Sty १

Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 01:12

प्लिज मला सॉरी म्हण...

बामसे काका केबिन मध्ये स्वतःचे केस ओढत बसले होते.अधून मधून ते समोर ठेवलेल्या मोठ्या पिवळ्या बाम च्या बाटलीतून नाक गाल आणि हनुवटी ला बाम फासत होते. बाम ने आगआग झाली की मनातून जास्त इंटेन्स कल्पना येतात असा त्यांचा अनुभव होता.पण आज मनातल्या कल्पनांना जणू कोणी अनामिक शक्तीने छप्परवेअर एअर टाईट जार मध्ये बंद करुन गुदमरुन टाकलं होतं.

या सगळ्याची सुरुवात झाली २२ वर्षापूर्वी. चित्रपट सृष्टी 'फार्मर हॉट वाईफ प्रोटेक्शन फ्रॉम विलेज सीइओ क्रायसिस' च्या विळख्यात अडकली होती. तेव्हा अशी पद्धत होती की एक २० पानी बाड विकत मिळायचं. त्यात असा साचा असायचा.
'एक गाव <गाळलेली जागा> होतं.तिथे एक गरीब हँडसम शेतकरी <मिश्या/दाढी/क्लिन शेव्हन> होता.त्याची एक हॉट बायको होती.ती रोज भाकरी आणि भाजी करुन रुमालात बांधून डोक्यावर घेऊन शेतात जायची आणि त्याला 'होम कुक्ड ० कॉलेस्ट्रेरॉल ० ग्लुटेन लंच पॅक्ड इन कंप्लीटली इको फ्रेंडली सस्टेनेबल पॅकेजिंग' पुरवायची. तिथेच एक <सरपंच/पाटील/सावकार/श्रीमंत माणूस> असायचा.त्याला हॉट बायको आवडायची.मग तो भरपूर कल्पक मार्ग वापरुन हँडसम शेतकर्‍याला कोंडीत पकडायचा.मग हॉट बायको आणि शेतकरी 'विलेज रन' खेळायचे.'
इच्छुक लोक या स्क्रिप्ट चे सायक्लोस्टाईल करुन(ते झेरॉक्स का काय ते महाग पडायचं ना) त्यात योग्य ऑप्शन ला खूण करुन, गा.जा.भरुन स्वतःच्या पिक्चर ची स्क्रिप्ट बनवायचे. एकदा बामसे च्या हातून स्क्रिप्ट वर चहा सांडला.त्याने घाईत शेवटची भिजलेली दोन पानं कचर्‍यात कोंबून त्याजागी नवी पानं लिहून चिकटवली.
'<सरपंच/पाटील/सावकार/श्रीमंत माणूस>' हॉट बायकोला गंडवून कड्यावर बोलावून भेटतो.हॉट बायको कड्यावरुन जीव देते.'<सरपंच/पाटील/सावकार/श्रीमंत माणूस>' वैतागून 'ओये तेरी! अब वापस हॉट बेब हंट शुरुसे चालू करना पडेगा' म्हणून घरी गेला.हँडसम शेतकरी घरी आला तर आता भूत असलेल्या हॉट बायकोने रुमालात गुंडाळलेला शिरा त्याला दिला आणि एक रोमँटिक गाणं म्हटलं आणि तिथे '<सरपंच/पाटील/सावकार/श्रीमंत माणूस>' मरुन पडला.'

पब्लिक ला हा भूताळी ट्विस्ट खूप आवडला आणि बामसे स्क्रिप्ट ची मागणी वाढायला लागली.बामसे सकाळी भल्या पहाटेच्या एस्टी ने कोकणात जायचे.तिथे लोकांशी बोलायचे.रात्री शेकोटी पाशी बसून गोष्टी ऐकायचे. आणि घरी गेल्यावर लगेच वहीत लिहून काढून स्क्रिप्ट लिहायचे.हळूहळू लोकांना सावकार्/शेतकरी घालवून कथेत फक्त हॉट बायको आणि भूत हवं वाटायला लागलं. बामसेंनी मंदीर,बंगले,झाडं,जंगल,बाग,विमानतळ,शाळा,कॉलेज सगळीकडे भूतं ठेवली.हौदात गुणगुणत आंघोळ करणार्‍या सुंदर बायका भूताकडून मारवल्या.खूप पैसे कमवले.

पण आता प्रेक्षक काही वेगळेच झाले होते.एखादा ड्रग अ‍ॅडिक्ट बेनाड्रिल,ग्रास,कोक,हेरॉईन,मेथ,नागाचं विष ऑन द रॉक्स असा टप्प्याटप्प्यात वाढत्या भुकेने इम्युन बनत जावा तसे त्यांना हे साध्या सोप्या कथा असलेले भूताचे पिक्चर आवडेना झाले होते.'अरे हे काये पांचट..बाई मरते.भूत बनते.मग व्हिलन ला मारते.मग मांत्रिक येतो.मग भूत मरते. नाहीतर मग नाग गर्लफ्रेंड बरोबर असताना नाग(डा) मरतो आणि भूत बनून सगळ्यांना मारतो.अरे ते इन्सेप्शन वगैरे पिक्चर बघा.हिरो एका अवकाशात असतो.मग फ्लॅशबॅक मध्ये तो एका पिरॅमिड मधून टाईम मशिन ने भविष्यात जातो आणि तिथे त्याला कळतं की आपण म्हणजे व्हिलन ने टाईम मशिन वापरुन पास्ट मध्ये जाऊन तिथे एका जत्रेत ३०० रु ला भाड्याने घेतलेल्या व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी गॉगल मधून पाहिलेली कवी कल्पना आहोत.बघा जरा.ते कुठे आणि आपण कुठे..काहीतरी क्वालिटी द्या आता.' बामसे चित्रपटांची तिकीटं आता बुकमायशो वर ऑफर देऊन ३० रु मध्ये विकावी लागत होती.फक्त अभ्यासाची सुट्टी असलेली एंजिनीयरींग ची मुलं त्यांचे पिक्चर पहायची.

बामसेंचा सगळा भर आता भयाशिष वर होता.भयाशिष म्हणजे बामसेंचा आयडीया मॅनेजर.तो आधी आयडीया मध्ये होता.मग एअरटेल ४जी आल्यावर त्याच्या सगळ्या प्रमोशन टिम ला त्यांच्या मॅनेजर कडून भयाकारी अनुभव यायला लागले.याच अनुभवांना थोडं बदलून स्क्रिप्ट मध्ये वापरुन तो चांगलाच हिट झाला होता. भयाशिष केबिन चा दरवाजा ढकलून आत आला.

'सॉरी.तुमचा मिस्ड कॉल पाहिला.पण आज घूल चा लास्ट भाग लाँच होणार होता.स्किल अपग्रेड ला अभ्यास करत होतो. '
'घूल? असा कधी शब्द असतो का?भूल असेल.किंवा रुल.तू स्टाईल फाँट मुळे घूल वाचलं असशील.'
भयाशिष मनातः 'व्हॉट अ‍ॅन इग्नोरंट ओल्ड मॅन!!' मोठ्याने: 'सर ती नवी वेब सिरीज आहे.हॉरर.'
'बरं, लेट्स कम टू पॉइंट. आज काय फँटाब्युलस टेरीफीक आयडीया आहे तुझ्याकडे?'
'सर, हे बघा.एक आयडीया आहे.जरा काम करावं लागेल.पण हिट जाईल.'
बामसेंनी मोबाईल चा रेकॉर्डर ऑन केला. 'बोल आता.'
भयाशिष ने खुर्चीत पायाची अर्ध पद्मासन मांडी घातली.(या पोझिशन मध्ये मूलाधार चक्र अ‍ॅक्टिव्हेट होऊन चांगल्या आयडीया येतात असं त्याला मागेच लँडमार्क गुरुंनी सेशन मध्ये सांगितलं होतं.) तो बोलायला लागला.

'एका शहरात अचानक दर शुक्रवारी एका माणसाचा खून व्हायला लागतो.मुडद्याची मान मोडून डोकं छातीवर वाकवलेलं असतं,मुडद्याची जीभ कापलेली असते.त्याच्या छातीवर रक्ताने 'प्लिज मला सॉरी म्हण' असं कोरलेलं असतं.पोलीसांना कोणीच सापडलं नाही.आता बाजारात 'सॉरी म्हणतो प्लिज सोड' लिहीलेली वायर ज्वेलरी ची लॉकेट,ब्रेसलेट आणि टिशर्ट जोरात विकले जायला लागले.(पोलीसांनी या लॉकेट/ब्रेसलेट चं ब्रँडिंग करणार्‍या बिझनेसमन वर पण नजर ठेवली होती.) कॉल सेंटर चे व्हॉइस एक्झिक्युटिव्ह,बस चे कंडक्टर,लांबे आहार भुवन चे कर्मचारी,छोकरी पेड फास्ट फॉरवर्ड सव्हिस चे कर्मचारी यांना झेड दर्जाची सिक्युरीटी दिली होती. शहरात दहशत माजली होती.आता शहराला एकच माणूस वाचवू शकणार होता..तो म्हणजे यशवर्धन तपस्वी.पण तपस्वी होते कुठे???'
(To be continued by others...)

मंडळी ह्या STY शीर्षक नाही हे तुमच्या लक्षात आलेच असेल. तर तुम्हाला स्कोप आहे कि तुम्ही STY हवे तसे वास्तवाकडे झुकणारे करू शकता किंवा completely illogical बनवू शकता. आपण नेहमीच हिंदी फिल्म डायरेक्टर्स ना दोष देत असतो कि 'काय वाट्टेल ते दाखवतायेत' तर आम्ही तुम्हाला एक तद्दन फिल्मी सुरूवात करून दिलेली आहे, तुम्ही तुमची कल्पना शक्ती नि लेखन कौशल्य पणाला ह्याला वास्तवादी बनवू शकता. तुमच्या कलाप्रमाणे मग शेवटी STY ला शीर्षक द्या, होउ दे खर्च !!!

नियमावली:
१) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
२) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
३) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परिचय करून देऊ नये.
४) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

"कु.. कुठाय तो वशयर्धन पतस्वी.. कुठाय..? "बामसे काका डोक्यावरच्या टकलाला बाम चोळत गडबडीत म्हणाले. ते अगदी अस्वस्थ दिसत होते. असं काहीसं ट्विस्ट देणारं ऐकलं की नेहमी बामसे काका टाळक्याला बाम चोळायचे आणि त्यामुळे त्यांचं टंग आॅफ स्लिप व्हायचं. भयाशिषला हे नेहमीचं होतं.

भयाशिष तेवढ्याच शांत, निर्विकार आवाजात, मख्ख चेहर्यानं म्हणाला, " सर तो यशवर्धन तपस्वी! "
"हां हां तोच्तो! तू पुढचं सांग" नेहमीप्रमाणे भयाशिषवर तु. क. टाकत बामसे काका बडबडले.

भयशिष बोलू लागला, "ऐका मग! .... तर तपस्वी शहराबाहेरच्या स्मशानात बसले होते. त्यांच्या ओळखीची भूतं मनुष्यरूपातून नुकतीच मुक्त होऊन भूतयोनीत गेल्याने ते त्यांच्याशी संवाद साधत होते. तपस्वींचा पेहराव काहीसा असा होता- फाटकी जिन्स (त्यांना गरीब समजू नका, ते फॅशनचे चाहते आहेत. ) , " शिवदे आय्याम साॅरी! " लिहीलेला नवाकोरा लेटेस्ट लाल रंगाचा टीशर्ट, डोळ्यांवर चमत्कारिक गाॅगल, ज्यातून त्यांना अतिमानवीय बाबी दिसत असत. तर तपस्वी त्यांच्या घरातली वाघाच्या कातड्याच्या प्रिंटची बेडशीट स्मशानात अंथरुन त्यावर बसले, "काय ही भूतं, स्मशान साफही ठेवत नाहीत मेली! " असं पुटपुटत. यावर उत्तरादाखल जोरात वार्याची झुळुक येऊन धूळ उडवून गेली.

तपस्वी भूतांशी संवाद साधायला लागले. बर्याच गप्पा मारल्या. इतक्यात.....

भूतांशी संवाद साधायला लागले. बर्याच गप्पा मारल्या. इतक्यात.....
त्यांना कुठुनतरी दोन आत्म्यांच्या कुजबुजण्याचा आवाज आला. त्यांपैकी एक आत्मा होता पैलवान रावसाहेब यांचा. रावसाहेबांच प्रेतही मान मोडून डोकं छातीवर वाकवलेलं ,मुडद्याची जीभ कापलेली .छातीवर रक्ताने काहीतरी लिहीलेल अशा अवस्थेत सापडलेल ते त्यांचे मित्र व मुत्सद्दी राजकारणी सरनाईक यांना डॊळ्यात पाणी आणुन सांगत होते.
" ते लय डेंजर कायतरी व्हत बगा. डायरेक निकालातच काढली. म्या लै प्रयत्न केल पण त्याची पकड इतकी आवळ व्हती की डायरेक असमान दावल मला त्यान." पैलवान

"मला सगळ व्यवस्थित सांगा पाहु आम्ही तुमचा प्रश्न विधा... " सरनाईक

"काय काय विधा काय" पैलवान

"काही नाही हो जाऊद्या!! आधी तुम्ही सांगा इतक्या अपरात्री तुम्ही कशाला मरायला बाहेर पडलेलात" सरनाईक म्हणाले.

"रातच्याला एक वाजता कुणीतरी थाप मारली बगा दरवाज्यावर. लै गोड होता ओ आवाज म्हुन दरवाजा उघडला." रावसाहेब

"मग? मग काय झाले??" सरनाईकांनी उत्सुकतेने विचारल

"काय माहीत. जवा उटलो तवा आयुष्यातन उटलो होतो. डायरेक निकालातच" पैलवान

दोघाच्या कुजबुजीचा नंतर आवाज येईना म्हणून तपस्वीने आवडत्या भुताला संपर्क केला... पण ते संपर्कक्षेत्रीच्या बाहेर आहे अस कळल... म्हणून त्याने बाटली तपासली.. तेव्हा त्याला बूच न काढल्याच लक्षात आल..पटकन जीभ चावत त्याने एक मंत्र म्हणून मोहीनीला बाहेर काढल..पाच दहा मिनीच गप्पा मारल्या नाहीत इतक्यात तपस्वीच्या कानातल्या ब्लूटूथचा दात निळा झाला आणि नुकताच मोहीनीला केलेला व्हीडीयो काॅल कट झाला....तशी मोहीनी चरफडत पुन्हा एकदा बाटलीत बंद झाली.... तपस्वीने बटन दाबून काॅल कनेक्ट केला... त्याबरोबर समोरच्या गाॅगलच्या स्क्रीनवर त्याला एक मोठ्ठ काचेच केबीन दिसल .. त्यात टेबलावर पन्नास बावन्न वर्षाचा डोक्यावर टक्कल पडलेला आणि खुर्चीवर काळजीत बसलेला एक माणूस दिसला... त्याचासमोर अजून एक पस्तीशीचा मुलगा होता... त्याने तपस्वीची खुर्चीवरल्या माणसाशी ओळख करून दिली... ते दुसरेतिसरे कोणी नसून आपले बामसे काकाच होते.... त्यांनी तपस्वीला सगळी स्टोरी सांगीतली... तपस्वी विचार करायला लागला.... त्याने एकेक करून सगळे आत्मे स्कॅन केले आणि मरतानाच्या वेळेसची त्यांचा शरीराची रचना तपासली... सगळे चेहेरे समोर ठेवल्यावर त्याला पटकन एक समान खूण दिसली... आणि त्याचा चेहरा आनंदाने लकाकला...मेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा डाव्या दाढेशेजारचा पहिला दात सोन्याचा होता.....

मेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा डाव्या दाढेशेजारचा पहिला दात सोन्याचा होता.....
अन् प्रत्येक दाताच्या उजवीकडील वरच्या कोपऱ्यात तपस्वीना अतिसूक्ष्म अक्षरात कोरलेली अक्षरे दिसून आली -- लाला लख्मीचंद ज्वेलर्स ...!

हे नाव समोर येताच तपस्वीने त्याच्या हॉट आयटम तपस्विनीला सेटेलाइट रेडियो वापरून vvimp टैग लाइन वापरत एक अर्जन्ट कॉल लावला. हिमालयन ट्रूपर्स सोबत सीक्रेट मिशनवर कार्यरत असलेल्या तपस्विनीने लगेच सगळा मेसेज डिकोड करत स्वताची एक होलोग्राफिक ईमेज चालु मिशनवर एक्टिव्ह मोड़ ऑन करुन ठेवली आणि आपल्या झोपलेल्या कामापुरता मामा टाइप मिशनबड़ी कड़े एक मिश्किल कटाक्ष टाकत तिने तिची हायपर सॉनिक muv बाहेर काढत तपस्वीच्या ऑनलाइन लोकेशनला बुकमार्क करत फूल स्पीडला पळवली.

मोजून अवघ्या ७क्षणात ती तिच्या ड्रेसकोडसहित तपस्वी समोर हजर होती. तिने आल्याआल्याच आपले नॅनो रोबोट्स टाइम मशीनमध्ये सेट करुन प्रत्येक बॉडीचा डिटेल रिपोर्ट आणायला पाठवले व तपस्वीच्या खुर्चीच्या डाव्या दांडीवर बसत मनगटावर काही बटणे दाबत उमटलेल्या स्क्रीनकडे बघत तिने तिचा सीक्रेट सोर्स वापरून मिळवलेला सगळा फीडबॅक नेहमीच्या हॉट स्टाईलमध्ये तपस्वीकडे सुपुर्द केला.

समोर दिसणारी विचक्षण अन् भयंकर माहिती बघून बामसे काकांच्या टकला वरून भितीमुळे घामाचे ओघळ वाहू लागले तर लाला लख्मीचंदच्या सीक्रेट लैबमधील सर्वात डेंजर व्हायरस एक्टिव्ह झाल्याचे पुरावे पाहुन येणाऱ्या भीषण संकटाच्या कल्पेनेने भयाशीषचे पाय अगतिक भयाने लटपटु लागले.

"मावडे मला सॉरी म्हण."
"सॉरी म्हणते, प्लिज मला सोड."
तो कसानुसा हसला, आणि त्याने मावडीला कुशीत घेतलं.
...आणि पुढच्याच क्षणी मावडीची मान मोडून त्याने छातीवर ठेवली...
'...याच जिभेने तू त्याला हो म्हटली होतीस, आणि मला सॉरी... बरोबर?'
त्याने तिची जीभ कापली आणि आणि त्याच जिभेच्या रक्ताने छातीवर कोरलं....
'प्लिज मला सॉरी म्हण'
मावडीची तडफड बघून त्याला अनामिक आनंद झाला होता. तिचं विव्हळणं बघून त्याला गुदगुल्या होत होत्या.
माणूस मरताना बघून मिळणारा आनंद तो अनुभवत होता.
तेव्हापासून त्याने आरंभ केला एका रक्तयुद्धाचा.
जावनपुरा म्हणजे स्मशान बनला होता. आणि त्यातच भर पडली होती त्याची...
जड काडीचा चष्मा, पुढे आलेले पोट आणि दात, फाटकी कोपरी, आणि कायम बापाच्या शिव्या खाणाऱ्या त्याच्यावर कुणाचा संशय जाणं शक्यच नव्हतं...
आणि अशीच एके दिवशी दंगलीत अक्खा जावनपुरा जळून खाक झाला...
लाला लख्मीचंद!
जावनपुर्यातल्या दंगलीत वाचलेला एकमेव माणूस.
मात्र त्या दंगलीने लालाला कधी न भागणार अशी भूक लावली.
तडफडणार्या माणसाला बघून मिळणाऱ्या आनंदाची भूक....
सगळा जावनपुर्यातल्या माल लुटून लाला करोडपती बनला होता. मात्र लालाची एकच भूक होती...
तडफडून मरणारा जमाव बघायची...

इंटरेस्टिंग मोडवर आणलीय कथा.... Happy >>>>>>>>
थँक्स. पुढचा भाग तुम्ही लिहून संपवा कथा, कारण जास्त कुणी इंटेरेस्टड वाटत नाहीये.

यशवर्धन तपस्वी त्यांच्या खोलीत बसले होते.त्यांच्या समोर एक पारा उडालेला आरसा होता.तपस्विनी मन एकाग्र केले.त्यांचे अंग थरथरू लागले आणि ते त्या आरश्यात खेचले गेले.खोली आता पूर्ण रिकामी होती.

बामसेंच्या केबिन मध्ये वारं वाहायला लागलं आणि तपस्वी तिथे अवतरले.त्यांनी पांढरी शुभ्र शाल पांघरली होती.त्यांचे केस वाऱ्यावर उडत होते.केबिनमधला आसमंत भारल्यासारखा झाला होता.भयाशीष चं लग्न न झाल्याने त्याला घरातला टीव्ही पूर्ण वेळ आपल्या मर्जीने चॅनल बदलून बघता यायचा.त्याच्या मनात आले, "अरे हा तर सुर्यवंशम मधल्या अमिताभ सारखा दिसतो.फक्त बॉडी पाहिजे होती."

बामसे घाबरून: "क क कोण तुम्ही?इथे कसे आलात?"
तपस्वी: "मूर्खां, मी तुझ्या पोऱ्याने सांगितलेल्या कहाणी मधला तपस्वी.काय चालवलंय तुम्ही लोकांनी?कोण तो लाला?लोकांना का मारतोय?त्याला का आणला स्टोरीत?"
भयाशीष: "ओ काका, हल्ली हेच विकलं जातं.जितकं रक्त जास्त तितका पिक्चर सुपरहिट."
इथे बामसे ना आपण कोणत्या ट्रॅप मध्ये फसतोय त्याचा अंदाज आला.
बामसे: "अरे पण इतकं रक्त दाखवलं तर ए सर्टिफिकेट लागणार.मग लहान टीनेज मुलं वाले आईबाप बघणार नाहीत.किती लाखाचा धंदा जाईल माहितेय का?पिक्चर काही करून युए बनलं पाहिजे.नाहीतर या वर्षी शून्य इन्क्रीमेंट. धंदा कमी,पैसे पण कमी."
भयाशीष आधीच चिंधीपणा करून जगत होता.त्याचे सेटल्ड मित्र सिंगापूर थायलंड ला ट्रिप काढत असताना हा रेनी सिझन डिस्काउंट घेऊन आगगाडीने चेरापुंजी ला जात होता.इन्क्रीमेंट नाही म्हटल्यावर त्याच्या पोटात गोळा आला.
भयाशीष: "काका, तुम्ही तुमच्या मंत्रसामर्थ्याने मारा ना लाला ला!"
तपस्वी: "ती केस क्रिमिनल मध्ये येते.तुम्ही कथेत मला फक्त भुतं मारायला डिझाइन केलंय."
बामसे: "तपस्वी, बघा ना काय होतंय का तुमच्याने! रांगेत 3 पिक्चर आपटलेत.आता चौथ्याचा ऑडियन्स कमी करून परवडणार नाही."

तपस्वीनी व्याघ्रचर्म डिझाइन ची बेडशीट खुर्चीवर अंथरली आणि ते बसले. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या.डोळे मिटले.आता आजूबाजूला वारं वाहायला लागलं. बामसेंचा चहाचा पेपर कप खिडकी बाहेर उडून गेला.तपस्वी दात आवळून तोंडातून आवाज काढत घुमायला लागले.भयाशीष ला अचानक सदा परांजपे काकू नावाच्या हॉरर पिक्चर ची आज रिलीज डेट आहे आठवलं आणि तो लवकर घरी जायला चांगली थाप आठवायला लागला.

अचानक वारं थांबलं.केस विस्कटलेले तपस्वी अचानक टाटा चाय जाहिराती मधल्या अर्चना जोगळेकर सारखे डोकं हलवून चप्प बसलेल्या व्यवस्थित केसांचे झाले.

तपस्वी: "एक उपाय आहे.लाला ला प्रेमात पाडायचं आणि त्या तरुणी ला फसवायला लावायचं.ती तरुणी जेव्हा त्याला मारायला येईल आणि प्लिज मला सॉरी म्हण म्हणेल तेव्हा लाला ची रक्ताची तहान शांत होऊन त्याच्या डोळ्यात सर्व बडजात्या चित्रपटात आलोकनाथ बाबूजी च्या चेहऱ्यावर असतात तसे सात्विक प्रेमळ भाव येतील."