बाळंतपणासाठी पगारी रजेबद्दल चर्चा

Submitted by भरत. on 9 August, 2018 - 01:30

अ‍ॅडमिन्/वेबमास्तर, खरं तर मला हा धागा चालू घडामोडी या ग्रुपात उघडायचा आहे. पण त्या ग्रुपमध्ये लेखनाचा धागा उघडायची सोय दिसली नाही, म्हणून ललितलेखनात लिहितोय.
current affairs.png

सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाबद्दलच्या धाग्यावरची चर्चा पुढे बाळंतपणासाठी पगारी रजेकडे वळली.
तिथले मुद्दे नेटकेपणाने मांडून नव्याने चर्चा करण्यासाठी हा धागा.

त्या धाग्यावरचे या विषयासंबंधीचे प्रतिसाद ,मुद्द्यांनुसार सुसंबद्ध रीतीने आणि जिथे मला आणखी लिहावंसं वाटेल, तिथे माझं मत, अशी मांडणी करायचा प्रयत्न आहे. आलेल्या आक्षेपांंना उत्तरही देईन.
हे लिहिताना सगळा त्या चर्चेचा मला पटेल्/रुचेल असा गोषवारा आहे, असा आक्षेप येण्याची शक्यता आहे. पण तसा हेतू आणि प्रयत्न नाही

***************************************************************
मुद्दा १ : बाळंतपणासाठी भरपगारी रजा असावी का?
सई केसकर - . मूल झाल्यावर काम करायचे की नाही करायचे यावर काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांची आपापसात जुंपणे. किंवा एका ग्रुप मधील काहींनी दुसऱ्यांना जज करणे.

अ‍ॅमी - याच्याशी पूर्ण असहमत. भरपगारी बाळांतपणाची 6 महिने रजा घेऊन नंतर राजीनामा टाकणाऱ्या बायका 'केवळ वैयक्तिक' निर्णय घेत नसून त्या सगळ्याच बायकांना, त्यांना नोकरिवर घेणाऱ्या/ठेवणारयाना आणि एकदरच समाजाला/त्याच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाला affect करतायत.

आणि स्त्रियांनी एक्मेकांसोबत भगिनीभावच बाळगला पाहिजे असे काही compulsion आहे का? भांडुदेत कि छान कचाकचा Lol

सई केसकर - टर्निटी लिव्ह एलिजिबिलिटी ही लिव्ह घेण्याच्या आधी केलेल्या कामावर आधारित असते हे एक कटू सत्य आहे.
आपण कुणालाच आपल्यासाठी काम करायचे कंपल्शन करू शकत नाही.

बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये?

अ‍ॅमी - सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

> बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये? > मला माफ करा मी तुमच्या गटात येऊ इच्छित नाही _/\_
भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे.

===
> प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी >
हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही.

mi_anu : एमी,
आमच्या मावशी अलरेडी 45 वर्षाच्या असलयाने असा सिनारीओ आला नाहीये.सध्या वर्षाला 24 पेड हॉलिडे, दिवाळीला पगाराला पगार बोनस, वर्षातून 2 वेळा गावी जायला पेड 5 दिवस सुट्टी इतकं देतो.
मूळ मुद्दा हा की बाळंतपण, त्या साठीची सुट्टी ही लक्झरी मानली जाऊ नये.
6 महिने पेड वाला मुद्दा आता आलाय.काही महिन्यांपूर्वी. त्यापूर्वी 3 महिने पेड, त्यांनंतर लिव्ह बॅलन्स उरला असेल तो आणि त्यांनंतर अनपेड असं सर्व कंपन्या मध्ये होतं.

राजसी - ऍमी, बिनतोड मुद्दा केला की पर्सनल व्हायचं का! बाकी माझा तरी अजून प्रेग्नेंट मोलकरणीशी संबंध आलेला नाही. एक मोलकरीण दिवस गेल्यावर गावी निघून गेली, विचारलं असतं तर दिली पण असती. एकीला मुलीच्या लग्नासाठी(मागितली तितकी) पंधरा-वीस दिवसांची भरपगारी रजा दिली होती , दोन-तीन वर्षे होती. तोंड उघडून मागितले की सगळं मिळत!

अजून तरी कोणी कोणाला भारतात मुलं जन्माला घालू नका सांगितले नाहीये!

अमितव - Amy, तुमची मते भयानक आणि टोकाची आहेत. जराही सहमत नाही.
पुढारलेल्या देशात (अमेरिकेचा अपवाद) स्त्री आणि पुरुष दोघांना पेरेंटल लिव्ह असते. कॅनडात तेव्हा जो पगार मिळतो तो इआय ( एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स) मधून मिळतो. तुम्ही काम करत असताना प्रत्येकाच्या पगारातून इ आय कापला जातो, आणि तुमची नोकरी गेली, आजारपण आलं, प्रेग्नंट झालात इ.इ. तर एका वर्षांपर्यंत ( प्रेग्नन्सीला हल्ली 2 केलंय मला वाटतं) तुम्हाला पगाराचा काही भाग इआय (पर्यायानं सरकार) देतं.
नंतर कामावर घ्यायचं बंधन असतं. व्यक्तीला काम सोडण्याचा हक्क असतो. इ आय ही एक उत्तम सोशल सिक्युरिटी आहे.

अ‍ॅमी - अमितव,
• तुम्ही ज्या पुढारलेल्या देशांबद्दल बोलताय तिथे जन्मदर किती आहे?
• इआय सरकार देतंय कि खाजगी कम्पन्या?
• तो सर्व नागरीकांना मिळतोय कि उच्च मध्यम वर्गातल्या पांढरपेशा नोकरदारांनाच मिळतोय?

अमितव - सर्व इ आय भरणाऱ्या व्यक्तीना मिळतो. सुखवस्तू बाई घरी बसली आणि नवरा काम करत असला तर नवऱ्याला मिळते. इंडिपेंडन्ट कॉन्ट्रॅक्टर असाल आणि खुशीने इ आय भरत असाल तरी मिळतो.
प्रत्येक प्रश्न सामाजिक उतरंडीतून बघण्याचे सोडा. (अ‍ॅमी - हे ठीक आहे. तिथे व्यक्ती निवड करतेय आपण एखाद्या 'सरकारी' स्कीमचा भाग बनायचे कि नाही. हे भारतातल्या Epf सारखे वाटते आहे. भारतातील भरपगारी maternity leave म्हणजे 'खाजगी कम्पनीच्या जीवावर सरकार उदार' प्रकार आहे.)

अमितव : तुम्ही जन्मदर वाढलाय म्हणून गर्भारपण कमी करायला रजा पगार काही नको म्हणत होता. मग ते फक्त पांढरपेशा लोकांना मिळतं तर मोलकरणीना का नाही वर आलात आता सरकारी धोरणामुळे सगळा भार खाजगी आस्थापनावर येतो म्हणून कितीपण रजा घ्या पण पगार नको पण नंतर नोकरी देण्याचं बंधन ठेवा असं म्हणताय.

अ‍ॅमी - अमितव,
परत एकदा मागे जाऊन प्रतिसाद वाचून बघा.

> सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं. > आपल्या एम्पलोयरकडून भ.बा.र. मिळावी म्हणणारे स्वतः एम्पलोयर झाल्यावर काय करतात विचारले आहे.
===
> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

अमितव : म्हणूनच विचारतोय की जन्मदर 2 होत नाही तोपर्यंत वरील सर्वांनी इन्शुरन्स ही देऊ नये. सरकारी मोफत उपचार करणारी इस्पितळे बंद करून टाकावी. पुरेसे गरीब लोक मेले आणि इफेकटिव्ह जन्मदर 2 वर आला की वाचवा कोणाला वाचवायचं ते. तोपर्यंत पैसे असतील तर जा डॉ कडे नाहीतर मरा. हे वाचायला कसं वाटतंय ??

अ‍ॅमी - व्यक्ती स्वतः प्रिमियम भरून विमा घेते ना? खाजगी कंपनीने भ.बा.र. का द्यावी सांगू शकाल का?
आणि सरकारने हि सक्ती केल्याने कम्पनी स्त्रियांना नोकरीवरच घेत नाही याची सामाजिक किंमत किती आहे?

त्याऐवजी सरकाराने इआयसारखी योजना आणावी किंवा 'सर्व' स्त्रियांना २च मुलांसाठी एक ठराविक रक्कम द्यावी. त्यासाठी करदात्यांना वेगळा सेस लावावा अशा मागण्या का होत नाहीत?

अमितव - हे नियम सरकारी आस्थापनानाही लागू असतील सो फक्त खाजगी कंपनी हे पहिलं चुकीचं आहे. [अ‍ॅमी - सरकारने द्यावं त्याच्या नोकरांना काय द्यायचं ते. खाजगी कम्पनीला का सक्ती करतायत?आणि त्यामुळे होणाऱ्या ऋण परिणामांच काय? ]
दुसरं म्हणजे तुम्ही जितका इआय भरता तितकाच इआय तुमच्या कंपनीला भरणे ही बंधनकारक असते. [अ‍ॅमी - Epf सारखेच आहे हे. कम्पनी इआय भरत असेल तर तो तुमच्या Ctc त हिशेबात धरलेला असणार.][(mandard : Insurance is not a part of CTC, at least in the company's I worked in India.]
शेवटचं : कोणी आणि कशा स्किम मधून हा खर्च उचलावा हा माझा मुद्दा नाहीये. [अ‍ॅमी - माझा हाच मुद्दा आहे]
ती सामाजिक सुरक्षा देणारी सेवा असावी. हे तुम्हाला मान्य असेल तर कोणी आणि कशी स्किम चालवावी यावर कॉम्प्रोमाईज होउ शकते. [सरकारी && 'सर्व'समावेशक असेल तरच मान्य आहे]

अ‍ॅमी - तुम्ही जो अर्थ काढला आहे तो चुकीचा आहे. मी वरती लिहिले आहे .
<भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

नानबा - अ‍ॅमी च्या पोस्ट्स काहीही वाटल्या.
चाईल्डबर्थ हा माझा ह क्क आहे. एज्युकेशन हा जसा आज सगळ्यान्चा हक्क समजला जातो, त्याचा भार कसा सगळ्या समाजावर पडतो, त्यापे क्षाही बेसिक गोष्ट आहे ही.
तुमची आई काम करायची का माहित नाही, पण करत असेल तर तेव्हाच रजाच न देण्याचा उपाय केला असता तर तुम्ही आज इथे असला असतात का? (वाईट अर्थाने लिहित नाहीये, उदाहरण समजावे म्हणून लि हिती ये) समाजात ५०% अ सलेल्या वर्क्फोर्स कर्ता असे धो रण!

राजसी -मोलकरणीला ML दिली असती लिहिलंय ते वाचलं नाहीत का तुम्ही? का तुम्ही देत नाही / द्यायची नाही म्हणून इतरांचं पण तसंच असेल असं गृहीत धरलं आहे. Organised sector एम्प्लॉयमेंट मध्ये कोणत्याही रजेच्या फायद्यांना eligible होण्यासाठी probation पूर्ण करावा लागतो. मोलकरीण एवढी टिकली तर आपोआपच सगळं manage होतं!
बाकी, तुमचं म्हणणं अस दिसतंय की बायका भरपगारी ML घेतात त्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे त्यांना भरपगारी रजा देऊ नये. इतकीच जर मुलं जन्माला घालायची बाईला हौस असेल तर Unpaid Leave घ्या आणि मुलं जन्माला घाला. मुळात बायकांना हे सगळ्या गोष्टी मिळवायला किती संघर्ष करावा लागलाय हे तुम्ही सोयीस्कर रित्या विसरताय. बायकांना बालंतपणाच्या सुट्ट्या द्यायच्या नसतील तर कोणालाच कसलीच सुट्टी देऊ नका. अवघड आहे परत स्वातंत्र्यपूर्व काळाकडे सामाजिक वाटचाल! काही माझ्या समजण्यात चूक झाली असेल तर नक्की सांगा.
बेसिकली, some women can have it all हे बऱ्याच जणांना खुपयंत का? सगळ्याच बायकांना have it all मिळावं अशी इच्छा असेल तर त्यात काही गैर नाही . त्याची सुरूवात घरापासून व्हायला हवी. वडील, भाऊ, नवरा ह्या मंडळींना आधी बदलावं लागेल!

भरत - कल्याणकारी राज्य आणि नोकरी देणारी कंपनी एकच का?

सशल - नोकरी देणारी कंपनी कल्याणकारी राज्यात आहे की कुठे? भारत कल्याणकारी नाही का? शिकून सवरून भारताच्या जीडीपी ला हातभार लावणार्‍या महिलांनां (मुलं काय गम्मत म्हणून एकटी बाई जन्माला घालत नाही) मुलं जन्माला घालण्याचा अधिकार बजावण्यासाठी नोकरीवर पाणी सोडण्याची गरज भासावी का कारण भारतात लोकसंख्या फार जास्त आहे? मुलं जन्माला घालणं ही चैन आहे का? तुम्हाला उद्या सर्दी ताप खोकला झाला तर तुम्ही बिनपगारी रजा घेता का?

अवरली वेजेस आणि सॅलरीड एम्प्लॉयमेन्ट ह्यातला फरक काय आहे? एम्प्लॉयर ला सॅलरीड एम्प्लॉइज् ठेवण्याची गरज का भासावी? तासाच्या हिशोबावर काम करून त्याची मोलमजूरी देणं बेस्ट

===
अ‍ॅमी - सिम्बानी " प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे," असे सुचवले आहे त्यावर मी "हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही." म्हणले आहे.
-

मानव पृथ्वीकर - (लोक)आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

झालेले विषयांतर लक्षात घेता हा ही योग्य व महत्वाचा मुद्दा आहे.

राजसी - बरं! बायकांची ML इतकी इतरांना खुपत असेल आणि कंपनीला आतबट्ट्याचा व्यवहार वाटत असेल म्हणून ML वर गदा आली तर career women इतर पर्याय धुंडाळतीलच जस की surrogate, adoption पण त्या option ला पण कुठलीतरी बाईच लागेल अजून प्रयोगशाळेत नऊ महिने ठेऊन घरी बाळ आणायची technology आलेली नाही.
Adoption /Surrogacy दोन्ही केसेसमध्ये नवमातांना ML मिळालेली पाहिलेली आहे. Adoption Govt तर्फे केलं तर surrogacy पेक्षा खूपच स्वस्त पडत. Surrogate Mother च्या ML च काय झालं किंवा ज्या बाईचं मूल दत्तक गेलं तिच्या ML च काय ते मला कळायला मार्ग नव्हता. कोणत्याही केसमध्ये स्वतः मूल जन्माला घालणे स्वस्त आहे.

मैत्रेयी - बाया प्रेग्नन्ट झाल्यावर मॅटर्निटी लीव्ह नाकारून मुले जन्माला घालण्यास डिस्करेज करणे हे फार लांबचा घास वाटतोय. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअ‍ॅक्टिव्ह होईल का? [अ‍ॅमी - वाह वाह मैत्रेयी. फारच स्पॉट ऑन!! सध्या फक्त maternity leave मिळणाऱ्या बायकाच मुलं जन्माला घालतायत आणि ती बंद झाली कि तो स्त्री नसबंदीचा प्रोग्रामच ठरणार आहे. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअॅक्टिव्ह होईल. बरोबर आहे. सुचलंच नाही मला.]

सशल - म्हणजे जी १०-१५% जनता ऑर्गनाइज्ड वर्क फोर्स मध्ये आहे त्यांनां मुलं जन्माला घालण्यापासून परावृत्त करावं आणि बाकीची मेजॉरिटी जनता (अनऑर्गनाइज्ड् लेबर) ह्यांनीं मात्र हवी तितकी मुलं जन्माला घालावी म्हणजे भारतातला पॉप्युलेशन एक्स्प्लोजन चा प्रॉब्लेम सुटेल असं म्हणता का तुम्ही? [अ‍ॅमी - Maternity leave मिळतेय म्हणून १०-१५% organised work force मधल्या बायका (त्या किती % आहेत एकूण लोकसंख्येच्या?) मुलं जन्माला घालतायत असं म्हणता का तुम्ही?]

सशल - तेच तर मी म्हणते. की ह्या बायकांनां मॅटर्निटी लीव्ह नाकारून भारतातल्या पॉप्युलेशन ला आळा घालण्याचा प्रस्ताव आहे ना तुमचा? त्याबद्दल उत्सुकता आहे.
बाकी मग ह्या बायकांनीं किती मुलं जन्माला घालावीत, प्रत्येक बाळंतपणात किती मॅटर्निटी लीव्ह घ्यावी, ती भर पगारी असावी की कशी आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनीं आणि उरलेल्या सर्व आयांनीं आपापल्या बाळांनां दुध कसं आणि कुठे पाजावं त्याबद्दल नंतर बोलू; एकदा पॉप्युलेशन प्रश्न निकालात काढला की चर्चा करायला मुद्दे हवेतच ना!

अमितव : (बाळंतपणाची रजा) गरजेची नाही असं म्हटलं म्हणून तर इतका पोस्ट प्रपंच.
भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?

स्वाती_आंबोळे - बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!

अ‍ॅमी - हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही. >
असे लिहिलेले असतानादेखील " भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?", " बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!" असल्या कमेंट येण्यामागे काय कारण असेल बरे??

फारेण्ड -मला तर माझ्या लहानपणीपासून आम्ही कोणत्याही मोलकरणीचा कसल्याही खाड्या बद्दल किंवा रजे बद्दल पगार काटल्याचे आठवत नाही, तसेच कोणत्याही मोलकरणीला आपणहून कधी काढल्याचे आठवत नाही - बहुतांश इतर कामांमुळे किंवा ठिकाण बदलल्याने सोडून जातात. या कामांना लोक मिळण्याचा प्रॉब्लेम मोठा असल्याने सध्या कोणीही ही लक्झरी अ‍ॅफोर्ड करू शकत असेल असे वाटत नाही Happy

च्या - किमान ६ महिन्याची मॅटर्निटी लिव्ह कंपल्सरी असावी पण ती भरपगारी असावी कि नाही हे ठरवण्याचा अधिकार कंपनीला असावेत किंवा बालसंगोपन हे LTD (long term disability) सारख्या सदरात आणून कंपन्यांना महिना ठराविक पगार देण्यास भाग पाडता येईल.

स्वाती_आंबोळे - >>> तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

भरत, हे 'फॅमिली लीव्ह' अशा सदरात म्हणत असाल, तर एकवेळ मान्य. म्हणजे मग त्यात कोणत्याही कारणाने शारीरिक आणि/अथवा मानसिकदृष्ट्या आजारी वा परावलंबी असलेल्या/झालेल्या व्यक्तींसाठी किंवा तिची काळजी वाहणार्‍यांसाठी ठराविक मुदतीची भरपगारी रजा. ('एकवेळ' म्हटलं कारण मग एकदा मॅटर्निटी लीव्ह घेतलेल्या स्त्रीवर कोणाची काळजी घ्यायची वेळ आली तर तेव्हा तिने काय करायचं?)

पण मौजमजा करण्यासाठी घेण्यात येणारी 'व्हेकेशन' आणि ही रजा यात तुलना होऊ शकत नाही.

मॅटर्निटी हा चॉइस असला तरीही त्याचे शारीरिक / मानसिक परिणाम असतात, रिकव्हरी ही प्रोसेस असते - यात दुमत असेल असं वाटलं नव्हतं. असो.

भारतात लोकसंख्या जास्त आहे म्हणून बायकांना पीनलाइज करा, त्यांना रिकव्हरीला वेळ देऊ नका हे काय लॉजिक?

च्रप्स - काही प्रतिसाद बायकांचे खरच आहेत का प्रश्न पडतोय. रिकव्हरी काय आहे, डिलिव्हरी मधले त्रास, सी सेक्शन वाल्यांचे वेगळे त्रास, नॉर्मल पण जास्त टियर वाल्यांचे वेगळे त्रास, 3rd डिग्री, 4th डिग्री , incontinance प्रॉब्लेम्स... हे किमान बायकांना माहीत असायला हवे.
9 महिने शरीरातील बदल, झीज भरून काढायला 3 मंथ असायलाच हवेत.
आणि मोस्ट important हा वेळ newborn शी bonding साठी पण महत्वाचा आहे

अमितव - मी पाहिलेल्या देशांत बाळंतपण, दीर्घ आजार, अपघात, काम गेल्याने (राजिखुषीने सोडल्याने नाही) नविन काम मिळेपर्यंतचा काळ हे सगळं एकाच तागडीत तोलुन त्यावर सुट्टी आणि पगाराचा काही भाग (१००% अजिबात नाही, अप टू ५०-५५% ) मिळतो. पण तुम्ही कामावर आहात हे धरलं जातं आणि दीर्घ सेवेमुळे जे लाभ मिळतात की वेतनवाढ इ. त्याला तुम्ही पात्र असता.
व्हेकेशन डेज मध्ये बाळंतपण उरका हे मला क्रुर वाटलं.
च्रप्स +१ हे त्रास स्पेल आउट करुनही हे त्रास निम्नस्तरालाही होतात हे उत्तर अड्ड्यावर मला मिळालं. असो.

मैत्रेयी - इथे लोकसंख्या नियंत्रणाचा उपाय म्हणुन मॅटर्निटी लीव्ह बंद करणे हा मुद्दा चर्चेला घेतला गेला. नंतर त्यातला फोलपणा दाखवून दिल्यानंतर लोकसंख्या नियंत्रण बाजूला पडले आणि कंपन्यांच्या आर्थिक हिताचा प्रश्न आला. आता काय तर इतरांना मिळणारी मॅटर्निटी लीव ज्यांना बाय चॉइस मुले नकोयत त्यांना न मिळण्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय पुढे आला! नक्की प्रॉब्लेम काय आहे? यालाच कोल्ड लॉजिक म्हणतात का?

m_Anu - खरं सांगायचं तर माझे डोळे इथल्या चर्चा वाचून बरेच उघडले.
चित्र बदललं आहे वगैरे असं काहीतरी वाटत होतं ते भास दूर झाले.Anu -

अमितव - आता निम्नवर्गाला मिळत नाही, पगारी लोकांच्या घरी काम करणार्‍या स्त्रीयांना मिळत नाही असा मुद्दा झालाय. त्यांना मिळत नाही, तर त्यांना मिळायला काय करता येईल ही चर्चा व्हायला हवी का ज्यांना मिळत्येय ती कशी चुकीची आहे/ गरजेची नाही ही?

मानव पृथ्वीकर -हा मुद्दा योग्यच आहे. अर्थात त्यांना कशी मिळेल यावर चर्चा व्हायला हवी.

फारेंड - टोटली Happy हे सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे विशिष्ठ वर्गाचे चोचले असून त्यात काही दम नाही, हे लॉजिक लावायचे असेल तर दुष्काळग्रस्त विस्थापित लोक, वीटभट्टी ते वीटभट्टी कुटुंब फिरवत संसार हाकणार्‍या बायका यांच्यापुढे शहरातील मोलकरणीही सुखवस्तू वाटतील. आदिवासी वगैरेंना तर नोकर्‍याच नसतात, मग कसली मॅटर्निटी लीव्ह - तेथून सुरूवात करावी काय?-

स्वाती२ - मॅटर्निटी लिव किंवा पॅरेंटल लिव जी आहे तीच्या कडे बघताना पुढील पिढीत केलेली गुंतवणूक म्हणून बघावे. यातुन अनेक गोष्टी खरे तर साध्य होतात. जन्म देणार्‍या स्त्रीचे शारीरीक आणि मानसिक आरोग्य, अर्भकाचे आरोग्य आणि निकोप वाढ ज्यात सुरवातेचे काही महिने हे खूप महत्वाचे असतात, मुल दत्तक घेतले असेल तर अजून वेगळे प्रश्न ही उद्भवू शकतात. त्याशिवाय मूल आणि पालक यामधील संबंध दृढ होणे, वाढत्या जबाबदारीतून येणारा ताणतणाव कमी होणे याचा दीर्घकालीन परीणाम बघता सशक्त समाज म्हणून हिताचेच आहे. अपत्य जन्मानंतर योग्य आधार खरे तर सर्वच थरातील पालकांना मिळायला हवा. तसा मिळत नाही ही खेदाची गोष्ट.

*********************************************************************************************************************
मुद्दा २ - महिला बाळंतपणावर गेल्यावर बाळंतपणानंतर कामावर रुजू झाल्यावर ऑफिसला आणि त्या महिलांना सामोरे येणारे प्रश्न

mi_anu : मला मान्य आहे, ६ महिने भर पगारी रजा घेऊन मग रिझाईन करण्याचा बायकांना मॉरल हक्क नाही.
पण बाई प्रेग आहे हे कळल्याक्षणी ती ३-४ महिने व्यवस्थित असली तरी तिच्याबद्दल चे सर्व महत्वाचे करीयर डीसीजन लांबणीवर टाकणे/दुसर्‍याला देणे, इन्क्रीमेंट प्रो रेटा देणे(हे इन्क्रीमेंट तिने प्रेग नसताना १०-११ तास बसून केलेल्या मागच्या वर्षीच्या कामाबद्दल असणार असतं.), अगदी व्यवस्थित प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन नसलेल्या स्त्री ला पण मॅ लीव्ह वर जायला आठवा चालू झाल्यापासून दबाव आणणे,लीव्ह वरुन परत आल्यावर इतर १०० लोकांनी नाकरलेली टिम आणि वर्क प्रोफाईल देणे, ऑनसाईट ला तिने हो सांगितले असले, घरचा सपोर्ट असला तरी परस्पर वर 'ती नाही येणार म्हणाली, जमणार नाही' सांगणे या गेमा कंपन्या टाकतच नाहीत असं नाही. (काही सन्माननीय अपवाद असतील.)

आमच्या स्त्री मैत्रिणी म्हणतात की बायकांना मुलं जन्माला घालावी लागतात,त्यासाठी आपल्याला त्यांना वेळेची/वफ्रॉहो ची सूट द्यावी लागते ही या लोकांना बायकांवर आपण करत असलेली मोठी मेहरबानी वाटते.

सई केसकर - नुसती प्रेग्नन्ट नाही. जर "प्रेग्नन्ट होणार" अशी शंका असली तरी. काही फर्टिलिटी ट्रीटमेंट घेणाऱ्या बायकांच्या अशा कथा ऐकल्या आहेत. एक तर मूल होईल की नाही याची खात्री नाही आणि मूल होईल म्हणून ऑफिसमधून चांगल्या संधी हातातून निसटाना पाहायच्या.
बिगर पिक्चर बघता बायकांना बेनिफिट ऑफ डाउट देण्याकडे माझा कल आहे. कारण आधी हायरिंगच कमी असतं. त्यात ही सगळी स्थित्यंतरे (आणि त्यांच्यावर असलेला कल्चरल दबाव) पाहता ज्यांना ६ महिन्यांची रजा घेऊन पुन्हा छान सुरुवात करायची आहे अशा स्त्रियांसाठी काही रिझाईन करणाऱ्या असल्या तरी अस व्हर्सस देम अशी स्त्रियांमध्येच फूट पडू नये.

सिम्बा - प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी

mi_anu : हो असे बरे वाटते.
एच आर आणि बाई या दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत गेमा टाकत बसण्यापेक्षा क्लियर अ‍ॅग्रीमेंट बरे.

राजसी - Maternity leave ला काहीही clause असू नये. सहा महिने maternity leave मग साठलेली PL, मग without pay leave असं सगळं करुन स्त्रीने राजीनामा दिला तरी. ह्या काळात स्त्री प्रचंड मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून जात असते. जितकी मदत मिळेल तेवढी असू दे. जी स्त्री rejoin करते तिला anyway मोठा ब्रेक झाल्यामुळे करियर बॅकलॉग आलेला असतोच. जी सोडून जाते तिला निदान पूर्ण काळावधी मिळते नक्की तिला काय हवंय आणि करायचंय ते ठरवण्याचा.

सिम्बा - राजसी तुमचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे,
पण उलटे बघा,
long ब्रेक नंतर परत येणाऱ्या स्त्री ला जॉब वर ठेऊन घेऊ असा एक अश्युअर्न्स मिळतोय.

तुम्ही एखाद्या कम्पनीच्या मालक, किंवा प्रोजेक्ट सांभाळनार्या manager आहात अशी कल्पना करून पहा.
तुमच्या टीम मेम्बर च्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतराबरोबर तुमचे किती देणेघेणे असेल?
आणि त्या टीम मेम्बर च्या आयुष्यात अशी उलथापालथ घडली आहे म्हणून क्लायंट ने तुमचा सब standard परफोर्मंनस का कबूल करावा?

जी काही पोलिसी असेल ती स्त्रियांना योग्य तितके झुकते माप देऊन कंपनी ला तोटा होणार नाही अशी असावी.

mi_anu : सब स्टॅंडर्ड?
मला वाटते अगदी नवी टेक्नॉलॉजी रात्री जास्त वेळ थांबून रॅम्प अप करायचे असे काम दिले नाही, आधी करत होती तेच काम दिले तर परफॉर्मन्स सब स्टॅंडर्ड असायचे काही कारण नसावे.तसा असला तर तो लिव्ह आधी पण असेल.
'कमी टाईम कमिटमेंट' हा एक फरकाचा मुद्दा सोडल्यास मूल होण्याआधीचा आणि नंतर चा परफॉर्मन्स यात फरक पडतो असे वाटत नाही.
कमी टाईम कमिटमेंट ला पॅकेज मध्ये काही कमी करून चालवायला हरकत नसावी(आमच्या इथे एकीला हाफ पे आणि 6 तास वर्किंग विथ लंच असे दिले होते)

राजसी - एखादया बुव्याला काही अनपेक्षित तब्बेतीच्या कारणांमुळे वर्ष-सहा महिने रजेवर जावे लागले तर लगेच त्याला काढून टाकायच्या गप्पा करतात का? सगळ्याच बायका बाळंत होतात म्हणून काही महत्त्वाचं नाही असं का! आणि आधी खर्ची घातलेल्या वर्षांवरच ML मिळते.
बाकी, अनुला अनुमोदन.

च्रप्स : बाळंत बाईला कुठल्या देशात कामावरून काढतात? सगळीकडे law आहेत त्यांना प्रोटेकट करायला.

राजसी : वरचं discussion वाचा..

mi_anu - एम्प्लॉयर ची मजबुरी पटते.टीम मधल्या बायका लिव्ह वर जाणार असणे, त्या साठी रिप्लेसमेंट बघणे हे करावे लागते.यात काही वेळा कंपनी चा फायदा पण असतो.रिसोर्स रोटेशन आपोआप होते.
परत एकदा, बाळंत होण्याचा निर्णय, त्यानंतर घरी राहणे ही लक्झरी नसून समाजातल्या बऱ्याच जणांची गरज आहे.(पुरुषांना पण प्रत्यक्ष बाळंत झाले नाही तरी ऑफस्प्रिंग हवं असतं असं मानून.)

भरत : ह्युमन रिसोर्सेसची गरज ठरवताना स्त्रिया बाळंतपणाची रजा घेणार, हे लक्षात घ्यायला हवं. घेतलं जात असावं ना?

फारेण्ड : पण सिरीयसली, हे सहा महिन्यांच्या पगारी रजेचे धोरण सार्वत्रिक असेल, तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही.
- काम करणार्‍या स्त्रीला सहा महिन्यांची पूर्ण पगारी रजा, आणि नंतर नोकरीत परत
- नवीन कामाकरता लायक असलेल्या स्त्रीला फक्त ती प्रेग्नंट आहे म्हणून नोकरी नाकारणे बेकायदा
- आणि सर्व ठिकाणी, अगदी मोलकरणींकरताही, ते एन्फोर्स करण्याची सिस्टीम

हे जरा युटोपियन वाटले, तरी पूर्ण १००% एन्फोर्स झाले तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही. याचे फायनॅन्शियल बर्डन सर्वत्र सारखेच वाटले जाणार आहे. इतरत्र वापरला जाणारा पैसा प्रेग्नंट स्त्रियांच्या पगाराकरता वापरला जाइल.

एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत अनेक खाजगी कंपन्यांत पहिले दोन नियम राबवले जातात. जेथे ते सक्तीचे आहेत त्या कंपन्यांना स्वतःला व त्यांच्या कॉम्पिटीटर्सना सुद्धा ते लागू होतात. त्यामुळे competitive disadvantage हा जो मुख्य खाजगी कंपन्यांना धोका असतो तो पूर्ण निघून जातो यातून.

उपाशी बोका - असहमत. पण धाग्याचा विषय हा नाही, त्यामुळे तुमचे चालू द्या.

अ‍ॅमी - सार्वत्रिक नाहीय ते धोरण. आणि त्याचा काय परिणाम होतोय याची लिंक वर सिम्बानी दिली आहे. हि अजूनेक

मुद्दा३ : कामाच्या ठिकाणी रजा आणि समानता

भरत - मला अ‍ॅमी यांचे मुद्दे (आता) पटले.
राजसी यांच्या पोस्टचा उत्तरार्ध पकडून आपण कुटुंबव्यवस्था, समाज बदलू शकत नाही, म्हणू कायद्याने, नोकरीच्या नियमांत स्त्रियांना सवलत दिली आहे असा अर्थ निघतो.

सारख्या कामासाठी सारखे हक्क आणि लाभ या तत्त्वांत मॅटर्निटी बेनेफिट्स बसत नाहीत. अ‍ॅमी यांनीच अन्यत्र लिहिलेल्या ज्या मुद्द्यामुळे मला त्यांचं म्हणणं पटलं तो हा मुद्दा :
मॅटर्निटी बेनेफिट्सचा लाभ पुरुष (आता पॅटर्निटी बेनेफिट्स येताहेत, दत्तक, सरोगसीसाठी बेनेफिट्स मिळतील हे आणखी पुढचं) आणि ज्यांना मूल नको आहे, असे स्त्रीपुरुष घेऊ शकत नाहीत. आत त्यांचा निर्णय जगावेगळा म्हणून त्यांना या सोयींचा लाभ घेता येऊ नये हा अन्याय नाही का? की त्याबद्दल त्यांना काही इन्सेंटिव्ह मिळावा? नो क्लेम पिरियडसाठी इन्शुरन्सवाले बोनस देतात- त्याप्रमाणे.

या सगळ्यासाठी स्त्रियांना झगडावं लागलंय हे मान्य करून आपण समानतेच्या पातळीवर ही तात्त्विक चर्चा करतोय हे लक्षात ठेवूया.

राजसी - बाळंतपणाची रजा हा benefit नाही आवश्यकता आहे. ज्यांना लाभ वाटतो त्यांनी खरंच डोळे उघडून बघण्याची गरज आहे. It is not a vacation, full time job where one doesn't have to atleast worry about how to feed herself and the baby.
बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे.

वावे - राजसी +१
बाळंतपणाची रजा ही आवश्यकताच आहे, ' फायदा' नाही.

भरत - मी आधीच स्पष्ट केलंय की बाळंतपणाच्या (भरप्गारी) रजेसाठी झालेल्या झगड्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे तात्त्विक पातळीवर आहे.

वेगळ्या शब्दांत लिहून पाहतो.
"बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे."
इथे भेदभाव होतो, असं वाटत नाही का?

mi_anu - हा मुद्दा मॅ लिव्ह ६ महिने झाली तेव्हा बर्‍याच चर्चात आला होता.फक्त मॅटर्निटी बेनिफिट स्त्रियांना दिले तर मूल न होण्याचा निर्णय घेतलेले कर्मचारी, बॅचलर्स यांना ते अन फेअर वाटते.
माणूस चोरीछुपे दुसरीकडे जॉइन होणार नाही, आपल्याच कंपनीसाठी काही हायर शिक्षण करेल आणी नंतर आपल्या कंपनीत वापरेल ही काळजी घेऊन कोणालाही ६ मंथ पेड सबाटिकल द्यायला हरकत नाही. (आणि गंभीर आजारांबाबत ६ मंथ पेड सीक लिव्ह.)

भरत - समान कामासाठी समान लाभ यात पेड मॅटर्निटी लीव्ह बसत नाही. तुम्हाला तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा, असं म्हटलं तर हा प्रश्न येणार नाही. [सशल - ह्यात कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधीलकी नाही!
रोबॉट्स ठेवावेत त्यापेक्षा!! हाडामासाची माणसं तरी कशाला?] [राजसी - अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा ---- युरोप-अमेरिका टूरला पगारी रजा घेऊन जाणे / घरांत सहा महिने लोळत पडून पुस्तके वाचणे आणि Maternity leave ह्यात फरक आहे.] [फारेण्ड - यात बाळंतपणाची रजा इतर रजांसारखी employer discretion वर असू नये. वेगळ्या कॅटेगरीत असावी. ]
लक्षात घ्या. मॅटर्निटी लीव्ह किंवा पेड मॅटर्निटी लीव्ह देऊच नका असं मी (अजूनपर्यंत) म्हटलेलं नाही.

याची दुसरी बाजू - एम्प्लॉयरकडून दिला जाणारा आरोग्य विमा हा अनेक ठिकाणी फक्त (लग्नाचा) जोडीदार आणि मुलांसाठी असतो. अन्य नातेवाईक (अनेक ठिकाणी डिपेंडंट आईवडील, भावंडे, थोडक्यात ज्यांची जबाबदारी आहे, अशी नातेवाईक असलेली किंवा नसलेली व्यक्ती यांचा समावेश असतोच असं नाही.

दोन्ही पालकांसाठी सारखीच पॅरंटल लीव्ह हे फक्त ऐकलं आहे. प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येत नाही.

अमितव - आमच्या इथे दोन्ही पालकांना मिळून 52 आठवडे सुट्टी मिळते. तुम्ही हवी तशी घ्या.
उत्पन्नमिळकत कर वजावटी आणि एकूणच स्ट्रक्चर जोडीदार ( लग्न गरजेचं नाही, कॉमन लॉ पार्टनर चालेल) आणि त्यातही मुलं असतील तर फेवरेबल असतात. मुलांचे खर्च वजावटीत जातात. कॅनडात तर युनिव्हर्सल चाईल्ड केअर बेंनिफिट मिळतो. सर्व पालकांना एक (करपात्र)रक्कम दर महिना मिळते. मुलं नसतील तर नाही मिळत. जी एस टी परत मिळण्याचं स्ट्रक्चर परत कुटुंबाच्या आकारावर अवलंबून असत. हे जन्मदर वाढावा मुलं जन्माला घालावी म्हणून काही प्रमाणात आहे हे मान्यच पण हे आर्ग्युमेंट साठी टोकाचं डिस्क्रिमीनेशन आहे.
दत्तक मूल घेतलं तरीही 52 आठवडे बॉंडिंगला सुट्टी मिळते.

यावा कॅनडा आपलाच आसा.

अमितव - अहो मग दीर्घ किंवा लघु अकस्मित आजारपणासाठीचे बेनिफिट ही समान काम मध्ये बसणार नाहीत.
प्रत्यक्ष कर भरला नाही/ कमी भरला तरी सरकारने काळं गोरं करायला हवं. कर भरला नाही... राज्य परिवहन बस मध्ये जागा मिळणार नाही. पार्क मध्ये घसरगुंडी वर चढा पण घसरायचं नाही.

सशल - >> यावा कॅनडा आपलाच आसा. Happy
आता अ‍ॅमी (आणि त्यांचं लॉजिक पटलेले भरत) म्हणतील , "खरंच, ज्या ज्या भारतीय वर्कींग महिलांनां पेड मॅटर्निटी लीव्ह हवी आहे त्यांनीं कॅनडात जाऊन मुलं जन्माला घालावीत; भारतात फार गर्दी आहे! एकतर मुलं जन्माला घालता येतील किंवा नोकरी करून पगार मिळवता येईल. दोन्ही जमायचं नाही , कारण पुरूषांनां मुलं जन्माला घालता येत नसल्यामुळे हा समसमान न्याय नाही ".

फारेण्ड - इन प्रिन्सिपल बरोबर आहे. पण एकूणच धोरणे कौटुंबिक गरजांच्या बाजूने झुकलेली असणे हे मला पटते आणि त्या दृष्टीने ही असमानता योग्य आहे. अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन, डायव्हर्सिटी हायरिंग मधेही अशी असमानता असते, आणि ती ही योग्य आहे.
<<<<आजारपण, अपघात कोणाला हवा असत नाही, ठरवून घेता येत नाही. तेव्हा ते यात घुसवू नका. >>> हे मान्य आहे. पण cold corporate culture च्या दृष्टीने जर पाहिले तर कर्मचार्‍याचे आजारपण ही कंपनीची जबाबदारी नाही. त्याबद्दल जेव्हा कन्सेशन दिले जाते तेव्हा 'समान' तत्त्वाला तेथेही अपवाद होतो. रजा कर्मचार्‍याच्या चॉईस ने आलेल्या गोष्टीमुळे आहे की नाही हा फॅक्टर कॉर्पोरेट लॉजिक ने नगण्य आहे.
वरती कामाच्या ठिकाणी झालेले अपघात किंवा कामाच्या स्वरूपातून आलेले आजारपण धरलेले नाही.

mi_anu कामवाल्या बायांना पेड लिव्ह देण्याबद्दलः
बाया दिवसाला १ घर सरासरी ४५ मिनीट काम करतात. अशी ४ ते ५ कामं त्यांच्याकडे असतात. सर्वांनी ठरवल्यास एखाद्या बाईला ६ महिने पगारी लिव्ह सर्वांनी मिळून द्यायला काहीच हरकत नाही. कल्पना चांगली आहे. माझ्याकडे दिवसाची फक्त ४५ मिनीट कमिट करणार्‍या बाईला ६ महिने भरपगारी रजा एकटीने देणं मला परवडणार नाही. पण ती माझ्याकडे दिवसाचे ६ तास/जास्त वेळ काम करत्/मुले सांभाळत असेल तर ही अशी लिव्ह आणि लागेल तो हेल्थ सपोर्ट/बिनव्याजी कर्ज देणं हे माझं कर्तव्य आहे.

**********************************************
मुद्दा ४ : बाळंतपणाची रजा भरपगारीच का असावी -
(खरं तर हे मुद्दा क्र, १ मध्येच बसू शकतं. पण कॉपीपेस्ट करताना मला वेगळा मुद्दा वाटला, म्हणून इथे खाली घेतलाय)
mi_ anu : मॅ लिव्ह ला दिले गेलेले पेड बेनिफिट ही महिला वर्गाला दिलेली सवलत नसून त्यात भूतकाळातील बरेच वाईट अनुभव, अगतिकता, बायकांनी मूल जन्माला घालून पैशाची गरज वाढणे (सिंगल मदर,काही आकस्मिक अपघातामुळे विधवा होणे, घराचे हफ्ते वगैरे विचार करता) याचा इतिहास आहे. (पूर्वीच्या काळी मुलांना अफू घालून घरी ठेवून दिवसभर कामावर जाणार्‍या बायकांच्या काही कथा ऐकल्या असतील.)
समाजावर परीणाम, गुन्हे वाढणे, मुलं कुपोषित्/गतीमंद निपजणे, मुलांचे शोषण असे बरेच प्रत्यक्ष न दिसणारे साईड इफेक्ट ३ किंवा ६ महिने पेड मॅ लिव्ह न देण्यात आहेत. पूर्वीच्या काळी सरकारी ऑफिसेस मध्ये पण शेवटची कळ येईपर्यंत (बाळ झाल्यवर ३ महिने पूर्ण मिळावे आणि पैशाचे कमी नुकसान व्हावे म्हणून )काम करणार्‍या बायांच्या कथा ऐकल्या आहेत.

पैश्याचं सोंग आणता येत नाही.काही घटकांनी मुलं न जन्माला घालायचा निर्णय घेतला म्हणून सर्वांना घेता येत नाही. नवा जीव समाजात आणायला, वाढवायला पैसे लागतात. वेळ लागतो.आपण ज्या कंपनीला उमेदीची ५-१० वर्षं, रोजचे ९-१० तास किंवा जास्त कमिटमेंट देतो तिच्याकडून या मोठ्या घटनेत आधाराची जराही अपेक्षा करु नये?
[भरत : यासाठी मोबदला मिळतो ना? की आवडीचं काम आहे म्हणून करतो आपण ते?
[ mi-anu - मोबदला मिळतो. नो डाऊट.पण कंपन्यांचे निर्णय, अक्वीझिशन्स, बदललेल्या स्ट्रॅटेजी या आपल्या जीवनाची दिशा हळूहळू नकळत बदलत असतात.ही दिशा भविष्यासाठी चांगली असते किंवा नसते.जरी हा सुप्रिम त्याग वगैरे नसला तरी एखादी कंपनी एका विशीष्ठ स्टेज ला जाण्यात मनापासून काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याचा बीट असतो.
मोबदला आणि श्रम हे प्रपोर्शन मध्ये नसू शकतात. (कोणत्यातरी लांबच्या गावातून १.५ लाख वर्षाला पॅकेज वर पुण्यात्/मुंबईत कॉट बेसिस वर राहणारे फ्रेशर्स्/पगार ओके मिळूनही कामाच्या ठिकाणाजवळ महाग रेंट्/लांब स्वस्त रेंट ने राहील्यास बस रुट वर नसणे/एकंदर खिश्यातले गणित नफ्याकडे जावे म्हणून कराव्या लागलेल्या तडजोडी/आयटीतले महाग पार्टी कल्चर्/त्यातून जास्त पंगे न घेता वेगळे राहणे/स्वस्त मजा मॅनेज करणे). कधीकधी आयुष्यातले अनेक तास, नोकरीसाठी केलेल्या तडजोडी, भलता रोल अंगावर पडून वेगळी कामे करावी लागणे याच्या मानाने नोकरीने आपल्याला जास्त दिलेले नाहीये असा फील येतो}]

mi_ anu- मे बी इथे मुद्दे मांडणार्‍यांसमोर चुकीची वागणारी उदाहरणे असतील. पण मॅ लिव्ह घेऊन आपले आवडीचे काम मिस होते म्हणून शक्य तितक्यालवकर जॉइन करुन, अनेक ठिकाणचे बॉल एका वेळी जगल करुन ऑफिस च्या कामावर इम्पॅक्ट होऊ न देणार्‍या कमिटेड वर्क ओरिएंटेड बायका आपण पाहिल्या नाहीत का?

बाय द वे, स्वतःचे रास्त तळमळीचे लॉजिकल मुद्दे पर्सनल वर न येता, अती अग्रीसिव्ह न होता मांडले तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो असा अनुभव आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं पुन्हा वाचायला लावल्याबद्दल क्षमस्व. एकेक मुद्दा घेऊन तो तडीस नेण्याचा विचार आहे.

अ‍ॅमी यांचा मुद्दा होता, बाळंतपणासाठी पगारी रजा देऊ नये. बिनपगारी रजा कितीही दिली तरी चालेल. रजा पगारी असेल, तर त्याचा भार एम्प्लॉयरने उचलणे योग्य नाही. इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी लिहूनही त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करून लोकसंख्यानियंत्रण आणि असे काय काय मुद्दे तिथे आले.
पगारी रजेचा खर्च एम्प्लॉयरवर पडू नये.
अमितव यांनी दिलेल्या माहितीत कॅनडामध्ये पगारी रजेचा खर्च सरकारकरवी उचलला जातो हे दिसते आहे.
अमेरिकेतली ही अगदी तीन दिवसांपूर्वीची बातमी आहे. त्यातला काही भाग इथे देतोय.
Sen. Marco Rubio (R-FL) introduced the Economic Security Act for New Parents last week, with support from White House adviser Ivanka Trump. The full text of the bill hasn’t been released, but it’s been sold as providing parents with “paid parental leave” after the birth or adoption of a child.

The bill is not, in fact, paid leave. It’s another version of unpaid leave that working parents in the United States would have to pay for themselves. A summary of the bill shows that it would merely let workers access some of their Social Security retirement income in advance to make up for some of the wages they would lose when taking parental leave. Workers would still bear the cost of taking time off — by delaying their own retirement.

The United States is the only industrialized country that doesn’t guarantee paid parental leave to working parents, and Republicans and Democrats overwhelmingly support the creation of such a program. The problem is that no one seems to agree on how to pay for it, and Rubio’s bill is the weakest proposal yet because Social Security, as it stands, is in trouble.
Some US businesses voluntarily offer paid parental leave to their workers, but only about one in 10 workers in the country get such a benefit from their employer. Low-wage workers are the least likely to get it.
(म्हणजे ज्यांना पगारी रजेची अधिक गरज आहे, त्यांनाच ती मिळत नाही.)
In response to federal inaction on the issue, several states have started requiring employers to provide some paid leave: California, New York, and the District of Columbia are among those that do.

त्याच बातमी/लेखात पुढे पगारी रजेचे फायदे नोंदवले आहेत.

ही भारतातली बातमी. (त्या धाग्यावरही अशीच एक बातमी भारतासंदर्भात आणि एक चीनसंदर्भात आहे. त्यांची लिंकही इथे देतो.
In India, the policy is problematic because it is imposed as an employer mandate. Employers have to bear the entire cost of providing leave to employees—in terms of both continued pay while on leave, as well as the indirect cost of having to get the work done by employing other workers to finish the work of the absent employee.

In turn, this raises the concern that employers will begin to discriminate against women of childbearing age, both in hiring as well as in salaries, since this group is entitled to the benefit of paid family leave and is most likely to use it. Therefore, employer mandates are not the ideal way to design a paid leave programme.-

यातून एक मार्ग हा दिसतो की सरकार(करदाते) , एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी या तिघांनी भरपगारी रजेचा वाटा(क्षमतेप्रमाणे, परिस्थितीनुरूप) उचलायला हवा.

हे सगळं ठीक पण कोण कुणाचा ड्युआय याबद्दल स्वतःच्या धाग्यात अवाक्षर नाही. हे सगळं दुस-यांच्या धाग्यावर लिहीतात का ? मला माहीत नाही म्हणून शंका.
उदा. विठ्ठल आणि भरत टिंब मला एकच वाटतात वगैरे

विषय निघाल्यावर विचार आणि चर्चा करताना त्याचे नवे नवे कंगोरे दिसू लागतात. त्याचा अर्थ आधी हा मुद्दा आणि मग तो मुद्दा, तो नाही मग पुढचा असा काढायची गरज नसावी.

गर्भारपणात स्त्रीला होणार्‍या शारीरिक, मानसिक, भावनिक त्रासाची कल्पना आहे. नात्यातील आणि मैत्रीतील जवळच्या स्त्रियांचं बाळंतपण, मिसकॅरेज, गर्भपात, स्टिलबॉर्न बेबी असं होत असताना त्यांना दुसरं काही देणं शक्य नसल्याने ऐकणारे कान दिलेले आहेत.
एका वाहत्या धाग्यावर बाळंतपणानंतर लगेच कामाला लागणार्‍या स्त्रीचं उदाहरण मी लिहिलं, ते पाहून खरं तर मला धक्का बसलेला. पण हे अगदीच अनकॉमन नाही, असं नंतर कळलं. याचा अर्थ बाळंतपणात होणार्‍या त्रासाची मला कल्पना नाही, असा लागत असेल, तर तो लागायला नको किंवा मी तिथे तसं लिहायला नको होतं.

आजच्यापुरतं इतकंच.

बरं, इथे काय पद्धत आहे ठाऊक नाही, पण दुस-यांच्या गंभीर धाग्यांवर ड्युआय कोण हा खेळ खेळण्याची भंकस मला फडतूसपणा वाटतो. त्यामुळे माझ्या विवेका स्मरून इथे धाग्याशी संबंधित रिप्लाय देतो आहे.
१९२८ साली मॅटर्निटी संबंधी बिलवर झालेली चर्चा आहे. (इग्नोर करूच शकता आणि फक्त वरच्या प्रतिसाला महत्व देऊ शकता)
http://www.dalitweb.org/?p=3430

हे बिल ऑर्गेनाइज्ड सेक्टर मधे आहे. कल्याणकारी राज्यात मालक कर्मचारी यांचे संबंध शोषणावर आधारीत असत नाहीत. कर्मचारी देखील आपली गुंतवणूक (श्रम, वेळ, कौशल्य आणि जीवन) सदर आस्थापनेत करत असतो. उमेदीच्या वर्षात एखाद्या आस्थापनेत नोकरीला सुरूवात केल्यावर अचानक काही कारणाने काढून टाकल्यास त्याला बाहेर पुन्हा पहिल्यापासून सुरूवात करणे अवघड असते. आपल्याला या ठिकाणी काम करायचे आहे या परस्पर विश्वासावर तो दाखल झालेला असतो. त्यामुळे बाहेर काढतानाचे कारण सबळ असायला हवे. त्यात त्याच्या मुलभूत गरजांचा संकोच होत असेल तर ते शोषण ठरते. बाळंतपणाची रजा मिळणे हा स्त्रीचा हक्क आहे. स्त्रियांना जर मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर बाळंतपणासाठी रजा नाकारणे बंद व्हायला हवे. अन्यथा तिचे लग्न आणि बाळंतपण हा तिच्या मार्गातला, करीअर मधला धोंडा ठरेल हे या सर्वामागचे गृहीतक आहे. बाबासाहेबांनी स्त्रीच्या मॅटर्निटी लीव्ह साठी प्रस्तावित कायद्याला विरोध करत दुरूस्ती सूचना मांडली होती.

(भारताची लोकसंख्या वाढली आणि लेबर उपलब्ध आहे म्हणून शोषण करावे असा त्याचा अर्थ होत नाही. १९९१ नंतर अनेक गोष्टी बंद केल्या गेल्या. ज्यावर पुरेशी चर्चा झालेली नाही. आजच्या पिढीला हे सर्व हास्यास्पद वाटणे साहजिक आहे. माझ्या माहितीप्रमाणे ब्रिटनसहीत अनेक राष्ट्रात मानवी मूल्यांना प्राधान्य आहे. शोषणाची परवानगी नाही.

अमेरिकन भांडवलवादी असूनही तिथल्या कायद्यांमुळे भारतात आउटसोर्स करतात. हे अवांतर )

अनऑर्गेनाइज्ड सेक्टरला लागू नाही हा पण गैस आहे. आपल्याला लेबर लॉज मागचे तत्त्व माहीत नाही. त्याच वेळी ते तत्त्व अंमलात आणण शक्य नाही याची राज्यकर्त्यांना जाणीव आहे. जर आपण कर्मचा-याला दहा हजार रूपये देत असू तर तो मोलकरणीला पाच हजार देऊ शकत नाही. आपल्याकडे टेक अवे सॅलरीची पण व्याख्या आहे. थोडक्यात त्याचे घर चालले पाहीजे. त्यावर बँका आणि आस्थापना कर्जे देतात. टेक अवे सॅलरी म्हणजे हप्ते गेल्यानंतर. त्यातून किमान वेतन देणे अशक्य आहे याची जाणीव असल्याने किमान वेतनाच्या कायद्याचा उद्देश धाब्यावर बसवत तो किमान म्हणजे दारीद्र्यरेषेखाली ठेवला गेला. आता तर दारीद्र्य रेषाच इतकी खाली नेली आहे की सगळेच तिच्या वर येतील.

हे सर्व देशात गुंतवणूक यावी म्हणून नव्हे तर देवयानी खोब्रागडेला किमान वेतनावरून ( ती ३० हजार रूपये देत होती मेडला) परदेशात लाज गेली म्हणून प्रक्षुब्ध झालेल्या पब्लिकला किमान वेतन कायद्याने अडचण होऊ नये यासाठी. भारतात सहा हजार रूपये आहे.

त्यातही मार्ग म्हणून पूर्ण वेळ मोलकरीण न ठेवता केवळ भांड्या साठी, केवळ कपड्यांसाठी तासभर या तत्त्वावर नेमणूक होते. दोघींचे मिळून तीन हजार (सरासरी) होतात. काही ठिकाणी जास्त असतील. पण अपवाद. छोट्या शहरात ७०० ते ८०० रूपयात काम होते.

एखादी पद्धत का आहे, तिच्या मागचा विचार काय आहे याचा विचार करून आजच्या संदर्भात ती गैरलागू आहे किंवा कसे अशी चर्चा असावी असे आपले वाटते.

( इथे सवयीने सिंबा उर्फ अतुल पटवर्धन "एकाच व्यक्तीने प्रतिसाद दिले आहेत. अ‍ॅडमिन / वेमा यांनी उगाच कष्ट घेऊ नयेत धागा बंद करायचे" असे प्रतिसाद देतील काय याची भीती वाटते. अ‍ॅडमिन आणि वेमा यांना हे संस्थळ चालवताना सिंबा यांची किती मदत होत असेल याची थोडीफार कल्पना येते. )

आमच्या पूर्ण सोसायटी मध्ये २१०० भांडी झाडू पोछा,दर २.५ वर्षांनी कामाचे स्वरुप न वाढवता ३०० रु इन्क्रिमेंट, आणि ७०० रोज ७ किंवा कमी पोळ्या केल्यास हा रेट आहे. पोळ्या कमी झाल्यास रेट कमी होत नाही. कधीतरी एखादा दिवस १-२ पाहुणे येऊन जास्त झाल्यास जास्त होत नाही. आम्ही २ पोळ्या २ भाकर्‍या, शनिवारी पोळी भाकरी सुट्टी, ज्या दिवशी भात किंवा खिचडी किंवा चकोल्या खाव्या वाटतील तेव्हा पोळी भाकरी सुट्टी असे रुटिन फॉलो करतो.
इतर सोसायटी च्या मानाने हा रेट खूप जास्त आहे.पण १० वर्षाच्या ओळखीने येणारा ट्रस्ट जास्त महत्वाचा आहे.
पुढे मागे पिंपरी चिंचवड लेबर असोसिएशन कडून आठवडी एक सुट्टी, पेड मेडिकल एक्स्पेन्स,पेड मॅटर्निटी लिव्ह वगैरे नियम येतीलच. ते पाळू.सध्या वर्षाला २४ पेड, वर्षातून २ वेळा ५-५ दिवस गावी जायला पेड,दिवाळी पूर्ण पगार बोनस,गावी जायचे दिवस एका वेळी ५ पेक्षा जास्त झाल्यास डीफरन्स काढून त्याचा १०० च्या मल्टिपल मध्ये राऊंड डाउन करुन कट असे पाळतो.

मी अनु >>> आमच्या इथे फक्त भांड्याला १५०० रूपये आहे. कपडे पण १५००/- . तुमच्याकडे स्वस्त आहे. मुंबईसारख्या ठिकाणी कामवाल्या बायका मिळत नाहीत.
पुण्यात कल्याणीनगर, कँप सारख्या ठिकाणी हा दर खूप जास्त आहे. कारण कामवाली जवळपास घर घेऊन राहू शकत नाही. लांबून यावे लागते त्यामुळे फार थोड्या कामवाल्या इकडे उपलब्ध असतात. जादा पैसे देईल तिकडे त्या जातात (तिथे अक्षरश: कामवाल्यांची पळवापळव चालते आणि त्यावरून भांडणेही).
ब-याच देशात मेडला घर घेऊन द्यावे लागते किंवा खोली.

हो. मुंबई ला जास्त असेल.
कल्पतरु जेड नावाच्या पॅन कार्ड क्लब रोड जवळ असलेल्या उच्च सोसायटीत मोठ्या फ्लॅट ना १ नॉर्मल साइझ सर्व्हंट रुम, त्याला अटॅच बाथरुम, या रुम ला घरात आणि बाहेर उघडणारी एन्ट्री, छोटीशी स्वयंपाकाची व्यवस्था अशी सोय आहे.

बाळंतपणाची रजा हा हक्क आहे , हे सर्वमान्य आहे. त्यावर पुन्हा चर्चा झाली नाही, तर बरं होईल.

भारत सरकारच्या कायद्याचं नाव मॅटर्निटी बेनेफिट अ‍ॅक्ट असं आहे.
१९६१ चा मूळ कायदा

२०१७ मध्ये केलेल्या सुधारणा

दोन्ही कायद्यांत मातृत्व-रजेचा कालावधी किती असावा ते म्हटलंय. किती बाळंतपणं ते म्हटलेलं नाही.
पण काही राज्यसरकारांनी याबाबतही नियम करून दोन अपत्यांची मर्यादा घातलीय. त्यातला उत्तराखंडचा नियम तिथल्या उच्च न्यायालयाने रद्द ठरवलाय.

केंद्रसरकारची गर्भवती-बाळंतिणींसाठी रोख रकमेत मदत देण्याची योजना आहे. सुरुवातीला ही योजना दोन अपत्यांपुरती होती. पण नंतर हा लाभ फक्त एकाच अपत्यापुरता मर्यादित केला गेला आहे.
या कायद्याचा आणि कॅश बेनेफिट योजनेचा अर्थ बाळंतपणासाठीच्या रजेचा हक्क अमर्यादित नाही, असाही लावता येईल.
धाग्याच्या विषयाशी सरळ संबंध नसला, तरी माहिती म्हणून नोंदवतोय.

आपल्या स्वतःच्या धाग्याची काळजी घेणे हे अगदी कौतुकास्पद आहे. हा धागा स्तनपानाचा नाही याचे भान आहेच. स्तनपानावरच्या धाग्यावर कशावर एकमत झाले याचा इथे संदर्भ लागला नाही. तो वेगळ्या विषयावरचा धागा असल्याने तिकडे अवांतर असलेले प्रतिसाद इग्नोर केले गेले आहेत.

आपल्याकडे जोपर्यंत कायद्याने किती मुलं असावीत हे बंधन असत नाही तोवर किती बाळंतपणं असावीत असा कायदा करता येणार नाही. परस्परविरोधी कायदे करताना त्यामागे जस्टीफिकेशन तसेच स्ट्राँग नसेल तर सर्वोच्च न्यायालयात तो कायदा टिकणार नाही. मात्र काही राज्यांनी तिसरे मूल झाले तार नोकरी जाईल असा कायदा आणायचा प्रयत्न चालवला होता जो हाणून पाडला गेला.

तिसया मुलानंतर इन्क्रीमेंट थांबते असा काही नियम असल्याचे ऐकले होते. वाचले नाही. सरकारचा आग्रह आहे, कायदा नाही.

या गोष्टी एखादा वकील सांगू शकेल. मात्र कायदे करताना काय चर्चा झाली हे वकील सांगूच शकेल असे नाही. तो संदर्भ घेऊन चर्चा झाली तर बरें इतकेच. अनेकदा आपले बरेच डाऊट्स तिथे येऊन गेल्याचे दिसते.

सर्व प्रतिसाद इथले तिथले वाचले. सहा महिने रजा हे किमान अपेक्षित आहे कारण बाळ पाळणा घरात ठेवायच्या लेव्हलचे व्हायला व स्त्रीच्या शरीराची झीज भरून यायला तितक्या कालावधिची आवश्यकता आहे. काही आस्थापने तर पाळणाघर, दूध पाजायला तसेच बेबी केअर साठी वेगळी खोली, फ्लेक्सी टाइम घरून काम, मासीक पाळी च्या पहिल्या दिवशी जेव्हा काहींना जास्त त्रास होतो त्या दिवशी पेड रजा अशी सुविधा पण ऑफर करतात. ह्या मागे इन्क्लुसिवि टी, डायवर्सिटी वर्क फोर्स मध्ये असावी अशी काही नवी प्रिन्सीपल्स आहेत.

जुन्या पद्धती( जेव्हा बायका घरी मुले जनत व त्यांची व घराची काळजी घेत) सिस्टिम्स व कायदे हे प्रिडॉमि नंटली पुरुष लेबर व मॅनेजर्स ऑफिसर्स स्टाफ साठी होते व अजूनही आहेत. तेव्हा हॉटेले, कामानिमित्त प्रवास हे सर्व पण रिग्ड फॉर मेल कंझम्प्शन असे होते. मी अनेकदा पोर काखोटीस मारून कामाच्या व्हिजिट्स प्रवास केले आहेत त्यामुळे सर्व अनुभवावर आधारित आहे.

जश्या वर्क प्रोफाइल्स, जॉब डिमांड बदलल्या तसे कामात जॉइन होणार्‍या मुलींचे स्त्रियाम्चे प्रमाण पण वाढले. त्यांच्या सोयी बघायला हव्यात कारण त्या एक महत्वाच्या रिसोर्स आहेत. उगीच लाडाने कामावर ठेवून घेतलेल्या नाहीत. त्याम्चे वर्क एन्वरोन मेंट आरामदायक व टायमिण्ग
वगैरे सोयीचे ठेवले तर त्यांचे आउट पुट वाढते व त्याचा दर्जा सुधारतो असाही विचार असतो त्या मागे.

बाळंत पण व स्तन पान, संगोपनासा ठी रजा घेणे फ्लेक्सिटाइम वापरणे ह्यात महिलांना गिल्टी वाटता कामा नये.

कामवाली संबंधाने बोलायचे तर मी माझ्याकडे ज्या बाई येत असत त्यांना बेबीला बरोबर घेउन या अशी परवानगी दिली होती. ती बेबी घरी कोणाकडे ठेवायची असा प्रश्न होता. ही सिंगल मदर होती. तसेच तेव्हा आम्ही अगदीच तरूण कपल असल्याने बेबीचे रड् णे वगिअरे बोअर व्हायचे पण तिला कधी नाकारले नाही. अ‍ॅड जस्ट झाल्यावर ही बेबी मस्त राहो लागली.

ह्या बाईंचे पुढे ऑपरेशन होउनही एकदा गर्भ राहिला होता घरी ब्लीडींग होत बेड वर पडून होत्या तेव्हा त्याम्ना घेउन अपोलो मध्ये इमर्ज न्सीत
चांगल्या गायनॅकला दाखवले. तिने पुढे काय करावे तो सल्ला दिला. व मला म्हणे ह्यांना सरकारी हॉस्पिटलात पाठवा ह्या लोकांना तेच ठीक.
तेव्हा मला जाम राग आला होता. मला तिला तिथे ट्रीट करयाची पण इच्छा होती.

पुढे ह्यांची पाळी जायचे दिवस आले तेव्हाही खूप त्रास झाला तेव्हाही आवश्यक तितका आराम घ्या व जमेल तसे च काम करा से सांगितले होते.
मग ऑपरेशन झाले व युटॅ रस काढोन टाकला गेला व त्या एकद म फिट झाल्या.

लिहायचे तात्पर्य इट इ ज नॉट चाइल्ड बर्थ ऑर ब्रेस्ट फीडिंग बायका काम करणार, पैसे घेणार रजा घे णार हे सर्व त्यांच्या शरीर धर्माला व सर्व
फर्टिलिटी सायकल ला जमेस धरून त्याप्रमाणे त्याम्चे करीअर सायकल आखले गेले पाहिजे.

मासीक पाळी सुरूवात ते मासिक धर्म, कन्सेप्शन चाइल्ड बर्थ, बाल संगोपन पाळ् णा घर सोय गायनॅक केअर, मेनो पॉज व ब्रेसट व इतर कॅन्सर केअर हे सर्व त्यात येते. धिस इज ५०% ऑफ ह्युमॅनिटी. त्यांच्या गरजा इग्नोअर करून चाल णार नाही. हे सोशल क्लास निरपेक्ष आहे.

मासीक पाळी सुरूवात ते मासिक धर्म, कन्सेप्शन चाइल्ड बर्थ, बाल संगोपन पाळ् णा घर सोय गायनॅक केअर, मेनो पॉज व ब्रेसट व इतर कॅन्सर केअर हे सर्व त्यात येते. धिस इज ५०% ऑफ ह्युमॅनिटी. त्यांच्या गरजा इग्नोअर करून चाल णार नाही. हे सोशल क्लास निरपेक्ष आहे. >>> सही. एकदम योग्य प्रतिसाद.

अनेक ठिकाणी स्वच्छतागृहे अजून उपलब्ध केली जात नाहीत. त्यासाठीही कायदा करावा लागेल (असल्यास माहीत नाही). कायदे स्त्री कामगारांचे संरक्षण करण्यासाठी आहेत.

अमा वेल मांडेड.

मानव, ७०० रु महिन्याच्या पर डे ७ पोळ्या(स्वयंपाक, भाजी नीट करणे वगैरे नव्हे.)
साधारण गणित पाहता ७००/२१० = ३.३३ रु लेबर कॉस्ट पर पोळी, पीठ आपले, गॅस आपला.
यात आम्ही ७ पोळ्या न घेता २ पोळ्या २ भाकर्‍या घेतो. सो ४ आयटम पर डे.
शनीवारी पोळ्याना सुट्टी होते. पर मंथ २ पेड लीव्ह मध्ये २ दिवस सुट्टी होते. म्हणजे साधारण ७००/९६ = १० रु पर पोळी/भाकरी पडते. भाकर्‍या हे थोडे स्पेशलाइझ्ड लेबर असल्याने अ‍ॅव्हरेज कॉस्ट इतर एरियापेक्षा किंचीत जास्त असली तरी बेअरेबल आहे.

यात समानतेचं तत्त्व शोधल्याने गंमत वाटली. समानता नव्हे समता.
पुरूषाने मुलं जन्माला घातली असती तर बायका मोकळ्या राहिल्या असत्या. तर मग पुरूषाला रजा देऊन समान पातळीवर आणणे ही जबाबदारी राहिली असती. इथे स्त्रीवर लादले गेलेले बाळंतपण आहे हा विचार करून तिला रजा आणि त्याबद्दलचे फायदे दिले जात आहेत. याची तुलना मुल जन्माला न घालणा-या स्त्रिया, पुरूष यांच्याशी होऊ शकत नाही. हा मुद्दाच हास्यास्पद आहे.
जसे एलटीए किंवा एलटीसी
ज्याला रजा घेऊन फिरायचे आहे त्याला त्याचे फायदे मिळतात. ज्याला नाही रजा घ्यायची त्याला नाहीत मिळत. तुमची मर्जी आहे. ती सुविधा दिलेली आहे. वापरा नका वापरू.
एखाद्या पुरूषाला मॅटर्निटी लीव्ह हवीच असेल तर त्याने विज्ञानाची मदत घ्यावी. रजाही मिळेल. हाकानाका.

माझ्या घरी मेड आजिबात नाही एवर्तिंग आटोमे टेड नाउ ऑर सेल्फ डन. म्हणजे थोडक्यात मीच घरी भांडी कपडे झाडू पोछा करते. आताची म्हणजे फिफ्टि एज नंत र ची लाइफ स्टाइल ब्याचलर पोरासारखीच आहे. कसलीच जबाबदारी नाही. बायकांचे असे खास आजार अजून तरी नाहीत. डोक्यात कायम कामाचेच विचार व फोकस अति कामावरच. असली जुनी बायकी खोडं एम्प्लॉयर च्या दृ ष्टी कोणातून अगदी प्युअर गोल्ड असतात. इथून नारोळ मिळाला रि टायरमेम्टचा की मी उबर चालवणार. Wink फर्टिलिटी सायकल चालू असलेल्या महिलांनी मुले बेबी व लहान असताना जेव्हा त्यांना आईची खास गरज असते( ही असते ) तेव्हा खरे तर आवश्यक तो ब्रे क घेउन मग मुले फुल टाइम शाळेस गेली.
की कामात परत उडी घ्यावी व जोमाने पुढी ३० -३५ वर्शे काम करावे. युअर गोल्डन पीरीअड लाइज अहेड आणि मोमेंट्स विथ बेबी आर जस्ट प्राइस लेस. रजा पगारी असून्दे नाहीतर बिन पगारी. बाळ लहान असताना फ्रीलान्स कि वा पार्ट टाइम ऑप्शन घ्यावा.

मी स्वतः मुलगी चार पाच महिन्याची असताना तिला घेउन पाच तास डीटीपी ऑपरेटर बरोबर बसून बाजूला तिचे दुपटे बेड पसरून ग्रीटिंग कार्ड्स डिझाइन केलेली आहेत व त्या कन्सेप्ट कार्पोरेट ला विकल्या आहेत.

जुने खोड आयडी लै भारी आहे.

मी जे मागच्या धाग्यावर कम्पनी च्या नजरेतून पहा वगैरे लिहिले होते, (आणि ज्या बद्दल बोलणी खाल्ली Wink ) तेच अमा नि इकडे लिहिले आहे असे मला वाटते
>>>>>>असली जुनी बायकी खोडं एम्प्लॉयर च्या दृ ष्टी कोणातून अगदी प्युअर गोल्ड असतात.....फर्टिलिटी सायकल चालू असलेल्या महिलांनी मुले बेबी व लहान असताना जेव्हा त्यांना आईची खास गरज असते( ही असते )>>>>>>

जुने खोड >>> Lol
असा डिक्लेअर नका करत जाऊ. गरजूंनी ढापलाही असेल एव्हाना

वर ज्या प्रश्नावरून उहापोह चालू आहे त्याचा डाटा आहे का कुणाकडे का नुसतेच भुई धोपटणे चालू आहे?
असंघटीत कामगार मजूर बायकांना बाळंतीण झाले तरी कामावर जावेच लागते आर्थिक माजबुरीमुळे.
मात्र संघटीत आर्थिकदृष्ट्या बऱ्या वर्गातल्या किती बायका maternity leave घेऊन पुढे नोकरी सोडतात? हे प्रमाण इतके जास्त आहे का ज्यामुळे पॉलिसी बदलावी लागेल?

बाळंतपणासाठी सहा महीने भरपगारी रजा रास्त आहे. माझ्या कंपनीत (टाटा समुह) या सहा महिन्यांनंतर तीन महिने अजून भरपगारी रजा मिळते... जर डॉक्टरने नंतर गरज आहे म्हणून लिहून दिले तर..

यावरून एक आठवलं..उसगावात आम्हाला एच आरने सांगितले होते कि मुलाखात घेताना उमेदवार पोटशी असेल आणि ती कामासाठी योग्य असेल त्या कारणाने तुम्ही तिला नाकारु शकत नाही.. नंतर एकाने विचारले जर नंतर तिच्या बाळंतप्णीच्या सुट्टीमुळे काम नंतर खोळंबणार असेल तर.. त्याची तजवीज मॅनेजरने केले पाहिजे.. तिचा तेव्हा बॅकअप शोधून...

संघटीत आर्थिकदृष्ट्या बऱ्या वर्गातल्या किती बायका maternity leave घेऊन पुढे नोकरी सोडतात? हे प्रमाण इतके जास्त आहे का ज्यामुळे पॉलिसी बदलावी लागेल? +१
थोडक्यात किमान २०-२२ वर्षे शिक्षण घेऊन इंटलेकच्युअल काम करणार्‍या, प्रसंगी ऑफीसमध्ये उशीरापर्यंत थांबणार्‍या, चांगलं काम करुन डिपेंडंसी बनवणार्‍या बायकांपुढे पर्याय ठेवायचा की पर्सनल लाईफ की करीअ‍र. स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या बाईला प्रेग्नंट झाल्याबद्दल सहा महिने पगार न मिळण्याची शिक्षा द्यायची. फक्त तीच मूल कॅरी शकते म्हणून. सहा महिन्याचा फु़कट मिळणारा पगार दिसतो पण त्यामागे वर्षानुवर्षांची मेहनत असते.
मॅ लिव्ह वरुन आल्यानंतर सगळं काही रेडीमेड मिळत नसतं. बरेचदा त्या बाईची जागा आधीच दुसर्‍याने भरलेली असते. तिला नवं / वेगळं काम मिळण्याची शक्यता जास्त असते. त्यात तिला बदललेल्या शरीरासकट, आयुष्यातल्या चेंजेस सकट चांगलं परफॉर्म करायचं असतं. एक वर्षे प्रेग्नसी, पुढचं वर्ष मॅ लीव आणि जॉयनींग, पुढचं १ वर्षे पुन्हा स्वतःला प्रूव करणे असे साधारण २-३ वर्षे नीट इंक्रीमेंट, प्रमोशन मिळत नसतं हे सुध्दा लक्षात घ्यायला पाहि़जे. तिच्या लेव्हलच्या सेम काम करणार्‍या पुरुषाच्या केवळ प्रेग्नंट आहे म्हणून ती आधीच मागे पडलेली असते.
आपल्याला स्त्रीयांना नोकरी करायला/ स्वतःच्या पायावर उभं करायला एन्करेज करायचं आहे. ज्यांना (कामवल्या बाया, रोजंदारीची कामे करणार्‍या, शेती, बिझनेस करणार्‍या बाया) योग्य फॅसीलीटीज नाहीत त्यांना कशा फॅसिलीटीज मिळतील हे बघायचं आहे. स्त्री असल्याची शिक्षा देउन आधीच झगडून मिळालेल्या फॅसिलीटीज काढायच्या नाहीयेत.
भरपूर शिकलेल्या , मोठ्या पोस्टवर असलेल्या बायकांनासुध्दा 'करीअर करण्याची काय गरज? नवर्‍याला, लोनला थोडाफार सपोर्ट होईल एवढे पैसे मिळवलं की झालं. मग नोकरी सोडून आयुष्य एंजॉय कर की' असं आजही ऐकवणार्‍यांच्या हातात कोलीत द्यायचं नाहीये. तिने आजपर्यंत केलेल्या कष्टांना किंमत आहे, केवळ स्त्री आहे, मूल कॅरी करावे लागते आहे म्हणून ती मागे पडणार नाही याची ( थोडीफार) शाश्वती यात आहे जी खूप आवश्यक आहे.

आणि ज्या बायका याचा गैरफायदा घेतात त्यांना रॉटन केस म्हणून सोडले पाहिजे. त्यावरुन सगळ्या (संघटीत क्षेत्रातल्या) बायकांना जज करु नये.

अवांतर -
बाय डीफॉल्ट आपण सोडून बाकी सगळे दिलेल्या सुविधांचा गैरफायदा घेतात असे लोकांना का वाटते? आरक्षण न मिळणारे लोक आरक्षण वाले गरज नसताना फायदा घेतात असे समजून चालतात तसेच हेही.

आरक्षण न मिळणारे लोक आरक्षण वाले गरज नसताना फायदा घेतात असे समजून चालतात तसेच हेही. >> अनावश्यक शेरेबाजी

@भरत, हे लिहायचे विसरले. वेगळ्या धाग्यासाठी तुम्ही बरेच कष्ट घेतले आहेत. धन्यवाद.
>>
हे लिहिताना सगळा त्या चर्चेचा मला पटेल्/रुचेल असा गोषवारा आहे, असा आक्षेप येण्याची शक्यता आहे.
>>
असं काही वाटलं नाही. तुम्ही सगळ्या बाजूंचं म्हणणे लिहीलेले दिसले.

Pages