प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 12 September, 2018 - 08:38

ती आली होती फक्त एकदा घरी

एक वाटी दूध मागायला

मला वाटले तिला दूध आवडते

म्हणून गेलो म्हशी पाळायला

खरी पंचाईत तेव्हा झाली

जेव्हा कळले म्हैस व्यायल्याशिवाय

दुध देतच नाही

म्हशींसोबत रेडा बघितला

बाप माझ्यावर जाम भडकला

शिव्या देउनी मला खूप बुकलला

व्यक्त केले मग मी पुढचे पत्ते

सांगून टाकले त्यांना , भावी सुनेला दूध आवडते

इकडे झाला उलट गेम

रेड्याने धरला म्हशींवर नेम

रेडा असा काही चौखूर धावला

प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

बाप माझा कुत्र्यागत पिसाळला

सुरु झालं मग घरी महाभारत

कसलं दूध अन कसलं प्रेम

सरळ गेलो माघारी

अन रेडयासंगे म्हशी दिल्या परत

सिद्धेश्वर विलास पाटणकर

Group content visibility: 
Use group defaults

प्रेम भंगामुळे तुमचे मन आतून खोल दुखावले गेले आहे. व्यक्त होत रहा. हळू हळू दु:ख कमी होईल. पण एकटे पडू नका. दुसृया वहिनी शोधा. तुम्हाला मनःशांती मिळो.

प्रेम भंगामुळे तुमचे मन आतून खोल दुखावले गेले आहे. व्यक्त होत रहा. हळू हळू दु:ख कमी होईल. पण एकटे पडू नका. दुसृया वहिनी शोधा. तुम्हाला मनःशांती मिळो.

@ रावल साहेब ,

मी कुसुमाग्रज नाही

नाही भा रा तांबे

कल्पना आंबट लागली तर कैरी

नाहीतर गॉड गॉड आंबे

त्ये कवी कि कोण काय असतंय

जरा इस्कटून इस्कटून सांगत्याल काय ?

म्या तर गावरान हाय , रानोमाळ हिंडणारा

कोण आपण , माझे मित्र बनता काय ?

कोण म्हणतं आम्ही कवी आहोत

हा मुळी आमचा प्रांतच नाही

जे घडतंय जे बघतोय

ते अजून बिघडू नये

म्हणून शब्दांत मांडतो

आम्ही कधी समाजाशी भांडतो

कधी हसवतो , कधी नेतो रानात

कधी जगाच्या पाठीवर

तर कधी नदीच्या काठावर

कधी समुद्रात फेसाळतो त्यांना

कधी वाऱ्याबरोबर सुकवतो त्यांना

कधी तार्यांची सैर करतो

कधी कंटकांशी वैर करतो

आम्ही इथेच असूनही

मनाने संचार करतो

कविता नाही करत

फक्त तुम्हाला स्मरतो

फक्त समाजासाठी मरतो

म्हणूनच भावना शब्दांत मांडतो

सिद्धेश्वर विलास पाटणकर

खालचा केलेला प्रयत्न कुणासाठी आहे , ते वेगळे सांगायला नको ...

त्ये तुमचं वाचन बीचन काय असतं

त्ये तुमच्या ह्याच्यात घाला

ह्याच्यात म्हणजे काय ,त्ये इचारायचं न्हाय

सरळ सरळ घालायचं , गप फाकवुन दोन पाय

वाचून वाचून झालाय , तुमच्या डोक्याचा खुराडा

कुठली बी कोंबडी कधीपण ओरडतेयं

सगळ्याच ज्ञानाचा राडा

मेंदू मॉप पाजळून पाजळून

छोटी अंडी तयार झाली

रवण करुनिया त्यातून सारी पिल्ले बाहेर आली

कुणी शिकवे डॉक्टरांसी तर कुणी धरे सरांना

कुणी शोधे ब्रह्मांड अवघे तर कुणी छेडे सुरांना

आम्ही बापुडे अज्ञ म्हणोनि

निव्वळ देखे खेळ जो चाले

अनुभवांना पकडून आम्ही

फक्त शब्दबद्ध ते केले

अमा ताई , आपल्याला माहिती नसेल तर सांगतो , प्रेम मला भरभरून मिळालेले आहे देवाच्या कृपेने .. सर्व व्यवस्थित चाललेले आहे .. काळजी नसावी ... आपल्याला वाहिनी मिळून एक तप लोटले आहे . आणि माझे दोन गोंडस राजकुमार , अगदी माझ्यासारखेच येत्या काही वर्षात , शब्दसेनेसह चाल करून येतील .. याची जाणकारांनी नोंद घ्यावी .. शुभम भवतु

शुभम भवतु>> किती गोड. धन्यवाद अपडेट दिल्याबद्दल. नाहीतर काय मी कविता वाचोन तुमची काळजी करत बसले असतेच. राजकुमारां ना अनेक उत्तम आशीर्वाद.

=))

श्रीमान सिद्धेश्वर साहेब,
माफ करा कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण तुमच्या कविता फारश्या चांगल्या नसतात..उगीच र ला र, ट ला ट लावून लिहल्यागत वाटतंय.
बर ते हि चालेल तुम्हांला शिकवायला मी काही मोठा कवी नाही..प्रयन्त करताय तो चांगलाच आहे मात्र तुमच्या कवितेत मला अश्लीलपणाच जास्त आढळला.
कवितेतील शृंगार व अश्लीलपणा यात खूप फरक आहे बर का... तुम्हाच्या भरमसाठ कविता येतात मायबोलीबर... एकच लिहा पण जरा.. क्या बात है| टाईप लिहा कि राव..

ते जमणार नाही साहेब आपल्याला .. कारण मुळात मला स्वतःला कवी वगैरे म्हणवून घ्यायचे नाही . मी हौसेखातर आणि निरीक्षणा अंती हे सर्व करत आहे .. या सर्व माझ्या कल्पना आहेत बरं का ..