅन्होलची झाकणं बहुतेक कास्टआयर्नची असतात, सॉर्टऑफ लो क्वलिटी. कंस्ट्रक्शन मधे वापरलं गेलेलं स्टील उच्च दर्जाचे असल्याने, भले ते स्क्रॅप असलं तरीहि मॅन्होलकरता वापरण्याचा अव्यापारेषु व्यवसाय कोणि करणार नाहि...

हेल्थकेअर च्या बाबत मेडिकल/हेल्थ डेटा ट्रांस्क्रिप्टिंग हा एक मोठा व्यवसाय आहे. सेंसिटिव डेटा मास्क करण्याची टेक्नॉलजी असल्याने गवर्नमेंट (हिपा) रेग्युलेशन त्याच्या आड येत नाहि...

सीमा, तुझा हेल्थकेअर चा मुद्दा काहे धड समजला नाही अजून. काय आऊटसोर्स करायचं म्हणतेस भारतात?

अजून एक म्हणजे ९० च्या दशकात "फोर्जिंग" (वितळवल्यानंतर धातूचे तुकडे पुन्हा पूर्ण टणक व्हायच्या आत हवे त्या शेप मधे वळवणे) ची बरीचशी कामे विकसीत देशांतून इतर देशांत हलवली गेली असे ऐकले होते. तेव्हा भारतात अनेक उद्योगांनी त्याचा फायदा घेतला. ते अजूनही होत असेल.

सशल, माझा मुद्दा आहे कि भारत इकडे सेवा, वस्तु पुरविण्याबाबतीत एकदम जबरदस्त आहे. दीपानी जसे मुद्दे उपस्थित केले आहेत तशी स्थिती नाही आहे. माझ्या मते आपण हेल्थ केअर फिल्ड मध्ये सेवा देण्याबाबतीत अस्जुन थोडे कमी पडतो. बाकी सगळीकडे आपण जबरी कंटेडर आहोत. Happy

चर्चा उगाच भरकटु नये म्हणुन हेल्थ केअर चा मुद्दा काढून टाकू काय ? Happy

हेल्थकेअर मध्ये मला स्वतःला विशेष इंटरेस्ट असल्यामुळे केवळ जाणून घ्यायचं होतं की तू नक्की कुठल्या प्रकारच्या सेवा भारतात आऊटसोर्स करण्याबाबत म्हणत आहेस. काही तूलनात्मक डेटा आहे का, इत्यादी?

मूळात ज्या विषयाला हात घालायचा प्रयत्न आहे त्याचा स्कोप इतका मोठा आहे की असं हाय लेव्हल वर काही डिस्कस करता येईल का ते कळत नाही. ज्या बाबतीत (सेवा तसंच उत्पादने) भारत अग्रेसर आहे त्याच्याशीही सांगड घालायला हवी ना?

आपण अर्थात कमी पडतोय. त्यात नाकारण्यासारखं काहीच नाही.
२०१७ मध्ये अमेरिकेने चीनकडून ५०५ बिलियनचा माल खरेदी केला. त्याच साली अमेरिकेने भारताकडून ७६ बिलियनचा माल खरेदी केला, आणि पाकिस्तानकडून ३ बिलियनचा, आणि कॅनडाकडून ३३० बिलियनचा माल खरेदी केला, आणि मेक्सिकोकडूनही जवळपास ३३० बिलियनचा. आता तुमच्या नजरेला यातील काय आणि किती पडणारे ते बघा.

अवांतरः
अमित मिनीटा मिनीटाला तो जिथे कमी पडतोय ते दुरूस्त करतोय. आपण त्याच्याकडून शिकायला हवं काहितरी! Proud

अमित - पण यातील बाकी सर्व देशांशी अमेरिकेचे खास व्यापारी संबंधा अनेक दशके आहेत. चीनशी सुद्धा १९७१ च्या आसपास हे सुरू झाले. भारताशी गेली १०-२० वर्षेच जास्त आहेत. आणि माझा अंदाज आहे की मध्यपूर्वेतील देशांशी संबंध ठेवायचा बॅलन्स न तोडण्याकरता अनेकदा भारत अमेरिकेच्या एकतर्फी अटी मान्य करत नाही (इराणशी संबंध वगैरे), त्यामुळे ही अनेकदा ही संधी मिळत नाही. पण ते एकूण राजकीय हिताच्या दृष्टीने बरोबर असेल.

म्हणजे माझा पॉइण्ट आहे की भारत गेली अनेक दशके हे करायला उत्सुक आहे पण आपण क्वालिटी मधे किंवा इतर बाबतीत कमी पडतोय असे अजिबात नाही.

अमितने दिलेल्या लिंकवर ही माहिती आहे . भारी आहे ती लिंक.

India was the United States' 11th largest supplier of goods imports in 2017.
U.S. goods imports from India totaled $48.6 billion in 2017, up 5.6% ($2.6 billion) from 2016, and up 101.9% from 2007. U.S. imports from India account for 2.1% of overall U.S. imports in 2017.
The top import categories (2-digit HS) in 2017 were: precious metal and stone (diamonds) ($10 billion), pharmaceuticals ($6.1 billion), mineral fuels ($2.7 billion), machinery ($2.5 billion), and miscellaneous textile articles ($2.5 billion).
U.S. total imports of agricultural products from India totaled $2.6 billion in 2017. Leading categories include: spices ($272 million), tree nuts ($236 million), essential oils ($182 million), rice ($178 million), and processed fruit & vegetables ($125 million).
U.S. imports of services from India were an estimated $28.1 billion in 2017, 9.0% ($2.3 billion) more than 2016, and 183% greater than 2007 levels. Leading services imports from India to the U.S. were in the telecommunications, computer, and information services, research and development, and travel sectors.

सशल Proud
फा, ओके. खरं आहे. अमेरीकेचे भारताशी गेल्या १०-१५ वर्षात चांगले संबंध होतायतं. त्यात हा इंपोर्ट हॉक तात्या आणखी ६ वर्षे राहिला तर फार सुधारणा शक्य नाहीत. चीनला काबुत ठेवायला भारताशी मैत्री असे सेकंड डिग्री स्टॅटेजिक विचार १४० शब्दांत मावतच नाहीत.
वरील कपडे आणि भांडी परदेशांत पाठवणे हे उद्योग अत्यंत कमी मार्जिनवर चालतात. आणि ज्या देशांत अत्यंत कमी आवरली वेजेस असतात तिथलाच माल निर्यात होऊ शकतो. चायनामधील पगार वाढू लागल्यावर हे बिझनेस पूर्व आशियाई देशांत सरकत आहेत. हे निर्यात करणे म्हणजे काही भारी काम नाही, भारताने त्यात पडू नये बाबतही सहमत.
पण निर्यात मात्र वाढवत रहावी.

अमित २०१७ चे अमेरिका-भारत ट्रेड डेफिसिट २७ बिलिअन डॉलर्सचे आहे.
तात्यांना लगेच २७ बिलिअन डॉलर्स चे बिल पाठवून द्या भारतातर्फे तगाद्याला आणि वसुलीला आपण जाऊन येवू. Proud

>> आणि ज्या देशांत अत्यंत कमी आवरली वेजेस असतात तिथलाच माल निर्यात होऊ शकतो
अमेरिकेला निर्यात करण्यासाठी होत नसलं तरी भारतात काय चीप लेबर वापरलं जात नाही असं समजतोय का आपण? तसं असेल तर झापड बांधतोय ना?

Pages