मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 14:50

aaras_1.gif
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.

अथर्वशीर्षाचा अर्थ समजला तर उत्तम पण नाही समजला तरी त्यातील दहा ऋचा ऐकताना मनाला अतीव आनंद होतो हे नक्की. या अथर्वशीर्षाचे गोड आवाजात गायन केलय स्वाती आंबोळे यांनी.
गणपती बाप्पा मोरया!

Group content visibility: 
Use group defaults

मस्त प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी!
लखलखाटात गणपती बाप्पा आणि मागे अथर्वशीर्ष ऐकू येतंय ते फार भारी वाटतय. दणक्यात होउ दे उत्सव.

बाप्पा मोरया _/\_
मस्त झालीये आरास आणि अथर्वशीर्षही सुरेख .

गणपती बाप्पा मोरया! मस्त झाली आहे आरास. फिरत्या दिव्यांची कल्पना भार्री.

स्वातीनं गायलेलं अथर्वशीर्ष फार आवडलं. रिपीटमोडवर ऐकलं सकाळी आणि आत्ता संध्याकाळी घरी आल्यावर सुद्धा.

संयोजक, मस्त सुरूवात हां गणेशोत्सवाची Happy

फिरत्या दिव्यांची आरास एकदम खास दिसते. लहानपणी पाहिलेल्या IRL माळांची आठवण झाली.
स्वातीचे अथर्वशीर्ष सुरेल, सुस्पष्ट . अनेकदा एकले. फार प्रसन्न वाटते प्रतिष्ठापना पान उघडल्याबरोबर .
|| बाप्पा मोरया ||

ॐ सुमुखश्च एकदंतश्च कपिलो गजकर्णकः ।
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम् ।
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये ॥
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् ।
येषं हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः ॥

मोरया!

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
ज्येष्ठराजं ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत
आ नः शृण्वन्नूतिभिःसीदसादनम् ॥
ॐ महागणपतये नमः ॥

शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं |
प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोप शांतये ||

गजाननम भूतगणादि सेवितं, कपित्थ जंबूफलसार भक्षितम्
उमासूतम शोक विनाशकारणं, नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||

धन्यवाद मायबोलीकरानो, सर्वाना आरास आवडली ह्याचा खूप आनंद झाला. व्यवस्थापनाने ही सजावट करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचेही खूप आभार.
फक्त फोटोशॉप वापरून केलेली ही साधीशी सजावट आहे पण सोबतच्या स्वाती ताईंच्या सुरेल आवाजाने मांगल्य आणि पावित्र्याची जोड मिळाली.
खूप खूप आभार.

प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी ||

मोरया!

ॐ गं गणपतये नमः

परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कांन्तमनन्तकम् ||

सुरासुरेन्द्रै: सिद्धैन्द्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||

इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत प्रातरुत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ||

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदुर पाझरे वरि बरे दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ||

मोरया!

स्वाती, नेत्री दोन हिरे आणि प्रारंभी विनती करु गणपती हे श्लोक लहानपणी म्हणायचो. ते कित्येक वर्षांनी आज वाचल्यावर मस्त वाटलं.

कवी रविन्द्र भट व मधुकर जोशी यानी अथर्वशीर्षाचे भाषान्तर मराठीत पद्यरूपात केले आहे त्या पद्याना सरोज गोखले यानी वेगवेगळ्या रागामधे चाली लावल्या आहेत. प्रत्येक पद्याआधी अभ्यासपूर्ण निवेदन येथील एकानी केले आहे. या अथर्व गीतमालेचा कार्यक्रम आम्ही ऑस्ट्रेलियात १६ सप्टेम्बर २००७ मधे केला होता. त्याची डिस्क पण केली आहे. मी आम्बोळे यानी गायलेले अथर्वशीर्ष ऐकले त्यान्चा आवाज गोड आहे परन्तु त्या गायनात उच्चाराच्या काही चुका आहेत. त्या सुधाराव्या अशी विनन्ती.

धन्यवाद, दिगोचि. चुका कुठे आहेत त्या जरूर सांगा, म्हणजे मला सुधारणा करता येईल. Happy
तसंच अथर्व गीतमालेची ध्वनिमुद्रिका कुठे मिळू शकेल?

Pages