बाप्पाचे अनुभव

Submitted by राजेश्वर on 11 April, 2011 - 05:32

श्री. आशुचॅम्प चे अमानविय वाचले, त्यांनतर आलेले एका एकाचे अनुभव वाचले. मग प्रश्न पडला की जर हे भुताचे / अमानविय अनुभव येऊ शकतात तर देव बाप्पाचे सुध्दा बर्‍याच व्यक्तींना अनुभव आले असतिल.
ते त्यांनी ईथे जर शेअर केले तर आम्हाला आनंदच होईल आणी परमेश्वरावरची आमची श्रध्दा वाढेल. माझ्या बाबतित म्हणाल तर प्रकाशीत करण्यासारखा मला अजुन कोणत्याच प्रकारचा अनुभव आलेला नाही. (अमानविय आणी देव बाप्पाचा) पण माझा देवा वर विश्वास आहे अर्थात कोणी याला अंधश्रध्दा म्हणेल पण मला त्यांच्या वाटेला जायचे नाही. प्रयत्न हाच असेल की आपल्या अनुभवातुन परमेश्वरी लिलेचा आनंद घेऊ शकु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मायबोलीची नियमित वाचक आहे . पण हा धागा आजच वाचला.
माझाही एक अनुभव सांगावासा वाटतोय..

स्वतःच घर व्हावं म्हणून मी गणेश चतुर्थीचे व्रत केले होते . व्रताचे उद्यापन गणपतीपुळेच्या मंदिरात व्हावे अशी फार इच्छा होती . पण त्यावेळी आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने एवढा सगळं खर्च ( जाणे येणे , राहणे , उद्यापन ) कसा झेपणार ह्याची खूपच काळजी वाटत होती . बऱ्याच चर्चेअंती शेवटी इथंच (पुण्यात)करू उद्यापन .गणपतीपुळेच बघू नंतर असं ठरलं . माझ्या मनाची अजिबात तयारी होत नव्हती . शेवटी ऑफिसला निघताना देवासमोर हात जोडून म्हणाले तूच काहीतरी मार्ग दाखव.
ही चर्चा सकाळी झाली . ऑफिसला निघाले तर राजाराम पुलावरून जेथे आपण डीपी रोड कडे वळतो तिथे अचानक मागून एका जीपने वर्तके केले . आणि त्याच्या मागच्या काचेवर मोठ्या अक्षरात “श्री गणपतीपुळे देवस्थान ”. लिहिले होते.
दोन मिनिटे काही सुचायलाच तयार नाही . भानावर येऊन परत नीट पाहिलं तोवर ती जीप गेली होती . कुठे गेली काहीच कळलं नाही .
बाप्पानेच संकेत दिला .
मिस्टरांना तिथेच थांबून फ़ोन केला . त्यांना सांगितलं .
आणि खरंच बाप्पाच्या कृपने आर्थिक अडचण असूनसुद्धा व्रताचे उद्यापन अतिशय व्यवस्थितपणे गणपतीपुळेच्या मंदिरात पार पडलं .

आम्ही पहिल्यांदा च 4 wheeler घेऊन लोनावळयाला जात होतो अर्थात गाड़ी वडील चालवत होते पन घाट असल्याने मनात भीति होती तेव्हा मनात म्हटले स्वामी आम्हाला सुखरूप न्या आणि जस घाट चढायला सुरुवात केली तस आमच्या गाडीच्या पुढेच अक्कलकोट बस आली आणि घाट संपेपर्यंत आमच्या पुढे च होती तेव्हा खर च जाणवल स्वामी म्हणतात तस भीऊ नकोस मि तुझ्या पाठीशी आहे

कधी नव्हे ते बीएससी लास्ट ईयर ला मि पहिल्यांदा च फेल झाले होते आम्ही 6-7 जण फेल झालो होतो नन्तर पुढच्या वर्षी पुनः all subject with practical अस घेऊन exam दिली आणि प्रत्येक पेपर लिहायच्या आधी गणपति अथर्वशीर्ष म्हणायचे अर्थात अभ्यास पन खुप केला होता च पन मनात भीति होतीच पन बाप्पा पावला आणि 6-7 जन मधे फक्त मि एकटी च पास झाले
गणपति बाप्पा मोरया

रीया लिही गं.

वरून वाहत आलेल्या गंगेत नहाणारे आम्ही. शेगावच्या गजाननावर पूर्ण विश्वास.

इतरांचे अनुभव वाचुनही बरं वाटतं

शंकर महाराज पुणे सांगत ईश्र्वराचे अनुभव हे भक्ताचे एक परमेश्वराने केलेले कौतुक असते, आजही असे अनेक अनुभव अगदी सहज येतात, आपले आयुष्य सहज पणे कसे उजळता येते हा अनुभव घ्यायचा असल्यास " मी बोलतोय " हे डॉक्टर सुनील काळे यांचे पुस्तक जरूर वाचा अनेक जणांचे जीवन सुखी वैभवशाली, आनंदी झाले

नुकताच आलेला अनुभव तुमच्या सोबत शेअर करावासा वाटला.
नुकतच घरी गौरी गणपती झाले.आमच्याकडे उभ्या गौरी असतात. माझ्याकडे आणि जावेकडे आलटुन पालटुन असतात.
गेल्या ४ वर्षात काही ना काही कारणाने माझ्याघरी गौरी नाही आल्या.
यावर्षी नवीन घर घेतले आणि ४ वर्षानंतर नवीन घरात गणपती आणि गौरी आल्या म्हणून आम्ही सगळे उत्साहात होतो.
गणपती आगमन, गौरी आगमन , पुजन चालु असताना सतत का कोण जाणे डोळे भरुन येत होते...तसही अतिशय आनंद झाला की माझे नेहेमी डोळे भरुन येतात..
सोसायटीतल्या भरपूर मैत्रीणी, नातेवाईक बोलवुन गौरी चे हळदीकुंकु अगदी आनंदात पार पडले.
गौरी साठी सगळे साग्रसंगीत फराळाचे पदार्थ आणले त्यात लाडु आणायचे राहिले होते...तसं २-३ वेळा साबा ना बोलुन दाखवलं तर दुसर्या दिवशी आलेल्या कोणीकोणी रवा, बेसन, बुंदी असे ३ प्रकारचे लाडु आणून दिले...
"तुझी गौर यावेळी सगळं साग्रसंगीत करुन घेते आहे.." असं म्हणाल्या पण साबा.
हळदीकुंकु ची धामधुम संपली
"गौरायांनो, जमेल तसं केलय..चुकलं माकलं पोटात घाला आणि क्षमा करा.." अशी मनापासुन प्रार्थना केली आणि साधारण रात्री ११:४५ च्या दरम्यान रात्री मी झोपायला गेले...
जागेपण आणी झोपेच्या सिमेवर असेन ..अचानक डोळ्यासमोर मोठ्ठा जाळ दिसला...आगीची धग जाणवावी ईतका जवळ आणि स्पष्ट...दचकुन जाग आली...१२:१५ वाजले असतील रात्रीचे...१५-२० सेकंद तशीच पडुन राहिले गादीवर..असं का झालं असा विचार करत..मग अचानक काहीतरी वाटलं आणि बाहेर हॉल मद्धे गौरींकडे बघुन येउ म्हणून बाहेर आले....
तर ..गौराईपुढे लावलेली समई शांत तेवत होती पण तिच्या अगदी जवळ ...ज्योती जवळ एक प्लास्टीक पिशवी चा कागद आणि पेपर नॅपकीन पोचला होता....शेजारच्या खिडकी मधुन वारं येत असावं आणि तो कागद समई च्या जवळ गेला असावा..समई पण गौरी च्या अगदी साडीजवळ होती...कागद पेटला असता तर..साडी ला काही झालं असतं तर..मागे डेकोरेशन मद्धे भरपुर कागद, ओढण्या ई ई बरच काही होतं.....
परत एकदा डोळे भरुन आले...म्हणजे याचा अर्थ माझी गौराई नक्की आली होती मला आशीर्वाद द्यायला..आणि धोका बघुन सावध पण करुन गेली....

वा वा वा, किती मस्त धागा. असो, माझा पण १ अनुभव लिहितो.
एकदा चुकून माझी गाडीची किल्ली गाडीतच राहिली आणि मी दार बंद केले. (हा पण देवाचाच संकेत असणार, पण ते एक जाऊ दे.)
आता दार उघडणार कसे? हँगरची तार वापरून दार उघडता येते, असे कुठेतरी वाचले होते म्हणून खटपट केली पण जमले नाही.
मी लगेच देवाचा धावा सुरू केला की मला या महान संकटातून वाचव. आणि काय आश्चर्य, २ मिनिटात एक मोटरसायकलवाला आला आणि मला विचारले त्याने की मी मदत करू का काही? मी प्रॉब्लेम सांगितला तर त्याने ती तार वापरून २ मिनिटात दार उघडून दिले की हो. पण देवाच्या खर्‍या कृपेचे रूप पुढे आहे. मी अगदी मनापासून त्याचे आभार मानले आणि म्हणालो की तुमच्यासारख्या भल्या माणसाची मला खूप मदत झाली. आजकाल कुणी कुणाची मदत करत नाही हो. तर तो मला म्हणाला, अहो मी काही भला माणूस नाही. गेल्याच आठवड्यात तुरुंगातून सुटून आलोय. ते पण कारची चोरी करायचो म्हणून.
मी लगेच हात जोडले आणि म्हणालो, देवा, तू किती महान आहेस. तू मदत पाठवलीस आणि ती पण साधी सुधी नाही, एकदम प्रोफेशनल माणसालाच पाठवलेस की.

तर तात्पर्य काय, भक्तीभाव महत्त्वाचा. श्रद्धा असली की जिथेतिथे देव दिसतो आणि पितळ पण सोन्यासारखे वाटू लागते.

उपाशी बोका तुमचा अनुभव वाचून डोळे भरून आले. तुम्हाला भेटलेला माणूस म्हणजे पूर्वजन्मीचे वाल्मिकी ऋषी असणार याची मला खात्री आहे. त्या जन्मात त्यांचा वाल्याचा वाल्मिकी झाला आणि या जन्मात गाडीचोराचा कसा वेळेवर देवदूत झाला बघा.
गाडीत चावी अडकली हा सुद्धा ईश्वरी संकेत आहे. 'चावी गाडीतच आहे' म्हणजे देव तुम्हाला सांगतोय बघा कि 'देव तुमच्या अंतःकरणातच आहे'. तुम्हाला याचा विसर पडला म्हणून तुम्ही गाडीबाहेर अडकलात. म्हणजे थोडक्यात काय तर भवसागरात अडकलात. भक्तीचा हँगर वापरून मोक्षप्राप्तीचा दरवाजा उघडा म्हणजे तुमची बाप्पाशी भेट होईल.
हरी ओम!!!!!!!!!

एकदा चुकून माझी गाडीची किल्ली गाडीतच राहिली आणि मी दार बंद केले. >.
पण गाडी लगेच लॉक होत नाही ना. थोड्या वेळाने लॉक होते.

मला काॅलेजला असतांना आलेला अनुभव.
त्यावेळी आमच्याकडे मोबाईल वगैरे नव्हते. आम्हाला हाॅस्टेलला जेवण बनवायला मनाई होती, (व बनवताही येत नसे तेव्हा ) थोड्या मुली चोरून स्टोवर चहा मॅगी वगैरे बनवत. जेवण बनवण्यासाठी एक मावशी यायच्या. पण त्यांच्या येण्यात नियमितपणा असा नसायचा. त्या नाही आल्या तर ब्रेड बटर किंवा मॅगी. त्या आल्या नाहीत, येणार नाहीत तर रात्रीच कळायचं, आधी कळवणे हा प्रकार नाही, त्यामुळे कितीदा तरी बिस्किटं, शेव वगैरे बॅकअप आम्ही ठेवत असू. हाॅटेल, खाणावळ जवळपास काही नाही. अगदी काही हवय तर बरीच पायपीट, त्यामुळे रात्री बाहेर जेवण नको वाटे. विकांताला मी गावी जात असे, अशीच एकदा जोडून सुट्टी आलेली म्हणून गुरूवारी गावी गेले, घरी पोचायला रात्र व्हायची , व मला दमून खूप झोप यायची, मी तडक घरी जाऊन झोपत असे, अगदी जेवायला उठवलं तरी मला झोपेतून उठायला जिवावर येई. व खूपदा मी उपाशीच झोपत असे. कुणी कितीही उठवलं तरी, त्यामुळे आई मला आल्या आल्या वाढायची. अशाच त्या गुरुवारी मी उपाशी झोपले. दुसर्‍या दिवशी आजी माझ्यावर खूप रागावली, म्हणाली असा अन्नाचा अपमान करू नये. काल तुझं ताट वाढून ठेवलं होतं तरी तू न जेवता झोपलीस. आधी देवखोलीत जा व क्षमा माग. तुला दत्त गुरू कधीच गुरुवारी उपाशी ठेवणार नाहीत. मी आज्ज्जीच्या समाधानासाठी माफी मागितली व ती गोष्ट विसरूनही गेले. पण मग असं व्हायला लागलं की दर गुरुवारी मला दुपारी किंवा रात्री साग्रसंगीत पूर्ण जेवणाचे ताट मिळू लागले. आधी लक्षात आले नाही, तीन चार गुरुवार सलग घडल्याने लक्षात आले. नेमकं काही तरी कारण असायचं कुठल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस, नाहीतर कुणाची उगाचच एखादी ट्रीट. पण गुरुवारी हटकून. एकदा काय झालं तर गुरुवारी दुपारी काहीच झालं नाही. मी रात्री होस्टेलवर गेले तर जेवण बनवणार्या मावशीही नाहीत. मला अगदी आश्चर्य वाटले. असही होऊ शकतं? म्हणजे एवढे आठवडे होतय ते नुसते योगायोग? आपल्या मनाचे खेळ? मी, माझी रुममेट, बाजूच्या खोलीतील अजून दोन मैत्रिणी आल्या. सगळ्याच ऊपाशी. मॅगी, चहा बिस्किटे सगळाच स्टाॅक संपलेला. सगळ्यांचेच चेहरे भुकेने एवढेसे झालेले. रात्रीचे साडेदहा वाजायला आले. मी मनात म्हटलं म्हणजे दत्त गुरू असं काहीच नसतं ना? गुरुवारचं जेवण, देवबीव आपल्याच मनाचे खेळ ना? एवढ्यात आमच्या खोलीचा दरवाजा वाजला. पहिल्या मजल्यावरची एक मुलगी हातात मोठ्ठा जेवणाचा डबा घेऊन हजर. म्हणाली बघाना माझ्या आईने अगदी पाच लोकं जेवतील एवढा मोठ्ठा डबा दिलाय. त्या रात्री आम्ही पाचही जणी जेवलो. पूर्ण जेवण, अगदी गोडासहीत. गुलाबजाम होते. जेवतांना डोळ्यात आलेले अश्रू मी हळूच पुसले, व मनोमन दत्तगुरुंची माफी मागितली.

बापरे.. सर्व प्रतिसाद वाचुन हसावे कि रडावे हेच समजेनासे झालेय. आपल्या महाराष्ट्रात संत तुकाराम, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, संत गाडगे बाबा, म. ज्योतिबा फुले, छ. शाहु महाराज, नरेन्द्र दाभोळकर ई.ई. अंधश्रद्धेला हाणुन पाडणारे आणि समाजाला विचारी बनविणारे थोर समाज सुधारक होउन गेले तरी आपण अजुनही केवढे अंधश्रद्ध आहोत..!! Uhoh

अमानवीय शक्तींविरुद्ध लढा देता देता मला अनेक दैवी अनुभव आलेत. एकदा असाच अमानवीय दुष्ट शक्तीच्या तडाख्यात सापडलो होतो, त्या शक्तींनी मला वडाच्या पारंब्याना बांधलं होतं, अमानवीय शक्तींची लहान पोरं माझ्या अवतीभवती फिरत काय होती मला पकडून झोका काय झुलत होती, तऱ्हा तऱ्हा झाली होती विचारू नका. माझे जगण्याचे चान्सेस खूपच कमी होते इतक्यात अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली सगळीकडे धूर पसरला आणि एक साधू अचानक माझ्यासमोर अवतीर्ण झाला, अमानवीय शक्ती गोंधळात पडल्या काय होतंय काही समजलंच नाही त्याने पटकन माझ्या गळ्यात काहीतरी टाकलं आणि अंगारा लावला तसा मी परत ताजातवाना झालो, मला तर अजूनही वाटतंय तो साधू बहुतेक तिरंगा मधला राजकुमार असावा कारण तो पार्ट गळ्यात पडल्यावर माझ्यात चक्क उडण्याची शक्ती संचारली होती, आणि त्या अमानवीय शक्तींपासून मी माझा बचाव करण्यात यशस्वी झालो होतो. सविस्तर किस्से वेळ मिळेल तसा लिहीत जाईनच.

अरेच्चा भुत्याभाऊ तुम्ही इकडे कसे काय? मला वाटलं चांगल्या शक्तींचा धागा आहे म्हणून भुतांच्या आयडीना इथे प्रवेश नसेल, तुम्हाला काय त्रास नाही झाला इथे लिहिताना म्हणजे ते सिनेमात नाही का दाखवतात मंदिरात पाय ठेवायला भुतं घाबरतात, पाय ठेवल्यावर लगेच शॉक बसतो वैगरे , तसं इथे लिहिताना शॉक वैगरे नाही बसला तुम्हाला? कमालच झाली म्हणायची ती.

१२ प्रतिसाद बघितले तेव्हाच वाटलं होतं की या धाग्याचं पण वाटोळं झालय म्ह़णून...आत येउन बघितले तर खात्रीच पटली...
असो... गेट वेल सून...

>>बापरे.. सर्व प्रतिसाद वाचुन हसावे कि रडावे हेच समजेनासे झालेय. आपल्या महाराष्ट्रात संत तुकाराम, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, संत गाडगे बाबा, म. ज्योतिबा फुले, छ. शाहु महाराज, नरेन्द्र दाभोळकर ई.ई. अंधश्रद्धेला हाणुन पाडणारे आणि समाजाला विचारी बनविणारे थोर समाज सुधारक होउन गेले तरी आपण अजुनही केवढे अंधश्रद्ध आहोत..!! Uhoh>>
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत होतेय एवढेच लिहु शकते मी...

<<< श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात गल्लत होतेय एवढेच लिहु शकते मी...>>>
अगदी अगदी. म्हणूनच, माझी ती श्रद्धा आणि दुसऱ्याची ती अंधश्रद्धा याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

बोकलत आणि ग्रुप
तुम्ही कृपया या आणि अमानवीय धाग्यावर येउन असे तुमचे अनुभव टाकू नका न प्लिज
प्रत्येक कथा एक रस असते आणि भीतीरास आणि भक्तिरस हे सुध्दा त्याचाच भाग आहे,.बाकीच्यांचे अनुभव खरे आणि तुमचे खोटे असे मी मुळीच म्हणणार नाही ,त्यांचे ही खोटे किंवा सांगोवंगी असूच शकतात मात्र ते वाचून आम्हाला भिती रस आणि भक्तिरसाचा आनंद मिळतो,माझ्यासारखा सर्व सामान्य वाचक म्हणूनच सुशी ,धारप,मतकरी यांचा प्रचंड चाहता आहे,पण म्हणून हे लेखक अंधश्रद्धा पसरवतात किंवा स्वतःचे खरे अनुभव लिहितात असे कोणी म्हणणार नाही,ही त्यांची कल्पनाशक्ती आहे आणि तिच्यातून आम्ही भीतिरस चा आस्वाद घेतो अगदी तस्सेच इथे आणि अमानवीय धागाबाबत आहे हे कृपया लक्षात घ्या.
तुमचे किस्से खरे असूही शकतील मात्र आम्हाला (बरेच लोकांचा तुम्हाला विरोध आहे या अर्थाने 'आम्हाला 'म्हटलेय)तुमचे किस्से मुळीच भीतीदायक वाटत नाहीत तर विनोदी वाटतात तुम्ही विनोदी लेखन चालू केलेत तर बरे होईल,नाही केलेत तरी चालेल मात्र हे दोन्ही धागे विनोदी करु नका
(माझे स्वतःचे काहीच लेखन नाही म्हणून मला कुणी काय लिहावे हे सांगण्याचा अधिकार नाही असा कोणी युक्तिवाद कृपया करू नका,आम्ही इथे फक्त वाचनमात्र आहे आणि वाचकाला तो अधिकार बहुतेक असावा Wink

Pages