गाडी (कार) च्या विक्रीनंतर खरेदीदाराने गाडीची कागदपत्रे आपल्या नावावर करून घेतली नाहीत तर काय करावे

Submitted by Parichit on 10 October, 2018 - 01:28

काही वर्षापूर्वी मी माझी कार जवळच्या नात्यातील एका व्यक्तीस विकली. त्यानंतर गाडीची कागदपत्रे स्वत:च्या नावावर करून घेतो म्हणून ती व्यक्ती माझ्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन गेली. तेंव्हा आमचे संबंध चांगले होते त्यामुळे मी सुद्धा फार काळजी न करता सगळी कागदे त्याच्या हातात दिली. पण गाडीची कागदोपत्री ट्रान्स्फरचे हे काम त्याने कधी केलेच नाही. जवळची व्यक्ती आणि संबंध चांगले होते म्हणून मी सुद्धा त्याबाबत त्याला फार तगादा लावला नाही. आता इतकी वर्षे झाली अद्याप गाडी माझ्याच नावावर आहे. पण गाडी आणि तिची मूळ कागदपत्रे मात्र त्याच्याकडे आहेत. मध्यंतरी ह्या व्यक्तीशी संबंध काही कारणांवरून खूप बिघडले. आता त्याच्याशी संवाद सुद्धा होत नाही. मला काही प्रश्न पडले आहेत:

१. गाडी माझ्या नावावर असणे पण वापरणारी व्यक्ती दुसरी असेल व तिने भविष्यात त्या गाडीचा गैरवापर अथवा अपघात केला तर मला भुर्दंड (प्रसंगी तुरुंगवास सुद्धा) होऊ शकतो असे ऐकिवात आहे. हि माझी भीती खरी आहे का?

२. हि भीती खरी असेल तर मला या परिस्थितीत काय करावे लागेल याबाबत मी खूपच संभ्रमीत आहे व ठोस माहिती हवी आहे. पोलिसांकडे जावे लागेल कि आरटीओ ऑफिसमध्ये. पोलिसांकडे गेलो तर त्यांना काय सांगू. गाडी हरवली आहे अशी खोटी तक्रार द्यावी कि जे आहे ते खरे सांगावे. जे आहे ते खरे सांगितले तर पोलीस त्याची नोंद घेतील का. आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन याबाबत काही करता येईल का. असे अनेकविध प्रश्न भंडावून सोडत आहेत.

कृपया ज्यांना माहित आहे त्यांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडीचे रजिस्ट्रेशन तुमच्या नावावर असेल तर गाडीचे काही झाले तर तुमच्या वरच त्याचा दंड भरायची जबाबदारी येईल. गाडीचा इंश्युरन्स आहे का ते ही बघा, तो ही तुमच्याच नावावर असेल, आणि संपला असेल तर त्याचं काय ते बघा.

अगदीच कल्ला करायचा असेल तर सरळ गाडी तुमच्या घरी घेउन या, कारण ती गाडी त्या व्यक्तीची आहे असे तो क्लेम करुच शकणार नाही.

संवाद नसेल तर अवघड आहे. वकिलाची नोटीस पाठवू शकता.
पैसे दिल्या घेतल्याचे पुरावे असतील तर जपून ठेवा.

बर्फ तोडा (ब्रेक द आईस) कमीपणा घेऊन गरज पडली तर आणि गोडीगुलाबीनं काम करवून घ्या; वेळ आलीच तर आरटीओमध्ये चकरा मारायची तयारीही ठेवा. हाच त्यातल्यात्यात सोपा उपाय वाटतोय. उगाच आहेत ते डिस्टर्ब्ड नातेसंबंध अजून बिघडवून काही साध्य होईल का?

आता इतकी वर्षे झाली << किती?

गाडी ताबडतोब आपल्या नावे करून घ्या, अन्यथा आपणास नातेवाईक म्हणून वापरायला दिलेली गाडी तुम्ही धाकदपटशाने परत देत नाही. अर्थात चोरली आहे, अशी तक्रार दाखल करावी लागेल असे तोंडी सांगा. फोनवर वा टेक्स्ट मेसेजने नव्हे.

गाडी प्रेमाने नेली, नेली तेव्हा तिच्यात माझे कागदपत्र तसेच होते, आता परत देत नाहीत अशी पोलीस तक्रार दाखल करा. जर नाव बदलले नसेल, तर त्या गाडीच्या कोणत्याही गैरवापराबद्दल तुम्हाला झेंगट नक्कीच लागेल.

२० वर्षांपेक्षा जास्त जुनी गाडी असेल तर आरटीओ मधे गाडी स्क्रॅप केल्याचे नोंदवता येते बहुतेक.

आरारा+१
गाडी द्या अन्यथा पोलिसात गाडी चोरली म्हणून तक्रार करु असे त्यांना सांगा आणि काही हालचाल झाली नाही तर करा ही.

संवाद नसेल तर अवघड आहे. वकिलाची नोटीस पाठवू शकता. >>> +१

कुठल्याही मोटर ट्रेनींग स्कुल मधुन वेहिकल ट्रांसफर फॉर्म मिळेल.
त्यावर खरेदीदाराची सही घेऊ शकता

सॉरी, उशिरा प्रतिसाद देत आहे. सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद _/\_

@हर्पेन
आभारी आहे धागा वर ठेवल्याबद्दल

@हिम्सकूल
कार घेऊन येणे हा पर्यायच नाही. कारण त्याच्याकडे जाणेयेणे बंद आहे. तो अन्यत्र राहायला गेला असेल तर अजून अवघड.

@मेरीच गिनो
खूप पूर्वी (कमीतकमी आठ वर्षे) त्याने चेक दिला होता त्याचा अद्याप कुठे पुरावा असणे दुरापास्त वाटते. तरीही बघतो प्रयत्न करून.

@योकु
मध्ये एका व्यक्तीला (ज्याचा आम्हा दोघांशीही संवाद आहे) घेऊन सध्या प्रयत्न सुरु आहेत. पाहू काय होतंय. पण मध्यंतरी "मला वेळ नाही, मी ते करणार नाही" असे काहीसे तो या व्यक्तीला बोलला होता.

@आ.रा.रा.
हो. कारला वीस वर्षे होऊन गेली आहेत. आणि मी त्याला कार दिली त्याला आठहून जास्त वर्षे झाली. वीस वर्षानंतर नुतनीकरण करावे लागते असे ऐकले होते. ते त्याने केले नसावे (कारण गाडी अद्याप माझ्याच नावावर असल्याने माझ्या सहीशिवाय ते तो करू शकणार नाही). वीस वर्षाहून जास्त जुनी गाडी रस्त्यावर चालवणे गुन्हा आहे का? असल्यास तिथे सुद्धा माझेच नाव येईल. स्क्रॅप केल्याचे नोंदवण्यासाठी गाडीची कागदपत्रे लागतील ना? चौकशी करून पाहतो. माहितीबद्दल खूप खूप आभार.

@king_of_net
याबाबत माहिती मिळवण्यासाठी मोटार ट्रेनिंग वाले हा एक पर्याय आहे. माझ्या लक्षात आला नव्हता. थोडेफार पैसे घेतील पण माहिती देतील मदत करतील हि अपेक्षा. सुच्व्ल्याब्द्द्ल धन्यवाद.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

२० वर्षांपेक्षा जास्त जुनी गाडी असेल तर आरटीओ मधे गाडी स्क्रॅप केल्याचे नोंदवता येते बहुतेक.
नवीन Submitted by आ.रा.रा. on 10 October, 2018 - 17:58

गाडीला १५ वर्षे झाली की पुढच्या ५ वर्षांकरिता पर्यावरण कर भरुन नोंदणी कालावधी वाढवता येतो. पुन्हा ५ वर्षांनी तसेच. अशा प्रकारे कितीही वेळा केवळ खासगी वापरातली (टूरिस्ट वाली केवळ आठच वर्षे चालते) गाडी नोंदणी कालावधी वाढवून वापरता येते. प्रत्येक वेळी इन्स्पेक्षन आरटीओ इन्स्पेक्षन हवेच. जर १५ वर्षे झाल्यावर लगेचच पर्यावरण कर भरला नसेल तर पुढे तो दंडासह भरता येतो.

पण जर गाडी स्क्रॅप करायची असेल तर मात्र ज्या दिवशी गाडी स्क्रॅप करायचा अर्ज द्याल त्यादिवशीपर्यंतचा पर्यावरण कर + दंड भरावा लागतो. तसेच चासीज् नंबर एंबॉसिंग केलेला भाग कापून आरटीओत जमा करावा लागतो. सबब, गाडी जर परिचितांच्या ताब्यात नसेल तर ती स्क्रॅप करण्याविषयी आरटीओतली प्रक्रिया करु शकत नाहीत.

पुढच्या ५ वर्षांकरिता पर्यावरण कर भरुन नोंदणी कालावधी वाढवता येतो.
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 11 October, 2018 - 18:14

हे करण्यासाठी माझ्या सहीची आवश्यकता असेल ना? त्या व्यक्तीने गाडीला पंधरा वर्षे झाल्यानंतर हे केले असेल असे वाटत नाही.

आता गाडी त्यांना स्वतःच्या नावे करून घ्यायची असेल काय किंवा नोंदणी कालावधी वाढवायचा असेल काय, तुमची सही लागेलच.

माझ्या गाडीसोबत असे झाले होते. मी एकाला विकली, माग त्याने दुसऱ्याला आणि तीन वर्षे झाली तरी त्याने स्वतःच्या नावावर केली नव्हती. आणि त्याने सिग्नल तोडल्याचे चलान माझ्या पत्त्यावर आले. पण माझ्या कडे विक्री करार आणि कसलासा फॉर्म त्याने सही केलेला होता . त्यांची फोटोकॉपी जोडून मी आरटीओला पत्र पाठवले की मी ती गाडी केव्हाच विकली आणि त्याचा हा पुरावा. पण तरी मला अधून मधून चलान येत राहीले आणि मी तसेच पत्र पाठवत राहिलो.
मग एक दिवस वैतागून आधी विकली त्याचा पत्ता शोधून, त्याने कुणाला विकली त्याचाही फोन नंबर मिळवला, गाडी ट्रान्सफर करून घ्यायला सांगितले. हो हो करत करत नव्हता मग दोघांना अल्टिमेटम दिले की आठवड्यात हालचाल केली नाही तर पोलीसात तक्रार करेन. मग तो एकदिवस आला परत माझी सही घ्यायला ट्रान्सफर पेपर्सवर , आधी सही करून दिलेले त्याला सापडले नाही. आणि मग त्याने स्वतःच्या नावावर गाडी ट्रान्सफर करून घेतली.

आठवड्यात हालचाल केली नाही तर पोलीसात तक्रार करेन.
Submitted by मानव पृथ्वीकर on 11 October, 2018 - 19:58

मानव साहेब माझा प्रश्न हाच आहे कि पोलिसात तक्रार द्यावी तर काय द्यावी?

१. जे घडलंय ते खरे सांगावे (कि गाडी आणि कागदपत्रे घेऊन गेलाय पण गाडी ट्रान्स्फर केलेली नाही) ह्या केस मध्ये पोलीस तक्रार नोंदवून घेतात का?

२. कि कागदपत्रासहित गाडी हरवली आहे अशी तक्रार द्यावी?

मला यापूर्वी पोलीस स्टेशनचा अनुभव नाही. ज्यांना आहे त्यांनी चांगला नाही असे सांगितले. म्हणून पोलिसांकडे जाण्याआधी सगळी चौकशी करून नक्की तक्रार काय करावी हे आधीच ठरवून गेलेले बरे असे वाटत आहे.

पहिला ऑप्शनच ठीक राहील. (दुसरा ऑप्शन वापरला आणि त्यांनी मी गाडी विकत घेतलीय, फक्त स्वतःच्या नवे केली नाही एवढे सिद्ध केले की तुम्ही तोंडघशी पडाल.)

या केस मध्ये जास्तीत जास्त पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला नकार देतील पहिल्या भेटीत, त्यापेक्षा अधिक काही नाही असे मला वाटते. कदाचीत आरटीओ एजंट्सना काय, कसे करावे याची माहिती देऊ शकतील.

पण पोलीस तक्रार करण्यापूर्वी त्या नातेवाईकांना सांगून बघा की गाडी आपल्या नावावर करून घ्या नाहीतर पोलीस तक्रार करावी लागेल. न ऐकल्यास त्यांना लेखी नोटीस पाठवता येईल ज्याबद्दल कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, आणि तरीही त्यांनी हालचाल केली नाही आणि दरम्यान गाडीचा अपघात/गैरवापर झाल्यास ही या नोटीसची प्रत तुमचा बचाव करू शकेल.

@ Submitted by बिपीन चन्द्र हर... on 11 October, 2018 - 18:14
<<
अरे वा! धन्यवाद चंद्रूभौ(२)

नवी माहिती समजली. आरटीओ वा अशा प्रकाराशी फार जवळून संबंध नसल्याने हे फायनर डीटेल्स ठाऊक नव्हते.

पूर्वी माझी एक जुनी कावासाकी मोटारसायकल अशीच एका ओळखिच्याला मी अडीच हजारात विकली होती. ती त्याने स्वतःच्या नावावर केलीच नाही, हे त्यानेच मला ५-६ वर्षांनंतर येऊन सांगितले, अन त्याचवेळी सांगितले की सर, ती गाडी मी म्युन्सिपाल्टीत गेलो होतो तेव्हा चोरीला गेली. ही गाडी चोरीला गेल्याच्या तक्रारीची कॉपी. तुमच्या नावावरून ट्रान्स्फर करायला जुना इन्शुरन्स्/टॅक्स वगैरे भरपूर खर्च होता म्हणून ट्रान्स्फर केली नव्हती.

आता गाडी भ र पू र जुनी. केबी १००, टू स्ट्रोक वाली. फक्त गाडी चोरीला गेल्याचा पुरावा म्हणून तक्रारीचा कागद मजकडे सांभाळून ठेवलेला आहे. उद्या उठून कुण्या टेररिस्ट हल्ल्यात मोटारसायकल वापरलेली दिसून येऊन मला चक्की पिसिंग करायला लागू नये यासाठी.

तर या प्रकरणात जितके ज्ञान प्राप्त झाले त्या बेसिसवर वरील सल्ला दिला होता.

धन्यवाद पुनः एकदा.

{{{ भ र पू र जुनी. केबी १००, टू स्ट्रोक वाली. }}}

केबी १०० / १२५, इंड सुझुकी / टीवीएस सुझुकी / टीवीएस मॅक्स १००, यामाहा आर एक्स १००, राजदूत, येझडी / जावा आणि अर्थातच यामाहा आर डी ३५० या टू स्ट्रोक गाड्या अजुनही ज्यांच्याकडे आहेत त्यांचा मला प्र चं ड हेवा वाटतो. ज्यांनी अशा गाड्या कुणालातरी स्वस्तात विकल्या त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते.

तळटीप - तुमची केबी १०० मी चोरलेली नाही. संधी मिळाली असती तर अडीचच काय पण पाच हजारही देऊन विकत घेतली असती.

टू स्ट्रोक गाडी चालवताना जी मजा येते ती फोर स्ट्रोक ला नाही. माझी 1 इंड सुझुकी फर्स्ट लॉट मधील अशीच रूम पार्टनर ला 10 हजारात विकली, ती त्याने 6 महिने वापरून 18 हजारात काढली. पण त्याने बरेच मोडफिकेशन केले होते, पण इतकी वर्षे गाडी वापरून पण 1 किक मध्ये स्टार्ट होत असे. ही 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

मला एक शंका आहे. धाग्याच्या विषयाशी संबंधित आहे म्हणून येथेच विचारतो आहे.
समजा मला गाडी विकायची आहे. (दुचाकी / चारचाकी) तर व्यवहार झाल्यावर विकत घेणाऱ्याने लवकरात लवकर ती त्याच्या नावावर करून घ्यावी यासाठी काय करावे?
व्यवहार झाल्यावर कागदपत्रे घेऊन जा आणि नावावर करून आण, मगच गाडी ताब्यात मिळेल असे सांगावे की गाडीची दुसरी चावी (हेतुपुरस्सर) आपल्याकडे ठेवून घेऊन कागदपत्रे त्याने त्याच्या नावावर केल्यावरच ती दुसरी चावी त्याला सुपूर्द करावी?

जेव्हा कार शोरुम वाले युज्ड कार ज्यांना हव्या त्यांना विकतात तेव्हा आधी आर्सी आणी इन्श्युरन्स ट्रान्सफर फॉर्म्स वर नव्या ओनर च्या सह्या घेतात, त्याची थोडी फी चार्ज करतात, आणी सर्व पैसे ट्रान्सफर्/चेक बिनाघोटाळा कॅश झाला की मग इन्श्युरन्स, गाडीची चावी देतात.आणि फॉर्म प्रोसेसिंग स्वतः करुन आरसी ट्रान्सफर झाले की मग घ्यायला यायला सांगतात. (तोवर्/इन्श्युरन्स ट्रान्सफर होईपर्यंत अपघात झाल्यास मूळ ओनर ला विनंती करुन क्लेम करावे लागेल आणि स्वतः नंतर जी काही इन्श्युरन्स पेनल्टी असेल ती भरावी लागेल रिन्यु करताना.आरसी ट्रान्सफर च्या आधी गाडीने काही गंभीर गुन्हा/मनुष्यवध घडल्यास मूळ ओनर ला धरले जाईल.नंतर सीसीटिव्ही ने कार दुसरा माणूस चालवत होता, विक्री कागदांनी तो ओनर आहे हे सिद्ध करता येईल पण थोडा वेळ लागेल.)

समजा मला गाडी विकायची आहे. (दुचाकी / चारचाकी) तर व्यवहार झाल्यावर विकत घेणाऱ्याने लवकरात लवकर ती त्याच्या नावावर करून घ्यावी यासाठी काय करावे?

---- गाडी विकणाराही नावावर करुन देऊ शकतो. खरेतर तशीच पद्धत असली पाहिजे. फार कठिण काही नाही त्यात. खरेदीदाराचे ओळखपत्र अणि पत्त्याचा पुरावा लागतो आणि ट्रान्सफर फॉर्म वर एक सही लागते. बाकीचे सगळे डॉक्स विकणार्‍या मालकाकडे असतातच. ते एजंटला देऊन विनात्रास काम होऊ शकते. गाडी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर करणे ही विकणार्‍या जुन्या मालकाची जबाबदारी आहे, ती कम्पलसरी असलीच पाहिजे. कारण भविष्यातला त्रास झालाच तर गाडी त्याच्याच नावावर राहिली तर त्यालाच होणार असतो.