वॉटर कूलर

Submitted by π on 30 August, 2018 - 15:48

वॉटर कूलर.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तत्कालीन घटनांवर तत्कालीन चर्चा करण्यासाठी धागा.
प्रश्न पडलाय, पण कुठे विचारू कळत नाही, असे प्रश्न विचारण्यासाठी धागा.

एक जोक व्ह्यायरल झाला आहे.

मुंबईकर : तुम्ही पुणेकर म्हणजे...
पुणेकर : हो , झोपतो आम्ही १ ते ४, तुमच्यासारखे फालतू व्हिडीओ बनवून वेळ वाया घालवत नाही Lol

आवडण्यासारखं काही नाही हे तर झालंच.
पण किती गलिच्छ कॉमेंट केल्यायत लोकानीपण...
मला हा मास हिस्टेरियासारखा प्रकार वाटतो. लिंचिंग, पण व्हर्च्युअल.

सेरेनाकाकूने कोर्टवर आकांडतांडव केलं, रॅकेट मोडली, अंपायरला अपशब्द वापरले. त्याबद्दल अंपायरने तिला दंड केला.
काकूंचा कांगावा - मी बाईए म्हणून मला असं वागवलं म्हणे! आणि तिची तळी उचलून आता उलटी अंपायरच्या नावाने 'सेक्सिस्ट' म्हणून खडेफोड होतेय. धम्माल!
आणि यावर ऑस्ट्रेलियातल्या एका पेपराने एक व्यंगचित्र काढलं तर ते म्हणे 'रेसिस्ट'. कस्काय?
आजकाल एक चमत्कारिक कल्चर निर्माण होतंय. तुम्ही मायनॉरिटी असाल तर कसेही वागायला मोकळे. चूक दुसर्‍यांचीच. आपण 'मी बाई/ब्लॅक/मुस्लिम/अमुक/तमुक आहे म्हणून मला असं वॉगवतॉत बघॉ!! अन्याव अन्याव!' म्हणून आरडा केला की झालं.

On Friday, the London Telegraph published a data analysis of 20 years’ worth of fines at Grand Slam events that undercut Williams’s claim of gender-based bias in officiating. The data showed that men were fined for code violations (which include racket abuse, verbal abuse and other infractions) nearly three times as often as women in Grand Slam events from 1998 to 2018.

3.14 - तो प्रकार रसिस्ट नव्हता पण सेक्सिस्ट होता. मेल याच्यापेक्षा बऱ्याच जास्त गोष्टी करतात पण त्यांना अशी वागणूक मिळत नाही. ती match 3rd सेट मध्ये गेली असती पण गेमच दिला आणि संपवलं सगळे.

https://www.elle.com/culture/a23051870/male-tennis-pros-confirm-serenas-...

मोग-याच्या रोपाला नवीन फांद्या फुटण्यासाठी काय करावे?
गेले बरेच महिने जैसे थे आहे. एकही नवीन पान / फांदी उगवलेली नाही.

नक्की कुठे?
काही अनावश्यक फांद्या काढुन टाकल्या दोन महिन्यापुर्वी. त्यानंतर नव्या फांद्याच येत नाहीत.
आत्ता ज्या फांद्या आहेत त्यामधुनच नव्या फांद्या येण्यासाठी काही करता येईल का?

वाळलेली पाने असतात त्याच्या खाली ५-६ इंच कट करायचे.

आत्ता ज्या फांद्या आहेत त्यामधुनच नव्या फांद्या येण्यासाठी काही करता येईल का?>>>> हो. त्यांना थोडे कट करा.कट करायच्याआधी झाडाला पाणी घाला.थोडे खत घाला.

>> काही अनावश्यक फांद्या काढुन टाकल्या दोन महिन्यापुर्वी. त्यानंतर नव्या फांद्याच येत नाहीत.
खुप फांद्या कमी तर नाही झाल्या एकदम ?

आज शुक्रवार, वीकान्त आला!
म भा दि उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी माबोकर नेहमीच उत्सुक असतात.
लेख लिहायला आणि साहित्य वाचनासाठी ध्वनिचित्रमुद्रण करायला वेळ मिळावा म्हणून खुप आधीच म भा दि उपक्रम जाहिर करण्यात आले. तरीही साहित्य वाचन आणि गोजिरे बोल ह्या उपक्रमासाठी साहित्य पाठवण्याची मुदत २५ तारखेपर्यन्त वाढवत आहोत.
आता एकच वीकान्त राहिलाय मंडळी!
शिवाय मोरपिसारा आणि विज्ञानभाषा मराठी हे उपक्रम तुमच्या लेखांची वाट पाहत आहेत!!
साहित्य पाठवण्याची तयारी करताय ना?

sa.png