बाळंतपणासाठी पगारी रजेबद्दल चर्चा

Submitted by भरत. on 9 August, 2018 - 01:30

अ‍ॅडमिन्/वेबमास्तर, खरं तर मला हा धागा चालू घडामोडी या ग्रुपात उघडायचा आहे. पण त्या ग्रुपमध्ये लेखनाचा धागा उघडायची सोय दिसली नाही, म्हणून ललितलेखनात लिहितोय.
current affairs.png

सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाबद्दलच्या धाग्यावरची चर्चा पुढे बाळंतपणासाठी पगारी रजेकडे वळली.
तिथले मुद्दे नेटकेपणाने मांडून नव्याने चर्चा करण्यासाठी हा धागा.

त्या धाग्यावरचे या विषयासंबंधीचे प्रतिसाद ,मुद्द्यांनुसार सुसंबद्ध रीतीने आणि जिथे मला आणखी लिहावंसं वाटेल, तिथे माझं मत, अशी मांडणी करायचा प्रयत्न आहे. आलेल्या आक्षेपांंना उत्तरही देईन.
हे लिहिताना सगळा त्या चर्चेचा मला पटेल्/रुचेल असा गोषवारा आहे, असा आक्षेप येण्याची शक्यता आहे. पण तसा हेतू आणि प्रयत्न नाही

***************************************************************
मुद्दा १ : बाळंतपणासाठी भरपगारी रजा असावी का?
सई केसकर - . मूल झाल्यावर काम करायचे की नाही करायचे यावर काम करणाऱ्या आणि न करणाऱ्या महिलांची आपापसात जुंपणे. किंवा एका ग्रुप मधील काहींनी दुसऱ्यांना जज करणे.

अ‍ॅमी - याच्याशी पूर्ण असहमत. भरपगारी बाळांतपणाची 6 महिने रजा घेऊन नंतर राजीनामा टाकणाऱ्या बायका 'केवळ वैयक्तिक' निर्णय घेत नसून त्या सगळ्याच बायकांना, त्यांना नोकरिवर घेणाऱ्या/ठेवणारयाना आणि एकदरच समाजाला/त्याच्या स्त्रियांबद्दलच्या दृष्टिकोनाला affect करतायत.

आणि स्त्रियांनी एक्मेकांसोबत भगिनीभावच बाळगला पाहिजे असे काही compulsion आहे का? भांडुदेत कि छान कचाकचा Lol

सई केसकर - टर्निटी लिव्ह एलिजिबिलिटी ही लिव्ह घेण्याच्या आधी केलेल्या कामावर आधारित असते हे एक कटू सत्य आहे.
आपण कुणालाच आपल्यासाठी काम करायचे कंपल्शन करू शकत नाही.

बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये?

अ‍ॅमी - सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

> बाकी भांडायचेच असेल तर बायकांनी एक होऊन पुरुषांशी का भांडू नये? > मला माफ करा मी तुमच्या गटात येऊ इच्छित नाही _/\_
भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे.

===
> प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी >
हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही.

mi_anu : एमी,
आमच्या मावशी अलरेडी 45 वर्षाच्या असलयाने असा सिनारीओ आला नाहीये.सध्या वर्षाला 24 पेड हॉलिडे, दिवाळीला पगाराला पगार बोनस, वर्षातून 2 वेळा गावी जायला पेड 5 दिवस सुट्टी इतकं देतो.
मूळ मुद्दा हा की बाळंतपण, त्या साठीची सुट्टी ही लक्झरी मानली जाऊ नये.
6 महिने पेड वाला मुद्दा आता आलाय.काही महिन्यांपूर्वी. त्यापूर्वी 3 महिने पेड, त्यांनंतर लिव्ह बॅलन्स उरला असेल तो आणि त्यांनंतर अनपेड असं सर्व कंपन्या मध्ये होतं.

राजसी - ऍमी, बिनतोड मुद्दा केला की पर्सनल व्हायचं का! बाकी माझा तरी अजून प्रेग्नेंट मोलकरणीशी संबंध आलेला नाही. एक मोलकरीण दिवस गेल्यावर गावी निघून गेली, विचारलं असतं तर दिली पण असती. एकीला मुलीच्या लग्नासाठी(मागितली तितकी) पंधरा-वीस दिवसांची भरपगारी रजा दिली होती , दोन-तीन वर्षे होती. तोंड उघडून मागितले की सगळं मिळत!

अजून तरी कोणी कोणाला भारतात मुलं जन्माला घालू नका सांगितले नाहीये!

अमितव - Amy, तुमची मते भयानक आणि टोकाची आहेत. जराही सहमत नाही.
पुढारलेल्या देशात (अमेरिकेचा अपवाद) स्त्री आणि पुरुष दोघांना पेरेंटल लिव्ह असते. कॅनडात तेव्हा जो पगार मिळतो तो इआय ( एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स) मधून मिळतो. तुम्ही काम करत असताना प्रत्येकाच्या पगारातून इ आय कापला जातो, आणि तुमची नोकरी गेली, आजारपण आलं, प्रेग्नंट झालात इ.इ. तर एका वर्षांपर्यंत ( प्रेग्नन्सीला हल्ली 2 केलंय मला वाटतं) तुम्हाला पगाराचा काही भाग इआय (पर्यायानं सरकार) देतं.
नंतर कामावर घ्यायचं बंधन असतं. व्यक्तीला काम सोडण्याचा हक्क असतो. इ आय ही एक उत्तम सोशल सिक्युरिटी आहे.

अ‍ॅमी - अमितव,
• तुम्ही ज्या पुढारलेल्या देशांबद्दल बोलताय तिथे जन्मदर किती आहे?
• इआय सरकार देतंय कि खाजगी कम्पन्या?
• तो सर्व नागरीकांना मिळतोय कि उच्च मध्यम वर्गातल्या पांढरपेशा नोकरदारांनाच मिळतोय?

अमितव - सर्व इ आय भरणाऱ्या व्यक्तीना मिळतो. सुखवस्तू बाई घरी बसली आणि नवरा काम करत असला तर नवऱ्याला मिळते. इंडिपेंडन्ट कॉन्ट्रॅक्टर असाल आणि खुशीने इ आय भरत असाल तरी मिळतो.
प्रत्येक प्रश्न सामाजिक उतरंडीतून बघण्याचे सोडा. (अ‍ॅमी - हे ठीक आहे. तिथे व्यक्ती निवड करतेय आपण एखाद्या 'सरकारी' स्कीमचा भाग बनायचे कि नाही. हे भारतातल्या Epf सारखे वाटते आहे. भारतातील भरपगारी maternity leave म्हणजे 'खाजगी कम्पनीच्या जीवावर सरकार उदार' प्रकार आहे.)

अमितव : तुम्ही जन्मदर वाढलाय म्हणून गर्भारपण कमी करायला रजा पगार काही नको म्हणत होता. मग ते फक्त पांढरपेशा लोकांना मिळतं तर मोलकरणीना का नाही वर आलात आता सरकारी धोरणामुळे सगळा भार खाजगी आस्थापनावर येतो म्हणून कितीपण रजा घ्या पण पगार नको पण नंतर नोकरी देण्याचं बंधन ठेवा असं म्हणताय.

अ‍ॅमी - अमितव,
परत एकदा मागे जाऊन प्रतिसाद वाचून बघा.

> सई, अनु आणि राजसी, आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं. > आपल्या एम्पलोयरकडून भ.बा.र. मिळावी म्हणणारे स्वतः एम्पलोयर झाल्यावर काय करतात विचारले आहे.
===
> भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

अमितव : म्हणूनच विचारतोय की जन्मदर 2 होत नाही तोपर्यंत वरील सर्वांनी इन्शुरन्स ही देऊ नये. सरकारी मोफत उपचार करणारी इस्पितळे बंद करून टाकावी. पुरेसे गरीब लोक मेले आणि इफेकटिव्ह जन्मदर 2 वर आला की वाचवा कोणाला वाचवायचं ते. तोपर्यंत पैसे असतील तर जा डॉ कडे नाहीतर मरा. हे वाचायला कसं वाटतंय ??

अ‍ॅमी - व्यक्ती स्वतः प्रिमियम भरून विमा घेते ना? खाजगी कंपनीने भ.बा.र. का द्यावी सांगू शकाल का?
आणि सरकारने हि सक्ती केल्याने कम्पनी स्त्रियांना नोकरीवरच घेत नाही याची सामाजिक किंमत किती आहे?

त्याऐवजी सरकाराने इआयसारखी योजना आणावी किंवा 'सर्व' स्त्रियांना २च मुलांसाठी एक ठराविक रक्कम द्यावी. त्यासाठी करदात्यांना वेगळा सेस लावावा अशा मागण्या का होत नाहीत?

अमितव - हे नियम सरकारी आस्थापनानाही लागू असतील सो फक्त खाजगी कंपनी हे पहिलं चुकीचं आहे. [अ‍ॅमी - सरकारने द्यावं त्याच्या नोकरांना काय द्यायचं ते. खाजगी कम्पनीला का सक्ती करतायत?आणि त्यामुळे होणाऱ्या ऋण परिणामांच काय? ]
दुसरं म्हणजे तुम्ही जितका इआय भरता तितकाच इआय तुमच्या कंपनीला भरणे ही बंधनकारक असते. [अ‍ॅमी - Epf सारखेच आहे हे. कम्पनी इआय भरत असेल तर तो तुमच्या Ctc त हिशेबात धरलेला असणार.][(mandard : Insurance is not a part of CTC, at least in the company's I worked in India.]
शेवटचं : कोणी आणि कशा स्किम मधून हा खर्च उचलावा हा माझा मुद्दा नाहीये. [अ‍ॅमी - माझा हाच मुद्दा आहे]
ती सामाजिक सुरक्षा देणारी सेवा असावी. हे तुम्हाला मान्य असेल तर कोणी आणि कशी स्किम चालवावी यावर कॉम्प्रोमाईज होउ शकते. [सरकारी && 'सर्व'समावेशक असेल तरच मान्य आहे]

अ‍ॅमी - तुम्ही जो अर्थ काढला आहे तो चुकीचा आहे. मी वरती लिहिले आहे .
<भारतासारख्या देशात जिथे मुलं जन्माला घालू नका म्हणून सांगावे लागते तिथे ३ महिने काय आठवडयाचीदेखील भरपगारी रजा देऊ नये असे माझे मत आहे. >
याचा अर्थ "भारतातल्या लोकाना मूल जन्माला घाला म्हणून सांगावे लागत नाही घालू नका म्हणून सांगावे लागते. ती मुलं जन्माला घालतच राहणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत जन्मदर २- होत नाही तोपर्यंत मुलं जन्माला घालणे हा काही सरकारी, सामाजिक, खाजगी कम्पनी मालकांचा प्रश्न होउ शकत नाही. यापैकी कोणीही मातेला पैसे द्यायची गरज नाही." असा होतो.

नानबा - अ‍ॅमी च्या पोस्ट्स काहीही वाटल्या.
चाईल्डबर्थ हा माझा ह क्क आहे. एज्युकेशन हा जसा आज सगळ्यान्चा हक्क समजला जातो, त्याचा भार कसा सगळ्या समाजावर पडतो, त्यापे क्षाही बेसिक गोष्ट आहे ही.
तुमची आई काम करायची का माहित नाही, पण करत असेल तर तेव्हाच रजाच न देण्याचा उपाय केला असता तर तुम्ही आज इथे असला असतात का? (वाईट अर्थाने लिहित नाहीये, उदाहरण समजावे म्हणून लि हिती ये) समाजात ५०% अ सलेल्या वर्क्फोर्स कर्ता असे धो रण!

राजसी -मोलकरणीला ML दिली असती लिहिलंय ते वाचलं नाहीत का तुम्ही? का तुम्ही देत नाही / द्यायची नाही म्हणून इतरांचं पण तसंच असेल असं गृहीत धरलं आहे. Organised sector एम्प्लॉयमेंट मध्ये कोणत्याही रजेच्या फायद्यांना eligible होण्यासाठी probation पूर्ण करावा लागतो. मोलकरीण एवढी टिकली तर आपोआपच सगळं manage होतं!
बाकी, तुमचं म्हणणं अस दिसतंय की बायका भरपगारी ML घेतात त्यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे त्यांना भरपगारी रजा देऊ नये. इतकीच जर मुलं जन्माला घालायची बाईला हौस असेल तर Unpaid Leave घ्या आणि मुलं जन्माला घाला. मुळात बायकांना हे सगळ्या गोष्टी मिळवायला किती संघर्ष करावा लागलाय हे तुम्ही सोयीस्कर रित्या विसरताय. बायकांना बालंतपणाच्या सुट्ट्या द्यायच्या नसतील तर कोणालाच कसलीच सुट्टी देऊ नका. अवघड आहे परत स्वातंत्र्यपूर्व काळाकडे सामाजिक वाटचाल! काही माझ्या समजण्यात चूक झाली असेल तर नक्की सांगा.
बेसिकली, some women can have it all हे बऱ्याच जणांना खुपयंत का? सगळ्याच बायकांना have it all मिळावं अशी इच्छा असेल तर त्यात काही गैर नाही . त्याची सुरूवात घरापासून व्हायला हवी. वडील, भाऊ, नवरा ह्या मंडळींना आधी बदलावं लागेल!

भरत - कल्याणकारी राज्य आणि नोकरी देणारी कंपनी एकच का?

सशल - नोकरी देणारी कंपनी कल्याणकारी राज्यात आहे की कुठे? भारत कल्याणकारी नाही का? शिकून सवरून भारताच्या जीडीपी ला हातभार लावणार्‍या महिलांनां (मुलं काय गम्मत म्हणून एकटी बाई जन्माला घालत नाही) मुलं जन्माला घालण्याचा अधिकार बजावण्यासाठी नोकरीवर पाणी सोडण्याची गरज भासावी का कारण भारतात लोकसंख्या फार जास्त आहे? मुलं जन्माला घालणं ही चैन आहे का? तुम्हाला उद्या सर्दी ताप खोकला झाला तर तुम्ही बिनपगारी रजा घेता का?

अवरली वेजेस आणि सॅलरीड एम्प्लॉयमेन्ट ह्यातला फरक काय आहे? एम्प्लॉयर ला सॅलरीड एम्प्लॉइज् ठेवण्याची गरज का भासावी? तासाच्या हिशोबावर काम करून त्याची मोलमजूरी देणं बेस्ट

===
अ‍ॅमी - सिम्बानी " प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे," असे सुचवले आहे त्यावर मी "हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही." म्हणले आहे.
-

मानव पृथ्वीकर - (लोक)आपापल्या मोलकरणीना भरपगारी बाळंतपणाची रजा वगैरे वगैरे देतात वाटतं.

झालेले विषयांतर लक्षात घेता हा ही योग्य व महत्वाचा मुद्दा आहे.

राजसी - बरं! बायकांची ML इतकी इतरांना खुपत असेल आणि कंपनीला आतबट्ट्याचा व्यवहार वाटत असेल म्हणून ML वर गदा आली तर career women इतर पर्याय धुंडाळतीलच जस की surrogate, adoption पण त्या option ला पण कुठलीतरी बाईच लागेल अजून प्रयोगशाळेत नऊ महिने ठेऊन घरी बाळ आणायची technology आलेली नाही.
Adoption /Surrogacy दोन्ही केसेसमध्ये नवमातांना ML मिळालेली पाहिलेली आहे. Adoption Govt तर्फे केलं तर surrogacy पेक्षा खूपच स्वस्त पडत. Surrogate Mother च्या ML च काय झालं किंवा ज्या बाईचं मूल दत्तक गेलं तिच्या ML च काय ते मला कळायला मार्ग नव्हता. कोणत्याही केसमध्ये स्वतः मूल जन्माला घालणे स्वस्त आहे.

मैत्रेयी - बाया प्रेग्नन्ट झाल्यावर मॅटर्निटी लीव्ह नाकारून मुले जन्माला घालण्यास डिस्करेज करणे हे फार लांबचा घास वाटतोय. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअ‍ॅक्टिव्ह होईल का? [अ‍ॅमी - वाह वाह मैत्रेयी. फारच स्पॉट ऑन!! सध्या फक्त maternity leave मिळणाऱ्या बायकाच मुलं जन्माला घालतायत आणि ती बंद झाली कि तो स्त्री नसबंदीचा प्रोग्रामच ठरणार आहे. त्यापेक्षा सर्व पुरुषांची सक्तीने नसबंदी करणे जास्त प्रोअॅक्टिव्ह होईल. बरोबर आहे. सुचलंच नाही मला.]

सशल - म्हणजे जी १०-१५% जनता ऑर्गनाइज्ड वर्क फोर्स मध्ये आहे त्यांनां मुलं जन्माला घालण्यापासून परावृत्त करावं आणि बाकीची मेजॉरिटी जनता (अनऑर्गनाइज्ड् लेबर) ह्यांनीं मात्र हवी तितकी मुलं जन्माला घालावी म्हणजे भारतातला पॉप्युलेशन एक्स्प्लोजन चा प्रॉब्लेम सुटेल असं म्हणता का तुम्ही? [अ‍ॅमी - Maternity leave मिळतेय म्हणून १०-१५% organised work force मधल्या बायका (त्या किती % आहेत एकूण लोकसंख्येच्या?) मुलं जन्माला घालतायत असं म्हणता का तुम्ही?]

सशल - तेच तर मी म्हणते. की ह्या बायकांनां मॅटर्निटी लीव्ह नाकारून भारतातल्या पॉप्युलेशन ला आळा घालण्याचा प्रस्ताव आहे ना तुमचा? त्याबद्दल उत्सुकता आहे.
बाकी मग ह्या बायकांनीं किती मुलं जन्माला घालावीत, प्रत्येक बाळंतपणात किती मॅटर्निटी लीव्ह घ्यावी, ती भर पगारी असावी की कशी आणि सगळ्यात मुख्य मुद्दा म्हणजे त्यांनीं आणि उरलेल्या सर्व आयांनीं आपापल्या बाळांनां दुध कसं आणि कुठे पाजावं त्याबद्दल नंतर बोलू; एकदा पॉप्युलेशन प्रश्न निकालात काढला की चर्चा करायला मुद्दे हवेतच ना!

अमितव : (बाळंतपणाची रजा) गरजेची नाही असं म्हटलं म्हणून तर इतका पोस्ट प्रपंच.
भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?

स्वाती_आंबोळे - बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!

अ‍ॅमी - हे ठीक आहे. बिनपगारी रजा असेल तर ती कितीही घेऊ द्यायला हरकत नाही. >
असे लिहिलेले असतानादेखील " भारताचा जन्मदर बघता पेन्शन बंद करावे, रुग्णालयांनी 50 55 च्या वरच्या व्यक्तीना काहीही सेवा देऊ नये. त्यांनी फक्त मरावे. हे कसं वाटतंय?", " बरोबर, आणि चाळिशीच्या वरची व्यक्ती काम करताना दिसली तर तिलाही मारावं. इतकं तरुण रक्त शिकून वर्कफोर्समध्ये दरसाल दाखल होत असताना करायची काय जुनी खोडं?!" असल्या कमेंट येण्यामागे काय कारण असेल बरे??

फारेण्ड -मला तर माझ्या लहानपणीपासून आम्ही कोणत्याही मोलकरणीचा कसल्याही खाड्या बद्दल किंवा रजे बद्दल पगार काटल्याचे आठवत नाही, तसेच कोणत्याही मोलकरणीला आपणहून कधी काढल्याचे आठवत नाही - बहुतांश इतर कामांमुळे किंवा ठिकाण बदलल्याने सोडून जातात. या कामांना लोक मिळण्याचा प्रॉब्लेम मोठा असल्याने सध्या कोणीही ही लक्झरी अ‍ॅफोर्ड करू शकत असेल असे वाटत नाही Happy

च्या - किमान ६ महिन्याची मॅटर्निटी लिव्ह कंपल्सरी असावी पण ती भरपगारी असावी कि नाही हे ठरवण्याचा अधिकार कंपनीला असावेत किंवा बालसंगोपन हे LTD (long term disability) सारख्या सदरात आणून कंपन्यांना महिना ठराविक पगार देण्यास भाग पाडता येईल.

स्वाती_आंबोळे - >>> तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा,

भरत, हे 'फॅमिली लीव्ह' अशा सदरात म्हणत असाल, तर एकवेळ मान्य. म्हणजे मग त्यात कोणत्याही कारणाने शारीरिक आणि/अथवा मानसिकदृष्ट्या आजारी वा परावलंबी असलेल्या/झालेल्या व्यक्तींसाठी किंवा तिची काळजी वाहणार्‍यांसाठी ठराविक मुदतीची भरपगारी रजा. ('एकवेळ' म्हटलं कारण मग एकदा मॅटर्निटी लीव्ह घेतलेल्या स्त्रीवर कोणाची काळजी घ्यायची वेळ आली तर तेव्हा तिने काय करायचं?)

पण मौजमजा करण्यासाठी घेण्यात येणारी 'व्हेकेशन' आणि ही रजा यात तुलना होऊ शकत नाही.

मॅटर्निटी हा चॉइस असला तरीही त्याचे शारीरिक / मानसिक परिणाम असतात, रिकव्हरी ही प्रोसेस असते - यात दुमत असेल असं वाटलं नव्हतं. असो.

भारतात लोकसंख्या जास्त आहे म्हणून बायकांना पीनलाइज करा, त्यांना रिकव्हरीला वेळ देऊ नका हे काय लॉजिक?

च्रप्स - काही प्रतिसाद बायकांचे खरच आहेत का प्रश्न पडतोय. रिकव्हरी काय आहे, डिलिव्हरी मधले त्रास, सी सेक्शन वाल्यांचे वेगळे त्रास, नॉर्मल पण जास्त टियर वाल्यांचे वेगळे त्रास, 3rd डिग्री, 4th डिग्री , incontinance प्रॉब्लेम्स... हे किमान बायकांना माहीत असायला हवे.
9 महिने शरीरातील बदल, झीज भरून काढायला 3 मंथ असायलाच हवेत.
आणि मोस्ट important हा वेळ newborn शी bonding साठी पण महत्वाचा आहे

अमितव - मी पाहिलेल्या देशांत बाळंतपण, दीर्घ आजार, अपघात, काम गेल्याने (राजिखुषीने सोडल्याने नाही) नविन काम मिळेपर्यंतचा काळ हे सगळं एकाच तागडीत तोलुन त्यावर सुट्टी आणि पगाराचा काही भाग (१००% अजिबात नाही, अप टू ५०-५५% ) मिळतो. पण तुम्ही कामावर आहात हे धरलं जातं आणि दीर्घ सेवेमुळे जे लाभ मिळतात की वेतनवाढ इ. त्याला तुम्ही पात्र असता.
व्हेकेशन डेज मध्ये बाळंतपण उरका हे मला क्रुर वाटलं.
च्रप्स +१ हे त्रास स्पेल आउट करुनही हे त्रास निम्नस्तरालाही होतात हे उत्तर अड्ड्यावर मला मिळालं. असो.

मैत्रेयी - इथे लोकसंख्या नियंत्रणाचा उपाय म्हणुन मॅटर्निटी लीव्ह बंद करणे हा मुद्दा चर्चेला घेतला गेला. नंतर त्यातला फोलपणा दाखवून दिल्यानंतर लोकसंख्या नियंत्रण बाजूला पडले आणि कंपन्यांच्या आर्थिक हिताचा प्रश्न आला. आता काय तर इतरांना मिळणारी मॅटर्निटी लीव ज्यांना बाय चॉइस मुले नकोयत त्यांना न मिळण्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय पुढे आला! नक्की प्रॉब्लेम काय आहे? यालाच कोल्ड लॉजिक म्हणतात का?

m_Anu - खरं सांगायचं तर माझे डोळे इथल्या चर्चा वाचून बरेच उघडले.
चित्र बदललं आहे वगैरे असं काहीतरी वाटत होतं ते भास दूर झाले.Anu -

अमितव - आता निम्नवर्गाला मिळत नाही, पगारी लोकांच्या घरी काम करणार्‍या स्त्रीयांना मिळत नाही असा मुद्दा झालाय. त्यांना मिळत नाही, तर त्यांना मिळायला काय करता येईल ही चर्चा व्हायला हवी का ज्यांना मिळत्येय ती कशी चुकीची आहे/ गरजेची नाही ही?

मानव पृथ्वीकर -हा मुद्दा योग्यच आहे. अर्थात त्यांना कशी मिळेल यावर चर्चा व्हायला हवी.

फारेंड - टोटली Happy हे सगळे प्रॉब्लेम्स म्हणजे विशिष्ठ वर्गाचे चोचले असून त्यात काही दम नाही, हे लॉजिक लावायचे असेल तर दुष्काळग्रस्त विस्थापित लोक, वीटभट्टी ते वीटभट्टी कुटुंब फिरवत संसार हाकणार्‍या बायका यांच्यापुढे शहरातील मोलकरणीही सुखवस्तू वाटतील. आदिवासी वगैरेंना तर नोकर्‍याच नसतात, मग कसली मॅटर्निटी लीव्ह - तेथून सुरूवात करावी काय?-

स्वाती२ - मॅटर्निटी लिव किंवा पॅरेंटल लिव जी आहे तीच्या कडे बघताना पुढील पिढीत केलेली गुंतवणूक म्हणून बघावे. यातुन अनेक गोष्टी खरे तर साध्य होतात. जन्म देणार्‍या स्त्रीचे शारीरीक आणि मानसिक आरोग्य, अर्भकाचे आरोग्य आणि निकोप वाढ ज्यात सुरवातेचे काही महिने हे खूप महत्वाचे असतात, मुल दत्तक घेतले असेल तर अजून वेगळे प्रश्न ही उद्भवू शकतात. त्याशिवाय मूल आणि पालक यामधील संबंध दृढ होणे, वाढत्या जबाबदारीतून येणारा ताणतणाव कमी होणे याचा दीर्घकालीन परीणाम बघता सशक्त समाज म्हणून हिताचेच आहे. अपत्य जन्मानंतर योग्य आधार खरे तर सर्वच थरातील पालकांना मिळायला हवा. तसा मिळत नाही ही खेदाची गोष्ट.

*********************************************************************************************************************
मुद्दा २ - महिला बाळंतपणावर गेल्यावर बाळंतपणानंतर कामावर रुजू झाल्यावर ऑफिसला आणि त्या महिलांना सामोरे येणारे प्रश्न

mi_anu : मला मान्य आहे, ६ महिने भर पगारी रजा घेऊन मग रिझाईन करण्याचा बायकांना मॉरल हक्क नाही.
पण बाई प्रेग आहे हे कळल्याक्षणी ती ३-४ महिने व्यवस्थित असली तरी तिच्याबद्दल चे सर्व महत्वाचे करीयर डीसीजन लांबणीवर टाकणे/दुसर्‍याला देणे, इन्क्रीमेंट प्रो रेटा देणे(हे इन्क्रीमेंट तिने प्रेग नसताना १०-११ तास बसून केलेल्या मागच्या वर्षीच्या कामाबद्दल असणार असतं.), अगदी व्यवस्थित प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन नसलेल्या स्त्री ला पण मॅ लीव्ह वर जायला आठवा चालू झाल्यापासून दबाव आणणे,लीव्ह वरुन परत आल्यावर इतर १०० लोकांनी नाकरलेली टिम आणि वर्क प्रोफाईल देणे, ऑनसाईट ला तिने हो सांगितले असले, घरचा सपोर्ट असला तरी परस्पर वर 'ती नाही येणार म्हणाली, जमणार नाही' सांगणे या गेमा कंपन्या टाकतच नाहीत असं नाही. (काही सन्माननीय अपवाद असतील.)

आमच्या स्त्री मैत्रिणी म्हणतात की बायकांना मुलं जन्माला घालावी लागतात,त्यासाठी आपल्याला त्यांना वेळेची/वफ्रॉहो ची सूट द्यावी लागते ही या लोकांना बायकांवर आपण करत असलेली मोठी मेहरबानी वाटते.

सई केसकर - नुसती प्रेग्नन्ट नाही. जर "प्रेग्नन्ट होणार" अशी शंका असली तरी. काही फर्टिलिटी ट्रीटमेंट घेणाऱ्या बायकांच्या अशा कथा ऐकल्या आहेत. एक तर मूल होईल की नाही याची खात्री नाही आणि मूल होईल म्हणून ऑफिसमधून चांगल्या संधी हातातून निसटाना पाहायच्या.
बिगर पिक्चर बघता बायकांना बेनिफिट ऑफ डाउट देण्याकडे माझा कल आहे. कारण आधी हायरिंगच कमी असतं. त्यात ही सगळी स्थित्यंतरे (आणि त्यांच्यावर असलेला कल्चरल दबाव) पाहता ज्यांना ६ महिन्यांची रजा घेऊन पुन्हा छान सुरुवात करायची आहे अशा स्त्रियांसाठी काही रिझाईन करणाऱ्या असल्या तरी अस व्हर्सस देम अशी स्त्रियांमध्येच फूट पडू नये.

सिम्बा - प्रेग्नन्सी लिव्ह नंतर रुजू झाल्यावर ठराविक काळ आम्ही नोकरी सोडणार नाही असा क्लोज घालून हवी तितकी प्रेग्नन्सी लिव्ह घेता आली पाहिजे,
( ३ महिने लिव्ह घेतलीत तर काही bond पीरीअड नाही, ६ महिने घेतलीत तर लिव्ह नंतर कमीतकमी ४ महिने काम करावे लागेल, वर्षभर घेतलीत तर ८ महिने लागेल etc _) असे काही तरी

mi_anu : हो असे बरे वाटते.
एच आर आणि बाई या दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत गेमा टाकत बसण्यापेक्षा क्लियर अ‍ॅग्रीमेंट बरे.

राजसी - Maternity leave ला काहीही clause असू नये. सहा महिने maternity leave मग साठलेली PL, मग without pay leave असं सगळं करुन स्त्रीने राजीनामा दिला तरी. ह्या काळात स्त्री प्रचंड मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतरातून जात असते. जितकी मदत मिळेल तेवढी असू दे. जी स्त्री rejoin करते तिला anyway मोठा ब्रेक झाल्यामुळे करियर बॅकलॉग आलेला असतोच. जी सोडून जाते तिला निदान पूर्ण काळावधी मिळते नक्की तिला काय हवंय आणि करायचंय ते ठरवण्याचा.

सिम्बा - राजसी तुमचे म्हणणे एका अर्थी बरोबर आहे,
पण उलटे बघा,
long ब्रेक नंतर परत येणाऱ्या स्त्री ला जॉब वर ठेऊन घेऊ असा एक अश्युअर्न्स मिळतोय.

तुम्ही एखाद्या कम्पनीच्या मालक, किंवा प्रोजेक्ट सांभाळनार्या manager आहात अशी कल्पना करून पहा.
तुमच्या टीम मेम्बर च्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्थित्यंतराबरोबर तुमचे किती देणेघेणे असेल?
आणि त्या टीम मेम्बर च्या आयुष्यात अशी उलथापालथ घडली आहे म्हणून क्लायंट ने तुमचा सब standard परफोर्मंनस का कबूल करावा?

जी काही पोलिसी असेल ती स्त्रियांना योग्य तितके झुकते माप देऊन कंपनी ला तोटा होणार नाही अशी असावी.

mi_anu : सब स्टॅंडर्ड?
मला वाटते अगदी नवी टेक्नॉलॉजी रात्री जास्त वेळ थांबून रॅम्प अप करायचे असे काम दिले नाही, आधी करत होती तेच काम दिले तर परफॉर्मन्स सब स्टॅंडर्ड असायचे काही कारण नसावे.तसा असला तर तो लिव्ह आधी पण असेल.
'कमी टाईम कमिटमेंट' हा एक फरकाचा मुद्दा सोडल्यास मूल होण्याआधीचा आणि नंतर चा परफॉर्मन्स यात फरक पडतो असे वाटत नाही.
कमी टाईम कमिटमेंट ला पॅकेज मध्ये काही कमी करून चालवायला हरकत नसावी(आमच्या इथे एकीला हाफ पे आणि 6 तास वर्किंग विथ लंच असे दिले होते)

राजसी - एखादया बुव्याला काही अनपेक्षित तब्बेतीच्या कारणांमुळे वर्ष-सहा महिने रजेवर जावे लागले तर लगेच त्याला काढून टाकायच्या गप्पा करतात का? सगळ्याच बायका बाळंत होतात म्हणून काही महत्त्वाचं नाही असं का! आणि आधी खर्ची घातलेल्या वर्षांवरच ML मिळते.
बाकी, अनुला अनुमोदन.

च्रप्स : बाळंत बाईला कुठल्या देशात कामावरून काढतात? सगळीकडे law आहेत त्यांना प्रोटेकट करायला.

राजसी : वरचं discussion वाचा..

mi_anu - एम्प्लॉयर ची मजबुरी पटते.टीम मधल्या बायका लिव्ह वर जाणार असणे, त्या साठी रिप्लेसमेंट बघणे हे करावे लागते.यात काही वेळा कंपनी चा फायदा पण असतो.रिसोर्स रोटेशन आपोआप होते.
परत एकदा, बाळंत होण्याचा निर्णय, त्यानंतर घरी राहणे ही लक्झरी नसून समाजातल्या बऱ्याच जणांची गरज आहे.(पुरुषांना पण प्रत्यक्ष बाळंत झाले नाही तरी ऑफस्प्रिंग हवं असतं असं मानून.)

भरत : ह्युमन रिसोर्सेसची गरज ठरवताना स्त्रिया बाळंतपणाची रजा घेणार, हे लक्षात घ्यायला हवं. घेतलं जात असावं ना?

फारेण्ड : पण सिरीयसली, हे सहा महिन्यांच्या पगारी रजेचे धोरण सार्वत्रिक असेल, तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही.
- काम करणार्‍या स्त्रीला सहा महिन्यांची पूर्ण पगारी रजा, आणि नंतर नोकरीत परत
- नवीन कामाकरता लायक असलेल्या स्त्रीला फक्त ती प्रेग्नंट आहे म्हणून नोकरी नाकारणे बेकायदा
- आणि सर्व ठिकाणी, अगदी मोलकरणींकरताही, ते एन्फोर्स करण्याची सिस्टीम

हे जरा युटोपियन वाटले, तरी पूर्ण १००% एन्फोर्स झाले तर यात कोणाचेही वैयक्तिक नुकसान नाही. याचे फायनॅन्शियल बर्डन सर्वत्र सारखेच वाटले जाणार आहे. इतरत्र वापरला जाणारा पैसा प्रेग्नंट स्त्रियांच्या पगाराकरता वापरला जाइल.

एक उदाहरण म्हणजे अमेरिकेत अनेक खाजगी कंपन्यांत पहिले दोन नियम राबवले जातात. जेथे ते सक्तीचे आहेत त्या कंपन्यांना स्वतःला व त्यांच्या कॉम्पिटीटर्सना सुद्धा ते लागू होतात. त्यामुळे competitive disadvantage हा जो मुख्य खाजगी कंपन्यांना धोका असतो तो पूर्ण निघून जातो यातून.

उपाशी बोका - असहमत. पण धाग्याचा विषय हा नाही, त्यामुळे तुमचे चालू द्या.

अ‍ॅमी - सार्वत्रिक नाहीय ते धोरण. आणि त्याचा काय परिणाम होतोय याची लिंक वर सिम्बानी दिली आहे. हि अजूनेक

मुद्दा३ : कामाच्या ठिकाणी रजा आणि समानता

भरत - मला अ‍ॅमी यांचे मुद्दे (आता) पटले.
राजसी यांच्या पोस्टचा उत्तरार्ध पकडून आपण कुटुंबव्यवस्था, समाज बदलू शकत नाही, म्हणू कायद्याने, नोकरीच्या नियमांत स्त्रियांना सवलत दिली आहे असा अर्थ निघतो.

सारख्या कामासाठी सारखे हक्क आणि लाभ या तत्त्वांत मॅटर्निटी बेनेफिट्स बसत नाहीत. अ‍ॅमी यांनीच अन्यत्र लिहिलेल्या ज्या मुद्द्यामुळे मला त्यांचं म्हणणं पटलं तो हा मुद्दा :
मॅटर्निटी बेनेफिट्सचा लाभ पुरुष (आता पॅटर्निटी बेनेफिट्स येताहेत, दत्तक, सरोगसीसाठी बेनेफिट्स मिळतील हे आणखी पुढचं) आणि ज्यांना मूल नको आहे, असे स्त्रीपुरुष घेऊ शकत नाहीत. आत त्यांचा निर्णय जगावेगळा म्हणून त्यांना या सोयींचा लाभ घेता येऊ नये हा अन्याय नाही का? की त्याबद्दल त्यांना काही इन्सेंटिव्ह मिळावा? नो क्लेम पिरियडसाठी इन्शुरन्सवाले बोनस देतात- त्याप्रमाणे.

या सगळ्यासाठी स्त्रियांना झगडावं लागलंय हे मान्य करून आपण समानतेच्या पातळीवर ही तात्त्विक चर्चा करतोय हे लक्षात ठेवूया.

राजसी - बाळंतपणाची रजा हा benefit नाही आवश्यकता आहे. ज्यांना लाभ वाटतो त्यांनी खरंच डोळे उघडून बघण्याची गरज आहे. It is not a vacation, full time job where one doesn't have to atleast worry about how to feed herself and the baby.
बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे.

वावे - राजसी +१
बाळंतपणाची रजा ही आवश्यकताच आहे, ' फायदा' नाही.

भरत - मी आधीच स्पष्ट केलंय की बाळंतपणाच्या (भरप्गारी) रजेसाठी झालेल्या झगड्याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि हे तात्त्विक पातळीवर आहे.

वेगळ्या शब्दांत लिहून पाहतो.
"बाकी जगावेगळा निर्णय घेणाऱ्यांना लाभ मिळत नाही म्हणणे म्हणजे विम्याचे पैसे वसूल व्हावेत म्हणून आजारपण/ अपघात अश्या अपेक्षा करण्यासारखे आहे."
इथे भेदभाव होतो, असं वाटत नाही का?

mi_anu - हा मुद्दा मॅ लिव्ह ६ महिने झाली तेव्हा बर्‍याच चर्चात आला होता.फक्त मॅटर्निटी बेनिफिट स्त्रियांना दिले तर मूल न होण्याचा निर्णय घेतलेले कर्मचारी, बॅचलर्स यांना ते अन फेअर वाटते.
माणूस चोरीछुपे दुसरीकडे जॉइन होणार नाही, आपल्याच कंपनीसाठी काही हायर शिक्षण करेल आणी नंतर आपल्या कंपनीत वापरेल ही काळजी घेऊन कोणालाही ६ मंथ पेड सबाटिकल द्यायला हरकत नाही. (आणि गंभीर आजारांबाबत ६ मंथ पेड सीक लिव्ह.)

भरत - समान कामासाठी समान लाभ यात पेड मॅटर्निटी लीव्ह बसत नाही. तुम्हाला तुमच्या सर्व्हिस पिरियडमध्ये अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा, असं म्हटलं तर हा प्रश्न येणार नाही. [सशल - ह्यात कुठल्याही प्रकारची सामाजिक बांधीलकी नाही!
रोबॉट्स ठेवावेत त्यापेक्षा!! हाडामासाची माणसं तरी कशाला?] [राजसी - अमुक इतकी पगारी रजा मिळेल. ती कशी वापरायची याचा निर्णय तुमचा ---- युरोप-अमेरिका टूरला पगारी रजा घेऊन जाणे / घरांत सहा महिने लोळत पडून पुस्तके वाचणे आणि Maternity leave ह्यात फरक आहे.] [फारेण्ड - यात बाळंतपणाची रजा इतर रजांसारखी employer discretion वर असू नये. वेगळ्या कॅटेगरीत असावी. ]
लक्षात घ्या. मॅटर्निटी लीव्ह किंवा पेड मॅटर्निटी लीव्ह देऊच नका असं मी (अजूनपर्यंत) म्हटलेलं नाही.

याची दुसरी बाजू - एम्प्लॉयरकडून दिला जाणारा आरोग्य विमा हा अनेक ठिकाणी फक्त (लग्नाचा) जोडीदार आणि मुलांसाठी असतो. अन्य नातेवाईक (अनेक ठिकाणी डिपेंडंट आईवडील, भावंडे, थोडक्यात ज्यांची जबाबदारी आहे, अशी नातेवाईक असलेली किंवा नसलेली व्यक्ती यांचा समावेश असतोच असं नाही.

दोन्ही पालकांसाठी सारखीच पॅरंटल लीव्ह हे फक्त ऐकलं आहे. प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलता येत नाही.

अमितव - आमच्या इथे दोन्ही पालकांना मिळून 52 आठवडे सुट्टी मिळते. तुम्ही हवी तशी घ्या.
उत्पन्नमिळकत कर वजावटी आणि एकूणच स्ट्रक्चर जोडीदार ( लग्न गरजेचं नाही, कॉमन लॉ पार्टनर चालेल) आणि त्यातही मुलं असतील तर फेवरेबल असतात. मुलांचे खर्च वजावटीत जातात. कॅनडात तर युनिव्हर्सल चाईल्ड केअर बेंनिफिट मिळतो. सर्व पालकांना एक (करपात्र)रक्कम दर महिना मिळते. मुलं नसतील तर नाही मिळत. जी एस टी परत मिळण्याचं स्ट्रक्चर परत कुटुंबाच्या आकारावर अवलंबून असत. हे जन्मदर वाढावा मुलं जन्माला घालावी म्हणून काही प्रमाणात आहे हे मान्यच पण हे आर्ग्युमेंट साठी टोकाचं डिस्क्रिमीनेशन आहे.
दत्तक मूल घेतलं तरीही 52 आठवडे बॉंडिंगला सुट्टी मिळते.

यावा कॅनडा आपलाच आसा.

अमितव - अहो मग दीर्घ किंवा लघु अकस्मित आजारपणासाठीचे बेनिफिट ही समान काम मध्ये बसणार नाहीत.
प्रत्यक्ष कर भरला नाही/ कमी भरला तरी सरकारने काळं गोरं करायला हवं. कर भरला नाही... राज्य परिवहन बस मध्ये जागा मिळणार नाही. पार्क मध्ये घसरगुंडी वर चढा पण घसरायचं नाही.

सशल - >> यावा कॅनडा आपलाच आसा. Happy
आता अ‍ॅमी (आणि त्यांचं लॉजिक पटलेले भरत) म्हणतील , "खरंच, ज्या ज्या भारतीय वर्कींग महिलांनां पेड मॅटर्निटी लीव्ह हवी आहे त्यांनीं कॅनडात जाऊन मुलं जन्माला घालावीत; भारतात फार गर्दी आहे! एकतर मुलं जन्माला घालता येतील किंवा नोकरी करून पगार मिळवता येईल. दोन्ही जमायचं नाही , कारण पुरूषांनां मुलं जन्माला घालता येत नसल्यामुळे हा समसमान न्याय नाही ".

फारेण्ड - इन प्रिन्सिपल बरोबर आहे. पण एकूणच धोरणे कौटुंबिक गरजांच्या बाजूने झुकलेली असणे हे मला पटते आणि त्या दृष्टीने ही असमानता योग्य आहे. अ‍ॅफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन, डायव्हर्सिटी हायरिंग मधेही अशी असमानता असते, आणि ती ही योग्य आहे.
<<<<आजारपण, अपघात कोणाला हवा असत नाही, ठरवून घेता येत नाही. तेव्हा ते यात घुसवू नका. >>> हे मान्य आहे. पण cold corporate culture च्या दृष्टीने जर पाहिले तर कर्मचार्‍याचे आजारपण ही कंपनीची जबाबदारी नाही. त्याबद्दल जेव्हा कन्सेशन दिले जाते तेव्हा 'समान' तत्त्वाला तेथेही अपवाद होतो. रजा कर्मचार्‍याच्या चॉईस ने आलेल्या गोष्टीमुळे आहे की नाही हा फॅक्टर कॉर्पोरेट लॉजिक ने नगण्य आहे.
वरती कामाच्या ठिकाणी झालेले अपघात किंवा कामाच्या स्वरूपातून आलेले आजारपण धरलेले नाही.

mi_anu कामवाल्या बायांना पेड लिव्ह देण्याबद्दलः
बाया दिवसाला १ घर सरासरी ४५ मिनीट काम करतात. अशी ४ ते ५ कामं त्यांच्याकडे असतात. सर्वांनी ठरवल्यास एखाद्या बाईला ६ महिने पगारी लिव्ह सर्वांनी मिळून द्यायला काहीच हरकत नाही. कल्पना चांगली आहे. माझ्याकडे दिवसाची फक्त ४५ मिनीट कमिट करणार्‍या बाईला ६ महिने भरपगारी रजा एकटीने देणं मला परवडणार नाही. पण ती माझ्याकडे दिवसाचे ६ तास/जास्त वेळ काम करत्/मुले सांभाळत असेल तर ही अशी लिव्ह आणि लागेल तो हेल्थ सपोर्ट/बिनव्याजी कर्ज देणं हे माझं कर्तव्य आहे.

**********************************************
मुद्दा ४ : बाळंतपणाची रजा भरपगारीच का असावी -
(खरं तर हे मुद्दा क्र, १ मध्येच बसू शकतं. पण कॉपीपेस्ट करताना मला वेगळा मुद्दा वाटला, म्हणून इथे खाली घेतलाय)
mi_ anu : मॅ लिव्ह ला दिले गेलेले पेड बेनिफिट ही महिला वर्गाला दिलेली सवलत नसून त्यात भूतकाळातील बरेच वाईट अनुभव, अगतिकता, बायकांनी मूल जन्माला घालून पैशाची गरज वाढणे (सिंगल मदर,काही आकस्मिक अपघातामुळे विधवा होणे, घराचे हफ्ते वगैरे विचार करता) याचा इतिहास आहे. (पूर्वीच्या काळी मुलांना अफू घालून घरी ठेवून दिवसभर कामावर जाणार्‍या बायकांच्या काही कथा ऐकल्या असतील.)
समाजावर परीणाम, गुन्हे वाढणे, मुलं कुपोषित्/गतीमंद निपजणे, मुलांचे शोषण असे बरेच प्रत्यक्ष न दिसणारे साईड इफेक्ट ३ किंवा ६ महिने पेड मॅ लिव्ह न देण्यात आहेत. पूर्वीच्या काळी सरकारी ऑफिसेस मध्ये पण शेवटची कळ येईपर्यंत (बाळ झाल्यवर ३ महिने पूर्ण मिळावे आणि पैशाचे कमी नुकसान व्हावे म्हणून )काम करणार्‍या बायांच्या कथा ऐकल्या आहेत.

पैश्याचं सोंग आणता येत नाही.काही घटकांनी मुलं न जन्माला घालायचा निर्णय घेतला म्हणून सर्वांना घेता येत नाही. नवा जीव समाजात आणायला, वाढवायला पैसे लागतात. वेळ लागतो.आपण ज्या कंपनीला उमेदीची ५-१० वर्षं, रोजचे ९-१० तास किंवा जास्त कमिटमेंट देतो तिच्याकडून या मोठ्या घटनेत आधाराची जराही अपेक्षा करु नये?
[भरत : यासाठी मोबदला मिळतो ना? की आवडीचं काम आहे म्हणून करतो आपण ते?
[ mi-anu - मोबदला मिळतो. नो डाऊट.पण कंपन्यांचे निर्णय, अक्वीझिशन्स, बदललेल्या स्ट्रॅटेजी या आपल्या जीवनाची दिशा हळूहळू नकळत बदलत असतात.ही दिशा भविष्यासाठी चांगली असते किंवा नसते.जरी हा सुप्रिम त्याग वगैरे नसला तरी एखादी कंपनी एका विशीष्ठ स्टेज ला जाण्यात मनापासून काम करणार्‍या प्रत्येक कर्मचार्‍याचा बीट असतो.
मोबदला आणि श्रम हे प्रपोर्शन मध्ये नसू शकतात. (कोणत्यातरी लांबच्या गावातून १.५ लाख वर्षाला पॅकेज वर पुण्यात्/मुंबईत कॉट बेसिस वर राहणारे फ्रेशर्स्/पगार ओके मिळूनही कामाच्या ठिकाणाजवळ महाग रेंट्/लांब स्वस्त रेंट ने राहील्यास बस रुट वर नसणे/एकंदर खिश्यातले गणित नफ्याकडे जावे म्हणून कराव्या लागलेल्या तडजोडी/आयटीतले महाग पार्टी कल्चर्/त्यातून जास्त पंगे न घेता वेगळे राहणे/स्वस्त मजा मॅनेज करणे). कधीकधी आयुष्यातले अनेक तास, नोकरीसाठी केलेल्या तडजोडी, भलता रोल अंगावर पडून वेगळी कामे करावी लागणे याच्या मानाने नोकरीने आपल्याला जास्त दिलेले नाहीये असा फील येतो}]

mi_ anu- मे बी इथे मुद्दे मांडणार्‍यांसमोर चुकीची वागणारी उदाहरणे असतील. पण मॅ लिव्ह घेऊन आपले आवडीचे काम मिस होते म्हणून शक्य तितक्यालवकर जॉइन करुन, अनेक ठिकाणचे बॉल एका वेळी जगल करुन ऑफिस च्या कामावर इम्पॅक्ट होऊ न देणार्‍या कमिटेड वर्क ओरिएंटेड बायका आपण पाहिल्या नाहीत का?

बाय द वे, स्वतःचे रास्त तळमळीचे लॉजिकल मुद्दे पर्सनल वर न येता, अती अग्रीसिव्ह न होता मांडले तर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो असा अनुभव आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता समजा एक TCS चा एम्प्लॉयी आहे तो Apple ऑफिस मध्ये काम करतोय. 1 वर्ष काम केले आणि आता maternity leave घ्यायची आहे, त्या व्यक्तीचा खर्च apple ने उचलणे कसे बरोबर आहे? पेड लिव्ह ही tcs लाच उचलावी लागेल.
आता समजा ती व्यक्ती TCS ची पण फुल्ल time एम्प्लॉयी नाहीय, subcontract आहे, मग TCS तरी का उचलेल खर्च आणि लिव्ह. >>>

हे सर्व कंपन्या आणि सर्व कर्मचारी यावर अ‍ॅग्रीगेट्/अ‍ॅव्हरेज केले तर तो खर्च स्प्रेड होतो. इथे लक्षात घ्या - दोन्ही कंपन्यांची पॉलिसी सेम असेल तर या काळात स्त्रिया आधीच्या कंपनीबरोबर राहणेच पसंत करतील. आवर्जून नोकरी बदलणार्‍यांचे प्रमाण कमी असेल. कारण अशा वेळेस फॅमिली प्रायॉरिटीज वाढतात.

दुसरे म्हणजे असा सार्वत्रिक नियम झाला, तर इन्शुरन्स सारखे त्यातही येइल काहीतरी - कंपन्यांकरता. म्हणजे ज्या कंपनीला यातून कव्हर हवे आहे त्यांनी वर्षाला काही प्रीमियम द्यायचे अशा अचानक येणार्‍या खर्चाकरता. आणि मग हा खर्च ती इन्शुरन्स कंपनी देइल.

द्विरुक्ती होतेय. पण नाईलाज आहे.
मेड म्हणजे थेट आपल्यात आणि तिच्यात झालेला करार आहे. एक महिन्यासाठी मेड हायर केली असेल तर ते कॉण्ट्रॅक्ट. पण कायमस्वरुपी असेल तर कामगार. तुम्ही एक तास राबवता कि आठ तास याला महत्व नाही. तुम्ही आठ तास राबवत नाही कारण आठ तासाचे पैसे तुम्हाला देणे परवडत नाही. ही तुमची सोय आहे.

पेड मॅ लिव्ह उपयोगी आहे पण कंपनीनेच हा खर्च उचलला पाहिजे हे छोट्या व्यवसायांसाठी कठीण ठरु शकते. मी अशावेळी कदाचित जी स्त्री प्रेग्नेंट रहाण्याची शक्यता जास्त आहे अशा स्त्रीयांना नोकरी देताना विचार केला असता.
कॅलिफोर्निया मध्ये प्रत्येक कंपनी प्रमाणे वेगळे मॅ लिव्हचे फायदे आहेत. सरकारच्या नियमाप्रमाणे तुमच्या स्वतःच्या शॉर्‍ट टर्म डिसॅबेलिटी इन्शुरन्स प्रमाणे डिलिव्हरी नंतर पैसे आणि रजा मिळते. नंतर बहुदा १ महिना बॉन्डींग लिव्ह पुरुष आणि स्त्रीयांना सारखी असते.

ठिक आहे, कामगार.
मी आठ तास राबवत नाही कारण मला ८ तासांचा कंटेंट नकोय आणि तिने नो काँपिट्/नो अदर गेनफुल एम्प्लॉयमेंट क्लॉज साईन केले नसल्याने तिच्याकडे अजून ५ जण आहेत ८ तासाचा कंटेंट नको असलेले. यातून तिला जास्त जॉब सिक्युरिटी आहे कारण यातल्या कोणी फायर केले/कोणाचे घर बदलल्याने/परदेशी गेल्याने काम सुटले तर तिच्याकडे अजून ५ पर्याय असतील.
यात तुम्ही म्हणता तसे माझे तिच्याशी लाँग टर्म कॉण्ट्रॅक्ट म्हणून नाते आहे म्हणून मी तिला ६ महिने पगारी लिव्ह द्यावी, याच सेम काळात आणि ५ जणांनी प्रत्येकी ६ महिने पेड लिव्ह द्यावी असे काहीसे म्हणताय का?

परदेशातला मेड चा आणि मिनीमम वेजेस चा सिनारिओ आहे त्यात ही मेड अजून ५ घरी कामे करते का? त्या केस मध्ये मॅटर्निटी बेनिफीट तिला ६*(६ महिन्यांचा पगार) इतके मिळतात का?

१. नाही मी असे नाही म्हणत. मी म्हणतोय आपल्याकडे असे शक्य नाही. त्याची कारणे मागच्या प्रतिसादांतून सांगितलेली आहेत. (मला उद्देशून प्रतिसाद असेल तर )

२. एक तासाच्या पगारात सरासरी महिना १००० रूपये मिळतील. हे मिनिमम वेजेस अ‍ॅक्टच्या कितीतरी खाली आहेच. शिवाय तिचे भागणे शक्य नाही. त्यामुळे ती पाच घरी काम करते. अशा प्रकारचे काम करणारं लेबर आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून हा असा रोजगार निर्माण होतो. थोडक्यात तिनेच तुमच्या समस्या सोडवल्या.

कामाला येणार्‍या व्यक्तीसाठी वरील अनु आणि पिनी शी सहमत.
मूळ चर्चेत (त्यात परत जायचं नाहीये.. पण कारण विचारलं म्हणून फक्त सांगतोय) बाळंतपण रजाच नकोच हा स्टँड होता, आणि हवी म्ह्टल्यावर 'मग तुम्ही कामाला येणार्‍या व्यक्तींना देता का?' असा मूळ मुद्दयावर भाष्य करायचं नाही म्हणून फाटे फोडायला खोडसाळ प्रश्न विचारला होता. आणि त्यासाठी त्यावर अजिबात मतप्रदर्शन केले न्हवते.
वर अनु म्हणतायत तसं, जर कोणी एक तास माझ्या साठी काम करत असेल तर त्याच्या प्रोरेटेडने, त्याला मोबदला नक्की देईन. करार केला न्हवता, बोलणं झालं न्हवतं हे मुद्दे आणणार नाही. अर्थात ह्याचा गैरफायदा घेतला जात नाहीये ना ह्यावर मला फक्त एका व्यक्तीकडे लक्ष द्यायचं असल्याने तुलनेने जरा जास्तच लक्ष दिलं जाईल. जे आदर्श नजरेत कदाचित संपूर्ण समतोल नाही.

मला माझी कंपनी ( मी एम्प्लॉयी आहे) भरपगारी ६ महिने मॅटर्निटी लिव्ह देते म्हणून मी माझ्याकडे लादी, केर करणार्या मोलकरणीलाही भरपगारी मॅटर्निटी लिव्ह द्यावी ह्यातलं लॉजिक माझ्यापर्यंत पोचलं नाहीये. मी समजा भारतात असेन आणि माझ्याकडे केर, लादी करायला एक बाई आणि पोळ्यांकरता दुसरी बाई अशा दोन बायका येत असतील (रोज दिवसातून एक तास प्रत्येकी) तर त्यांना पगारी मॅटर्निटी लिव्ह मी द्यायची? का? म्हणजे त्या माझ्या एम्प्लॉयी नाहीत आणि मी माझ्या एम्प्लॉयरकरता जितके तास काम करते तितके त्या माझ्याकडे करत नाहीत. माणुसकी म्हणून काही रक्कम देणं समजू शकते.
आता नॅनी म्हणून त्या माझ्याकडे दिवसाचे ८, ९ तास काम करत असतील आणि आमच्यात तसं काँट्रॅक्ट असल्यास कबूल आहे.

mi_anu,
तुम्ही तिच्याकडे किती कामे आहेत याचा विचार करताय. पण ती इतक्या घरी कामे करत आहे कारण तिचे घर चालवायला तिला तितक्या पैशांची गरज आहे. जर दोन घरात मिळून तेवढ्याच पैशांचं काम असेल तरी ती करेल. टोटल इंन्कम किती हा प्रश्न आहे. मग ते डिवाईड होऊन येताय की एकाचं ठीकांणांहून येतयं हे महत्वाचं नाही.
आता ती जेव्हा बाळंत होईल तेंव्हाही तिला तेवढेच पैसे मिळाले पाहिजे. म्हणून सगळ्या घरांतून ते मिळायला पाहिजे.
ही कंसेप्ट आता पटायला जड जातीये पण काही वर्षांत अशी पध्दत सुरु झाली तर रुटीन होईल.
गेल्या दहा वर्षांतले त्याच कामाचे त्याच मेहनतीचे महागाईच्या प्रमाणात वाढलेले दर मोलकरणींचे लोकांनी अ‍ॅ़सेप्ट केले तसेच हेही होईल.
च्रप्स,
तुमचं TCS, Apple चं लॉजिक बरोबर आहे. पण हीच तर असंघटीत क्षेत्राची अडचण आहे ना की त्यांना वाली कोणीच नाही.
जोवर त्यांना कायद्याने, नियमांनी, सरकारकडून कुठल्याही मार्गाने संरक्षण मिळत नाही तोवर या क्षेत्रातल्या लोकांनी कोणाशी काय काँट्रॅक्ट केले आहे त्या फंदात न पडता, आपल्या परीने जेवढे होईल तेवढे करावे.

कॉन्टॅक्ट कामाचा मोबदला जास्त असतो (कारण कंपनीला विमा, पेंशन, पीएफ असं काहीही करायला लागत नाही), कर वजावटी प्रचंड जास्त असतात, अनेक खर्च कामाकरता दाखवता येतात, कर कमी असतो आणि त्याच्या बदल्यात जॉब सिक्युरिटी नसते इ. इ. भारतात काम करणारे डोमेस्टिक हेल्पर हे कॉन्टॅक्ट मध्ये बसतात पण त्यांची सामाजिक दूरवस्था बघितली तर ते चीप लेबर आहेत. खुशीने कॉन्टॅक्ट करत नाहीयेत तर राबवले जात आहेत कारण मिनिमम वेज असं काही नाहीचे.
सो आयडिअल वर्ल्डची नजर मी लावणार नाही. हक्क म्हणून देईन.

बाळंतपणाची रजा ही बाळाचे संगोपन, आई-बाळातील बॉण्ड, आईच्या शरीराची झीज वगैरे साठी असते व ती भरपगारी न देणे माणुसकीला धरून होणार नाही असे काहींनी म्हटलेय म्हणून कामवालीला या गरजा नाहीत का वगैरे प्रश्न आलेत.

तुम्ही एका तासाचे काम करून घेता, तितकाच मोबदला देता तर तोच 6 महीने बाळंतपणात काम न करता द्यायचा आहे. मग ती दुसरीकडे काम करते की नाही हे बघायची गरज नसावी.

बाईची गरज वगैरे म्हटले जात असताना कायमस्वरूपी कामगाराला देणे व कंत्राटी कामगाराला न देणे का पटते? कामवालीला अमुक इतकेच दिवस काम करायचे आहे त्यानंतर नाही असे सांगितलेले नसते त्यामुळे केवळ पूर्ण दिवस नाही म्हणून कंत्राटी समजावे असे आहे का?

माझ्या शेतावर 20 लोक पूर्ण दिवस समजा गेली 5 वर्षे काम करत आहेत. त्यातील एखादी बाळंतपणासाठी रजेवर गेली तर मी 6 महिने काम न करता पगार देणार नाही. बाकी आजारपणं वगैरेंसाठी, तान्ह्या बाळासाठी, मला पटणाऱ्या कारणांसाठी काही दिवस रजा घेतली, मीच काही दिवस येऊ नका म्हणून सांगितले तर अर्थातच पगारी रजा असेल ती.

मी शेत करणे माझ्या बाळंतपणासाठी 6 महिने बंद ठेवले तर मला त्यातून उत्पन्न मिळणार नाहीय.

बाळंतपणाची रजा ही बाळाचे संगोपन, आई-बाळातील बॉण्ड, आईच्या शरीराची झीज वगैरे साठी असते व ती भरपगारी न देणे माणुसकीला धरून होणार नाही असे काहींनी म्हटलेय म्हणून कामवालीला या गरजा नाहीत का वगैरे प्रश्न आलेत. >>> तेच तर ना , पहिले वाक्य जनरिक आहे त्यात सगळ्याच आया आल्या ना? कामवालीला या गरजा नाहीत असे कुणी स्टेटमेन्ट केलेले दिसले नाही. मग दुसर्‍या वाक्याचा संबंध काय पहिल्याशी?
काहींना आत्ता पगारी रजा मिळत नाही तर मग इतरांना तरी कशाला हवेत हे चोचले असा स्टँड घ्यायचा की ज्यांना आत्ता नाही मिळत त्यांनाही ही रजा कशा पद्धतीने मिळेल असा स्टँड असला पाहिजे?
लाखो बायकांना स्वच्छतागृहासारख्या सोयी नाही मिळत . मग त्यांना ती मिळावीत यासाठी प्रयत्न करणार की ज्यांना आहेत त्यांना ' त्या अमक्या विडी कारखान्यातल्या स्त्रिया तर दिवसभर कळ काढतात. तुम्हाला कशाला हवीत हपिस च्या खर्चाने स्वच्छ रेस्टरूम्स? ' असे म्हणणार ?

काहींनी मीच का द्यावी भरपगारी रजा ती इतर ठिकाणीही काम करत असताना, ज्यांकडे काम करते त्या सगळ्यांनी मिळून द्यावी असे तोडगे, कंत्राटी असताना का द्यावी, इत्यादि मुद्दे उपस्थित केले आहेत त्यासाठी आहे. ज्यांनी पूर्ण 6 महिने जितका पगार आहे तितका सर्व द्यायची तयारी दाखवलीय त्यांच्यासाठी नाही.

स्वच्छतागृह विशिष्ट शारिरीक अवस्था असलेल्या लोकांनाच उपलब्ध असेल इतरांना नाही असे नसते त्यामुळे सरसकट स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचे उदाहरण येथे योग्य वाटत नाही. अपंगांसाठी असणारे वेगळे स्वच्छतागृह उपलब्ध करावे का नाही हे उदाहरण चालू शकावे. त्यासाठी काय नियम आहेत ते माहीत नाही, परंतु कामावर असतानाच कामाच्या ठिकाणचे स्वच्छतागृह वापरले जाईल, त्यामुळे त्याने काम बंद पडणे व काम न करता मोबदला देणे, बदली कामागाराचाही खर्च करणे हे प्रश्न येत नसल्याने ते ही तितकेसे चांगले उदाहरण वाटत नाही.

पगारी व बिनपगारी रजा किती मिळेल हे कामावर रुजू होण्यापूर्वी ठरलेले असावे. ही रजा कोणत्या कारणासाठी घेतली जातेय हे विचारले जाऊ नये अशा मताची मी आहे. मी दिलेल्या शेतकामगार उदाहरणात मी म्हटलेय की मला पटणारे कारण असेल तर मी भरपगारी रजा देईन, पण ते देण्या किंवा न देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मला हवेय. नसेल तर मी स्त्री कामगार घेणार नाही माझ्या शेतावर अगदीच केवळ स्त्रीलाच जमेल असे काम नसेल तर.

नसेल तर मी स्त्री कामगार घेणार नाही माझ्या शेतावर >>> हं. हे झाले तुमचे कारण. उद्या एखादा म्हणेल मी कृष्णवर्णीय घेणार नाही अमक्या कामावर. किंवा अमक्या जातीच्या व्यक्तीलाच स्वयंपाकी म्हणून घेईन. हे सर्व डिस्क्रिमिनेशन आहे. तुम्ही ते सपोर्ट कराल का एम्प्लॉयर च्या निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणुन ?

मला वाटतं प्रश्न स्किल्ससेट व मोबदला हा आहे. जर समान काम केले जात असेल पण एकाला जास्त मोबदला, सुविधा व एकाला नाही तर कमी सुविधा मागणार्याला घ्यावे हे डिस्क्रिमिनीशन होतय असे मला वाटत नाही.

पूर्ण चर्चेत मैत्रेयी, पिनी +१
मूळ चर्चेत मोलकरणींचा मुद्दा आला ते माझ्या दृष्टीने डायग्रेशन होतं आणि म्हणून मी मुद्दाम त्या वाटेने गेलेच नव्हते. एकदा अनऑर्गनाइज्ड लेबर म्हंटल्यावर तिकडे ऑब्जेक्टिव्हली चर्चा होणंच कठीण. अर्थातच बायका कुठे काम करतात किंवा काय प्रकारचं काम करतात ह्याचा मॅटर्निटी लीव्ह शी संबंधच नाही.
घरी कामवाली बाई असण्याचा अनुभव च नाही अमेरिकेत असल्यामुळे. पण एव्हढं नक्की की जमेल तितकी माणूसकी आणि समता राखण्याचा कायम प्रयत्न असेल. जिकडे ऑब्जेक्टिव्ह चर्चा करताच येणार नाही ते मुद्दे आणण्यात काय पॉइन्ट आहे?

स्वाती२ ने मूळ बीबी वर छान पोस्ट लिहीली आहे जी इकडेही आणली आहे. एम्प्लॉयर च्या नजरेने विचार करा, देशाच्या नजरेने विचार करा असे अनेक फाटे फोडता येतील. तेव्हा आधी प्रश्न काय हे ते क्लीअरली डिफाईन करा. नक्की कोणाला भरपगारी मॅटर्निटी लीव्ह नाकारायची आहे ते एकदा कळलं की बरं तर अजून चर्चा करता येईल. नाहीतर सगळ्यांचा भर ओसरेपर्यंत असंख्य मुद्दे येतील आणि भर ओसरला की सगळी चर्चा भूतकाळ !

अरे डिस्क्रिमिनेशन करणारा कसे म्हणेल हो मी करतो डिस्क्रिमिनेट असे. तो हेच म्हणणार की मला नाही बाबा वाटत हे डिस्क्रिमिनेशन आहे Happy
रेस, जेन्डर, कलर वगैरे (जे क्रायटेरिया कायद्याने डिफाइन केलेल असतील) च्या बेसिस वर तुम्ही एखाद्याला फेवर किंवा डिनाय केले तर त्याला डिस्क्रिमिनेशनच म्हणतात. तुम्हाला काय "वाटतेय" त्याला काही किंमत नसते.

माझ्या शेतावर काम करायला पुरुष घेतला तर त्याला 15 दिवस भरपगारी पटर्निटी लिव्ह द्यावी लागेल पण बाई घेतली तर 6 महिने भरपगारी रजा यात मी काय निवडावे हे डिस्क्रिमिनीशन? सध्या तरी वाटणेच महत्वाचे आहे कारण मला त्याबद्दल कोणी जाब विचारणार नाहीय. जर हे अनिवार्य केले तर मला घेण्याशिवाय पर्याय नाही.

6 महिने भरपगारी रजेवर जाणारी व न जाणारी यांचे स्किलसेट सारखे आहेत तर मी कोणाला घ्यावे हा मुद्दा मांडण्यासाठी स्किलसेट लिहिले आहे.

<मूळ चर्चेत (त्यात परत जायचं नाहीये.. पण कारण विचारलं म्हणून फक्त सांगतोय) बाळंतपण रजाच नकोच हा स्टँड होता,>
अमितव, तुमच्यासारख्यांसाठीच त्या चर्चेतले मुद्दे संकलित करून या धाग्यावर आणले आहेत.
कॉपी पेस्ट करताना मी एकही शब्द वगळला/बदलला/जोडलेला नाही. फक्त प्रतिसादांचा क्रम बदललाय.
पहिल्या वाक्यापासून भरपगारी रजा हा शब्द आहे. तुमच्याशीच त्याचा खर्च कोणाकडून वसूल केला जातो याबद्दल चर्चा झालीय. बिनपगारी रजा कितीही घेतली तरी चालेल, असं म्हटलंय.
तेव्गा मूळ चर्चेत बाळंतपणाची रजाच नको, असा मुद्दा होता असं तुम्हांला आणि ज्यांना अजूनही खरंच वाटत असेल, तर तुमच्या समजून घेण्याच्या क्षमतेबद्दल मला शंका येणार किंवा तुम्ही खोडसाळपणा करताय असं वाटणार.
शिवाय तुम्ही ज्या कॅनडा या देशाचं उदाहरण देताय, त्याला लोकसंख्यावाढीची गरज आहे, हेही तुम्हीच अन्यत्र सांगितलंय.

<नक्की कोणाला भरपगारी मॅटर्निटी लीव्ह नाकारायची आहे ते एकदा कळलं की बरं तर अजून चर्चा करता येईल>
सशल, अमेरिकेत भरपगारी रजा हा नॉर्म नाही. काहीच एम्प्लॉयर भरपगारी रजा देताहेत. अन्यथा ती बर्‍यापैकी फक्त अ‍ॅडव्हान्स सॅलरी आहे. या भरपगारी रजेचा भार कोणी उचलावा? एम्प्लॉयरवर टाकला तर त्याचे डायरेक्ट वाईट परिणाम स्त्रियांवर होताहेत यांसारखे अनेक मुद्दे चर्चेत आलेत. पण त्यात तुम्हांला ऑब्जेक्टिव्हिटी दिसत नसावी.
मु़ळात भरपगारी रजेचा भार कोणी उचलावा हा मुद्दा त्या धाग्यावर निघूनही भरपगारी रजा स्वतःच्याच खिशातून निघतेय हे कोणालाही स्पष्ट करावेसे वाटले नाही, याचे मला नवल वाटते.
ऑब्जेक्टिव्ह चर्चा ? हं.

पीनी, बहुधा आपण एकाच मुद्दा बोलत असू.
"mi_anu,
तुम्ही तिच्याकडे किती कामे आहेत याचा विचार करताय. पण ती इतक्या घरी कामे करत आहे कारण तिचे घर चालवायला तिला तितक्या पैशांची गरज आहे. जर दोन घरात मिळून तेवढ्याच पैशांचं काम असेल तरी ती करेल. टोटल इंन्कम किती हा प्रश्न आहे. मग ते डिवाईड होऊन येताय की एकाचं ठीकांणांहून येतयं हे महत्वाचं नाही.
आता ती जेव्हा बाळंत होईल तेंव्हाही तिला तेवढेच पैसे मिळाले पाहिजे. म्हणून सगळ्या घरांतून ते मिळायला पाहिजे."

मी वर आधी हेच म्हटले आहे.ती व्यक्ती 5 ठिकाणी काम करते की एका ठिकाणी याचा संबंध बसून ती प्रेग्नन्ट नसताना 1 किंवा 5 घरातून जितके टोटल उत्पन्न कमावत होती तितके 6 महिन्यासाठी तिला मिळावे हा मूळ मुद्दा आहे ना?सध्या 5 ठिकाणी काम करणे हा त्या व्यक्तीचा चॉईस आहे.पूर्णवेळ एका ठिकाणी कामात जास्त तासांची गुंतवणूक करावी लागते.4-5 कामे शेजारी यात कमी तासात काम होते.
या अश्या लेबर मध्ये सोयी नसणे, कधीही फायर होणे या रिस्क मलाही खटकतात.चांगली गोष्ट ही की लेबर कमी आणि गरज जास्त असल्याने कामं सतत मिळत राहतात.ज्याप्रमाणे फायर होण्याचा धोका त्याप्रमाणे काही बिनसल्यास 'उद्यापासून मी येत नाही' असं म्हणण्याची सोय एका घरात असते.नवी माणसं येत राहतात.गरज वाढत राहते.
त्या दृष्टीने माझ्या घरात ती घेत असलेला 1 महिन्याचा पगार * 6 मी तिला देणे योग्य आहे.(जेव्हा मी माझ्या घरात कमवत असलेल्या 1 महिन्याचा पगार मी, आणि बाकी 1 महिने बाकी 5 जणांनी द्यावे म्हणत होते तेव्हा माझा हिशोब चुकलेला होता.)

पुन्हा एकदा,
अनऑर्गेनाइज्ड सेक्टर मधे कायद्यांची अंमलबजावणीच नाही. उद्या जर मोलकरणींच्या संघटनेने घरोघरी काम करणा-या बायांचा डेटा ठेवायला सुरूवात केली तर मात्र कायदे लागू होतील. आमच्याकडे एकच तास काम असते ही सबब नाहीशी होईल. तुम्ही बाकीचे सात तास बसवून ठेवा आणि आठ तासाचा पगार द्या. कायदा असाच आहे.
पण असे झाले तर मोलकरणींना काम मिळणार नाही. कारण सगळे असा पगार देऊ शकत नाहीत. हा एम्प्लॉयर सक्षम नाही याची कल्पना सर्वांनाच आहे. अनऑर्गेनाज्ड सेक्टर मधील रोजगार हा रजिस्टर्ड नाही त्यामुळे कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. याला थेट शोषण म्हणता येईल. पण ज्यांच्याकडे ती काम करते तो ही शोषित आहे. फार थोडे असे आहेत की ज्यांचे उत्पन्न ब-यापैकी आहे. ते देऊ शकतील म्हणून सर्वांकडून अपेक्षा करता येणार नाही.

भरपजारी रजा का असावी ?

मला नाही वाटत या प्रश्नाचे उत्तर खूप अवघड आहे. बायका गरजू नसतात हा समज खोडून काढला गेल्याने भरपूर रजा असावी हे मान्य झालेले होते. प्रत्यक्षात भारतात त्याची अंमलबजावणी उशिराच झाली. जर भरपगारी रजा नसेल तर बायका तातडीने कामावर रुजू होण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे त्यांची आणि बाळाची परवड सुरू होईल. एव्हढेच सिंपल कारण आहे.

<<केवळ इमोशनल कारणांसाठी प्रतिसाद देऊ नका.>>

इमोशन्स हा त्या स्त्री पुरुष "रिसोर्सेस" चा एक अविभाज्य भाग आहे. तसेच आजारी पडणे, स्वातंत्र्यदिन, दिवाळी सा़जरी करणे हा त्या "रिसोर्सेस"
बरोबर येणारा अविभाज्य भाग आहे. त्या सुट्ट्या देणे सर्वमान्य आहे.
( मॅटर्निटी लिव्ह दिली नाही तर बायका मुलेच जन्माला घालणार नाहीत, तसे सिक लीव्ह दिली नाही तर कुणि आजारीच पडणार नाही असे मुद्दे इथे विचारात घेऊ इच्छित नाही!)
यंत्रे जरी रिसोर्सेस म्हणून वापरायची असली तरी त्यासाठीहि बरेच प्रश्न विचारात घ्यावे लागतात. होणार्‍या फायद्याच्या बदलात कॅपिटल कॉस्ट, मेन्टेनन्स कॉस्ट वगैरे. मग यंत्रांऐवजी मनुष्य नोकरीवर ठेवायचा तर त्याचेहि असेच मूल्यमापन करावे लागेल. एक अतिशय लायक, योग्य, तरुण, हुषार स्त्री कामाला हवी असेल तर तिला बाळंतपणाची सुट्टी द्यावी लागेल. ते नको म्हणून नोकरीवरच न ठेवणे हे परवडणार आहे का? परवडत असले तरी कायद्याचे काय? म्हणजे रिसोर्सेस घेताना, भावना, कायदा मधे आलेच ना!
अहो मोलकरणीलाहि नीट वागवत नसाल तर काम करायला कुणि मिळणार नाही.

तर रिसोर्स म्हणून काय वापरतो, ते रिसोर्सेस वापरायचे तर त्या बाबतीत काय काय गोष्टींचा विचार करावा लागतो, हे सगळे मोठा धंदा करणार्‍यांना कळते.
धंद्यामधे माणूसकी, सामाजिक जबाबदारी, कायदा यांना काही स्थान आहे का याचाहि विचार करावा लागतो. धंदा जेव्हढा मोठा करायचा तेव्हढे हे सगळे विचारात घ्यावेच लागते.
बाकी हे सगळे मल्टि नॅशनल धंदे करणार्‍यांना कळते.

जे आपले सांगितलेले काम करणारे, त्यापलीकडे जास्त विचार न करणारे, स्वतःचा धंदा न केलेले लोक असतात ते असे कंपनीच्या कामाच्या वेळेला इथे येऊन धंदा करणार्‍यांना फुक्कटचे सल्ले देणार! त्यांनी आपले दिलेल्या रिक्वायर्मेण्टसारखे प्रोग्राम लिहावे नि गप्प बसावे. पॉलिसी, कुणाला कामावर घ्यायचे, काय बेनेफिट्स द्यायचे हे ज्यांना धंदा चालवायचा आहे, मोठा करायचा आहे त्यांचे काम, नाही समजले तुम्हाला तरी हरकत नाही.

भावना बाजूला ठेवा, स्त्री पुरुष समानता! कुठेहि काहीहि लावायचे! असे करून धंदे नाही चालवता येत, फार तर चहाची टपरी चालवा!

ती सुद्धा लहानशीच, पुण्यात. म्हणजे आमची इतरत्र कुठेहि शाखा नाही असे अभिमानाने सांगता येईल. स्टारबक वाल्यांइतकी मोठी करू नका तुमची टपरी!

कॉण्ट्रॅक्ट लेबर आणि सब कॉण्ट्रॅक्ट यात गल्लत होतेय. अलिकडे मोदींनी बदललेल्या कायद्यांची कल्पना नाही. पण कॉण्ट्रॅक्ट लेबरच्या मागे दडून पळता येणार नाही असे निर्णय वेळोवेळी कामगार न्यायालयांनी दिलेले आहेत. मोठ्या कंपन्यात असलेल्या वकिलाला याची चांगली माहिती असते. तसेच सब कॉण्ट्रॅक्ट म्हणजे लेबर कॉण्ट्रॅक्टर कडून हायर केलेले लेबर जर तुम्ही रेग्युलर एम्प्लॉयी सारखे राबवत असाल तर त्याला न्यायालयांनी फायदे दिलेले आहेत. तसेच काही केसेस मधे कायमस्वरुपी करून घ्यायला लागलेले आहे.

गुजरात मधे हे कायदे धाब्यावर बसवण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतले अनेक उद्योग गुजरातेत गेले. तिथे लेबर कॉण्ट्रॅक्ट्रच्या टोळ्या आल्या. यातून नवे माफिया उभे राहीले. कायमस्वरुपी कामगार ही संकल्पनाच मोडीत काढली गेली जी बेकायदेशीर होती.

पुण्याच्या लेबर कमिशनरचे याच विषयावरचे भाषण एकदा मी आयोजित केले होते. त्या वेळी अनेक शंकांना त्यांनी वरीलप्रमाणे उत्तरे दिली. लोकांच्या मनात गोंधळ होता.
ठेका, ठेकेदार आणि कामगार यातला गोंधळ त्यांनी असा स्पष्ट केला.
कामाचा असतो तो ठेका. मनुष्यबळाचा ठेका नसतो. घरात इलेक्ट्रिकचे काम करायचे असेल तर तो ठेका दिला जातो. त्या कामासाठी तो आपले मनुष्यबळ वापरतो. पण तुम्ही कारखाना टाकला आणि रोज चार माणसे पाहीजेत असा ठेका दिला तर तो बेकायदेशीर. कारखान्यातले भंगार उचलण्याचा ठेका दिला जाऊ शकतो. कारण ते रोजचे काम नाही.
पण कारखाना स्वच्छ ठेवणे हे काम दाखवून ठेका दिला तर वादाचा विषय आहे. कारण कारखान्यात स्वच्छतेसाठी कामगारांची जागा आवश्यक आहे हे त्यातून सिद्ध होते. त्यासाठी मग कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे २०० कि ३०० दिवसांचा ठेका देऊन ठेका ब्रेक करतात आणि नवीन ठेका दिला जातो.
जर स्वच्छता सेवा पुरवणारी कंपनी असेल आणि तिच्याकडचे कामगार कायमस्वरुपी असतील व ती कायद्याने त्यांना सर्व फाएदे देत असेल तर मग वादाचा मुद्दा होत नाही.
कायद्याचा उद्देश शोषण होऊ नये एव्हढाच आहे.

घरगुती कामांसाठी पण हा उपाय योग्य वाटतो. भांडी घासणे, कपडे धुणे यासाठी सेवा पुरवणारी कंपनी असेल तर त्या कंपनीने रोजचा या कामाचा ठेका घ्यावा. त्यासाठी मनुष्यबळ पुरवावे आणि कायद्याने जे देणे द्यायचे ते द्यावे. बाळंतपणाची रजाही द्यावी. त्या काळात बदली कामगार द्यावेत. फक्त त्यामुळे सेवा थोडीशी महाग होईल. पण हे योग्य होईल.

ऑर्ग्युमेण्ट्स आणि काउण्टर ऑर्ग्युमेण्ट्स यामुळे हा वाद अनंत काळ चालू शकेल. त्या ऐवजी गोंधळ करणा-या सर्व संज्ञा मुद्दलात समजून घेतल्या आणि त्यामागचे विचार समजून घेतले तर लवकर वाद संपेल.

जरी माझ्या घरी येणा-या मेडला पण मी फायदे देऊ नका हे युक्तीवाद असंबद्ध वाटत असले तरी त्याचा संबंध आहेच. त्यांना का मिळत नाहीत यासाठी भारतातली विषम परिस्थिती समजून घ्यावी लागेल. इथे राज्यकर्त्यांचा नाईलाज होतो. मात्र ही विषमता दूर त्यांनीच करायची आहे. कायदे पाळण्यासाठी सर्वांना सक्षम बनवणे हा उपाय आहे, पळवाटा काढणे किंवा दुर्लक्ष करणे हा नाही.

Pages