याला मूर्खपणा नव्हे तर काय म्हणावे?

Submitted by अज्ञातवासी on 14 September, 2018 - 12:44

आताच टीव्ही बघताना एका चॅनलवर व्हिडीओ दाखवत होते, तोही बातम्यांमध्ये...
"पुण्यातील सोनवणे कुटुंबियांनी केला कोंबड्याचा वाढदिवस"
व्हिडिओत एक कोंबडा राजेशाही थाटात खुर्चीवर बसला (की बसवला) होता. आजूबाजूला सजावट होती. एक बाई खिदळत पिल्लू पिल्लू करत होत्या (कारण कोंबड्याच नाव त्यांनी पिल्लू ठेवलं होतं म्हणे). त्यांचा मुलगाही मध्येच येऊन सेल्फी पाऊट देत होता. कोंबडा चोच मारून त्याच्यासमोरचा केक चिवडत होता, ते बघून ह्या बाई त्याला मिठी मारून पिल्लू पिल्लू करत त्याची पप्पी घेत होत्या. चॅनल वाले सुद्धा पुढच्या वर्षी खास या कार्यासाठी भूतदया ही नवीन कटेगरी तयार करून त्याचं नोबेल यांना मिळावं या स्टाईलमध्ये दाखवत होते...
सगळं फक्त प्रसिद्धीच्या अट्टहासापायी....
एक गोष्ट आठवली. लहानपणी मी बाबांच्या मागे लागून केक आणायचा, केक आणायचा म्हणून त्यांना बेकरीत घेऊन गेलो होतो. वेळेवर बाबांनी दोन केक घेतले. मला एक केक मागितला तर दोन मिळाले म्हणून मी खुश. पण बाहेर येताना बेकरीबाहेरच एक म्हातारी बसायची, काहीबाही मागून खायची, तिला त्यातला एक केक त्यांनी देऊन टाकला. आणि वरून काही पैसेही. आणि फक्त एक मागितलं...
"आजीबाई पोराला आशीर्वाद दे."
दात नसलेली ती म्हातारी खळखळून हसली. आज अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं, तो प्रसंग आठवून!

संताप होतोय, आणि कोंबड्यांने चिवडल्याने तो भलामोठा केक कुणी खाऊ शकणार नाही. तो फेकावाच लागेल. एखाद्या गरीबाचं पोट भरलं असतं ना, जास्त समाधान मिळालं असतं, या मुर्खपणा पेक्षा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Showबाजी म्हणावे. फक्त कॅमेर्यासमोर येण्यासाठीचा अट्टहास. हा एक प्रकारचा आजारच झालाय आजकाल. आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी अगणित प्रसारमाध्यमे हजर आहेत.
"मी अचाट चांगलं (?) काहीतरी करतोय, माझ्याकडे बघाच".

एखाद्या गरीबाचं पोट भरलं असतं ना, जास्त समाधान मिळालं असतं, या मुर्खपणा पेक्षा...
>>>
चॅनलमध्ये काम करणार्‍या असंख्य लोकांचे पोट तुम्ही (व इतर अनेकांनी) तो बघितल्याने भरलेच की. तुम्ही पाहिले नसते तर ते उपाशी राहणार. तुम्ही बघू नका, ते दाखवणार नाहीत.

ते तरी बरे म्हणायची वेळ आली आहे.
बातम्यां मधे चोरी करताना, आत्महत्या करणार्‍या लोकांचे, खून करतानाचे, प्रेतांचे cctv footage दाखवतात. अतिशय धक्कादायक!!

माननीय टवणे सर...
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, पण आजकाल एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे अशी परिस्थिती झालीय. आणि माणूस ठरवून बातम्या बघत नसतो (की नको नको, आज किनई मला फक्त गॉड गॉड बातम्या बघायच्या आहेत.)
एक बातमीमागे ही (बातमी?) आली आणि संताप झाला, आणि लिहिले इतकेच.
...आणि हो अर्थातच माझ्यामुळे कुणाचं पोट भरत असेल त्याचा आनंद आहेच, पण काहीही दाखवताना आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त ते करताना तारतम्य आणि माणुसकी नावाची गोष्ट ठेवली तर जग अधिक चांगलं होईल, नाही का? Happy

Showबाजी म्हणावे. फक्त कॅमेर्यासमोर येण्यासाठीचा अट्टहास. हा एक प्रकारचा आजारच झालाय आजकाल. आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी अगणित प्रसारमाध्यमे हजर आहेत.
"मी अचाट चांगलं (?) काहीतरी करतोय, माझ्याकडे बघाच".>>>>>अगदी बरोबर. पण यात समाजासाठी काहितरी चांगले करणारे लोक दुर्लक्षित राहतात, याचं दुःख आहे.

ते तरी बरे म्हणायची वेळ आली आहे.
बातम्यां मधे चोरी करताना, आत्महत्या करणार्‍या लोकांचे, खून करतानाचे, प्रेतांचे cctv footage दाखवतात. अतिशय धक्कादायक!!>>>>>बरोबर

आपले पैसे खाणार्‍या नेते, अभिनेते आणि बाबा/बुवांच्या वाढदिवस ऊत्सवाच्या लाईव टेलिकास्टपेक्षा निरपेक्ष भावनाने प्रोटीन (अंडी आणि अजून कोंबड्या) देणार्‍या कोंबड्याचा वाढदिवसाचे टेलिकास्ट स्तुत्य आहे ना?
फक्त केक बिगर अंड्याचा असावा असे वाटले. Sad

मला ऊगीचच सटायर वगैरे असावे असे वाटले... माबुदोस.

अमक्या तमच्याच्या बाळाने सू केली, शी केली असल्या बाइट्स बघण्यापेक्षा हे बरे की. नाहीतरी टीव्ही बघणे सोडून दिलेले आहे. क्वचित कधीतरी एनकाउंटर झाला टीव्हीशी तरच

<<<आणि कोंबड्यांने चिवडल्याने तो भलामोठा केक कुणी खाऊ शकणार नाही.>>>
पण मी म्हणतो, कोंबड्याच्या नशीबाने त्याला केक मिळाला. त्याच्या केकवर का डोळा?
इतरांसाठी दुसरा आणा ना, नि गरीबांना वाटायला तिसरा!
एव्हढे भरमसाठ पैसे आहेत सगळ्यांच्याकडे, करावे खर्च!

कोंबडयाने मेणबत्त्या विझवल्या की नाही?
आणि कोंबडयाने चिवडल्याने तो भला मोठा केक का फेका?
चिवडलेली बाजू चाकूने वेगळी केली की झालं.

हां, मुळात पक्ष्यांना / प्राण्यांना असले पदार्थ खाऊ घालावेत का, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने? हा मुद्दा होऊ शकतो.

पाळीव पशुपक्ष्यांवर प्रेम व्यक्त केल त्यांनी त्यात गैर काय? जे थोड जगावेगळे आहे त्याची बातमी होते. चॆनेलवाल्यांनी तरी सारख नवीन नवीन काय दाखवायच?

हाहा. पुण्याला कोणीतरी जग्वार घेतली आणि आनंदाने सोन्याचे पेढे वाटले. काका हलवाईकडून खास सोळा हजार किलोने बनवून घेतले. बाप बेटे दोघेही सोन्याने मढलेले होते. आता कोणी पाळत ठेवून घरात चोरी झाली तर नवल वाटायला नको. काका हलवाईचा धंदा वाढेल मात्र. थोडक्यात आजकाल या प्रकारालाच बातम्या म्हणतात.
तो पुनरजन्म प्रकारही तसाच अचाट. ना शेंडा ना बुडखा. शाहीदने मुलाचे नाव ठेवले आणि रणविरच्या घरी लगीनघाई सुरू याही बातम्याच आहेत आणि त्या कोणाला महत्वाच्या वाटतही असतील.

पुण्याला कोणीतरी जग्वार घेतली आणि आनंदाने सोन्याचे पेढे वाटले. काका हलवाईकडून खास सोळा हजार किलोने बनवून घेतले. बाप बेटे दोघेही सोन्याने मढलेले होते. आता कोणी पाळत ठेवून घरात चोरी झाली तर नवल वाटायला नको. काका हलवाईचा धंदा वाढेल मात्र. ....... मी पन हेच लिहिनार होते. ते पोकळे नावाचे आहेत.

मल वाटलं ते पुनर्जमावाल्या प्रोग्रामबद्दल लिहल्यं का... शा? किति हा मूर्ह्पणा... तसल्या कार्यक्रमांवर लिहायचे तर काय कोंबड्याचे वाड्डिद्वस साज्रे करन्यावर लिहितात..

सोन्याचे पेढे वाटणार्‍याची लोकसत्तेत बातमी आहे. त्या बातमीखाली प्रतिक्रियांमध्ये एका वाचकाने लिहिलंय हा सोनपेढे वाटणारा मराठा आरक्षण मोर्च्यात सामील होता. खखोदेजा.

ब्रिटिशांना देशभक्त क्रांतिकारकांबद्दल टिप देणारे रास्वंसंघाचे कार्यकर्ते होते... तसेच काही असेल..

तो माणूस नक्कीच देवमाणूस/देवदूत असावा. नायतर तो कोंबडा त्याचा जवळचा नातेवाईक असावा, एखाद्या दिवशी खेळता खेळता त्याच्याकडून अनावधानाने ऋषींची तपश्चार्या भंग झाली असावी आणि त्याला कोंबडा होण्याचा शाप मिळाला असावा. नंतर दया येऊन उशाप दिला असावा जर वाढदिवसाला मॉन्जिनीसचा केक कापलास तर परत माणूस होशील. नायतर एखाद्या चेटकिणीने पण त्याला कोंबड्यात रूपांतरित केला असावा. अशा अनेक शक्यता असू शकतात.

खाउद्या हो.. कोंबड्याने केक खाला तर खाल्ला.. गणपती उठले कि आपण कोंबड्याला खाउ.. म्हणजे केक सुद्धा आपल्याच पोटात जाइल..!! Proud Proud Proud

" शेवटी माझीच लाल" अस म्हणणार माकड आठवतं अशा बातम्या पाहिल्या /ऐकल्या की

या कॅटॅगिरीमधली बंडल लोक काय थराला जातील सांगता येत नाही , पण चॅनलवाले उगाच कोणीतरी पैसे देतय म्हणून कशाचीही बातमी बनवणार असतील तर पहिले त्यांना ठोकले पाहिजे . टॉमीभाऊचा वाढदिवस आणि शुभेच्छूक डूकरे असे बॅनर / फ्लेक्स लावताना त्याच्यामागे सिग्नल किंवा इतर महत्वाच्या पाट्या झाकल्या जात आहेत याची जराही खंत या मुर्खांना नसते शिवाय महापालिकेचे किंवा ट्राफीकचे कर्मचारी किंवा अधिकारी यांनाही त्याचे काही घेणे देणे नसते .

भावी आमदार आणि भावी नगरसेवक वगैरे पोस्टर लावून घेणारी ही त्यातलीच पुढची येडxx पिढी ... देवा यांना शहाणपण दे रे बाबा

पत्रकारिता किती खालच्या पातळीला पोहचली आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. याला कारण म्हणजे २४ तास बातम्या देण्याचा अट्टाहास आणि मग आम्हीच कसे सगळ्यात पुढे (एक कि २ पाऊल पुढे / मागे / वरती / खालती हा भाग वेगळाच) हे दाखवण्याची खाज ...

त्यापेक्षा सरळ दूरदर्शनच्या बातम्या बघा ... फार चांगल्या असतात

त्यापेक्षा सरळ दूरदर्शनच्या बातम्या बघा ... फार चांगल्या असतात>>
बातम्या बघायची गरज का असावी पण? आपल्या बुडाखाली किती अंधार/ जाळ आहे हे पहावं प्रत्येकाने Wink

पूर्वी फक्त सातच्या ठळक बातम्या बघत होतो पण काही राहून जातंय असं वाटत नव्हतं कारण वर्तमानपत्रात सगळ्या बातम्या वाचल्या जायच्या. आता वाचन जवळजवळ बंदच झालंय. कसं वागूू नये हे कळावं म्हणून बातम्या बघायच्या.