पौष्टिक सलाड: कारलं

Submitted by अतरंगी on 18 September, 2018 - 06:45

तेल, साखर, मीठ या सर्वाने होणारे नुकसान सर्वांनाच माहित आहे. ते वगळून पण ताटातील सर्व महत्वाचे घटक आणि त्यातून मिळणारे पोषक मुल्य मिळातील अशा सलाडच्या पाककृतींसाठी ही मालिका. ही सगळी सलाड आपल्या जवळच्या भाजी मंडईत मिळणार्‍या घटकांपासून आणि घरी बनवता येण्यासारखी आहेत.

मी स्वतः आहारतज्ञ नाही, मला त्यातले काही कळत नाही. हा आहारविषयक सल्ला नाही. मीठ, तेल, साखर विरहीत जेवण बनविण्याच्या अट्टहासात तयार झालेल्या/ मिळालेल्या/ ट्राय केलेल्या रेसीपी आहेत.

घटक क्र १:- चवळी (एक मुठ)
घटक क्र २:- पालक ( एक वाटी)
घटक क्र ३:-कारलं + थोडी झुकिनी ( अर्धी वाटी)
घटक क्र ४:- डाळींब.

कृती:-
चवळी धुवून घ्या
डाळींब सोलून घ्या
पालक निवडून घ्या
कारलं आणि झुकिनीच्या चकत्या करुन घ्या. Happy

चवळी,पालक, कारलं, झुकिनी स्टीम बास्केट वापरुन वाफवून घ्या. त्यात आवडीप्रमाणे डाळींब टाका.

टीप्सः- सलाड अजुन गोड हवे असेल तर थोड्या वाळवलेल्या क्रानबेरीज टाका.
यात झुकिनी कमी करुन ताजे रसदार किसलेलं गाजर टाकलं तर अजुन छान चव येते.

IMG-0413.JPG

चव चांगली वाटली नाही तर पैसे परत Wink

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी कल्पना आहे!
अतरंगी हा धागा शीर्षक बदलून गणेशोत्सव ग्रूपमध्ये टाका. चुकून पाककृतीमध्ये आला आहे.

ओके. Happy

सॅलडच्या साहित्यामुळे करणं होईल असं वाटत नाहीये पण एक सुचवू का? तुमची रेसिपी गणेशोत्सवाकरता नाहीये तर मग शिर्षक तरी वेगळं देणार का?

स्पर्धेच्या नियम क्रमांक ८ नुसार सलाड चविष्ट असणे बंधनकारक आहे. Light 1

Submitted by सस्मित on 18 September, 2018 - 06:56>>>
ही पाककृती आणि मालिका स्पर्धेसाठी नाही. Happy

Submitted by अतरंगी on 18 September, 2018 - 06:59>>>
तरीसुद्धा सलाड चविष्ट असणे बंधनकारक आहे

तरीसुद्धा सलाड चविष्ट असणे बंधनकारक आहे>>>>>

माझ्या साठी सलाड किंवा जेवण पौष्टिक असणे बंधनकारक आहे. पौष्टिकता हा प्रथम उद्देश आहे.

म्हणूनच मालिकेचे नाव पौष्टिक सलाड आहे, चविष्ट सलाड नाही.

Happy

तुमची पौष्टिकतेची ओढ तीव्र असेल तर सापडेल.>>>>>>>>>>>.

पण माझी जी पौष्टिकतेची जी ओढ आहे, त्याची तृप्तता माझ्या स्वतःच्या हाताने होत आहे. मग मी ती शोधायला बाहेर का पडेन? Happy

ओके.