अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

Submitted by दीपा जोशी on 13 August, 2018 - 23:18

अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

तान्ह्या बाळांची आंघोळ ---- एकदम नाजूक, अलवार विषय!
पूर्वी, बाळ बाळंतिणीची काळजी घरातल्या इत्तर बायकांकडे आपोआपच जायची. तान्ह्या बाळांना आंघोळ घालायला चांगल्या अनुभवी बायका नेमल्या जायच्या. त्याच बायका बाळंतिणींना तेल लाउन मसाज देखील करून द्यायच्या. पहिलटकरणीना तान्ह्या बाळाला हाताळायची सवय नसते. त्यामुळे बाळाची , बाळाच्या आंघोळीची काळजी कुणीतरी घेतंय ही मोठीच दिलासा देणारी गोष्ट असायची.
पण अमेरिकेत असं कुणी बाळाला संभाळणारं , आंघोळ घालणारं मिळत नसल्याने त्या नवीन आई बाबाना सगळी व्यवस्था बघायला लागते. अमेरिकेत माझ्या मैत्रिणीची मुलगी आई होणार आहे . सध्या ती आणि तिचा नवरा बाळाच्या बाथ टबच्या आणि पाळण्याच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या अभ्यासात गुंग आहेत. काहीसे गोंधळून पण गेलेत. काही माहिती नसल्याने मैत्रिणीलाही काय सल्ला द्यावा हा प्रश्न पडलाय .अश्या वेळी यातल्या अनुभवी मायबोलीकरांच्या सल्ला घ्यावा म्हणून हा लेखनाचा प्रपंच !
तर येऊ द्यात तुमचे वेगवेगळ्या बाथ टब आणि पाळण्यांचे अनुभव या धाग्यावर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.amazon.com/First-Years-Comfort-Newborn-Toddler/dp/B000067EH7...

हा असा बाथ टब आम्ही आणला होता. एक प्लास्टिकचे मोठे शीट कार्पेटवर अंथरून त्यावर हा टब ठेवायचो. बादलीत हवे तेव्हडे गरम पाणी आणायचो आणि बाळाला आंघोळ घालायचो. हाच टब किचनच्या सिंकमध्येही बसतो - तसे सिंक असेल तर ते अजून सोपे जाते. बाथरुममध्ये टबच्या आत बाळाला घेउन उठ बस करण्यापेक्षा सोपे आहे. बाळ थोडे मोठे झाले बसू लागले की मग हाच बेबी टब बाथरुममधल्या मोठ्या टबमध्ये नेउन त्याला आंघोळ घालू शकता.

https://www.indiamart.com/proddetail/a-e-baby-indian-ghodiyu-portable-ba...

हे असे झुले पण मिळतात. गुजराथी लोकांना विचारा - त्यांच्याकडे नक्की असतात.

वरच्या पोस्टला +१ . आम्हीही पहिले ३ एक महिने तरी बेबी टब बेडरुम मध्ये नेऊन तिथेच आंघोळ घालायचो.
मग थोडे महिने झाल्यवर नंतर तो टबच बाथरुममधल्या मोठ्या टबमध्ये नेउन ठेवायचो.

नवरा बायको दोघांना मिळून निभावून नेता येउ शकतंच. पण एकट्या माणसाला जरा (खूपच) कठिण जाईल वाटतं.
वॉटर लीक झाल्यावर गाडी चालवत हॉस्पिटलात जाणे, तिकडे डिलिवरी झाल्यावर ती कशा प्रकारची असेल तसे त्रास/ हील होत असताना बाळाच्या खाण्याची, आपल्या खाण्याची आणि झोपेची तजविज एका माणसाने करणे भयंकर कठिण जाईल. घाबरवण्याचा हेतू नाही पण किमान पहिले २ आठवडे तरी आणखी एका व्यक्तीची तरी हेल्प हवीच असं फार वाटतं.

अमितव ++१
अगदी हेच लिहिणार होते. पहिले २ आठवडे postpartum depression पण असते. अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी रडू येते. बाळाबरोबर रुटीन सेट व्हायला पण वेळ लागतो . त्याला आपली - आपल्याला त्याची सवय व्हायला वेळ द्यावा लागतो. अशावेळेस कोणीतरी कंपनी हवीच.

थँक्स मैत्रेयी आणि सशल...

अमित, बरोबर आहे पण कधी कधी नसतं पॉसिबल Happy हालात के आगे वगैरे वगैरे.. अर्थात मला कोणीतरी असलेलंच हवंय पण नसेलच तर कंबर कसायला हवीच की... सो कसतेय Happy

सिंगल मॉम्स करतातच की अमेरिकेत किंवा भारता बाहेर. म्हणजे हे फार सोप्पं आहे वगैरे असं नाही म्हणतेय मी पण अशक्य नाहीये आणि हात पाय गाळून बसण्यापेक्षा मी जमेल ते करायचं ठरवलंय

रिया, अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

बाळंतपणाच्या वेळी कोणी स्वैपाकाला / घरपोच डबा वगैरे देणारं मिळतं का बघ. आणि नॅनी मिळाली तर आणखी मस्त. पहिली वेळ आहे म्हणून.
केअर.कॉम सारख्या साइट्सवरून आपल्या वेळा आणि नीड्सप्रमाणे मदतनीस मिळू शकतात.

ओके रिया.
तुझं अभिनंदन आणि शुभेच्छा. होईल सगळं व्यवस्थित. Happy

हे असे झुले पण मिळतात >>> टण्या, झुले वाचल्यावर माबोवरच्या प्रोफाइलमधला तुझाच तो फोटो आठवला Happy

चला, बघता बघता खूप महत्वाची माहिती जमा होत आली. सगळ्याना मनःपूर्वक धन्यवाद.
रिया, तुम्हाला बेस्ट लक .

सिंगल मॉम्स करतातच की अमेरिकेत किंवा भारता बाहेर. म्हणजे हे फार सोप्पं आहे वगैरे असं नाही म्हणतेय मी पण अशक्य नाहीये आणि हात पाय गाळून बसण्यापेक्षा मी जमेल ते करायचं ठरवलंय>>>
फक्त नवरा बायको मिळून बाळंतपण, बाळाची काळजी घेण वगैरे घेण अज्जिब्बात कठीण नाही. आम्ही दोघांनी मिळून लहान बाळाचा पुर्वी अगदी जराही अनुभव नसताना what to expect बूक सिरिजच्या जोरावर अगदी व्यवस्थित जमवल. उलट मला ते सोपे वाटते कारण स्वतःचा कंट्रोल रहातो. आपल्याला स्वतःला पटेल ते करता येत. त्रास होतो कुठे तर सि सेक्शन नंतर रिकव्हरीचा थोडा त्रास होतो. डायव्हिंग लवकर करता येत नाही. पण नवरा असेल मदतीला तर जमत सगळ. फक्त बाळाच, इंडियन पद्धतीने साग्र संगीत करणार असा काही हट्ट नसावा. बाउन्सर, स्विंग वगैरे मध्ये अक्खी अमेरीकेतली बाळ मोठी झाली. आपल्याकडेच हे व्हायब्रेशन वगैरे चालेल वगैरे शंका का मला कळत नाही. पण असेल काहीतरी कारण. असो. तीच गोष्ट बॉटल ची. वाटी चमच्यानेच दुध देणार वगैरे अट्टाहास का ते कळत नाही. बॉटलने व्यवस्थित दिध पोटात जात खरतर.

आणखी एक , कुणाला माहित नसेल म्हणुन लिहिते. इथे डुला 'Doula' मिळतात. काही डुला फक्त डिलिव्हरीच्या वेळी मदत करतात. जर तुम्ही एपिड्युरल घेणार नसाल तर अगदी ब्रिदिंग पासून,कळा देताना पासून सगळ्याला हेल्प करतात.
दुसर्‍या टाईपच्या डुला घरी येतात, बाळाला आंघोळ घालण्यापासून सर्व करतात. हव असेल तर लाईट हाऊस वर्क , स्वयंपाक वगैरे पण करतात. बाळाची काळजी अशी घ्यायची वगैरे शिकवितात. बाळाला रॅप कसं करायच पासून डायपर बदलण्यापासून सगळ्याला मदत करतात.
माझ्या सिंगल मॉम कोवर्कर/मैत्रिणिने कुणाचीही (अगदी कुणाचीही) मदत न घेता बाळाला जन्म दिला आणि तोही नॅचरल पद्धतीने. टब मध्ये पाण्यात. नंतर डुलाची हेल्प घेतली. बाळासाठी तिने झोळी सारख घेतलेलं. बाळ सतत टच मध्ये रहाव म्हणून.

बेस्टलक आणि अभिनंदन. Happy

अमेरिकेत शक्यतो सी सेक पटकन करत नाहीत. मोस्टली नॉर्मल करायचा प्रयत्न असतो.
माझा एक सल्ला - तुम्ही जास्त वेळ लेबर मध्ये असाल आणि समजा नीट पुश करू शकत नाही आहे. तुमच्याकडे सी सेक चा ऑपशन नेहमी असतो, फक्त तुम्हाला सांगावे लागेल त्यांना. आणि सी सेक सेफ आहे खूप इथे.डॉक्टर्स ची एक रुलबुक असते की अमुक तास लेबर मध्ये असून पण डिलिव्हरी नाही झाली तर मगच सी सेक करायचे. त्यामुळे शेवटी ते आसिस्टेड डिलिव्हरी ट्राय करायला बघतात.
व्हॅक्युम किंवा फॉरसेप्स ( माहीत नसेल तर गूगल करा ) वापरून नॉर्मल डिलिव्हरी शक्यतो टाळावे हे माझे वैयक्तिक मत आहे.

रीया, अभिनंदन आणि शुभेच्छा!
सिंगल मॉम्स करतातच की अमेरिकेत किंवा भारता बाहेर. म्हणजे हे फार सोप्पं आहे वगैरे असं नाही म्हणतेय मी पण अशक्य नाहीये आणि हात पाय गाळून बसण्यापेक्षा मी जमेल ते करायचं ठरवलंय>> यू गो गर्ल!
अमेरीकेत मदत मागितली तर मिळते . इथे हॉस्पिटलमधे खूप रिसोर्सेस उपलब्ध असतात. स्वयंसेवकांची मदत मिळते. तुझ्या गायनॅकशी बोलल्यास ती मदत कशी मिळवायची याबद्दल मार्गदर्शन करेल. थोडे प्लॅनिंग केले तर सर्व व्यवस्थित पार पाडता येते. रीया, तुझा इंशुरन्स काय काय कव्हर करेल ते बघून घे आणि त्यानुसार इतर मदतीचे प्लॅनिंग कर.

रॉकर आणि बाऊन्सर वापरु नका असं जनरली सगळे म्हणतात, ते खरं आहे का? >>
मला तरी असे सांगणारे कोणी भेटले नाहीत. अगदी ज्ये ना / काना सुद्धा .

तुम्हाला सांगणारे कोण हे सगळे लोक ? त्यांच्यापैकी किती लोकांची मुलं अमेरिकेत जन्माला आलीत/ वाढलीत ? हे सगळे लोक पेडिआट्रिशियन आहेत का ? तेच सगळे लोक शेक शेगडी पण करावीच म्हणतील. बाळंतिणीने , बाळाने ४० दिवस घराबाहेर पडू नये म्हणतील. आमच्यावेळी नव्हती हो असली थेरे म्हणतील. चालणार आहे का ?

प्रेग्नन्सी अ‍ॅप्सही आता कितीतरी चांगली असतात उपलब्ध - त्यातलं एखादं चांगलं डाउनलोड कर. सगळी इन्फर्मेशन अ‍ॅट फिंगरटिप्स! Happy
(मी कुठलं वापरलं होतं त्याचं नाव आता विसरले. पण रीव्ह्यूज बघून ठरवू शकशील.)

आणि हो, भारतातून रिमोट कन्ट्रोल बाळंतपण करून घेऊ नकोस. लोक काळजीपोटीच सल्ले देतात, नुसते हो हो म्हणून ऐकून घ्यायचे, प्ण आपली गायनॅक आणि आपली पीडिआट्रिशियन सांगतील ते खरं. Happy

रिया, अभिनंदन आणि शुभेच्छा .
थोडं प्लानिंग केलं तर नक्की जमेल. वर अनेकांनी सांगितलंय तसं लोकल मदत, मदर्स हेल्पर असं कोणी आधीच शोधून ठेवा.

प्ण आपली गायनॅक आणि आपली पीडिआट्रिशियन सांगतील ते खरं >> +१०००. हे सगळ्यात महत्वाचं.

वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आता प्रसृति/गर्भारपण/बाळंतपण तुलनेने सोपे झाले आहे. केवळ ५०/१०० वर्षांपुर्वीच्या तुलनेत या काळात होणारे आजार व त्रास एस्क्पोनेन्शिअली कमी झाले आहेत. तेव्हा मिडवाइफ, तुमचे डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणे मार्गक्रमण करा.
तज्ज्ञ शहाणा असतो, बाकी कुणाचे ऐकण्याची गरज नसते हे जवळजवळ सगळीकडेच लागू पडते. आपली मागची पिढी आपल्यापेक्षा प्रगत असती मनुष्याची प्रगतीच झाली नसती. तेव्हा त्यांचे ऐकू नये.

>>>>हात पाय गाळून बसण्यापेक्षा मी जमेल ते करायचं ठरवलंय>>>>

जियो रिया ... अशी हिंमत ठेवशील तर सगळं छानच होईल ... तुझे आणि बाळाचे डॉक्टर सांगतील तशी तयारी कर . पेडीएट्रीशन शी आधी बोलून काय तयारी करून ठेवता येईल ते बघता येईल का ?

केवळ वैद्यकिय शास्त्राची प्रगती झाली म्हणून बाळंतपण सोपे झाले असे नाही. तर सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थिती ही बदलली आहे. हल्लीची पहिलटकरीण अनेक वेळा पूर्वीच्या आजीच्या वयाच्या आसपास असते. तिची आर्थिक व शैक्षणिक बाजू मजबूत असते. हवी ती मदत मिळवण्याची क्षमता असते. हल्ली पहिलटकर जोडप्यात कामाची विभागणी सम-समान करण्याची मानसिकता असते (उदा: पहिले ६ आठवडे ती सुट्टी घेणार मग ४ आठवडे बाबा सुट्टी घेतो).
मागच्या पिढीची गरज सल्लागार म्हणून कमी व कौतुककर (चिअरलीडर) म्हणून अधिक असते. आजी लोकांना त्यांच्या आयांनी बाळंतपणात केलेली धडपड आठवत असते. आपल्या आईने केलेली काळजी, कष्ट हेच आपल्या मुलीच्या बाळंतपणातील पालकत्वाचे परिमाण ठरते. आजीला स्काईपवर "किती सगळं मस्त करताय" म्हणून सुटवंग रित्या पुन्हा आपल्या दैनंदिन व्यवहारात जाणे कठीण जाणार आहे Happy

थँक्यू सगळ्यांना Happy

स्वाती, स्वयंपाकाला पहिले २ आठवडे नवरा असेल , समजा तो इथे नसताना डिलेवरी झाली तर तेवढे १-२ दिवस ऑफिसमधले कलिग्स पण मदत करतील त्यामुळे त्या बाबत मी निश्चिंत आहे. ऑफिसमधे एखाद्या कलिगच्या बायकोला पैसे देउन दब्बा देता येइल का ते बघते
केअर.कॉम बद्दल थँक्स.. तिथेही बघते

सीमा, डुला बद्दल माहिती साठी धन्स.. कुठे शोधायचं त्यांना? सॉरी फारच स्पून फिडिंग आहे पण आत्ता मला गरज आहे त्याची Happy हे डुला खरंतर सोबत कोणी असो नसो तरीही उपयोगाचे वाटतायेत.

अमेरीकेत मदत मागितली तर मिळते >> स्वातीताई, खरं तर या एकाच गोष्टीवर मी इथे सगळं करण्याचा निर्णय घेतलाय. इन्श्युरन्स वर रिसर्च चालू आहे आणि माझा आत्ताचा प्लॅन बर्‍यापैकी सोयीस्कर आहे असं वाटतंय सध्या तरी, आणखी काही मैत्रिणींनी आणखीन महत्वाचे ऑप्शन्स सुचवलेत, त्यावरही काम चालू आहे

तुम्हाला सांगणारे कोण हे सगळे लोक ? त्यांच्यापैकी किती लोकांची मुलं अमेरिकेत जन्माला आलीत/ वाढलीत ?
>>> मेधा, हे सांगणारे सगळे माझे भारतीय कलिग आहेत आणि त्यांची मुलं इथेच जन्माला आली आहेत. पण ते जे सांगतायेत त्यापैकी कोणीही हे दोन्ही प्रकार वापरलेले नाही आहेत त्यामुळे त्यांचं मत विचारात घेण्यापेक्षा ज्यांनी वापरलंय ते काय म्हणतात ते महत्वाचं आहे म्हणून इथे विचारलं

प्रेग्नन्सी अ‍ॅप्सही आता कितीतरी चांगली असतात उपलब्ध >> बेबी सेंटर वापरतेय. मला कधी कधी त्यातल्या गोष्टी कन्फ्युजिंग वाटतात, काय ऐकावं , काय नाही ते कळत नाहीये, शिकतेय हळू हळू Happy

आपली गायनॅक आणि आपली पीडिआट्रिशियन सांगतील ते खरं >> मी डॉक्टरांशिवाय कधीच कोणाचंच काहीच आजिबात ऐकत नाही Proud
प्लस पॉईंट हा आहे माझा की मी आजिबात पॅनिक होत नाही, कोणतीही परिस्थीती असली तरी

दीपातै, सॉरी तुमचा धागा हायजॅक केला, पण माझ्या मते इथली एकुण एक लहान माहीती सुद्धा तुमच्या मैत्रिणीच्याही उपयोगाला येईल

लकिली साबा फार ढवळाढवळ करत नाहीत आणि आईला तिच्यावेळंचं काही आठवत नाही किंवा ती काही सांगण्याच्या परिस्थीतीत नाहीये त्यामुळे मला फारसे सल्ले येत नाहीयेत कुठुन पण त्यामुळेच कधी कधी थोडी भिती वाटते की चुकुन काही तरी चुकीचं केलं जात नाहीये ना.

पण जोपर्यंत डॉक्टर चिल आहेत तोपर्यंत मी पण शांत आहे Happy

ज्या बाईने लमाझ क्लास घेतला ती बहुतकरुन डुला असेल. तिला विचारा. हॉस्पिटलमध्येही सांगतील, त्या डुला बायकांचे एक स्टेशन तिथे असणार.

रीया,
तुझ्या गायनॅकला तुझी परीस्थिती सांग आणि डुला बद्दल विचार. तुमच्या भागात शोध घे. डिलिवरीच्यावेळी आणि पोस्ट नेटल असे दोन्ही प्रकाराची सर्विस असते. आतापासून शोध घेतल्यास तुला मॅच होईल अशी डुला मिळून जाईल. बहुतेक इंशुरन्स हे कव्हर करत नाही तेव्हा दर निगोशिएट करुन ठरव.

रीया ग्रेट आहेस. God bless u dear. खूप खूप शुभेच्छा तुला.

प्लस पॉईंट हा आहे माझा की मी आजिबात पॅनिक होत नाही, कोणतीही परिस्थीती असली तरी >>> hats off.

थँक्स सगळ्यांना Happy

सध्या एक तिढा संपलाय त्यामुळे मला कुठुन तरी एक मदत मिळण्यासाठी आशेचा किरण दिसलाय. पण तरीही बाकीची तयारी करावी लागणार आहेच... तिला सुरुवात केलीये आता.

जेंडर पुढच्या काही आठवड्यात कळेल, मग खरेदीला लागेन

Pages