श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत

Submitted by रुद्रसेन on 22 October, 2018 - 02:24

श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

नुकताच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ऐकण्याचा योग आला. अध्यात्मातले बारकावे आणि श्रीपाद प्रभूंच्या चरित्राच रसाळ वर्णन त्यात आढळते. श्रीपाद वल्लभ हे दत्त महाराजांचेच अवतार त्यानंतर त्यांनी श्री नृसिंहसरस्वती या नावाने अवतार घेतला, त्यानंतर कर्दळीवनामध्ये गुप्त होऊन श्री स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण केला. कलीयुगामध्ये दत्त महाराजांनी इतके अवतार घेण्यामागे दीन दुबळ्यांचा उध्दार आणि आणि साधकांची अध्यात्मात प्रगती हे प्रयोजन खचितच होते. त्याच श्रीपादांच्या चारीत्रामधील काही भाग इथे देत आहे. अध्यात्माची आस असणाऱ्यांना हे लिखाण म्हणजे श्रीपादांचा कृपाप्रसादच वाटेल यात दुमत नसावं.

नामस्मरण महिमा

एक वद्धृ ब्राम्हण पोटदुखीच्या त्रासाने कुरुगड्डीस श्रीपाद प्रभुंच दर्शन घ्यायला आला हो्ता. त्याच्या वेदना एवढ्या असह्य होत्या की त्याला त्या वेदना सहन करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असे वाटले. त्या ब्राम्हणाने श्रीपाद प्रभुंच दर्शन घेऊन आपली व्यथा दर करण्याची आर्त स्वरात प्रार्थना केली. त्यावेळी श्रीपाद प्रभ म्हणाले“अरे विप्रा पुर्वजन्मी आपल्या कठीण वाणीने अनेक लोकांना दुखावलेस. अनेकांना आपल्या ह्र्दयभेदी कठोर शब्दांनी घायाळ केलेस त्याचेच फळस्वरूप म्हणून तुला हि पोटदुखिची व्याधी जडली आहे. रात्रि कुरुगड्डीस (कुरवपुर) राहून “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जप कर.” प्रभुंच्या आदेशानुसार वृद्ध ब्राम्हण रात्री कुरुगड्डीस राहीला. त्याने अत्यंत श्रद्धा भावाने जप केला. त्या ब्राम्हणाची पोटदुखी पण बरी झाली.
श्रीपाद प्रभु पढुे म्हणाले “मानवास आपल्या वाकदोषापासन मुक्त होण्याचा या कलियुगात ‘नामस्मरण’ हाच एक मार्ग आहे. भगवंताच्या नामस्मरणाने वायुमंडल शुद्ध होते. मी कुरुगड्डी येथे नामस्मरण महायज्ञाची सरुुवात करणार आहे. त्या नामाबरोबर “श्रीकार” ही जोडणार आहे. त्यामुळे चिरस्थायीपने परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी अशा चारी वाणी नियंत्रित होतील. जे भक्त "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे” मनस्फुर्तिने नामस्मरण करतील त्यांना मी अत्यंत सुलभरितिने प्राप्त होउन त्यांचा मनोकामना पूर्ण करतो.श्रीपाद प्रभु पढुे म्हणाले" वायुमंडलात आज पुर्वीसारखे वाग्जळ भरून आहे. आपण उच्चारलेले प्रत्तेक वाक्य प्रकृतीत सत्व , रज , तम या तीन गुणांनी अथवा एक किंवा दोन गुणांनी परिपूर्ण असते. या त्रिगुणात्मक सृष्टिचा पंचमहाभूतांवर वाईट प्रभाव पडतो. हि पंचमहाभूते दूषित झाली की संपूर्ण अंतराळ दूषित होते. त्यामुळ मानवाकडून पापकर्म घडून तो दरिद्री होतो. या दरिद्र्यामुले पुन्हा पापकर्म घडते.या पापामुळे मन दुषित होऊन दान, धर्म, लोकसेवा अशी सत्कर्मे त्यांच्याकडून न घडल्याने पुन्हा दारिद्र्य येते. हे दुष्ट चक्र असे चालू राहते, या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काया, वाचा, मन शुद्ध असायला हवे यालाच त्रीकरण शुद्धी असे म्हणतात. आपल्या मनात जे असते तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्ट भाव आणि वाणीने अगदी मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा.
आपल्या वाणीप्रमाणेच आचरण सुद्धा अगदी पवित्र असावे. या कलियुगात जीवन सागर तरून जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यात "नामस्मरण " हे अत्यंत सुलभ साधन आहे. नामस्मरण करणाऱ्या साधकाची वाणी मधुर असते, त्याचा योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.

अध्याय ४४ - श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय.

आपल्यासोबत घडलेल्या घटना आपल्या डोक्यात चलचित्रासारख्या फिरत राहतात. त्याने मन सतत प्रक्षुब्ध राहते, मनात संताप भरून राहतो, कित्येकवेळा नैराश्य येते. नामस्मरण किंवा काही श्लोकवगैरे मनात घोळवत राहिल्यास नकारात्मक विचार, ज्यांचा आपले बीपी वाढवण्यापलिकडे बाकी काहीही उपयोग नसतो, ते मनात आणायला वेळ राहात नाही.

श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये

पिठापूर आणि कुरवपुर ह्या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३ वेळा जाणे झाले आहे. एक विलक्षण मनःशांती लाभते दोन्ही ठिकाणी.

अवांतर: जानेवारी २०१९ मध्ये "श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत" चे भाषांतरकार श्री. निठूरकर महाराज ह्यांचा भागवत कथन सप्ताह डोंबिवली अथवा बदलापूर येथे आयोजित करण्याचा माझ्या कुटुंबियांचा मानस आहे. सगळे नक्की झाल्यावर जाहीर निमंत्रण देईनच. _/\_

मी दोनदा वाचलंय हे चरीत्र. ओघवतं, रसाळ वाटलं.

श्री दत्त बावनी ( मूळ गुजराथी श्लोक ) वाचल्यावर माझ्या आईला असेच चांगले अनूभव आले. >>> ती रंगावधुत महाराजांनी रचली आहे. मला आवडते मूळ गुजराथी वाचायला. पूर्वी दर गुरुवारी वाचायचे, हल्ली नाही होत वाचन. माझी आईपण सांगते याचे बऱ्याच जणांना चांगले अनुभव आलेत.

कोणाला जर अजून काही माहिती किंवा कोणते अध्यात्मिक अनुभव आलेले असल्यास सांगावे मला आणि वाचकांना प्रेरणाच मिळेल. स्वामी दत्तावधूत यांची अध्यात्मिक पुस्तके कोणी वाचली आहेत का?

सलग ५२ गुरुवार केले तर बरोबर होईल.
चुकून एखाद गुरुवार राहिला तर तेथून १ला गुरुवार मोजत पुन्हा नव्याने करायला हवे.
हे झाले कर्मकाण्ड.
पण भाव खरा अपेक्षित आहे तो त्याच्या पुढील ओवीत ― यथावकाशे नित्य नियम हे जमणे म्हणजेच ह्या ५२ गुरुवारांची फलश्रुति असे मला वाटते

@ रुद्रसेन, स्वामी दत्तावधूतांची अध्यात्मिक पुस्तके वाचली आहेत. दोन अजून मिळाली नाहीत. (हिमालयातील सिद्धयोग्यांच्या कथा व मानवी जीवनातील गूढ रहस्ये बहुतेक सहावा भाग)

५२ गुरुवारे नित नेम करे पाठ बावन सप्रेम >>> हे केल्याने आयुष्यात खूप छान अनुभव आलेत. >>>>> खूप छान कल्पेश कुमार. शक्य असल्यास जरूर शेअर करा, वाचायला आवडेल.

दत्तावधूत स्वामींची सगळी पुस्तके आणि पोथ्या मी वाचली आहेत ... जबरदस्त लिखाण आहे पण त्यात सगळ्या पुस्तकांत कायम एक उल्लेख आहे कि हि पुस्तके दिव्य असून त्याच्या नुसत्या घरात असण्याने आणि वाचनाने दिव्य अनुभव येतील आणि अडचणींचे निवारण होईल वगैरे असं काही , ते मात्र पटत नाही .. अगदी लोकांच्या अनुभवावर देखील दोन पुस्तके असून त्यात चमत्कारिक अनुभव दिले आहेत .. मला हे थोडं जास्तच वाटतंय पण तरी कोणाला काही अनुभव आले असल्यास इथं कृपया तुमचे अनुभव लिहा .. बाकी हे स्वामी कायम जंगलात असतात आणि कोणालाही भेटत नाही असं दिल असल्याने स्वतः खात्री करून घ्यायची पण सोया नाही काही ...
माझे स्वतःचे दत्तगुरु हे इष्टदैवत असून बरेच अनुभव आहेत पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मात्र दिव्य वगैरे असले अनुभव नाय आले कधी आजपर्यंत ... परमपूज्य टेम्ब्ये स्वामींचे साहित्य हे प्रासादिक असून आचारविचाराचे नियम पळून काही वर्ष उपासना केल्यास १००% अनुभव येतात .. त्यांचे घोरकष्टोद्धारण स्तोत्र, करुणात्रिपदी आणि इतरही कवच -स्तोत्रे हि अत्यंत प्रासादिक आहेत ... ग्रहणकाळात यांचा शक्य तितका पाठ करून नंतर नित्य उपासनेत पाठ केल्यास खात्रीशीर अनुभव येतात फक्त प्रारब्ध आणि इष्टकृपा मात्र पाठीशी हवी .. बाकी अन्नदान आणि नामस्मरण ह्या गोष्टी दत्तउपासनेत अभिप्रेत असल्याने त्याच्या विषयी काही सांगत नाही .... उपासना करा किंवा नका करून पण चुकूनहि गुरु शोधण्याच्या भानगडीत पडू नका कारण सध्याच्या काळात अधिकारी व्यक्ती सापडत नाहीत आणि जे थोडेफार असतात तेहि शक्यतो उठसूट कोणालाही अनुग्रह करत फिरत नाहीत .. किरकोळ सिद्धीच्या जोरावर किरकोळ चमत्कार करणारे बरेच भेटले पण खऱ्या अध्यात्माचा आणि यांचा दूरपर्यंत संबंध नसतो ..
नवनाथ उपासनेचे कोणाला काही अनुभव आले असल्यास ते पण इथं कृपया लिहा ...

>>>चुकूनहि गुरु शोधण्याच्या भानगडीत पडू नका कारण सध्याच्या काळात अधिकारी व्यक्ती सापडत नाहीत आणि जे थोडेफार असतात तेहि शक्यतो उठसूट कोणालाही अनुग्रह करत फिरत नाहीत.
@जिद्दु.. अगदी बरोबर खरा गुरु आजकाल सापडत नाही तसेच गुरु हा शोधायचा नसतोच आपली गुरुभेटीची तळमळ जर असेल तर गुरु हा स्वतःच आपल्याला शोधत येतो. आपली भक्ती आणि तळमळ खरी हवी बाकी कुठेही जाण्याची गरज नाही.
>>अगदी लोकांच्या अनुभवावर देखील दोन पुस्तके असून त्यात चमत्कारिक अनुभव दिले आहेत,मला हे थोडं जास्तच वाटतंय...>> माझा ओळखीचे एक गृहस्थ आहेत त्यांना स्वामी दत्तावधूत आणि त्यांची पुस्तके याबद्दल काही माहित नाही त्यांचं लग्न झालाय आणि ते आई वाडीलांपासून लांब राहतात पण मी त्यांच्या आई वडिलांना या पुस्तकांबद्दल बोललो होतो त्यांना सुद्धा याबद्दल काही माहित न्हवते. एकदा त्या गृहस्थांचा त्यांचा आई वडिलांना फोने आला कि स्वामी दत्तावधूतांची पुस्तके माझा घरात देवघरात एका कप्प्यात सापडली ती पुस्तके तुम्ही आणली होती का? त्यांचा आई वडिलांना याबद्दल काही माहित न्हवत. मग ती पुस्तके आणली कोणी हे अजूनही कळलेले नाही. बाकी ते गृहस्थ आणि मी लहानपणापासून एकमेकांना ओळखतो त्यामुळे ते खोटे बोलतील हे शक्य नाही आणि खोटे बोलण्याचा त्यांना फायदा पण काय.
@अनामिका यांनी वाचलेल्या काही पुस्तकात(ईश्वभाक्तीचे अनुभव ) सुद्धा असे बरेच अनुभव लोकांना आलेले आहेत.

@ श्रद्धा, या मार्गावर मी एक साधक आहे, एवढी माझी योग्यता नाही, पण सद्गुरूकृपेने एवढे सांगू शकते की जी काही साधना तुम्ही कराल त्यात पूर्ण श्रद्धा, भक्ती व प्रेम हवे. पूर्ण श्रद्धेने तुम्ही नामस्मरण जरी केलेत तर तेही चालेल. त्याला कुठलेच व कसलेही बंधन नाही. गुरूचरित्र वाचायचे असले तर संक्षिप्त श्री गुरूचरित्र सार (टेंबे स्वामी) विरचित वाचू शकता. तुम्हाला जर दत्त बावनी वाचाविशी वाटते तर तीही वाचू शकता.
रश्मीताईंनी मागे सांगितले आहे संकल्पाबद्दल (त्यांची खूप आभारी आहे ) तसा संकल्प जरूर करा. संकल्पाने आपल्या साधनेला बळकटी येते. 52 गुरुवारी वाचायची असली तर तसा संकल्प करा, अडचणीमुळे सलग 52 गुरूवार मिळणार नाहीत, जसे मिळतील तसे करा व ते लिहून ठेवा. सद्गगुरूंना आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी असते त्यामुळे आपण शुद्ध मनाने केलेली सेवा त्यांच्या चरणी रूजू होतेच. माझा एक अनुभव सांगते, माझी पत्रिका बघून मला एका ज्योतिषाने देवीची सलग पाच शुक्रवार ओटी भरायला सांगितले होते, मी सलग वर स्ट्रेस करून दोन तीनदा विचारले तरी ते सलगच म्हणाले. (जे शक्य नव्हते ) चार शुक्रवार झाले, पाचव्या शुक्रवारी अडचणीमुळे जावू शकले नाही , मग परत पहिला शुक्रवार. असे खूप शुक्रवार झाले. शेवटी त्या जगदंबेलाच माझी दया आली असणार, स्वप्नात देवीने सांगितले की ओटी मिळालेली आहे. तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली.

रुद्रसेन, जिद्दू, अगदी खरे आहे. गुरू शोधायच्या भानगडीत अजिबात पडू नये. आजच्या काळात भोंदूगिरी खूप फोफावली आहे. योग्य वेळ आल्यावर खरे सद्गुरू आपल्या शिष्याच्या शोधात येतात हे शंभर टक्के खरे आहे. त्यामुळे "पानी पिना छानके और गुरू करुना जानके".

या दत्तगिरी(यांचे दुसरे नाव) स्वामींची माहिती कशी मला कशी कळली याचा मोठा रंजक किस्सा आहे . नगर ला रिजर्व बँकेतून रिटायर्ड झालेले आमचे एक स्नेही आहेत . हे अक्कलकोट स्वामींचे भक्त असून त्यांचीही मोठी उपासना आहे . यांचा अध्यात्म क्षेत्रातील बऱ्याच अधिकारी लोकांचा परिचय आहे . यांचे पुण्यात एक मोठे डॉक्टर मित्र आहेत जे धनकावडीच्या शंकर महाराज शिष्य परंपरेतील आहेत आणि त्यांनाही अनेक अधिकारी व्यक्तींशी संबंध आलेला आहे आणि अजूनही आहे .. तर एके रविवारी या डॉक्टर साहेबांकडे सकाळी हे दत्तावधूत स्वामी घरी आले .. स्वामी समर्थांच्या आदेशावरून मी आलो आहे असं ते म्हणाले आणि जवळपस अर्धा तास गप्पा मारून आणि नाश्ता करून निघाले .. निघताना त्यांनी त्यांची पुस्तके याना भेट म्हणून दिली .. डॉक्टर त्यांना गेट मध्ये सोडवायला गेले तेव्हा स्वामी त्यांना इथपर्यंतच या म्हणाले आणि पुढं निघाले ... डॉक्टर साहेब मग गेट मधेच थांबून पाहू लागले तर काही अंतरावर जाऊन हे स्वामी अदृश्य झाले ... हा किस्सा मग त्यांनी नगरच्या मित्राला सांगितला आणि त्यांनी आम्हाला ... मग मी बुकगंगा वर यांची दोन तीन पुस्तके स्टॉक ला होती ती मागवली .. मला ती फार भारी वाटली मग मी खास पुण्याला जाऊन उर्लेलि पुस्त्के आणायचं ठरवलं तर कुठे मिळणार त्याची माझ्या स्नेह्यांकडे चौकशी केली तर त्यांनी नेर्लेकर बूकडेपो चे नाव सांगितलं ..हे दुकान दगडूशेठसमोर आहे पुण्यात ..
हि घटना ६ वर्षांपूर्वीची आहे .. आता त्यांची पुस्तके बहुतेक दुकानातून मिळतात सगळीकडे ... यात असा हि सांगितलं आहे कि हि पुस्तके दुसऱ्याना वाटल्याने पुण्यप्राप्ती होते आणि बराच काही अस... तर मला स्वतःला हि एक मार्केटिंग ची कल्पना वाटली ... मी कोणतीही गोष्ट शक्यतो स्वतः पडताळून पाहतो आणि मगच विश्वास ठेवतो , पण शेवटी मला एखाद्या गोष्टीचा अनुभव नाय आला म्हणजे ती गोष्ट खोटी असाही मी मानत नाही त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता तसे खरे अनुभव येतही असतील लोकांना कदाचित ... या पुस्तकांच्या मुद्रकाच्या कुटुंबातील एक व्यक्ती समवयस्क मित्रांच्या ओळखीतील असल्याने माझ्या माहितीत आहे आणि तिच्याकडे बघून यांचा आणि अध्यात्माचा काही संबंध आहे असं वाटलं नाही कारण तिचा एक प्रसंग एका पुस्तकात दिला आहे म्हणून तसा विचार आला .. बाकी पुस्तके मात्र मस्त आहेत वाचायला ...

आजच्या युगात खरा मानवी सदगुरु प्रत्येकाला लाभणे अगदीच जमेल असे नाही हे पटले. पण जीवनात गुरुची आवश्यकता ही असतेच असते. त्यामुळे श्री साईं सच्चरित सारखे अपौरुषेय ग्रन्थ गुरुस्थानी मानून त्याप्रमाणे अनुनय करत जीवन विकास साधणे हां मार्ग नक्कीच प्रत्येक श्रद्धावान मनुष्यास उपलब्ध आहे.

सद्गुरूंची आपल्याला का आवश्यकता असते,ह्याबद्दल संत दासगणू महाराज यांचे साईबाबांवरील स्तोत्र अश्विनी के ह्यांनी स्तोत्र,प्रार्थना ह्या नावाने एक धागा काढला होता.त्यातल्या 10 व्या पानावर मी ते स्तोत्र पाठवले होते.ते वाचल्यावर सगळ्या शंकांचे निरसन होते.

मी रोज हे स्तोत्र म्हणते.त्यामुळे माझ्या स्वभावात खूप फरक पडला आहे.आणि आता हे दाम्भीक गुरू पाहिले की ह्या स्तोत्रांचे महत्व आणखी कळते.कुणालाही गुरू मानायच्या आधी तो वरील प्रमाणे आहे की नाही हे तपासायला पाहिजे.

मी रोज हे स्तोत्र म्हणते.त्यामुळे माझ्या स्वभावात खूप फरक पडला आहे.आणि आता हे दाम्भीक गुरू पाहिले की ह्या स्तोत्रांचे महत्व आणखी कळते.कुणालाही गुरू मानायच्या आधी तो वरील प्रमाणे आहे की नाही हे तपासायला पाहिजे.

Pages