रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - क्रंची प्राईड सलाड- सिम्बा

Submitted by सिम्बा on 22 September, 2018 - 08:26

गणेशोत्सावाच्या अवघ्या ७ दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या ३७७ कलमामध्ये दुरुस्ती केली. न्यायालयाचा हा पुरोगामी निर्णय सगळी माध्यमे चढाओढीने साजरा करू लागली. जवळपास सगळ्या ब्रांडसनी आपआपले लोगो प्राईड flag च्या रंगात रंगवून या निर्णयाला आपला पाठींबा दर्शवला. यात अगदी आरोग्य, फूड इंडस्ट्री, गृहकर्ज, वाहतूक, विमान, टायर अशा सगळ्या क्षेत्रातल्या कम्पन्या होत्या हे विशेष.
त्यातलीच काही उदाहरणे पुढे देत आहे.

uber pride.jpgindigo pride.jpgdelmonte Pride.jpgयाच प्राईड कलर्स वरून स्फूर्ती घेऊन मायबोली गणेशोत्सवासाठी घेऊन येत आहोत “ क्रंची प्राईड सलाड”
ज्यांना प्राईड कलर्स ची अलर्जी आहे ते याला “क्रंची रेनबो सलाड” म्हणू शकतात. Wink

साहित्य-

IMG-20180922-WA0015.jpg

झुकीनी, लाल भोपळी मिरची, जांभळा कोबी,ब्रोकोली, बेबीकोर्न, कॉर्न चे दाणे, राजमा, ७-८ लसून पाकळ्या, लिंबू, थोडेसे ऑलिव्ह ऑईल, सलाड ची पाने (हि केवळ कमी-भरती ला आहेत स्पर्धेचे १:१:१ प्रमाण सांभाळण्यासाठी), चिली फ्लेक्स.

कृती:-

IMG-20180922-WA0005.jpg

१) लसुण अतिशय बारीक कापून ऑलिव्ह ऑईल मध्ये घालून ठेवणे. जितका जास्तवेळ राहील तितके चांगले, जर वेळ कमी असेल तर लसूण पेस्ट ऑईल मध्ये घालून वापरा.
२) बेबी कॉर्न, मका दाणे आणि राजमा कुकर ला उकडवून घेणे.
३) झुकीनी चे १ इंच लांबीचे तुकडे करून डायरेक्ट gasवर भाजावेत. त्यांना स्मोक्ड वास येण्या पुरतेच, ते शिजायला नकोत नाहीतर त्यांचा क्रंच जाईल.
४) पर्पल कोबी, सलाड लीफ बारीक कापून घेणे.
५) लाल भोपळी मिरची चे बारीक तुकडे करणे.
६) ब्रोकोली आपण कच्ची वापरणार आहोत म्हणून फक्त तुरे घेणे.
७) या सगळ्या गोष्टी आधीच कापून ठेवणार असाल तर कापून झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा, नाहीतर त्या मऊ पडतील, स्पेशली सलाड लीफ
८) मोठ्या बोल मध्ये पाने (सलाड लीफ + कोबी), दाणे (राजमा+ मका+ बेबी कॉर्न), फळभाज्या (भो. मी.+ झुकीनी) हे सगळे १:१:१ प्रमाणात एकत्र करणे (स्पर्धेसाठी सलाड असल्याने, नाहीतर आपल्याला हव्या त्या प्रमाणात ), ड्रेसिंग साठी ओलिव्ह ओईल घालावे, चवी प्रमाणे मीठ, चिली फ्लेक्स, लिंबू रस घालावे आणि मिक्स करावे.
क्रंची प्राईड सलाड तयार आहे.

IMG-20180922-WA0006.jpgतळटीप:-
- हे काही रॉकेट सायन्स रेसिपी नाहीये, रंगाला रंग उभा करून केलेले सलाड आहे,
त्यामुळे यात वेरीअशन ला प्रचंड वाव आहे, उदा लाल रंगात डाळिंब दाणे , आणि हिरव्या रंगासाठी हिरवी भो.मी.,ऑरेंज रंगासाठी गाजर , पर्पल रंगासाठी बीट उकडून,etc
शेवटी diversity celebrate करणे हाच मुळ उद्देश असल्याने हे सलाड सगळे बदल स्वीकारेल Happy
फक्त एकच पथ्य पाळा कि ज्या भाज्यांना पाणी सुटते , काकडी, टोमाटो अशा भाज्या टाळा, नाहीतर फार पाणी सुटेल आणि सलाड मऊ पडेल,

- घरी खायचे असल्यास यात काही थेंब टोबेस्को सॉस जास्त छान लागते.

Behind the scene :- Happy
- कच्च्या मालाच्या फोटोसेशन वेळी एक सलाड लीफ नावाचे मॉडेल गैरहजर राहिले.
- राजमा आणि कॉर्न एकत्र कुकर ला लावल्याने राजमा अंमळ जास्त शिजला, त्यामुळे सलाड मिक्स केल्यावर ते दाणे वरतून टाकले आहेत
- शेवटच्या फोटो च्यावेळी उन्हे फिरली आणि त्यामुळे फोटो फारच डल आलाय, फोटो पेक्षा बरे दिसत होते. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो बघून लगेच खावेसे वाटतेय.

मी करताना स्पर्धेसाठी नसल्याने ब्रोकोली घालणार नाही किंवा घातलीच तर किंचित वाफवून बटर वर परतवून घेईन.

बाबो! जबरा फोटो सेशन आहे! एंड प्रॉडक्टपेक्षा आधी ची तयारी आणि कच्च्या मालाचे स्टेजिंग भारी वाटले Happy

डेंजर!!!(चांगल्या अर्थाने)
व्यवस्थित वेळ घेऊन नीट तयारी, प्रेझेंटेशन, कंटेंट लिहून केलेली एन्ट्री.
चविष्ठ असेलच.

>>>>>>> एंड प्रॉडक्टपेक्षा आधी ची तयारी आणि कच्च्या मालाचे स्टेजिंग भारी वाटले >>>>>

हे खरे आहे, ओपन बाल्कनी मध्ये , नैसर्गिक प्रकाशात फोटो काढत होतो, एन्ड प्रॉडक्ट् बने पर्यंत पर्यंत तिकडे सावली आली, मग पुढचे फोटो गंडत गेले Sad

सर्वांना धन्यवाद Happy

diversity celebrate करण्याचा अभिनव मार्ग आवडला.
स्पर्धेकरता शुभेच्छा

आहाहा! नक्की करून बघणार. मांडणी आणि आयडिया भारी आहे. Happy
यामध्ये बाल्सामिक व्हिनेगर, ऑलिव्ह ऑइल आणि मधाचे ड्रेसिंग कसे लागेल?

चांगलेच लागेल की,
गेल्या 2 3 दिवसात वेगवेगळी ड्रेसिंग ट्राय केली
1) ग्रेप सीड ऑइल (सुला मधून आणलेले) पण याला वूडी वास येतो, नाही आवडले
2) मस्टर्ड ऑइल, थोडा तिखट पणा छान वाटला , पण लसूण + मस्टर्ड मिश्रण स्ट्रॉंग वाटले.
3) टोबेस्कॉ सॉस, आवडले

अभिनंदन!!
इंद्रधनुष्य सॅलड करून पाहणार.

Pages