अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

Submitted by दीपा जोशी on 13 August, 2018 - 23:18

अमेरिकेतली तान्ह्या बाळांची आंघोळ आणि पाळणा

तान्ह्या बाळांची आंघोळ ---- एकदम नाजूक, अलवार विषय!
पूर्वी, बाळ बाळंतिणीची काळजी घरातल्या इत्तर बायकांकडे आपोआपच जायची. तान्ह्या बाळांना आंघोळ घालायला चांगल्या अनुभवी बायका नेमल्या जायच्या. त्याच बायका बाळंतिणींना तेल लाउन मसाज देखील करून द्यायच्या. पहिलटकरणीना तान्ह्या बाळाला हाताळायची सवय नसते. त्यामुळे बाळाची , बाळाच्या आंघोळीची काळजी कुणीतरी घेतंय ही मोठीच दिलासा देणारी गोष्ट असायची.
पण अमेरिकेत असं कुणी बाळाला संभाळणारं , आंघोळ घालणारं मिळत नसल्याने त्या नवीन आई बाबाना सगळी व्यवस्था बघायला लागते. अमेरिकेत माझ्या मैत्रिणीची मुलगी आई होणार आहे . सध्या ती आणि तिचा नवरा बाळाच्या बाथ टबच्या आणि पाळण्याच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या अभ्यासात गुंग आहेत. काहीसे गोंधळून पण गेलेत. काही माहिती नसल्याने मैत्रिणीलाही काय सल्ला द्यावा हा प्रश्न पडलाय .अश्या वेळी यातल्या अनुभवी मायबोलीकरांच्या सल्ला घ्यावा म्हणून हा लेखनाचा प्रपंच !
तर येऊ द्यात तुमचे वेगवेगळ्या बाथ टब आणि पाळण्यांचे अनुभव या धाग्यावर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली ऑनलाईन शॉपिंग करताना ज्याला शॉपिंग करायचं आहे ती व्यक्ती रिव्युज वाचून ठरवते कोणतं प्रॉडक्ट चांगलं किंवा वाईट्/सो सो हे. किंवा नवीन आईवडील आसपासच्या अनुभवी मित्रमैत्रिणींना विचारुन ठरवतात. तुम्ही भारतातून इथे लिहिलेले अनुभव ज्यांना गरज आहे त्यांना वाचून दाखवणार का?

सायो ,प्रतिसादाबद्दल आभार.
<<तुम्ही भारतातून इथे लिहिलेले अनुभव ज्यांना गरज आहे त्यांना वाचून दाखवणार का?>>

ज्यांना गरज आहे ते देखील मायबोलीचे वाचक आहेत. फक्त, त्यांना मदत करायच्या भावनेतून मायबोलीकरांचे अनुभव ( जे खूपदा बऱ्याचजणांना उपयोगी पडतात ) इथे एकत्र संकलित होतील या उद्देशाने ह्या धाग्याची कल्पना माझ्या मनात आली ..... एवढच.

अमेरिकेत तान्ह्या बाळांना टब मधे व्यवस्थित अंघोळ घालतात आणि अगदी बेसीन वर टब ठेवून आम्ही व सर्व मित्रांनी ते केले आहे. काही मित्रांना भारतात करतात तसे खाली बसून पायावर घालून मालीश वगैरे करणे शक्य नव्हते त्यांनी चेंजींग टेबल वर किंवा अगदी पलंगावरही ते जमवले.
आधुनिक पद्धतीचे छान पाळणे / रॉकर्स मिळतात आणि त्यात बाळं छान झोपतात. अगदी भारतीय पाळणा हवा असेल तर भारतीय मालाच्या दुकानातुन हल्ली तेही मिळायला लागले आहेत. हा तुम्हाला वाटतोय तेवढा मोठा प्रश्न नाही आहे.

अमेझॉन.कॉम मधे बेबी बाथ टब व बेबी रॉकर्स बाउन्सरस असा सर्च मारला तर मिळून जाइ ल. फेसबुक वर पोस्टी टाकायच्या लुकिंग फॉर बेबी टब रॉकर वगैरे. म्हणजे बेबी शावर करतात तेव्हा अमेरिकन लोक्स गिफ्ट देतील. एखादी लॅटिनो किंवा आफ्रिकन अमेरिकन नॅनी मिळाली तर बघा सुलेखा. कॉम व केअर कॉम वर नॅनी सर्च केले तर मिळून जाईल. फिशर प्राइस किंवा मदर केअर्ची उत्पादने मस्त असतात. चायनीज मेकचे घेउ नका कारण वी नीड टू मेक समहाउ अमेरिका ग्रेट अगेन. चायनीज वस्तूंच्या जॉइंटचा भरोसा नाही. बेस्ट विशेस फॉर बेबी अँड पेरेंट्स.

https://www.amazon.in/s/ref=nb_sb_noss_1?url=search-alias%3Daps&field-ke...

https://www.amazon.in/s/ref=nb_sb_ss_c_1_11?url=search-alias%3Daps&field... हे छान आहेत बघा.

बेबी बॉय का गर्ल कळले का म्हणजे ब्लू का पिंक ते घेता येइल. युज्ड घेतले तर जवळच्या कम्युनिटीत मिळून जाईल. गराज सेल असेल तर शोधावे लागेल मात्र.

>>चायनीज मेकचे घेउ नका कारण वी नीड टू मेक समहाउ अमेरिका ग्रेट अगेन.>> Lol
अमा, प्रेग्नन्सीत दीपचे सामोसे खाऊ नका नाहीतर बाळाला ही तेच हवेसे होतील हे राहिलंच बघा. Wink

वर बहुतेक सगळी माहिती आलीच आहे. किचन सिंकमध्ये ठेवण्यासारखे तान्ह्या बाळांचे बाथटब्ज मिळतात. सहसा सिंकला छोट्या शॉवरसारखी अटॅचमेन्ट असते आणि गरम-गार पाणी असतं त्यामुळे ते अगदी सुटसुटीत पडतं. जमिनीवर/कार्पेटवर जुनी चादर वगैरे घालून त्यावर बसून बेबीला पायावर घालून मसाज करू शकता. किंवा चेन्जिंग टेबलवरही करू शकता.
मी टू-इन-वन बाथटब (आपल्या रेग्युलर बाथटबमध्ये ठेवता येईल असा टॉडलर टब आणि त्यात इन्फन्ट इन्सर्ट) घेतला होता. मान न धरता येणार्‍या बाळांना त्या इन्सर्ट्सवर नीट ठेवता येतं. पुढे बसायला लागले की इन्सर्ट काढून टाकायचा. टबमध्ये आंघोळ घालणार असाल तर टबपाशी बसाय्ला kneeling pad घ्या - तुमचे गुडघे तुम्हाला धन्यवाद देतील. Happy

बाळाला झोपवण्यासाठी क्रेडल / बॅसिनेट /रॉकर असा सर्च दिलात तर बरेच प्रकार दिसतील.

आम्ही पहिले २ आठवडे स्वच्छ तलम कापडाने दररोज फक्त पुसून घ्यायचो. नंतर बाथटब मध्ये आंघोळ घालायला सुरुवात केली. आमचं सिंक बाथटबसाठी सोयीस्कर वाटले नाही. म्हणून कार्पेटवर मोठं प्लास्टिक अंथरून बाथटबात आंघोळ. मी टू-इन-वन बाथटबच वापरला.
गूगलवर भरपूर व्हिडिओज आहेत बाळाला बाथटबमधे आंघोळ कशी घालावी म्हणून. त्याचा खूप उपयोग झाला.

बरोबर, नाळ पडेपर्यंत तिथे पाणी लागू द्यायचं नाही - ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देताना सांगतीलच.

टार्गेट, वॉलमार्ट मध्ये जाऊन जो बरा दिसेल तो आणा. मासा, पेपा पिग, बेडूक, एलमो अशी व्हरायटी असते. वर स्वाती ने सांगितलेला बेबी सपोर्ट मात्र घ्याच.
रॉकरचं पण तेच. ट्विनकल ट्विनकल, धिस ओल्ड मॅन, आणि बेबी ललाबाय युट्युब केलं की जो एक तास + चा व्हिडीओ दिसतो ते म्युझिक अशी व्हरायटी. जे गाणं आवडेल मग छोटा मोठा, पुढे मागे हलणारा, डावी कडे उजवी कडे हलणारा, नुसता वायब्रेट होणारा, गाण्याची बॅटरी संपली तरी हलण्याची बॅटरी चाले पर्यंत हलणारा यात गेल्यावर जे बरं दिसेल तो आणा. काही फरक पडत नाही. त्यातून काढलं की पोरं उठतातच.

भारतीय मालाच्या दुकानातुन हल्ली तेही मिळायला लागले आहेत. हा तुम्हाला वाटतोय तेवढा मोठा प्रश्न नाही आहे.
>>>
ऑनेस्टली, हे तुम्हाला वाटतंय Happy आमच्या डेन्व्हर मधे नाही मिळत असे पाल्णे, माझ्या मैत्रिणींच्या बाळासाठी हा मोठ्ठा इष्यु होता Happy

स्वाती,ट्युलिप , फार छान माहीती.

वर स्वाती ने सांगितलेला बेबी सपोर्ट मात्र घ्याच.
>>> कसा दिसतो ते प्लिज कोणीतरी सांगणार का?

रॉकर आणि बाऊन्सर वापरु नका असं जनरली सगळे म्हणतात, ते खरं आहे का?

मला टब मधे इतकुशा छोट्याश्या बाळाला अंघोळ कशी घालायची ते काही समजेना झालंय.. म्हणजे विडिओ बघुन समजेल, पण हे लाऊड थिंकिंग Proud

>> मला टब मधे इतकुशा छोट्याश्या बाळाला अंघोळ कशी घालायची ते काही समजेना झालंय.. म्हणजे विडिओ बघुन समजेल, पण हे लाऊड थिंकिंग Proud
माझं बाळ लहान असेपर्यंत मला कधीच धड समजलं नाही आणि मी कायम आपल्या पद्धतीने टबमध्ये पायावर घेऊनच आंघोळ घातली Lol

ज्यांना गरज आहे ते देखील मायबोलीचे वाचक आहेत. फक्त, त्यांना मदत करायच्या भावनेतून मायबोलीकरांचे अनुभव ( जे खूपदा बऱ्याचजणांना उपयोगी पडतात ) इथे एकत्र संकलित होतील या उद्देशाने ह्या धाग्याची कल्पना माझ्या मनात आली ..... एवढच.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
बाळाचे आई बाबा आणि आम्ही सगळेच वाचतो आहोत तुमच्या प्रतिक्रिया आणि अनुभव, तसच सल्ले. उपयोग होतोय.

चरप्स,
<<पायावर घाला आंघोळ तेल लावून.
2 महिन्यानंतर बाळाचे टब वापरा.
सुरुवातीला 2 वेळा मालिश हवीच.>> पटलंय.

चौकट राजा ,
<<काही मित्रांना भारतात करतात तसे खाली बसून पायावर घालून मालीश वगैरे करणे शक्य नव्हते त्यांनी चेंजींग टेबल वर किंवा अगदी पलंगावरही ते जमवले.
आधुनिक पद्धतीचे छान पाळणे / रॉकर्स मिळतात आणि त्यात बाळं छान झोपतात. अगदी भारतीय पाळणा हवा असेल तर भारतीय मालाच्या दुकानातुन हल्ली तेही मिळायला लागले आहेत. >> अच्छा. भारतीय मालाच्या दुकानात चक्कर टाकुन पाहायचय.

अमा ,
<<एखादी लॅटिनो किंवा आफ्रिकन अमेरिकन नॅनी मिळाली तर बघा सुलेखा. कॉम व केअर कॉम वर नॅनी सर्च केले तर मिळून जाईल. फिशर प्राइस किंवा मदर केअर्ची उत्पादने मस्त असतात. चायनीज मेकचे घेउ नका कारण वी नीड टू मेक समहाउ अमेरिका ग्रेट अगेन. चायनीज वस्तूंच्या जॉइंटचा भरोसा नाही. बेस्ट विशेस फॉर बेबी अँड पेरेंट्स.>> सदिच्छांसाठी आभार. आणि खरंच खूप उपयुक्त माहिती दिलीत.

स्वाती_आंबोळे,
<<जमिनीवर/कार्पेटवर जुनी चादर वगैरे घालून त्यावर बसून बेबीला पायावर घालून मसाज करू शकता. किंवा चेन्जिंग टेबलवरही करू शकता.
मी टू-इन-वन बाथटब (आपल्या रेग्युलर बाथटबमध्ये ठेवता येईल असा टॉडलर टब आणि त्यात इन्फन्ट इन्सर्ट) घेतला होता. मान न धरता येणार्‍या बाळांना त्या इन्सर्ट्सवर नीट ठेवता येतं. पुढे बसायला लागले की इन्सर्ट काढून टाकायचा. टबमध्ये आंघोळ घालणार असाल तर टबपाशी बसाय्ला kneeling pad घ्या - तुमचे गुडघे तुम्हाला धन्यवाद देतील. >>
छान सांगितलंत. Todalar टब आणि इन्फन्ट इन्सर्ट हे माहिती नव्हतं. जमिनीवर चादरीवर बसून मसाज ची कल्पना आवडली.

स्वाती_आंबोळे ,
<<बाळाला झोपवण्यासाठी क्रेडल / बॅसिनेट /रॉकर असा सर्च दिलात तर बरेच प्रकार दिसतील.>> हो. आम्ही सगळेच असा बराच शोध घेतला आणि मग हे चांगलं का ते चांगलं… असं झालं ! परत आणि कुणाचं म्हणणं पडलं की electically vibrate होणारे पाळणे नकोत.
तुम्हाला काय वाटतंय ?

ट्युलिप,
<<आम्ही पहिले २ आठवडे स्वच्छ तलम कापडाने दररोज फक्त पुसून घ्यायचो. नंतर बाथटब मध्ये आंघोळ घालायला सुरुवात केली. आमचं सिंक बाथटबसाठी सोयीस्कर वाटले नाही. म्हणून कार्पेटवर मोठं प्लास्टिक अंथरून बाथटबात आंघोळ. मी टू-इन-वन बाथटबच वापरला.>> असा पण विचार करता येईल.

अमितव,
<<जे गाणं आवडेल मग छोटा मोठा, पुढे मागे हलणारा, डावी कडे उजवी कडे हलणारा, नुसता वायब्रेट होणारा, गाण्याची बॅटरी संपली तरी हलण्याची बॅटरी चाले पर्यंत हलणारा यात गेल्यावर जे बरं दिसेल तो आणा. काही फरक पडत नाही. त्यातून काढलं की पोरं उठतातच.>>हे मस्त वाटतंय. पण elctrical vibration वाले पाळणे तान्ह्या बाळासाठी चालतील का , अशी एक शंका मनात होती.

अदिती,
<<कार सिट्च ही बघा. महत्वाचे आहे…>> हो. पहिल्यांदा बाळाच्या आई बाबाना आम्ही वेड्यात काढलं. म्हणजे अगदी हॉस्पिटलमधून परत येताना तुम्ही त्या तान्ह्या बाळाला कार सीट मध्यें कसं बसवणार. ते आईच्या कुशीतच असायला पाहिजे, म्हणून. पण मग समजलं, की तिथे हे अपरिहार्य आहे म्हणून .

मेधा,
तुम्ही लिंक चांगल्या दिल्या आहेत .पण, ‘’तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.’’ आहे संदेश येतोय. कश्या उघडता येतील त्या?

खरं सांगायचे तर भारतातल्या पायावर मालिश आणि आंघोळ घालण्याच्या पद्धतीपेक्षा ते बाळांसाठीच बनवलेले बेबी बाथ टब्ज खूप जास्त सेफ आणि वापरायला सोयिस्कर सुटसुटीत असतात. एकूणच भारतल्यापेक्षा वेगळे वाटले तरी तुम्हाला खूप सोयीच्या , आपले काम सोपे करणार्‍या वस्तू मिळतील. पाळण्याचे पण तसेच. व्हायब्रेट होणारे पाळणे नको असेल तर इतर अनेक वेगवेगळे पाळणे इथे मिळतात की. शिवाय अत्यन्त सेफ. उगीच भारतातले जुन्या पद्धतीचेच लोखंडी पाळणे हवे असा हट्ट न धरता इथेही काय काय अव्हेलेबल आहे ते बघा तरी.

खरं सांगायचे तर भारतातल्या पायावर मालिश आणि आंघोळ घालण्याच्या पद्धतीपेक्षा>> माझ्या माहितीत तरी बाळाला आंघोळ घालणार्‍या बायका हे काम वर्षानुवर्षे करणार्‍या असत. बाळाची आजी, पणजी करत नसत. अमेरिकेत बाळंतपणाला येणार्‍या आई / सासूबाई यांना सुद्धा अगदी त्यान्ह्या बाळाला पायावर घेउन आंघोळ घालायचा फारसा अनुभव असेलच असे नाही . असलाच तरी तो २०-२५ वर्षांपूर्वीचा. नातवंडाच्या जन्मापर्यंत गुडघे / पाठ यांची फ्लेक्झिबिलिटि कमी होणार. ओल्या टब मधून बाळाला हातात धरुन आत बाहेर करणे / बाळाच्या आईने बाळाला टबमधे बसलेल्या आई / सासू च्या हाती देणे हे सर्व मला अत्यंत रिस्की वाटते. माझ्या ओळखीत अमेरिकेतल्या देशी आणि नॉन देशी आयांनी किचन सिंक मधे किंवा ओट्यावर सिंकच्या बाजूला टब ठेऊन बाळाला आंघोळ घातलेली आहे . सगळ्यांची मुले व्यवस्थित मोठी झालीत. मालिश केले , नाही केले यावरुन काही फरक पडत नाही.

अर्र्र, हे माझ्या पोस्टमुळे डायग्रेशन झालं का? तसं असेल तर मला इतकंच म्हणायचं होतं की मला स्वतःला इकडचे बेबी बाथ टब्ज् वापरणं कधी जमलं नाही; भिती वाटायची. त्यामुळे आईचं बघून मी तिच्यासारखंच पायावर घेऊन आंघोळ घालायला शिकले आणि ते जास्त सवयीचं झाल्यामुळे तेच कन्टिन्यु केलं. कदाचित ते जास्त रिस्की (इकडच्या सेट-अप मध्ये असेलही). सुदैवाने आमचं निभावलं त्यावर.
पण माझा हेतू अजिबात बेबी बाथ टब्ज् ना कमी लेखण्याचा किंवा क्रिटिसाईज करण्याचा नव्हता. रिया च्या पोस्ट मुळे आठवण झाली इतकंच. हजारो, लाखो आई-बाबांनीं आणि त्यांच्या बाळांनीं इकडे मिळणारे बाथ टब्ज् वापरले असणार, माझ्याच माहितीत अनेकांनीं. सगळ्यांची बाळं छान निरोगी, सुदृढ राहिली आणि आता मोठीही झाली. तेव्हा गैरसमज नसावा.

इथेही काय काय अव्हेलेबल आहे ते बघा तरी.
>>
तोच प्रयत्न चालुये म्हणूनच हा धागा महत्वाचा वाटला मला. अनुभवी लोकांचे सल्ले खुप कामी येतात हा स्वानुभव आहे.

सशल, अगदी अगदी!

मेधा,त्या दोन्ही धाग्यांवरच्या तुझ्या पोस्टी ऑसम आहेत. शांतपणे वाचुन काढते, समहाऊ तो धागा वाचुन 'एकटीच्या जीवावर बाळंतपण सहज जमेल' असं वाटुन गेलं.. धन्यवाद! Happy

रिया - जमेल जमेल. काहीही अडचण येणार नाही.
माझा मोठा लेक भारतात जन्मला, घरात मदतीला ७-८ लोक होते अन धाकटी लेक इथे जन्मली, मदतीला कोणी नाही. तरी इथले बाळंतपण मला खूपच सोपे आणि सुटसुटीत वाटले होते. अगदी झटपट रिकवरी. लगेच स्वावलंबी झाल्यासारखे वाटले. त्यामानाने तिकडे जाम कुटाणा वाटला होता सगळाच.

अर्र्र, हे माझ्या पोस्टमुळे डायग्रेशन झालं का? तसं असेल तर मला इतकंच म्हणायचं होतं की मला स्वतःला इकडचे बेबी बाथ टब्ज् वापरणं कधी जमलं नाही; भिती वाटायची. >> सशल , तुझ्या पोस्टला उद्देशून नाही. इन जनरल काही काही भारतीय लोकांचा अमेरिकेत/ परदेशात भारतीय सामान/ मदत नसताना बाळंतपण ( किंवा लग्न, किंवा मंगळागौर इ ) कसं करणार असा जो सूर असतो तसा या धाग्यात दिसला म्हणुन हा प्रपंच . जगभर लोक वेगवेगळ्या पद्धतीने यशस्वीपणे जगत असतात , मुलं जन्माला घालतात, वाढवतात.

भारतातल्या सारखे पाळणे आता मिळत असतील. पण गेली कित्येक दशके अमेरिकेतल्या भारतीयांची मुले नीट वाढत आहेतच ना ? उगा आपलं परदेशातलं बाळंत पण अस्सं कठीण बाई का आळवत बसायचं .

मदतीला कोणी नाही. तरी इथले बाळंतपण मला खूपच सोपे आणि सुटसुटीत वाटले होते.
>>
प्रचंड धीराचे शब्द आहेत हे (आत्ता या क्षणी तरी त्याची मला इतर कशाही पेक्षा सगळ्यात जास्त गरज आहे ) पण गंमत अशी आहे की बाळाचे बाबा पण नसणारेत बहुदा त्या वेळेला जवळ... त्यामुळे मी आणि बाळ काय करतो बघायचं आता Proud

अर्थात माझ्याकडे बराआआआआआआआआआच वेळ आहे पण आत्तापासुन जमवा जमव सुरु केली तर ऐन वेळेस धावपळ होणार नाही म्हणून तयारी करतेय)

थँक्स गर्ल्स.. आता आधी वाचते इतर धागे आणि मग प्रश्न विचारते

रीया, अभिनंदन Happy
>>समहाऊ तो धागा वाचुन 'एकटीच्या जीवावर बाळंतपण सहज जमेल' असं वाटुन गेलं.. >> अगदी सहज शक्य आहे हे स्वानुभवावरुन सांगते.

थँक्यू सायो Happy

दिपा ताई, तुम्हाला पण थँक्यू, मी हा आणि अशा प्रकारचा धागा काढणारच होते पण आलाच आहे अनायसा तर वापरून घेते Happy

हो अभिनंदन करायचे राहिलेच की - अभिनंदन रिया! खूप वेळ आहे तर ते जुने धागे सगळे वाच आता Happy मेधाने लिन्क्स दिल्याच आहेत. अजून पण असतील त्या ग्रुप मधे.

रीया, अभिनंदन!!

आणि तू एकटीने निभावून नेणार सगळं हे ऐकून तर प्रचंड "रीस्पेक्ट"!!! बेस्ट ऑफ विशेस्!
सायो, तूही एकटीने निभावून नेलंस?!! वॉव! खरंच रिस्पेक्ट! Happy

Pages