अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

Submitted by दीपा जोशी on 13 August, 2018 - 23:18

अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

तान्ह्या बाळांची आंघोळ ---- एकदम नाजूक, अलवार विषय!
पूर्वी, बाळ बाळंतिणीची काळजी घरातल्या इत्तर बायकांकडे आपोआपच जायची. तान्ह्या बाळांना आंघोळ घालायला चांगल्या अनुभवी बायका नेमल्या जायच्या. त्याच बायका बाळंतिणींना तेल लाउन मसाज देखील करून द्यायच्या. पहिलटकरणीना तान्ह्या बाळाला हाताळायची सवय नसते. त्यामुळे बाळाची , बाळाच्या आंघोळीची काळजी कुणीतरी घेतंय ही मोठीच दिलासा देणारी गोष्ट असायची.
पण अमेरिकेत असं कुणी बाळाला संभाळणारं , आंघोळ घालणारं मिळत नसल्याने त्या नवीन आई बाबाना सगळी व्यवस्था बघायला लागते. अमेरिकेत माझ्या मैत्रिणीची मुलगी आई होणार आहे . सध्या ती आणि तिचा नवरा बाळाच्या बाथ टबच्या आणि पाळण्याच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या अभ्यासात गुंग आहेत. काहीसे गोंधळून पण गेलेत. काही माहिती नसल्याने मैत्रिणीलाही काय सल्ला द्यावा हा प्रश्न पडलाय .अश्या वेळी यातल्या अनुभवी मायबोलीकरांच्या सल्ला घ्यावा म्हणून हा लेखनाचा प्रपंच !
तर येऊ द्यात तुमचे वेगवेगळ्या बाथ टब आणि पाळण्यांचे अनुभव या धाग्यावर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलगा की मुलगी हे सरप्राइज न उरण्याव्यतिरीक्त काय फायदे असू शकतात ते जाणून घेण्याचे? नर्सरी चा रंग, कपडे, खेळणी इत्यादींचे रंग ह्याशिवाय आणि काय फायदे असतात?

सशल आता त्यात फायदे काय असणारेत! Biggrin
प्रेग्नंट आहे समजलं की डु यु नो द जेंडर? प्रश्नाला उत्तर देता येतं. लोकं बेबी शॉवरला जेंडर न्युट्रल गोष्टी नाही देत. नाहीतर पोराला पांढरे आणि पिवळे कपडे मिळतात. Proud

मला काय माहित काय फायदे ते? Lol फायदे हा शब्द चुकीचा वापरला ते मात्र कबूल.

सगळेजण जाणून घेतात आणि ते आधीच जाणून घेण्यातली मज्जा मला कळत नाही म्हणून तर विचारते आहे Lol

लोल.. ३.१४ ते बेडरूम मध्ये पोस्टर लाव णारे लोक्स पन मदत करतात. बर्फी की लाडू हे खेळ तर सातव्या महिन्यात. व्हेन ऑल इज फायनलाइज्ड .

मुलगा की मुलगी हे सरप्राइज न उरण्याव्यतिरीक्त काय फायदे असू शकतात ते जाणून घेण्याचे? नर्सरी चा रंग, कपडे, खेळणी इत्यादींचे रंग ह्याशिवाय आणि काय फायदे असतात?>>>
मला आश्चर्य वाटलं या प्रश्नाच. मलगा मुलगी अस कळल्यावर एक प्रकारचा छंद , खेळ लागत नाही का मनाला , मी अस करीन , तस बोलवेन. मला शब्दात मांडता येत नाहीये. जणु त्या गोळ्याला आता आकार मिळालाय अस वाटायला लागत.
शेवटी काहीही असेना आपलं प्रेम असणारच आहे त्यावर, फरक पडत नाही वगैरे मुद्दे आहेतच. पण तरीही. मे बी आय एम राँग.

रिया , इथे डुलाच्या साईट्स आहेत ग डॅल्लस स्पेसिफिक. तुझ्या तिथला पिन कोड टाकून बघतेस का. मिळतील तुला.
उदा. ही साईट आमच्या गावाची आहे. अशा हजारो साईट्स आहेत. तुला कल्पना येण्यासाठी खाली देती आहे.
https://delightedtodoula.com/

डुला नक्की बघा. एक उत्तम दुला नक्किच एक असेट असतो. तुम्ही जर दोघेच असणार असाल तर दुलाचा प्रचंड उपयोग होतो. सर्व नोर्मल झाले तर व जर काही कोंप्लिकेशन झाली तर त्यांचा अनुभव नक्किच उपयोगी येतो.

इथे रॉकरची चर्चा वाचली पण निट कळले नाही. मी रॉकर घ्यायचा विचार करत होते(म्हणजे मैत्रीण गिफ्ट करणार आहे)पण खरच फायदा आहे का त्याचा बाळासाठी. नाहीतर ती पाच सात हजार खर्च करून घ्यायची आणि तो पडून रहायचा.
दूसर म्हणजे लमाझ कुणी केल आहे का? माझ्या पैकेजमध्ये ते इन्क्लुड आहे त्यात breathing टेकनिक शिकवतात ना?ज्या नार्मल डिलीवरीसाठी उपयोगी ठरतील अशा. बहुतेक माझ सी सेक्शन करणार आणि आता वेळही कमी आहे तर अटेंड करावे की नाही विचार करतेय.

माझ्या मामीने मला एकट्याने घालायची "टबमधील" अंघोळ याचे प्रात्यक्षिक दिले होते आणि माझ्याकडून सरावही करून घेतला होता. तिला तशी अंघोळ इंग्लंडमधील नर्सने शिकवली होती.
पण त्याचा मला व्हिडीओ पोस्ट करावा लागेल.
रिया अभिनंदन.
आणि मी पण बऱ्याच गोष्टी डे १ पासून भारतात असूनही स्वतः केल्या.
मला बेबी मसाज फार काही पटला नाही. नुसती रडारड व्हायची म्हणून मी विक्रमला स्वतःच अंघोळ घालायला लागले. फार काही अवघड नसतं. माझ्या ब्लॉगवर जमल्यास व्हिडीओ पोस्ट करून लिंक शेअर करिन.

आपल्याकडे बाळाला मसाज, विशिष्ट पद्धतीने/पोजिशनमध्येच आंघोळ घालणे याचे नको इतके स्तोम माजवले गेले आहे असे माझे मत आहे. रोज स्वच्छता झाली आणि त्या बाळाच्या मानेला दुखावलं नाही, इतर त्रास झाला नाही की झालं. यासाठी जे बाथटब मिळतात ते अगदी सोयीचे असतात. बाकी स्वतःला जमेल, पटेल तसं आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावं. काही गोतावळा गरजेचा नसतो हे सगळं करायला. बाळाचे आई बाबा असतील तरी जमतं. एखादा प्रशिक्षित मदतनीस मिळाला/ली तर उत्तम. नसले तरी बिघडत नाही. (हे सगळं अर्थातच काहीही शारिरिक अडचण नसलेल्या बाळबाळंतिणीबद्दल आहे)

इथे सर्वांनी सर्व सल्ले देऊन झाले आहेत तरी काही ठणकावून दिले गेलेले सल्ले बघून हे लिहावसं वाटलं. नव्या आईला / बाबाला मिळून सर्व झेपणार आहे की नाही हे बाळाच्या जन्माआधी कसं कळेल? अगदी सगळं सुरळीत झालं तरी अती रडकं बाळ असेल तर हे नवे आई-बाप जेरीस येतात. आईची मनस्थिती पण कशी होइल ते 'स्मॉल वंडर' / 'बंडल ऑफ जॉय' इ.इ. बघितल्यावर (खरं तर हार्मोनल बदलांमुळे पण असं लिहायला बरं असतं) काही सांगता येत नाही. चांगल्या टणकमावश्यासुद्धा भयंकर मुळुमुळू होतात पहिले काही आठवडे. अशा वेळी काही तासांसाठी सुद्धा कुणी सोबतीला/मदतीला येणारं असेल तर खूप फरक पडतो. तेव्हा काही ना काही मदत मिळेल अशी सोय आधीच करून ठेवावी.

Pages