मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 12 September, 2018 - 14:50

aaras_1.gif
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.

अथर्वशीर्षाचा अर्थ समजला तर उत्तम पण नाही समजला तरी त्यातील दहा ऋचा ऐकताना मनाला अतीव आनंद होतो हे नक्की. या अथर्वशीर्षाचे गोड आवाजात गायन केलय स्वाती आंबोळे यांनी.
गणपती बाप्पा मोरया!

Group content visibility: 
Use group defaults

गणपती बाप्पा मोरया!

प्रसन्न मूर्ती आणि सुरेख आरास. स्वातीच्या आवाजातलं अथर्वशीर्ष ऐकायला मस्त वाटलं.

गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>>> +999

गणपती बाप्पा मोरया!!
मस्त बाप्पा. आरासही छान.
स्वाती नी सुंदर पठण केलंय अथर्वशीर्षाचं.

गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>> 111

गणपती बाप्पा मोरया!!

गेल्या वर्षी फक्त बॅनर ढाक चीक होता, यंदा अख्खी आरास ढाक चीक.. एक नंबर.. फुल लायटिंग चा बाप्पा झालाय

गणपती बाप्पा मोरया!!
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! >>> + १

गणपती बाप्पा मोरया!
अथर्वशीर्ष कल्पना आणि पठण मस्तच! आरासही छानच.

सुरेख!
स्वाती, खूप छान वाटलं अथर्वशीर्ष ऐकताना Happy

मंगलमूर्ती मोरया!
नेत्रदिपक आरास आणि सुरेल अथर्वशीर्ष पठण!
प्रसन्न, मंगलमय वाटले.

सुंदर आणि सुरेल सुरवात..
अथर्वशीर्षाची कल्पना मस्त आणि पठण फार सुरेख! +१११
गणपती बाप्पा मोरया!

मोरया!

गणपतीची फिरत्या दिव्यांची आरास फार सुंदर झाली आहे! Happy
अथर्वशीर्ष सादर करायची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आणि आवडल्याचं आवर्जून कळवणार्‍या सर्व अभिप्रायदात्यांचे अनेक आभार.

Pages